{"title":"शिक्षणशास्त्र","description":"\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eशिक्षणशास्त्र विषयासाठी उपयुक्त पुस्तके\u003c\/p\u003e","products":[{"product_id":"shaikshanik-sanshodhan-paddhati","title":"शैक्षणिक संशोधन पद्धती","description":"\u003cp\u003e• डी.एल.इडी., बी.एड., एम.एड. व शिक्षणशास्त्र विषयातील एम्.फिल. व पीएच.डी. करणार्यांना संशोधन विषयासाठी उत्तम मार्गदर्शन.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e• पाठ्यपुस्तक मंडळ, एस.एस.सी., एच.एस.सी.बोर्ड, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था यांसारख्या मान्यवर संस्थांचे शैक्षणिक संशोधन प्रकल्प घेणार्यांना विशेष उपयोगी.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e• सामाजिक शास्त्रातील समाजशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, व्यवस्थापन, वाणिज्य, शारीरिक शिक्षण, कायदा यांसारख्या विषयांमधील संशोधकांना मार्गदर्शक.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e• शैक्षणिक संशोधन क्षेत्रातील नवीन संकल्पनांचा समावेश. उदाहरणार्थ, संशोधन व संकल्पना स्पष्ट करणारी सोपी व सुलभ भाषा.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e• संशोधनात क्रमाने येणार्या ५९ संज्ञांचा पहिल्याच प्रकरणात दिलेला अर्थ व व्याप्ती.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e• संशोधनात संख्याशास्त्राचा उपयोग कसा करावा याची सुलभ माहिती.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e• मराठीतील शैक्षणिक संशोधनपर पुस्तकांमध्ये महत्त्वपूर्ण भर.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e• प्रश्नपेढी, शैक्षणिक संशोधन-शब्दकोश, विषयसूची यांचा समावेश. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964683149603,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/928f.jpg?v=1750154862"},{"product_id":"europatil-arambhichya-vidyapeethancha-uday","title":"युरोपातील आरंभीच्या विद्यापीठांचा उदय","description":"\u003cp\u003eसालेर्नो, बोलोग्ना आणि पॅरिस ही युरोपातील आरंभीची विद्यापीठे होत. या विद्यापीठांचा उदय नेमका केव्हा झाला हे सांगता येत नाही. या विद्यापीठांना संस्थापक नाही. ही विद्यापीठे उदयास आली आणि वाढत गेली. आरंभी या विद्यापीठांना त्यांच्या स्वत:च्या इमारती नव्हत्या. त्यांना त्यांची स्वत:ची ग्रंथालये नव्हती आणि प्रयोगशाळाही नव्हत्या! प्राचीन भारतात तक्षशिला, नालंदा ही प्रसिद्ध विश्वविद्यालयेच होती. बाहेरून आलेल्या आक्रमकांनी ती उद्ध्वस्त केली. इ. स. १८५७मध्ये लंडन विद्यापीठाच्या धर्तीवर हिंदुस्थानात पहिली तीन विद्यापीठे कोलकाता, मुंबई आणि मद्रास (हल्लीचे चेन्नई) येथे सुरू झाली. हिंदुस्थानातील विद्यापीठ शिक्षणाची परंपरा युरोपात स्थापन झालेल्या आरंभीच्या विद्यापीठांपासून येते; नालंदा, तक्षशिलेकडून नव्हे! \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eलेखक रवींद्र लक्ष्मण लोणकर यांनी सर परशुराम भाऊ महाविद्यालय, पुणे येथे ३० वर्षे इतिहास विषयाचे अध्यापन केले. ‘रेनेसॉं’ हा त्यांचा विशेष अध्ययनाचा विषय आहे.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964684788003,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/942f.jpg?v=1750154932"},{"product_id":"balshikshanache-adharstambh","title":"बालशिक्षणाचे आधारस्तंभ","description":"\u003cp\u003e\tगिजुभाई, ताराबाई, अनुताई यांची जडणघडण आणि कार्य स्वातंत्र्यलढ्याच्या काळातीलच होते. जरी राजकीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी थेट उडी घेतली नसली तरी, या लढ्यामागील  स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या तीन  तत्त्वांचा आविष्कार, त्यांच्या आचरण आणि कृती यामध्ये वेगळ्या स्वरूपात झाला. पानसे यांची जडणघडण स्वातंत्र्यानंतर ताबडतोबच देशउभारणीच्या कल्पनेने भारलेल्या काळात झाली.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \tया चौघांवरही गांधीजींच्या विचारांचा विलक्षण प्रभाव दिसून येतो. तरीही त्यांनी कळत- नकळत काहीशी वेगळी वाट चोखाळली. समाजातील प्रत्येक स्तरातील बालकांना स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे, ते विकसित करण्याचा त्यांंना पूर्ण हक्क आहे आणि यासाठी समाजाने त्यांना मदत करायला हवी, हे त्यांनी आपल्याला येथे प्रथम दाखवून दिले. यादृष्टीने पाहता या चौघांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला एक वेगळे परिमाण दिले, त्याची व्याप्ती वाढवली असे म्हणता येईल.