{"product_id":"striyanchya-niyatkalikancha-itihas","title":"स्त्रियांच्या नियतकालिकांचा इतिहास","description":"\u003cp\u003eएकोणिसावं शतक स्त्री-भान, स्त्री-जाणिवा सर्वार्थानं सजग होण्यात उल्लेखनीय स्थित्यंतर घेऊन आलं. सार्वजनिक अवकाशात अनेकानेक माध्यमांतून स्त्रियांच्या विचारजाणिवा प्रखरतेनं अभिव्यक्त होण्याचा हा काळ होता. याला मोलाची साथ मिळाली ती स्त्री-विषयक नियतकालिकांची. कैक काळ थोपवलेली, दडपलेली, दबून राहिलेली स्त्रियांच्या भावविश्वातली स्पंदनं, शब्द नि लेखणीतून या नियतकालिकांमधून असोशीनं व्यक्त होऊ लागली. या अर्थी स्त्रियांचं समाज-सांस्कृतिक तथा राजकीय विचारभान व्यापक करण्यात, स्त्री विकासाची बिजं भवतालात रुजवण्यात ती मदतगार ठरली. स्त्री प्रबोधनाची धुरा जोपासण्यात, दृढमूल करण्यातही त्यांचा लक्षणीय वाटा आहे. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  १८५५ मध्ये प्रथमतः सुरू झालेलं ‘सुमित्र’ ते आजघडीचं ‘मिळून सार्याजणी’, ‘माहेर’, ‘मानिनी’, ‘प्रपंच’, ‘बहिणा’ असा हा प्रदीर्घ प्रवास रेखता येतो. या सर्व ज्ञात-अज्ञात नियतकालिकांचा खोलवर धांडोळा प्रस्तुत ग्रंथामधून डॉ. स्वाती कर्वे यांनी घेतला आहे. स्त्रियांच्या नियतकालिकांचं ऐतिहासिक दस्तऐवजीकरणच त्यांनी साकार केलं आहे. स्त्री-अभ्यासातही यामुळे मौलिक भर पडलेली आहे.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964765724963,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/871f.jpg?v=1750157570","url":"https:\/\/kanakbook.in\/products\/striyanchya-niyatkalikancha-itihas","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}