{"title":"स्त्री-अभ्यास","description":"\u003cp\u003eस्त्री-अभ्यास  विषयासाठी उपयुक्त पुस्तके \u003c\/p\u003e","products":[{"product_id":"streevad-sahitya-ani-samiksha","title":"स्त्रीवाद साहित्य आणि समीक्षा","description":"\u003cp\u003eस्त्रीवादी चळवळ ही आधुनिक लोकशाहीवादी राजकारणाचा पाया असणारी चळवळ आहे. पुरुषांनी उभ्या केलेल्या व्यवस्थांचा पुनर्विचार करण्याची गरज आत्मभान आणि सामाजिक व्यवस्थांचा अभ्यास या दोन्हींमधून स्त्रियांच्या लक्षात आली.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्त्रीवादाविषयी बोलणं म्हणजे फक्त स्त्रियांनी स्त्रियांच्या प्रश्नांविषयी बोलणं नाही, तर स्त्री आणि पुरुष दोघांनीही, ते प्रश्न निर्माण करणार्यान व्यवस्थेविषयी बोलणं. मानवी संस्कृतीचं प्रगल्भ रूप अहिंसक, संवादी आणि सत्याधिष्ठित स्त्री-पुरुष नात्यातून घडतं. त्यासाठी दोघांचंही प्रशिक्षण व्हावं लागेल. पुरुषसत्ताक व्यवस्थेने अनेक क्षेत्रात गंभीर प्रश्न उभे केले आहेत. त्यांच्यावर उपाय शोधायचा, तर त्यासाठी स्त्री-पुरुष नात्यात बदल घडवणं पायाभूत ठरेल. या विचारांमधून जे तत्त्वज्ञान निर्माण होतं आहे, त्याला स्त्रीवाद असं म्हणतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया तत्त्वज्ञानाची वाटचाल समजावी म्हणून पाश्चात्त्य स्त्रीवादाच्या आणि भारतीय स्त्रीवादाच्या जडणघडणीचा आढावा या पुस्तकात घेतला आहे. तसंच स्त्रीवादी साहित्य कशाला म्हणता येईल आणि साहित्याची समीक्षा करण्यासाठी स्त्रीवादी निकष असू शकतील काय, याचा शोध घेतला आहे. स्त्रीवादी समीक्षेचे काही नमुनेही या पुस्तकात दिलेले आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्त्रीवादाच्या अभ्यासकांना, तसंच स्त्रीवादाविषयी जिज्ञासा असणार्याद सर्वांनाच हे पुस्तक निश्चित उपयुक्त ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964683378979,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/929f.jpg?v=1750154868"},{"product_id":"prashna-purushbhanache","title":"प्रश्न पुरुषभानाचे","description":"\u003cp\u003eपारंपरिक पुरुषपण न मिरवता थोडा चौकटीबाहेरचा विचार करणाऱ्या, माणुसपणानं जगू पाहणाऱ्या सर्वांसाठी ‘हे प्रश्न पुरुषभानाचे’ !\u003cbr\u003eमित्र-मैत्रीण, आई-बाप, नवरा-बायको, मालक–नोकर अशा कुठल्याही स्वरूपात नातेसंबंधांना सामोरं जाताना तो फक्त अन्यायग्रस्तांचा प्रश्न नसून, आपलं जगणं सुंदर आणि समृद्ध करण्याचा मार्ग आहे. हे समजून जगू पाहणाऱ्या नव्या पीढीला हे ‘प्रश्न पुरुषभानाचे’ आश्वासक साथ देईल. \u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964703432995,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/460f.jpg?v=1750155614"},{"product_id":"mahilanchya-sattasangharshacha-alekh","title":"महिलांच्या सत्तासंघर्षाचा आलेख","description":"\u003cp\u003e १९६० ते २००९ पर्यंतच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमधील महिलांच्या राजकीय सहभागाचे विश्‍लेषण ‘महिलांच्या सत्तासंघर्षाचा आलेख’ या पुस्तकात केले आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e राजकीय समावेशन (Political Inclusion), राजकीय वगळण्याची प्रक्रिया (Political Exclusion), लिंगभाव व पितृसत्ताकता (Gender and Patriarchy) या संकल्पनात्मक चौकटींमध्ये महिलांच्या राजकीय सहभागाचे चिकित्सक विश्‍लेषण या ठिकाणी केलेले आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e हे पुस्तक समावेशन व वगळण्याची प्रक्रिया