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964687638819,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/962f.jpg?v=1750155036"},{"product_id":"mahavidyalaya-karyalayeen-kamkaj","title":"महाविद्यालय कार्यालयीन कामकाज","description":"\u003cp\u003eस्वातंत्र्यानंतर उच्च शिक्षणासाठी प्रगत राष्ट्रांप्रमाणे भारताचा विकास साधावयाचा असेल तर, उच्च शिक्षण घेणार्‍या व्यक्तींचे प्रमाण वाढविणे गरजेचे आहे, यासाठी गेल्या ६० वर्षात भारतातील विद्यापीठे व महाविद्यालय यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे, सदरकामी केंद्र व राज्य शासनाची पूरक धोरणे विचारात घेता, महाविद्यालयांची संख्या वाढ होत आहे. त्याचबरोबर विद्यापीठ  व महाविद्यालय यांच्या दर्जा निश्‍चितीसाठी स्वतंत्र यंत्रणा राबविण्यात येत आहेत. यामुळे महाविद्यालय चालविणारे संस्थाचालक,  महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, सेवक व विद्यार्थी यांना शासन नियमांची व महाविद्यालय कार्यालयीन कार्यपद्धतीची माहिती असणे अत्यंत गरजेचे झालेले आहे. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e संस्थाचालक, प्राचार्य, प्राध्यापक, सेवक व विद्यार्थी यांना महाविद्यालय कार्यालयीन कामकाजाच्या पूर्ततेसाठी त्याचे मार्गदर्शक स्वरूप माहिती असणे यासाठी सदर ग्रंथाचे महत्त्व हे एका शिक्षकेतर सेवकाने त्यांच्या ३९ वर्षाच्या कार्यालयीन कामकाजाच्या अनुभव संपन्नतेमधून विद्यापीठ आर्थिक व्यवहार, कार्यालयीन रेकॉर्ड, शासन आदेश, नॅक मूल्यांकन, माहिती अधिकार या सर्व बाबींचा समावेश केल्याने अनन्यसाधारण असे आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e महाविद्यालय कार्यालयीन कामकाज नियोजनपूर्वक व बिनचूक होऊन कार्यक्षमतेमध्ये गुणात्मक वाढ होण्यासाठी सर्व शिक्षकेतर सेवक यांना हा ग्रंथ मार्गदर्शक आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964692816163,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/29f.jpg?v=1750155242"},{"product_id":"balshikshan-swaroop-aani-navi-disha","title":"बालशिक्षण : स्वरुप व नवी दिशा","description":"\u003cp\u003eमज्जामानसशास्त्रातील घडणार्‍या घटनांकडे जागरूकतेने पाहिल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत आहे ती अशी की, आता लहान मुलाकडे, शिकत असलेल्या शाळकरी मुलाकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलली आहे. एवढेच नव्हे तर या नव्या दृष्टीतून न्याहाळलेले बालकही आता वेगळे दिसू लागले आहे. आता घरी वा शाळेत आपल्यासमोर उभे राहणारे मूल, हे या सर्व शोधांच्या आधारावर आपण समजून घेतलेले बालक म्हणून आपल्यासमोर उभे राहणार आहे. आपण आजवर मानत आलो तसे अज्ञानाने गृहित धरलेले ते बालक नाही. तर आपल्या अतर्ंगत शक्तींच्या नि आपल्या आजूबाजूच्या आजवरच्या उभ्या राहिलेल्या संस्कृतीच्या आधारे, स्वतःच जगाची ओळख करून घेणारे असे ते मूल आहे. जगातील विविध वस्तू, नि घटनांचे आपल्या पद्धतींनी अर्थ लावणारे, नि त्याचे स्वतःपुरते स्वतंत्र सिद्धान्त बांधणारे असे ते बालक आहे. ते ज्ञाननिर्मिती करणारे शास्त्रज्ञही आहे नि ते तेवढेच प्रभावी असे निर्मितीक्षम कलावंतही आहे.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964692980003,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/37f.jpg?v=1750155252"},{"product_id":"sharirik-shikshan-mapan-mulyamapan","title":"शारीरिक शिक्षण: मापन मूल्यमापन","description":"\u003cp\u003eशारीरिक शिक्षण विषयाच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त संदर्भ ग्रंथ. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील महाविद्यालयांसाठी उपयुक्त. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964693078307,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/40f.jpg?v=1750155258"},{"product_id":"kho-kho-shastrokt-margdarshan","title":"खो-खो शास्त्रोक्त मार्गदर्शन","description":"\u003cp\u003eखोखो खेळाची शास्त्रोक्त माहिती देणारे पुस्तक. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील महाविद्यालयांसाठी उपयुक्त. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964693438755,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/42_KHO_KHO_Shastroktt_Margdarshan_2.jpg?v=1750155324"},{"product_id":"volleyball-sampurn","title":"व्हॉलीबॉल संपूर्ण","description":"\u003cp\u003eव्हॉलीबॉल खेळाची शास्त्रोक्त माहिती देणारे पुस्तक. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील महाविद्यालयांसाठी उपयुक्त.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964695404835,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/43_VOLYBALL_Sampurn_2.jpg?v=1750155330"},{"product_id":"vividh-purak-khel","title":"विविध  पुरक खेळ","description":"\u003cp\u003eशारीरिक शिक्षण विषयाच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त संदर्भ ग्रंथ. