{"product_id":"shitti","title":"शिट्टी","description":"\u003cp\u003eनिरामय मानवी नातेसंबंधांची कल्पना करता येते? शोध चालूच आहे. अनेक पातळ्यांवरचे विरोधाभास सोसत वाटचाल चालू आहे. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eवाटचाल चालू आहे अजूनही हे महत्त्वाचं नाही? इतके उत्पात सोसूनही शोध चालू आहे हे?\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eकिती नकार पचवले, किती वंचना आणि वर्चस्वांना नाकारले, संघर्ष केले आणि तरीही आपण निरामय नातेसंबंधांची भाषा बोलतो.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eएकमेकांच्या सोबत राहण्याच्या अनिवार्यतेला नाकारत-स्वीकारत आपण अजूनही आशा करतो की, मानवी नातेसंबंध सगळ्या दुःखातून मुक्त होतील. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eकधी स्वतःच्या मर्यादांचा तिरस्कार करत तर कधी दुसर्यांोच्या, \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eस्मृती-विस्मृतींना जोखत, परजत, पारखत, स्वीकारत चालत राहतो. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eनिखळ मैत्रीचे क्षण शोधण्याची आस मनात सांभाळत. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eव्यक्तिगत इतिहासावर या सगळ्याचे ताण जाणवत राहतात. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eमग लक्षात येतं की, संपूर्ण मानववंश-संस्कृतीची मीमांसा \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eआपल्या या शोधाच्या पाठीशी असायला लागेल,\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eनिव्वळ एकट्या व्यक्तीचा इतिहास पुरेसा नसतो नातेसंबंधांच्या शोधात. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eइतिहास, साहित्य, कला, संस्कृती, राजकारण हे सगळे कारणीभूत असतात नात्यांच्या परिस्थितीला. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eतेव्हा निरामय नातेसंबंधांची भ्रांतिका बनवण्यापेक्षा \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eसम्यक भानातून भविष्याकडे जाण्याची वाटचाल\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eअधिक खात्रीशीर...\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964744950051,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/817f.jpg?v=1750156757","url":"https:\/\/kanakbook.in\/products\/shitti","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}