{"product_id":"samakalin-samajik-chalwali","title":"समकालीन सामाजिक चळवळी - संकल्पना - स्वरूप - व्याप्ती","description":"\u003cp\u003eपक्षीय चळवळी आणि सामाजिक आंदोलने यांच्यात जसजशी फारकत होत गेली तसतशी एकप्रश्नलक्ष्यी चळवळ वाढत गेली.  बिगर शासकीय संघटनांनीही मोठा अवकाश व्यापला आहे. शिवाय, समाजातील विविध समूहांमध्ये जसे आत्मभान व जागृती वाढली तसे त्या समूहांची, आत्माविष्काराची व आपापल्या हितसंबंधांचे संवर्धन करण्याच्या गरजेतूनही चळवळी एकप्रश्नलक्ष्यी बनल्या; मात्र, एकप्रश्नलक्ष्यी चळवळींनी आपापल्या क्षेत्रात कार्य करत असतानाच समग्रलक्ष्यी परिवर्तनवादी चळवळींशी जैवसंबंध राखले पाहिजेत. सुट्या सुट्या प्रश्नांवरची आंदोलने महत्त्वाच्या टप्प्यांवर एकेकटी पडतात.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eराज्यसंस्थेच्या माघारीतून सामाजिक चळवळींना उपलब्ध झालेला अवकाश हा जमातवादी, धर्मांध, मूलतत्त्ववादी शक्तींच्या हाती न जाण्यासाठी कोणत्या प्रकारची उपक्रमशीलता (इनिशिएटिव्ह) दाखवली पाहिजे, याचा परिवर्तनवाद्यांनी विचार केला तरच प्रत्येक सामाजिक चळवळीला विधायक प्रतिसाद देणे शक्य होईल.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e- प्रा. यशवंत सुमंत \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964767101219,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/879f.jpg?v=1750157604","url":"https:\/\/kanakbook.in\/products\/samakalin-samajik-chalwali","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}