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील महाविद्यालयांसाठी उपयुक्त. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964695535907,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/44_VIVIDH_PURAK_KHEL_2.jpg?v=1750155336"},{"product_id":"diamond-shikshanshastra-kosh","title":"डायमंड शिक्षणशास्त्र कोश","description":"\u003cp\u003eप्रस्तुत स्पष्टीकरणात्मक कोश म्हणजे एक संक्षिप्त ज्ञानकोशच आहे. या कोशामध्ये प्रथम इंग्रजी संज्ञा घेऊन त्यांना मराठी प्रतिसंज्ञा दिलेल्या आहेत. नंतर त्या संज्ञा-सिध्दांताचे मराठी भाषेत स्पस्टीकरण दिले आहे. त्यामुळे इंग्रजी भाषेतील ग्रंथ वाचत असताना अर्थाविषयी येणार्‍या अडचणी दूर होणार आहेत. एवढेच नव्हे तर प्रत्येक विषयाच्या कोशाच्या शेवटी मराठी-इंग्रजी पारिभाषिक शब्दावली दिलेली असल्याने मराठी भाषेतील ग्रंथ वाचकांचीही सोय झालेली आहे. आज मराठी भाषेत एकतर प्रदीर्घ स्वरूपातील ज्ञानकोश आहेत किंवा केवळ मराठी प्रतिशब्द देणारे शब्दकोश आहेत. परंतु मराठी प्रतिशब्दासह मराठीमध्ये संक्षिप्त स्वरूपात स्पष्टीकरण देणारे कोश उपलब्ध नाहीत. ॠामाजिक शास्त्रांच्या बाबतीत ही गरज या कोशामुळे भागणार आहे. प्रस्तुत कोशाचे सर्वच भाग ज्ञानेच्छू अशा सर्व ज्ञानशाखामधील जिज्ञासूंना उपयुक्त ठरतील असा विश्‍वास वाटतो. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964696322339,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/85f.jpg?v=1750155363"},{"product_id":"nayi-taalim","title":"नयी तालीम","description":"\u003cp\u003eनयी तालीम शिक्षणाला हेतूपूर्ण अंग होते ते नवसमाजरचनेच्या निर्मितीचे शोषणविहीन आणि समतेवर नि न्याय्यतेवर आधारित असा खरा लोकशाही समाज गांधीजींना अभिप्रेत होता. उच्च-नीच भाव नसलेला, शहरे आणि खेडी यांमधील अंतर नाहीसे करणारा, बुद्धीचे काम आणि श्रमाचे काम यांमध्ये फारकत न करणारा, शिक्षित आणि अडाणी समाजात पडलेले अंतर भरून काढणारा, जन्मापेक्षा कर्मावर भर देण्याची मानसिकता असलेला, जेथे प्रत्येकाला आपल्या गरजेनुसार मिळते आहे, पण त्याचबरोबर, आपल्यासारख्या दुसर्‍याला जे मिळणार नाही ते आपलेही असणार नाही, अशी मानसिकता तयार झालेला आणि परस्परांमध्ये धर्मभेद, जातीभेद, भाषाभेद, वर्गभेद अशा समाज मोडणार्‍या वृत्तींच्या वर उठणारा नि बंधुभावाने परस्परव्यवहार साधणारा असा समाज अपेक्षित होता.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e गांधीजींच्या मते, नयी तालीमचे शिक्षण हे आजच्या समाजाला या ध्येयाकडे पावले टाकायला लावणारे, शिक्षण असणार होते. गांधीजींनी म्हटले होते, की प्राथमिक शिक्षण प्रदान करण्याची योजना ही फार दूरवरचे परिणाम अनुस्युत असलेल्या अशा एका शांतिपूर्ण क्रांतीकडे अंगुलीनिर्देश करणारी आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964696879395,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/105f.jpg?v=1750155386"},{"product_id":"udyonmukh-bharteeya-samajateel-shikshan","title":"उदयोन्मुख भारतीय समाजातील शिक्षण","description":"\u003cp\u003eभारतीय शिक्षण व्यवस्थेच्या अभ्यासकांसाठी उपयुक्त संदर्भ ग्रंथ\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964698943779,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/133f.jpg?v=1750155452"},{"product_id":"laingik-shikshan","title":"लैंगिक शिक्षण","description":"\u003cp\u003eसमाजस्वास्थ्यासाठी\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलैंगिक शिक्षणाचे आद्य प्रवर्तक प्रा. र. धों. तथा रघुनाथ धोंडो कर्वे यांनी तत्कालीन सनातनवाद्यांशी प्रखर लढा देऊन\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e१९२३ मध्ये ‘संततिनियमन : विचार व आचार’ हे पुस्तक लिहून एक धाडसी प्रयत्न केला व समाजप्रबोधनाची एक दिशा दाखवली. त्या प्रयत्नाच्या एक पाऊल पुढे टाकून सद्य:स्थितीत तरुणांना अधिक सजग करण्यासाठी ‘लैंगिक शिक्षण’ या परिवर्तनशील पुस्तकात समाजहित डोळ्यांसमोर ठेवून, बुद्धिप्रामाण्यवादी दृष्टिकोनातून उमलत्या तरुण पिढीला लैंगिक शिक्षण व त्यातील शास्त्रीय वास्तवता अधिक सोप्या पद्धतीने स्पष्ट केली आहे. प्रत्येक कुटुंबातील या विषयाचा सुसंवाद या पुस्तकामुळे सहजसाध्य होण्यास निर्विवादपणे मोलाचे साहाय्य होईल. \u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964702646563,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/453f.jpg?v=1750155588"},{"product_id":"vedh-shikshanshastratil-spardha-parikshancha","title":"वेध शिक्षणशास्त्रातील स्पर्धा परीक्षांचा","description":"\u003cp\u003eआजमितीला शिक्षणशास्त्रात उन्नतीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. स्पर्धा- परीक्षांच्या माध्यमातून शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शिक्षणविस्तार अधिकारी याचप्रमाणे ऊखएढ साठी ज्येष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता यांसारखे अनेक पर्याय आज उपलब्ध आहेत. त्याचबरोबर सेट-नेटच्या माध्यमातून अधिव्याख्यातापदाची पात्रतापरीक्षा असो किंवा एम्.