धोरणनिर्मिती विभाग (Political Inclusion and Exclusion Department), स्त्री अभ्यास केंद्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र विभाग यांना उपयुक्त ठरणारे आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e ‘महिला सक्षमीकरण धोरण’ हे आधुनिक उदारमतवादाचा विकास व  विस्तार करणारे धोरण कसे आहे याचेही सविस्तर विवेचन या पुस्तकाद्वारे केले गेले आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e रमाबाई रानडे व शारदाबाई पवार यांनी कौटुंबिक चौकट मोडीत न काढता सार्वजनिक व व्यक्तिगत जीवनामध्ये उदारमतवादाचा वापर कसा केला, याचे स्पष्टीकरण येथे केले आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e त्याचप्रमाणे स्थानिक व राज्य पातळीवरील सत्तेमध्ये महिलांना किती प्रमाणात वाटा मिळाला याचेही संख्याशास्त्रीय माहितीच्या आधारे अभ्यासपूर्वक विश्‍लेषण केलेले आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964719522083,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/630f.jpg?v=1750155894"},{"product_id":"kautumbik-hinsachar","title":"कौटुंबिक हिंसाचार (वास्तवाला सामोरे जाताना)","description":"\u003cp\u003eकौटुंबिक हिंसाचार म्हटलं की, मनात येते शारीरिक इजा! पण एखाद्या स्त्रीवर शारीरिक आघाताबरोबर इतर प्रकारचाही अत्याचार होत असतो. समाजातल्या सर्व स्तरांमधील स्त्रियांवर घरामध्ये कमीअधिक प्रमाणात दररोज अत्याचार होत असतो.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e कौटुंबिक अत्याचार म्हणजे काय, आपण किंवा आपल्याजवळचे कोणी पीडित आहे का? अत्याचार होत असताना मदत कशी मागाल? कायदा काय सांगतो? आणि समाजातील स्त्रियांचा ह्या प्रश्‍नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे? ह्याची सखोल माहिती ह्या पुस्तकात दिली आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e व्यवसायाने मार्केट रिसर्च कन्सल्टंट असलेल्या मेधा ताडपत्रीकर ह्यांनी गेली अनेक वर्षे भारतातील व परदेशातील असंख्य पीडित महिलांशी प्रत्यक्ष संवाद साधून, त्यांना बोलते करून ‘कौटुंबिक हिंसाचार’ ह्या विषयाचा सखोल अभ्यास केला आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964720636195,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/641f.jpg?v=1750155950"},{"product_id":"womens-studies","title":"Women's Studies","description":"\u003cp\u003eVidyut Bhagwat is among the foremost scholars of a generation of scholarship in Women's Studies who moved with critical ease between the spaces of the women's movement and women's studies and took on the challenge of translating multidisciplinary feminist knowledges into interdisciplinary teaching and research programmes. These essays written over the last two decades show us the productive intellectual shifts in   doing social history of Maharashtra inaugurated by feminist engagement with the medieval and modern literatures of the region and outline the political, intellectual and institutional challenges posed to the making of women's studies over the last two decades. The collection spans varied themes in Maharashtra Studies will interest students and researchers in social sciences and humanities. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964720767267,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/642f.jpg?v=1750155956"},{"product_id":"dalit-striyanchya-mukticha-prashna","title":"दलित स्त्रियांच्या मुक्तीचा प्रश्न","description":"\u003cp\u003e\tउच्चजातीय बुद्धिजीवींनी मांडलेल्या सिद्धान्तांची विरचना करणे हे दलित स्त्रीवाद्यांपुढचे आव्हान आहे. कोणताही सिद्धान्त हा त्यांच्याशी किंवा त्यांच्या वास्तवाशी जुळणारा आहे किंवा नाही हे सतत तपासून पाहणे गरजेचे आहे. यामध्ये उच्चजातीयांनी निर्माण केलेल्या पद्धतिशास्त्राच्या संपूर्ण विच्छेदनाचा समावेश आहे. दलित स्त्रीवादाच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे दलित स्त्रीवाद स्वत:चे असे सैद्धान्तिक विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. यांतूनच दलित स्त्रीवादी दृष्टीकोन हा प्रमुख प्रवाही स्त्रीवादापेक्षा किंवा दलित पुरुषांच्या सिद्धान्तांपेक्षा अधिक सर्वसमावेशक होईल. परिणामी, दलित स्त्रीवादामध्ये सर्वाधिक एकात्म असे पर्यायी प्रमाणशास्त्र होण्याची क्षमता आहे.\n\u003cbr\u003eवास्तवाच्या उपलब्ध आकलनाहून वेगळा दृष्टीकोन अंतर्भूत असलेली स्वत:ची अशी भूमिदृष्टी विकसित करण्याचा प्रयत्न दलित स्त्रिया करत आहेत. व्यक्तिनिष्ठा, कर्तेपणा अशा संकल्पनांचा पुनर्विचार ह्या भूमिदृष्टीमुळे होईल. दलित स्त्रीवादी पद्धतिशास्त्रानुसार कोणतेही सैद्धान्तिक संशोधनमूल्य वा भूमिका निरपेक्ष नसते, म्हणजेच दलित स्त्रीप्रश्न अभ्यासकांना विद्याशाखीय क्षेत्रात फार मोठी कामगिरी बजावावी लागेल.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964745212195,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/834f.jpg?v=1750156771"},{"product_id":"strivaadi-samajik-vichaar","title":"स्त्रीवादी सामाजिक  विचार","description":"\u003cp\u003eपाश्‍चिमात्य जगातील स्त्रीवादी विचारांचा परिचय करून देणारे हे पुस्तक, आजघडीला जेव्हा आपण जागतिकीकरणाचा रेटा आणि धार्मिक मूलतत्ववाद अनुभवतो आहोत, त्यासंदर्भात महत्त्वाचे वाटते. आज स्त्रीवादाला हिरीरीने पाश्‍चिमात्य ठरवून फेकून देऊन संकुचित संस्कृतीनिष्ठ चौकटीत स्त्री-प्रश्‍न मांडला जातो आहे. अशावेळी चिकित्सक स्त्रीवाद विकसित व्हायचा तर आपण स्त्रीवादाचा अभ्यास जागतिक इतिहासाच्या संदर्भात करणे महत्त्वाचे आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपाश्‍चात्य जगातील स्त्रीवादाची पायाभरणी करणार्‍या या पुस्तकातील सहा विचारवंतांनी आपल्या काळातील सामाजिक-राजकीय प्रश्‍नांमध्ये रस घेऊन, कृती करून, आपला विचार मांडला. आज आपण जे स्त्रीवादी सिद्धांतन करू पाहतो आहोत, अथवा राजकीय परिवर्तन आणू पाहतो आहोत, त्याचा पाया निर्माण करणार्‍या ह्या विचारांचा अभ्यास म्हणूनच महत्त्वाचा ठरतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964752650531,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/243f.jpg?v=1750157034"},{"product_id":"bharatiya-vikasachi-vatchal","title":"भारतातील महिला विकासाची वाटचाल","description":"\u003cp\u003eस्त्रीवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण वाढत चालले आहे. ते संपूर्णपणे निर्मूलन होईल, थांबेल अशी अशा बाळगणे भाबडेपणाचे ठरेल. शासनातर्फे वेळोवेळी होणारे प्रतिबंधक कायदे, जनसामान्य स्त्री पुरूषांचे सातत्याने प्रबोधन, प्रसारमाध्यमांचा दबाव व त्यांच्यातर्फे होणारे जनजागरण व वातावरण निर्मिती ह्या सर्वांचा सामूहिक परिणाम म्हणजे त्या प्रमाणात होणारी घट. ह्या सर्व अत्याचार, अन्यायापासून मुक्त असा समाज निर्माण करणे ही