{"product_id":"gandhi-nawache-mahtma","title":"गांधी नावाचे महात्मा","description":"\u003cp\u003eमहात्मा गांधींचे निधन होऊन ३० जानेवारी २०१२ रोजी ६४ वर्षे पूर्ण होत आहेत. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e या महापुरुषाच्या सर्वंकष अशा जीवनविषयक विचारांचा प्रभाव गेली अनेक वर्षे कायम आहे आणि यापुढेही तो तसाच निरंतर राहणार आहे. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e गांधीजींची अहिंसा, शांतता, संवाद आणि समन्वय ही मूलभूत मूल्ये आजच्या बदलत्या वैज्ञानिक-यांत्रिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक पर्यावरणातही सुसंगत आहेत.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e गांधीजींचे विचार सर्व स्तरांमधील आणि सर्व वर्गांमधील माणसाला अंतर्मुख करणारे आहेत, एवढेच नव्हे तर आजच्या जीवघेण्या जीवनसंघर्षात आपापल्या जीवनशैलीचा पुनर्विचार करायला लावणारे आहेत.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e त्यांच्या या विचारांवरील - म्हणजेच गांधीवादावरील आणि पर्यायाने गांधीजींवरील- नेहरू, आचार्य अत्रे, सुभाषचंद्र बोस, जयप्रकाश नारायण, डॉ. आंबेडकर, शंकरराव खरात... अशा प्रतिभावंत विचारवंतांचे विचारप्रवर्तक लेख या ग्रंथात समाविष्ट केले आहेत. असे लेखक आजच्या काळात किमान वाचण्यास मिळणे, हेही तसे दुर्लभच!\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964716966179,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/591.jpg?v=1750155793","url":"https:\/\/kanakbook.in\/products\/gandhi-nawache-mahtma","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}