एड्. प्रवेशपरीक्षा या सर्वांसाठी केवळ कठोर परिश्रम असता कामा नयेत तर शिक्षणशास्त्राकडे पाहण्याचा एक चिकित्सक दृष्टिकोन,चिंतन आणि (हार्ड वर्क) कठोर परिश्रमापेक्षा स्मार्टवर्क ऍप्रोचचा अवलंब करूनच आपण यशाचा वेध घेऊ शकतो. या अनुषंगाने सदर पुस्तकात शिक्षणशास्त्र, सामान्यज्ञान, चालू घडामोडी आणि मुलाखतीचे तंत्र यांबद्दल मार्मिक पद्धतीने माहिती मांडण्यात आलेली आहे. हे पुस्तक आपणास यशप्राप्तीसाठी निश्‍चितच उपयुक्त ठरेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964703236387,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/459f.jpg?v=1750155609"},{"product_id":"diamond-quiz-series-kridavishva","title":"डायमंड क्विझ सिरीज : क्रीडाविश्व","description":"\u003cp\u003eस्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त प्रश्नसंच \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964705988899,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/530f.jpg?v=1750155683"},{"product_id":"encyclopedia-of-education","title":"Encyclopedia of Education","description":"\u003cp\u003eThe Encyclopedia of Education is an elaborate reference book essaying information in all  related areas of education. It features a wide coverage of topics not only in education but also in other inter-connected disciplines, like Psychology, इतिहास, Information Technology, Statistics, and Sociology among others.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eThe book is complete overview of field of Education and contains factual material that all readers, students and other professionals need to understand. Besides a comprehensive set of text matter, it also includes statistical formulae that serve as an additional usage. It provides high knowledge content with ease for referencing to the reader community.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964716310819,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/585f.jpg?v=1750155776"},{"product_id":"tumhi-ghadawal-amhala","title":"तुम्ही घडवलं आम्हांला","description":"\u003cp\u003e‘आचार्य देवो भव’ या उक्तीने भारतीय संस्कृतीत शिक्षक अथवा गुरूला गौरवलं गेलं आहे. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या नात्याला म्हणूनच परंपरेत अव्वल स्थान दिलं जातं. चांगल्या शिक्षकाच्या मुशीतून घडलेला विद्यार्थी म्हणजे देशाचं उज्ज्वल भविष्य असतो.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  ‘तुम्ही घडवलं आम्हांला’ हे असंच विविध क्षेत्रांत चमकलेल्या ‘विद्यार्थ्यांचं’ त्यांच्या शिक्षकांविषयीचं हृद्य कथन आहे. प्रसिद्ध उद्योजक, शास्त्रज्ञ, डॉक्टर्स, विद्यापीठांचे कुलगुरू, शासकीय अधिकारी, लेखक इ. अनेक क्षेत्रांतल्या मान्यवरांनी आपल्या शिक्षकांविषयीची कृतज्ञता या लेखांतून व्यक्त केली आहे. शाळांपासून विद्यापीठापर्यंतच्या आणि देश-विदेशातल्या वेगवेगळ्या आदर्श शिक्षकांचा परिचय या पुस्तकाद्वारे आपल्याला होतो. सध्याच्या शिक्षणव्यवस्थेचा आणि शिक्षक संस्कृतीचा विचार करता संपूर्ण समाजाला नवचेतना देण्यासाठी हे लेख नक्कीच प्रेरक ठरतील.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964722503971,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/668f.jpg?v=1750156027"},{"product_id":"football-niyam-va-kaushalye","title":"फुटबॉल: नियम व कौशल्ये","description":"\u003cp\u003eफुटबॉल  या खेळाची सखोल माहिती करून देणारे पुस्तक. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील खेळ व शिक्षणशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्याना व अभ्यासकांना उपयुक्त. स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.  \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964740362531,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/791f.jpg?v=1750156591"},{"product_id":"shikshanshastra-ugc-net-set","title":"शिक्षणशास्त्र : युजीसी नेट-सेट पेपर१,२ आणि ३ एकत्र","description":"\u003cp\u003eशिक्षणशास्त्र च्या नेट-सेट परीक्षेच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार लिहिलेले हे पुस्तक आहे. पेपर १ , २ आणि ३ ची एकत्रित माहिती इथे दिली असून अनेक सरावप्रश्न व २०१४-२०१५ च्या सोडवलेल्या प्रश्न्पात्रीकांचाही यात समावेश केलेला आहे. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964744032547,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/828f.jpg?v=1750156727"},{"product_id":"shaley-vyavasthapan-va-netrutva-kshamata","title":"शालेय व्यवस्थापन व नेतृत्व क्षमता","description":"\u003cp\u003eआजचं शैक्षणिक वातावरण सतत बदलतं आणि गतिमान आहे. मुख्याध्यापकांना शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, संस्थेचे पदाधिकारी, शासकीय कार्यालयं, माध्यमं, देणगीदार आणि हितचिंतक, राजकीय पक्ष, समाजातल्या वेगवेगळ्या प्रवृत्तींच्या व्यक्ती अशा अनेक गुंतागुंतीच्या घटकांना एकाच वेळी सामोरं जावं लागतं; आणि या घटकांची शाळेबद्दलची सकारात्मक मानसिकता कायम राखण्याचं आव्हानही पेलावं लागतं. याशिवाय, शैक्षणिक बाबींचं, तसंच सहशालेय आणि बहिःशालेय उपक्रमांचं नियोजन, प्रशासकीय कामांचं नियोजन अशा अनेक आघाड्यांवर काम करताना मुख्याध्यापकांच्या नेतृत्वक्षमतेचा अक्षरशः कस लागतो. याबरोबरच मातृसंस्थेची विचारप्रणाली, ध्येय-धोरणं, नियम, शिस्त यांचं पालन करणं, संस्थेच्या इतर शाळांच्या तुलनेत आपल्या शाळेची स्पर्धात्मकता जोपासणं आणि संस्थाचालकांच्या शाळेकडून असलेल्या अपेक्षांची पूर्तता करणं यासाठीही मुख्याध्यापकांना कसून प्रयत्न करावे लागतात.\n\u003cbr\u003e\tआजकाल अनेकदा सेवा ज्येष्ठतेच्या निकषामुळे एखाद्या शिक्षकाला मुख्याध्यापक होण्याची अचानक संधी मिळते. अशा वेळी शाळेशी संबंधित सगळे निर्णय त्याला घ्यावे लागतात. मात्र यासाठी खंबीरपणा, एखादा प्रश्न हाताळण्यातलं कौशल्य, व्यवस्थापकीय आणि प्रशासकीय अनुभव, कायदे आणि शासकीय नियमांची माहिती अशी अत्यावश्यक वैशिष्ट्य या नवख्या मुख्याध्यापकामध्ये अभावानेच आढळतात. \n\u003cbr\u003e\tही सगळी गुंतागुंत पाहता, मुख्याध्यापकांचं व्यक्तिमत्त्व बहुआयामी असणं आणि त्यांच्याकडे नेतृत्वक्षमता असणं ही त्या पदाची गरज झाली आहे. वरवर पाहताना ‘नेतृत्वक्षमता’ हा शब्द साधा आणि सोपा वाटला, तरी वास्तवात ही क्षमता म्हणजे कौशल्य, प्रेरणा, दृष्टिकोन, वैचारिक-भावनिक-सामाजिक जाणिवा, ज्ञान, माहिती अशा वेगवेगळ्या गुणांचा परिपाक आहे. त्यामुळे सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत मुख्याध्यापकांच्या नेतृत्वक्षमतांचा विकास करण्यासाठी, त्यांच्या भूमिका आणि जबाबदार्‍या  त्यांच्या नेमकेपणाने लक्षात आणून देण्यासाठी, त्यानुसार त्यांची मानसिकता घडवण्यासाठी, तसंच त्यांच्या प्रशासकीय क्षमता विकासित करण्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल. याशिवाय महाराष्ट्रातल्या सगळ्या खाजगी, सरकारी, अनुदानित, विनाअनुदानित शाळांचे मुख्याधापक, पर्यवेक्षक आणि शिक्षक यांच्यासाठीही हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964746916131,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/859f.jpg?v=1750156827"},{"product_id":"shaikshanik-margdarshan-va-sampudeshan","title":"शैक्षणिक मार्गदर्शन आणि समुपदेशन","description":"\u003cp\u003eशैक्षणिक मार्गदर्शन\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजोन्स यांच्या मते ‘‘शैक्षणिक मार्गदर्शन म्हणजे विद्यार्थ्यांची आवड-निवड,\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपात्रता, समायोजनक्षमता लक्षात घेऊन शाळा, अभ्यासक्रम, विविध विषय व शालेय जीवनासंदर्भातील साहाय्य. ’’\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eब्रेवर यांच्या मते ‘‘शैक्षणिक मार्गदर्शन म्हणजे विद्यार्थ्यांना यश मिळविण्यासाठी त्यांच्या शैक्षणिक जीवनात दिले गेलेले साहाय्य. ’’\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eरुथ स्ट्रँग यांच्या मते, ‘‘अभ्याक्रम (अध्ययनयोग्य) निवडण्यास व त्यातील प्रगतीसाठी मदत म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र.’’\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसमुपदेशन :\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘सल्ला- मसलत’ म्हणजे समुपदेशन.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमार्गदर्शनात समस्यांच्या स्वरूपानुसार समुपदेशन करावे लागते. जसे - विद्यार्थ्यांच्या भावनिक, सामाजिक, आरोग्य, कौटुंबिक, अभ्यासविषयक व समायोजनसमस्या.