दुरवरचे उद्दिष्ट आहे. अंतिम ध्येय आहे. त्यासाठीच शासन, जनसामान्य , प्रसारमाध्यमे , स्वयंसेवी संस्था ह्यांची बांधिलकी निर्माण होणे अगत्याचे आहे. भारतीय राज्यघटणेची उद्दिष्टे पायाभूत आहेत. समता, स्वातंत्र्य , बंधुता ह्या मूल्यांसाठीच भारतीय महिला विकासाची वाटचाल चालू आहे. \n\u003cbr\u003eमहिल विकासाच्या आगामी वाटचालीत परूषवर्गाच्या समंजसतेची, उदार मनोवृत्तीच्या नितांत गरज आहे. स्त्री मुक्तीची कार्यप्रेरणा ही पुरुषविरोधी, पुरुषाला शत्रू मानणारे असणार नाही कारण महिला मुक्तीबरोबरच पुरुषमुक्तीही होणार आहे . कौटुंबिक जीवन सुखी समाधानी, सुसंस्कृत होण्यासाठी पुरुष वर्गात सुयोग्य बदल, परिवर्तन वेगाने व्हायला हवा. पुरुषसत्ता , स्वामित्व भावना अधिकाधिक मवाळ, सहयोगपूरक व्हायला हवी. आगामी काळातील महिल विकासाची वाटचाल प्रामुख्याने पुरुषवर्गाच्या वृत्ती-प्रवृत्ती परिवर्तनावर अवलंबून आहे. \n\u003cbr\u003eअशा महिला विकासातील सर्व महत्वाच्या टप्प्यांचे दर्शन या पुस्तकातून होते.  \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964754682147,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/283f.jpg?v=1750157109"},{"product_id":"stri-sukta","title":"स्त्रीसूक्त","description":"\u003cp\u003e\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  समाज हे कुटुंबाचे व्यापक स्वरूप \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e आणि कुटुंबाचं सार म्हणजे स्त्री. अनादिकाळापासून हे सत्य मानले गेले.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e तसेच हेही सत्य आहे की या ‘सत्याची’ सत्यता टिकवून धरण्यासाठी स्त्रीच एकांगी झिजली, झटली, लुटली गेली. मात्र आता ती पुरातन, जाचक रूढींवर मात करत उभी राहते आहे. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e स्वत:च्या समस्या सोडवण्यासाठी तिने प्रत्येक टप्प्यावर प्रयत्न केले. आत्मविकासाकडे तिचा प्रवास हळूहळू पण नक्की होत गेला आणि अजूनही होत आहे. तिचं स्त्रीत्व, तिचं माणूसपण याचे खरे संदर्भ शोधण्याची तिची धडपड  आजही चालू आहे. त्या आजच्या स्त्रीचा प्रवास; माणूसपण, वैवाहिक जीवन आणि व्यक्तिमत्त्वविकास या तीन पातळ्यांवर\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e लेखिकेला महत्त्वाचा वाटतो.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e तिचा हा प्रवास, तिच्या जीवनातले हे परिवर्तन\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  छोट्या छोट्या उदाहरणांनी, सोप्या आणि संवादी भाषेत\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  जेथे उलगडले ते हे\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  स्त्रीसूक्त.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964757860643,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/315f.jpg?v=1750157222"},{"product_id":"saad-padsaad","title":"साद-पडसाद  : स्त्री-प्रश्नांचे चित्रण करणाऱ्या निवडक कादंबऱ्यांचा वेध ..'यमुना पर्यटन ते ब्र'","description":"एकोणिसाव्या शतकातील प्रबोधन पर्वात ‘स्त्री जीवन’ सांस्कृतिक जीवनात केंद्रवर्ती आले. स्त्री जीवना विषयीचे नवे भान येऊन स्त्रियांच्या प्रश्नांत नवे मार्ग काढण्याची कालसंगत प्रेरणाही निर्माण झाली. त्याचवेळी समाजजीवनाचे, माणसांच्या जीवनानुभवांचे चित्रण व्यापक पटावर करणार्‍या ‘कादंबरी’ या कथात्म साहित्य प्रकाराच्या लेखनाला सुरुवात झाली. साहजिकच ‘स्त्री जीवन’ कादंबरी लेखनाचा मुख्य विषय झाले.