{"product_id":"krushi-bhugol-bharat","title":"कृषी भूगोल (भारताच्या विशेष संदर्भासह)","description":"\u003cp\u003eकृषी भूगोल व भारतीय शेती या विषयावरील हे संदर्भ पुस्तक; शेतीचा भौगोलिक, अर्थशास्त्रीय व समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करावयास प्रवृत्त करणारे असे आहे. जगात शेतीचा प्रारंभ व प्रसार कसा होत गेला अशा विषयापासून ते भूमी क्षमतामापन, कृषी कार्यक्षमतामापन, कृषी उत्पादकता, पोषण व भूक समस्या, अन्नसुरक्षा, भूमिहिन श्रमिक, महिला व बालके यांची स्थिती, पर्यावरण र्‍हास व शेती आणि शेतकर्‍यांचे आरोग्य अशा भारतीय शेतीच्या वर्तमान चर्चा विश्‍वापर्यंत या पुस्तकात सहजसोप्या भाषेत लेखिकेने ऊहापोह केला आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e मराठी माध्यमातून उच्च शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना, स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या तरुण वर्गास व शिक्षणक्षेत्रातील इतर संबंधितांना हे पुस्तक निश्चितच उपयुक्त आहे. या पुस्तकाचे आंतरविद्याशाखीय स्वरूप विशेष उल्लेखनीय आहे. लेखिकेला विषय शिकविण्याचा आणि पाठ्यपुस्तके, लेख लिहिण्याचा दीर्घ अनुभव असल्याची प्रचिती या पुस्तकातील लिखाणातून येते.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e आकृत्या, आलेख, संख्याशास्त्रीय तक्ते व नकाशे; तसेच शब्दार्थसूची व विषयसूची दिल्याने विषय समजण्यास सुलभ झाला आहे. एक चांगले आंतरविद्याशाखीय स्वरूप असलेले संदर्भ पुस्तक म्हणून त्याचे योगदान महत्त्वाचे आहे.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964735086883,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/762f.jpg?v=1750156432","url":"https:\/\/kanakbook.in\/products\/krushi-bhugol-bharat","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}