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसमुपदेशनाचे कार्य :\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविद्यार्थ्यांच्या प्रगतीआड येणार्‍या समस्यांची जाणीव करून देणे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eबलस्थाने, कुवत, पात्रता यांची जाणीव करून देणे. आत्मविश्‍वास निर्माण करणे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशैक्षणिक मार्गदर्शन व समुपदेशन या विषयावरील अत्यंत मुद्देसूद सखोल व अभ्यासपूर्ण पुस्तक.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964753338659,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/249f.jpg?v=1750157055"},{"product_id":"uttam-adhyapanachi-rahasye","title":"उत्तम अध्यापनाची  रह्स्य","description":"\u003cp\u003e आजचे अडखळणारे मराठी पाऊल पुढे पडायचे असेल तर महाराष्ट्रात परीक्षांचा नव्हे - तर विद्येचा सुकाळु  व्हायला हवा.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e दिशा हरवलेल्या शैक्षणिक धोरणातून सुटका होण्याची वाट बघत न बसता पालक-शिक्षकांनी संगनमत करून शिकवण्याचा आणि म्हणून शिकण्याचा दर्जा सुधारण्याच्या मागे लागले पाहिजे. ( खास करून उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात.)\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e मराठी माणसाची आणि भारतीयांची सतत चिंता करणार्‍या \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e डॉ. अशोक केळकरांच्या हाती, एके काळी त्यांच्यापाशी शिकलेल्या डॉक्टर श्रीमती विनय किरपालांनी आपण संपादित केलेले पुस्तक \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e Secrets of Good Teaching\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e अभिप्रायासाठी आणून दिले. मानव्यविद्या, विज्ञान, तंत्रज्ञान, वाणिज्य अशा विविध विषयांतल्या गुणी प्राध्यापकांनी आपआपल्या लेखात (तात्त्चिक आदर्शांच्या मोघम भाषेत गप्पा न मारता) थेट अनुभवाचे बोल ऐकवले आहेत. हे पुस्तक वाचणार्‍या प्राध्यापकांना आणि त्यांच्या सहायकांनाही आपल्या कामात सहज वापरून पाहता येतील, अशा युक्त्या इथे उघड केल्या आहेत. त्यांना नवीन तांत्रिक सुविधादेखील डोळसपणे वापरता येतील. थोडक्यात, एकच एक रहस्य नव्हे तर अनेक गुपिते म्हणजेच \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e        उत्तम अध्यापनाची रहस्ये\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e प्राध्यापकांत कळकळ तर हवीच, पण ती जागरुक, उपक्रमशील, विवेकी कळकळ हवी. डॉ. केळकरांनी आपल्या देखरेखीखाली हा मराठी अनुवाद करवून घेतला आहे.  \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964753404195,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/251f.jpg?v=1750157060"},{"product_id":"vastunishth-sharirik-shikshan-va-khel","title":"वस्तुनिष्ठ शारीरिक शिक्षण व खेळ -- पेपर 2","description":"\u003cp\u003eशारीरिक शिक्षण व खेळ याविषयाच्या प्राध्यापक व विद्यार्थ्याना उपयुक्त पुस्तक. मुबलक वस्तुनिष्ठ प्रश्नसंच. MPSC UPSC तसेच NET SET च्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त वस्तुनिष्ठ प्रश्नसंच.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964757074211,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/302f.jpg?v=1750157178"},{"product_id":"prabhavshali-shikshantadnya","title":"प्रभावशाली शिक्षणतज्ञ","description":"ज्याच्याकडे प्रज्ञेसोबत शील आहे तो विद्येच्या बळावर स्वतःबरोबर इतरांचीही उन्नती करील. प्रज्ञा, शील व करुणा यांचा समावेश ज्याच्या व्यक्तिमत्त्वात आहे, असा जबाबदार नागरिक घडवणे हे शिक्षणाचे कार्य आहे. जागतिक-भारतीय अनेक शिक्षणतज्ज्ञांनी यासाठी अनेक नवेनवे मार्ग आणि प्रयत्न केले आहेत. या शिक्षण तज्ज्ञांच्या योगदानाची ओळख करून देणे हेच पुस्तकाचे उद्दिष्ट आहे.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964759597347,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/352f.jpg?v=1750157294"},{"product_id":"krida-spardha-niyojan","title":"क्रीडा स्पर्धा नियोजन","description":"\u003cp\u003eव्यक्तिमत्व घडवण्यात मैदानी खेळांचे आत्यंतिक महत्व आहे. आत्मसात केलेले कौशल्य दाखवण्याची संधी खेळाडूंना स्पर्धेतून मिळते. त्यासाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन व नियोजन खूप महत्वाचे आहे. हे तंत्र अत्यंत कुशलतेने हाताळणे गरजेचे असते. \u003cbr\u003eस्पर्धेत भाग घेणारे संघ , त्यांचे खेळाडू , उपलब्ध वेळ, साधनसामग्री इत्यादीचा विचार व स्पर्धेच्या अनेक पद्धती यांची सांगड घालून स्पर्धा नियोजन यशस्वी करण्याच्या तंत्राचे भाग्यपत्रक बनवले जाते. क्रीडा स्पर्धा नियोजनाचे संपूर्ण तंत्र सहज सोप्या भाषेत समजावून सांगणारे हे पुस्तक वाचकाच्या निश्चितच