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e१८५७ साली प्रसिद्ध झालेली पहिली मराठी सामाजिक कादंबरी ‘यमुना पर्यटन’ तत्कालीन स्त्रीप्रश्नांचे चित्रण करणारीच होती. गेल्या १५० वर्षात ‘स्त्री’ हा समाजातील महत्त्वाचा परिवर्तनशील घटक आहे. या दीर्घकाळात स्त्री जीवन बदलत आले. स्त्रियांच्या प्रश्नांचे स्वरूप पालटत आले. बदलत्या स्त्री प्रश्नांचे ‘साद-पडसाद’ सामाजिक कादंबरीतून उमटले. स्त्री प्रश्नांची मांडणी करणार्‍या कादंबर्‍यांचा एक स्वतंत्र प्रवाहच विकसित झाला.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eविधवा विवाह, विषम विवाह, परित्यक्तेचे जीवन, घटस्फोट, पतिपत्नींचे बदलते नाते, १९७५ नंतर स्त्रीचे जागृत होणारे आत्मभान आणि स्त्रीची विकसित स्वयंनिर्णय क्षमता, इत्यादी प्रश्नांचे ‘साद-पडसाद’ कादंबर्‍यांतून चित्रित झाले. ‘यमुना पर्यटन’ (१८५७) ते ‘ब्र’ (२००५) या काळातील महत्त्वाच्या निवडक कादंबर्‍यांतील ‘साद-पडसादांचा’ आस्वादक व चिकित्सक वेध डॉ. स्वाती कर्वे यांनी घेतला आहे. स्त्री प्रश्नांबरोबर विकसनशील स्त्री जीवनाचा, बदलत्या सामाजिक, सांस्कृतिक जीवनाचा आलेखही प्रातिनिधिक स्वरूपात त्यांनी यामधून साकार केला आहे.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e- डॉ. रेखा साने-इनामदार\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964768805155,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/993f.jpg?v=1750157727"},{"product_id":"dr-gail-omvedt-samajshastriya","title":"डॉ. गेल ऑम्व्हेट समाजशास्त्रीय आकलन","description":"प्रा.डॉ.गेल ऑम्व्हेट या आंतरराष्ट्रीय किर्तीच्या संशोधक विचारवंत होत्या.त्यांची वैचारिक बांधिलकी ही सिद्धांत आणि कृतिशीलता यांच्याशी होती. इटालियन विचारवंत ग्राम्सी यांना अभिप्रेत असलेला 'जैविक विचारवंत' हा त्यांच्या समाजशास्त्रीय संशोधनामध्ये आढळतो. डॉ. गेल ऑम्व्हेट यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या क्रांतिकारक सांस्कृतिक विचारांना आंतरराष्ट्रीय अभ्यास विषयांमध्ये पहिल्यांदा आधिष्ठित केले. त्यांनी भारतातील जातवास्तवाचा प्रश्न हा समाजशास्त्रीय विचारविश्वात अग्रभागी आणला. स्त्री अभ्यासामध्ये वर्ग, जात, लिंगभाव आणि पर्यावरण यांच्यातील आंतरसंबंधांचा आलेख मांडला. त्याचबरोबर दलित स्त्रियांच्या अस्तित्वाची प्रारंभिक नोंद त्यांनी ठळक केली. डाव्या चळवळीतील चर्चाविश्व आणि कार्यक्रमपत्रिकेत फुले-आंबेडकरांचा क्रांतीदर्शी विचार उजागर करण्यामध्ये त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. भारतातील मार्क्सवादी विचार परंपरा आणि सिद्धांतनाचे फुले-आंबेडकरी परिप्रेक्षात विश्लेषण केले तरच समृद्ध होऊ शकेल हा त्यांचा आग्रह आहे .बुद्धाचा धम्मविचार आणि तुकोबांचा भक्तीविचार यांचा चिकित्सक अभ्यास हा भारतीय तत्वज्ञानाची मूलगामी ओळख करून देणारा आहे. भारतातील नव्या सामाजिक चळवळी’नी क्रांतीची पुनर्व्याख्या व्यापक केली असे त्यांचे मत आहे .दलित बहुजन विचारवंतानी आणि नेत्यांनी रविदासाचा बेगुमपुरा ,फुलेंचे बळीराज्य,पेरीयारांचे द्रविडस्थान, शाक्य बौद्ध धर्मीयांचे बौध्द राष्ट्रकुल आणि डॉ.आंबेडकरांचे प्रबुध्द भारत या भावचित्राला साकार करावे हे त्यांचे भविष्यदर्शी प्रतिपादन आहे . या ग्रंथामध्ये डॉ. गेल ऑम्व्हेट यांच्या बहुविध संशोधकीय आयामांच्या मूलग्राही चिकित्सक लेखांचा अंतर्भाव आहे. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e डॉ.