Kanak Books
शेतकऱ्याचा आसूड | Shetkaryacha Asud | महात्मा जोतीराव फुले | Mahatma Jyotirao Phule
शेतकऱ्याचा आसूड | Shetkaryacha Asud | महात्मा जोतीराव फुले | Mahatma Jyotirao Phule
Couldn't load pickup availability
"‘ इतर गावकर्यांसारखा मी पैमाष करणार्या भटकामगारांची मूठ गार केली नाही यास्तव त्यांनी टोपीवाल्यास सांगून मजवर शेतसारा दुपटीचे वर वाढविला व त्याच वर्षी पाऊस अळम टळम पडल्यामुळे एकंदर सर्व माझ्या शेत व बागाईती पिकास धक्का बसला. इतयात बाप वारला व त्याच्या दिवसमासाला बराच खर्च झाला, यामुळे पहिले वर्षी शेतसारा वारण्यापुरते कर्ज ब्राह्मण सावकारांपासून काढून त्यास मळा गहाण देवून रजिस्टर करून दिला. पुढे त्याने मन मानेल तसे मुद्दल कर्जावरील व्याजाचे कच्चयाचे बच्चे करून माझा बारवेचा मळा आपल्या घशात सोडला. आता मी हल्ली सालचा शेतसारा द्यावा तरी कोठून? बागाइतांत नवीन मोटा विकत घेण्याकरिता जवळ पैसा नाही. जुन्या तर अगदी फाटून त्यांची चाळण झाली आहे. जनावरांना पोटभर चारा मिळत नसल्यामुळे कित्येक धट्टेकट्ठे बैल उठवणीस आले आहेत. सुनाबाळांची नेसण्याची लुगडी फाटून चिंध्या झाल्यामुळे लग्नात घेतलेली मौल्यवान जुनी पांघरुणे वापरून त्या दिवस काढीत आहेत. घरातील धान्य सरत आल्यामुळे राताळ्याच्या वरुवर निर्वाह चाहू आहे... ’
११८३ साली फुलेंनी मांडलेल्या या शेतकर्याच्या स्वगतात आणि त्याच्या आजच्या स्थितीत किती अंतर आढळेल?(!) एक समाज म्हणून आपण अंतर्मुख होऊ शकलो का? कुठल्याही महात्म्याने खर्ची घातलेली ऊर्जा नागरिक म्हणून आपण तेवत ठेवू शकलो का?
यांपैकी एका जरी प्रश्नाचं ‘प्रामाणिक’ उत्तर आपण स्वत:लाच देऊ शकलो, तरी धुगधुगी जिवंत आहे म्हणायला हरकत नाही!"
Share