उपयोगी पडेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964760776995,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/386f.jpg?v=1750157330"},{"product_id":"sharirik-shikshan-mapan-va-mulyamapan","title":"शारीरिक शिक्षण मापन व मूल्यमापन  पेपर- 1","description":"\u003cp\u003eशारीरिक शिक्षण व खेळ या विषयाच्या प्राध्यापक व विद्यार्थ्याना उपयुक्त संदर्भ ग्रंथ\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964761301283,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/391f.jpg?v=1750157347"},{"product_id":"maharashtratil-shaikshanik-vikas","title":"महाराष्ट्राचा शैक्षणिक  विकास","description":"\u003cp\u003e भारतीय शिक्षणाचा धावता आढावा घेत असतानाच महाराष्ट्रातील शैक्षणिक विकासाचा सविस्तर तपशील प्रस्तुत पुस्तकात मांडण्यात आला आहे. शिक्षणविषयक प्रमुख आयोग, समित्या, योजना या संदर्भात विचार करणारे स्वतंत्र प्रकरण या पुस्तकात आहे. याशिवाय शिक्षणाच्या विकासात, शिक्षकांच्या प्रशिक्षणात आणि शाळा-महाविद्यालये, विद्यापीठांच्या प्रशासनात मार्गदर्शन, नियंत्रण आणि अंमलबजावणी करणार्‍या राष्ट्रीय व राज्य पातळीवरील महत्त्वाच्या संस्थांचा परिचय करून दिला आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e अंगणवाडी ते उच्च शिक्षणापर्यंत झालेल्या संख्यात्मक व गुणात्मक विकासाचा आढावा घेत असतानाच प्रौढ शिक्षण, निरंतर शिक्षण या सामाजिक विकासासाठी प्रयत्नशील असणार्‍या अनौपचारिक शिक्षणाच्या विविध अंगांचाही यात समावेश आहे. महाराष्ट्राच्या शैक्षणिक विकासाचे प्रेरणास्थान असणार्‍या प्रभावशाली शिक्षणतज्ज्ञांचा समावेश या पुस्तकाचे बलस्थान आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e काही प्रयोगशील तसेच, अग्रेसर शिक्षण संस्थांचा परिचय करून देताना तंत्रज्ञान, वैद्यकीय अशा शाखांशी निगडित शिक्षणाबरोबरच वाणिज्य-व्यवसाय क्षेत्रातील उपलब्ध पर्याय ‘नवे दालन-नव्या संधी’ या प्रकरणात समाविष्ट केले आहेत. शिक्षणक्षेत्रातील या बदलत्या जगाची माहिती विद्यार्थ्यांबरोबरच पालक, संस्थाचालक यांना उपयुक्त ठरू शकेल असा विश्वास वाटतो.र\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964761825571,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/404f.jpg?v=1750157386"},{"product_id":"maharashtratil-khel","title":"महाराष्ट्रातील खेळ : आजचे कालचे","description":"\u003cp\u003e क्रीडा हे व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासाचेच नव्हे तर समाजपरिवर्तनाचे एक प्रभावी साधन आहे. अशा या खेळातील महाराष्ट्रात प्रारंभ झालेल्या तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात खेळल्या जाणार्‍या मल्लखांब, कुस्ती, आट्यापाट्या, खो-खो, कबड्डी तसेच लाठी, जंबिया, ङ्गरिगदका यासाराख्या पारंपारिक क्रीडाबाबींची माहिती प्रस्तुत पुस्तकामध्ये लेखकाने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर ऍथलेटिक्स, जलतरण, शूटिंग व क्रिकेट यांसारख्या खेळांचीही माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964762841379,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/412f.jpg?v=1750157428"},{"product_id":"diamond-shikshanshastra-shabdkosh","title":"डायमंड शिक्षणशास्त्र शब्दकोश","description":"\u003cp\u003eशिक्षणशास्त्र पदविकेपासून ते थेट पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी, त्यांचा अध्यापकवर्ग , मराठीतून संशोधन करणारे संशोधक यांपासून सर्वसामान्य माणसांपर्यंत सर्वांनाच हा शब्दकोश उपयुक्त ठरेल अशी आशा आहे. \n\u003cbr\u003e१. मूळ मराठी शब्दांचे उच्चार व अर्थ २. १५०० हूं अधिक संज्ञाचे स्पष्टीकरण ३. उपयुक्त परिशिष्टे \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964764938531,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/440f.jpg?v=1750157515"},{"product_id":"mulana-vachun-dakhava-ani-tyanche-aayushya-ghadava","title":"मुलांना वाचून दाखवा आणि त्यांचं आयुष्य घडवा","description":"\u003cp\u003e\t‘वाचन’ आणि ‘श्रवण’ हे ज्ञान संपादनाचे दोन महत्त्वाचे मार्ग. मुले लहान असताना स्वतः वाचू शकत नाहीत परंतु ते ऐकू शकतात. किंबहुना त्यांची या काळातली श्रवणशक्ती व ग्रहणशक्ती अतिशय तल्लख असते. अगदी लहानपणापासून मुलांना वाचून दाखवल्यामुळे मुलांच्या बौद्धिक विकासात मौलिक भर पडते. मुलांना वाचनाची गोडी लागते. त्यांच्या शब्दसामर्थ्यात विलक्षण वाढ होते. त्यांच्यातील आकलनक्षमता, सर्जनशीलता विकसित होते. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी वाचनकौशल्याचा विकास होणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.