सुरेंद्र जोंधळे \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964777095459,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1037f.jpg?v=1750158078"},{"product_id":"dr-gail-omvedt-samjun-ghetana","title":"डॉ. गेल ऑम्व्हेट समजून घेताना","description":"वैज्ञानिक दृष्टीकोन, समतेचे तत्त्वज्ञान, लोकशाहीनिष्ठा, बुद्धिप्रामाण्यवाद, सामाजिक बांधिलकी आणि परिवर्तन हे डॉ. गेल ऑम्व्हेट यांच्या साहित्याचे आणि विचार-व्यवहारमूल्यांचे केंद्र राहिले आहे. आज समाजात सांस्कृतिक दहशतवाद, जातीय अभिमान, अवास्तव धर्मभान आणि धर्मवादी सांप्रदायिकता हेच विश्वभान म्हणून अभिव्यक्त होण्याइतकी संकुचितता आलेली आहे. या पार्श्वभूमीवर, डॉ. गेल ऑम्व्हेट परिवर्तनवादासाठी महत्त्वाच्या ठरतात. आज आभासी वास्तविकता, हायपर टेक्स्ट यांसारख्या संकल्पना आणि उत्तर आधुनिक दृष्टीकोनासारखे परिप्रेक्ष यांमुळे विशिष्ट तत्त्वज्ञानाशी बांधिलकी असण्याचे युग संपुष्टात आले आहे. त्यामुळे यथार्थ सामाजिक वास्तव आणि त्याच्या परिवर्तनाच्या दिशा स्पष्ट होताना दिसत नाहीत.\u003cbr\u003eडॉ. गेल ऑम्व्हेट यांनी ज्ञानाच्या साचलेपणाची कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या या समृद्ध लेखणीला बुद्ध-मार्क्स-फुले-आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानाची पार्श्वभूमी असल्याने त्यांच्या कर्तृत्वाची उजेडवाट लखलखीत झालेली आहे. समाजव्यवस्था, समाजवास्तव आणि शोषण यांबद्दलची त्यांची जाण फारच स्पष्ट होती. बदलत्या ‘ग्लोबल व्हिलेज’च्या काळात दलित-शोषित जीवनाची आणि पुरुषसत्ताक जातिव्यवस्थेची बदलती परिमाणे सुरुवातीपासूनच आपल्या साहित्यातून अधोरेखित करत त्यांनी जातिअंताचा विचार मांडला. याचाच वेध या पुस्तकातून घेण्यात आला आहे.\u003cbr\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964777128227,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1038f.jpg?v=1750158084"},{"product_id":"snshodhn-krtaanaa","title":"संशोधन करताना","description":"संशोधन क्षेत्रात करण्यासारखे खूप आहे. एम्.फिल. व मुख्यत: पीएच.डी.पदवीसाठी संशोधन करावेच लागते. तसेच एम्.ए., एम.कॉम, एम्.बी.ए. या पदवी अभ्यासासाठीही संशोधन उपयुक्त ठरते, हे सर्वांना ज्ञात आहेच. याशिवाय शिष्यवृत्तीसाठी, स्वतःला रूची आहे म्हणून अनेकजण संशोधन करीत असतात. पत्रकारिता करतानाही एखाद्या समस्येवर संशोधन करुन त्याची मांडणी व त्यावर उपाय सुचवावे लागतात.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e संशोधन करताना हे पुस्तक वरील सर्व अभ्यासकांना उपयोगी पडेल. याशिवाय व्यावसायिक संशोधक म्हणून काम करताना, सल्लागार म्हणून काम करतानाही हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल यात शंका नाही.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964779290915,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/213f.jpg?v=1750158217"},{"product_id":"kraantijyotii-saavitriibaaii-phule-strii-shikssnnaacaa-paayaa-rcnnaarii-dhgdhgtii-mshaal","title":"क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले - स्त्री-शिक्षणाचा पाया रचणारी धगधगती मशाल","description":"एक दिवस तर हद्दच झाली. सावित्रीबाई शाळेत निघालेल्या असताना त्यांच्या वाटेत एक धटिंगण गुंड येऊन उभा राहिला. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e‘‘ए बाई, बर्‍या बोलानं घरी जा... न्हाईतर फुडं जे व्हईल, त्याची जिम्मेदारी माझी नव्हं!’’ त्याने दम दिला. