Skip to product information
1 of 2

Diamond Publications

अदृश्य माणूस

अदृश्य माणूस

Regular price Rs. 0.00
Regular price Sale price Rs. 0.00
Sale Sold out

ती बोलत असतानाच एक अत्यंत अद्भुत गोष्ट घडली. पलंग आणि खुर्चीवरचे कपडे आपोआप गोळा झाले आणि त्या कपड्यांचा गठ्ठा हवेतून उडत जात जिन्यावरून अचानक खाली गेला. जणू कुणीतरी कपड्यांचा ढीग हातात धरून तो खाली फेकला असावा. खुर्चीच्या पाठीला अडकवलेली पाहुण्याची हॅट पुढच्याच क्षणी हवेत गोलगोल फिरायला लागली आणि मि. हॉलच्या दिशेनं अचानक चाल करून आली... खोलीतलं फर्निचर हवेत उडत विजयी नृत्य करत असल्यासारखे आवाज काही क्षण येत राहिले. मग सगळं काही शांत झालं.
एका इंग्लिश खेडेगावातल्या पथिकाश्रमात ऐन हिवाळ्यात एक विचित्र दिसणारा अनोळखी इसम येतो. पथिकाश्रमाच्या मालकिणीला आणि गावकर्‍यांना हा इसम विक्षिप्त, गूढ वाटत असतो, पण जेव्हा त्याचं खरं रूप समोर येतं, तेव्हा सगळे जण हादरून जातात. कारण तो माणूस अदृश्य असतो !
प्रसिद्ध विज्ञानकथा लेखक एच.जी. वेल्स यांच्या प्रतिभेतून अवरतेली, पिढ्यान् पिढ्या वाचली गेलेली आणि मानवी मनातल्या दुष्ट प्रवृत्तीला अधोरेखित करणारी ही कादंबरी एकाच वेळी खिळवून ठेवते आणि अंतर्मुखही करते.

View full details