{"product_id":"श्यामची-आई-shyamchi-aai-साने-गुरुजी-sane-guruji","title":"श्यामची आई | Shyamchi Aai | साने गुरुजी | Sane Guruji","description":"\u003cp\u003eजगामध्ये आजपर्यंत अनेक कवींनी आणि लेखकांनी ‘आई’ संबंधी लिहिलेले असेल, कविता केल्या असतील, गोष्टी लिहिल्या असतील. पण मराठी भाषेत साने गुरुजींनी ‘श्यामच्या आई’ मध्ये मातृप्रेमाचे जे महान स्तोत्र रचून ठेवले आहे, असे अतीव माधुर्याने आणि मांगल्याने ओथंबलेले महाकाव्य दुसर्‍या कोणत्याही वाङ्मयात असेल, असे मला मुळीच वाटत नाही. अमृताशी पैजा जिंकण्याचे सामर्थ्य आपल्या मराठी भाषेत आहे असे ज्ञानेश्वर म्हणाले; पण वाटेल त्यांच्या मुखातून किंवा लेखणीतून निघालेली मराठी भाषा अमृताशी थोडीच पैजा जिंकू शकणार आहे? ते सामर्थ्य जसे ज्ञानेश्वरांच्या ‘ज्ञानेश्वरी’ मध्ये आहे, तसे गुरुजींच्या ‘श्यामच्या आई’ मध्ये आहे. ह्या दोन्हीही काव्यांत शुद्ध आणि निर्मळ प्रेम अगदी तुडुंब भरून वाहत आहे. अमृतदेखील अळणी पडेल, अशी नितांत मधुर स्थळे ठिकठिकाणी या काव्यात अगदी हारोहारीने लागून राहिली आहेत. द्राक्षांचे घडच्या घड नुसते लोंबाताहेत चहूकडे. त्यातले किती तोडावेत अन् किती चाखावेत? अगदी वेड लागायची पाळी येते खरोखर! ज्ञानेश्वरीप्रमाणेच ‘श्यामची आई’ हे मराठी भाषेचे एक अमर भूषण आहे, ह्यात काही शंका नाही.\u003cbr\u003e- आचार्य अत्रे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Kanak Books","offers":[{"title":"Default Title","offer_id":48790833791267,"sku":"","price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/KN001-shyamchiaai-back_3.jpg?v=1720080363","url":"https:\/\/kanakbook.in\/products\/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%88-shyamchi-aai-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%9c%e0%a5%80-sane-guruji","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}