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eत्या गुंडाचा अविर्भाव बघून सावित्रीबाई क्षणभर गांगरल्या, पण त्यांनी लगेचच सगळं अवसान गोळा केलं आणि पुढे होऊन त्या गुंडाला एक जोरदार थप्पड लगावली. गुंडाला याची अजिबातच अपेक्षा नव्हती. सावित्रीबाईंनी त्याच्या धमकावण्याला उत्तरही दिलं, पण ते ऐकायला तो तिथे थांबलाच नव्हता. त्याने तडक पोबारा केला होता!\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eसमाजाचं काम करणार्‍या माणसाकडे जितकी आत्मीयता, तितकीच धमक आणि तितकाच संयमही लागतो. या तिन्हींचा अर्क म्हणजे ‘सावित्रीबाई फुले’! अर्थात अशा बाईला जर जोतिरावांसारख्या जोडीदाराची साथ मिळाली, तर ’स्त्री-पुरुष समानता’ हे फक्त शब्द राहत नाहीत. त्या संपूर्ण समाज-बदलाच्या पाऊलखुणा ठरतात.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eम्हणूनच हे पुस्तकं वाचकांच्या हाती ठेवणं, म्हणजे एका अर्थी उत्तम नागरिक घडवण्याच्या दिशेने छोटंसं पाऊल टाकणं!\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964779749667,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1055f.jpg?v=1750158240"},{"product_id":"tattvadnyan-va-samajik-sashtre-yatil-sanshodhan-paddhati","title":"तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रे यातील संशोधन-पद्धती | Tattvadnyan Va Samajik Sashtre Yatil Sanshodhan-paddhati","description":"\u003cp\u003e\"विसाव्या शतकाच्या मध्याला पाश्चिमात्य जगतात आंतरविद्याशाखीय अभ्यासाची लाट विशेषत्वाने उफाळून आली. कालांतराने ही लाट भारतीय ज्ञानक्षेत्रसुद्धा व्यापू लागली. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठासारखी संस्था यात अग्रेसर होती...भारताच्या नव्या शैक्षणिक धोरणात आंतरविद्याशाखीय अभ्यासाला पूर्वीपेक्षा अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रातील २०१६च्या विद्यापीठ कायद्यात आंतरविद्याशाखीय अभ्यासक्षेत्रासाठी स्वतंत्र पूर्णवेळ अधिष्ठाता नियुक्त करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e...याबाबत आपल्याकडची स्थितीसुद्धा बदलत चाललेली आहे. कायदा असो, साहित्य असो, कला असो वा क्रीडा असो, अशा विविध क्षेत्रांना आंतरविद्याशाखीयतेने व्यापून टाकलेले आहे. किंबहुना आंतरविद्याशाखीयता हा आजचा युगधर्म आहे.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eप्रस्तुत ग्रंथ हा वर उल्लेखिलेल्या युगधर्माचे भान राखणारा ग्रंथ आहे. हा ग्रंथ सिद्ध करणे हे एक आव्हानात्मक काम होते. ते काम प्रा. मीनल कातर्णीकर व प्रा. लता छत्रे यांनी केलेले असल्याने त्या दोघी अभिनंदनास पात्र आहेत. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e- डॉ. राजा दीक्षित\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eसुप्रतिष्ठित प्राध्यापक (Emeritus Professor),\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eअध्यक्ष व प्रमुख संपादक, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ\"\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eA Marathi language book on Research Methodology in Philosophy and Social Sciences . Edited by Prof. Meenal Katarnikar and Prof. Lata Chhatre.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964782567715,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/3d-1077-tattvadnyancover.jpg?v=1750158366"}],"url":"https:\/\/kanakbook.in\/collections\/womens-studies.oembed","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}