\n\u003cbr\u003e\tमुलांचे वाचनकौशल्य विकसित करण्याचे समग्र तंत्र, त्यामागचे शास्त्रीय संशोधन  यांविषयी पालकांना, शिक्षकांना सहजसोप्या शब्दात ओळख हे पुस्तक करून देते. या प्रक्रियेतील पालकांच्या विशेषतः वडिलांच्या भूमिकेचे महत्त्व पटवून देते. हे जगभरात गाजलेले पुस्तक प्रत्येक मराठी पालकाने, शिक्षकाने वाचलेच पाहिजे.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964765397283,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/866f.jpg?v=1750157546"},{"product_id":"madhymik-va-uchha-madhymik-shikshan","title":"माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण   - व्यवस्थापन , समस्या व उपाय","description":"\u003cp\u003eमाध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण   - व्यवस्थापन , समस्या व उपाय\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964767428899,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/31f.jpg?v=1750157629"},{"product_id":"karmveer","title":"कर्मवीर भाऊराव पाटील : एक आधुनिक भगीरथ","description":"गंगेच्या पाण्यावर ही भारतभू सुजलाम् सुफलाम् झाली; इथली संस्कृती रुजली, बहरली. पण ही गंगा हिमालयातच राहिली असती; तर हे घडले नसते. म्हणूनच त्या गंगेला खाली घेऊन येणार्‍या पुराणातल्या त्या भगीरथाला लोक आजही स्मरतात. आधुनिक महाराष्ट्राच्या शिक्षणक्षेत्रात हेच काम कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले; थोड्या महानगरांपुरती आणि मूठभर उच्चवर्णीयांपुरती सीमित राहिलेली ज्ञानगंगा त्यांनी इथल्या खेड्यापाड्यांतून खेळवली, लक्षावधी गोरगरिबांच्या मनात विकासस्वप्ने पेरली आणि म्हणूनच या आधुनिक भगीरथाला भावी पिढ्या कृतज्ञतापूर्वक स्मरतील.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964773753123,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1000f.jpg?v=1750157862"},{"product_id":"mulanche-shikshan","title":"मुलांचे शिक्षण : पालक व शासन","description":"शिक्षणाविषयी सार्वत्रिक समाधान तर आहेच. किंबहुना म्हणूनच ते नाकारण्याचा आणि त्याच्या जागी पर्यायी शिक्षण उभे करण्याचा परिवर्तनवादी विचार आता होऊ लागला आहे. पण, हा एकच प्रश्‍न नाही. आणखिही काही मोठे प्रश्‍न आहेत. उदाहरणार्थ, शिक्षण सर्वांनाच मिळत नाही. शिक्षणाची संधी आजही अनेक सामाजिक आर्थिक आणि राजकीय कारणामुळे सर्वांना सामावून घेत नाही. शिक्षणवंचितांचा मोठा वर्ग असणारा असा आपला देश आहे. ज्यांना शिक्षणाची संधी मिळते त्यांना ता समानतेने मिळत नाही, हे घटनेच्या जाहिरनाम्यात समतेचा उद्घोष करणार्‍या राष्टा्रतील सूर्यप्रकाशाएवढे सत्य आहे. एके काळी सामाजिक वर्गवारीनुसार शिक्षणाची संधी असायची तर आता प्रामुख्याने आर्थिक वर्गवारीनुसार. शिक्षण ही एक विक्रेय वस्तू म्हणूणच ठरविली गेली, आणि सरकारी शिक्षण खात्याचे रूपांतर मानवी संसाधन खात्यात केले गेले, त्यामुळे शिक्षणाचा प्रत्यक्ष संबंध ग्राहकाच्या खरेदीशक्तीशी बांधला गेला. बाजार हा नेहमीच असमता निर्माण करतो, हे आपण याबाबतीत ध्यानात घ्यायला हवे. संधीची व दर्जाची समानता हे आजुनही क्षितीजाच्या पलिकडचे ध्येय आहे. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e आपले आजचे शिक्षण असमाधानकारक आहे, असे वेगवेगळ्या कारणाने पण प्रत्येकजणच म्हणत असतो. शिकतांना शिकणार्‍यांना त्यात रस वाटत नाही, असा अनुभव सार्वत्रीक आहे. शिक्षणाने व्यक्तीला आयुष्यभरासाठीची ज्ञान, मुल्ये, कौशल्य आणि प्रश्‍न सोडविण्याची ताकद द्यायची असते. आजचे शिक्षण हे असे नाही, अशी भावना जर सार्वत्रिक असेल तर सार्वत्रिकरित्याच ते नाकारले गेले पाहिजे. त्यासाठी राज्यव्यापी आंदोलन छेडले गेले पाहिजे. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964774637859,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/36f.jpg?v=1750157922"},{"product_id":"shikshan-vicharmanthan","title":"शिक्षण : विचारमंथन","description":"सामान्यपणे; माझा शिक्षणविषयक अभ्यास व त्यावरील विचार जस जसा पुढे जातो, तसतसा तो मी लेखरूपाने व नंतर ग्रंथरूपाने वाचकांसमोर ठेवीत आलो आहे.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e या पुस्तकातील शिक्षणविषयक विचारमंथन मात्र, वेळोवेळी, माझ्या व इतरांच्या ग्रंथांना प्रस्तावना लिहिण्याच्या निमित्ताने झाले आहे.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e मी अशा प्रकारे लिहिलेल्या काही निवडक प्रस्तावना येथे एकत्रित केल्या आहेत. आपल्याकडील मुलामुलींचे शिक्षण ज्या व्यापक अशा तात्त्विक आणि व्यावहारिक परिस्थितीत होत आहे, त्या परिस्थितीचे अवलोकन, विश्लेषण आणि विवेचन या प्रस्तावनांमधून त्या त्या वेळी मांडले असल्यामुळे त्यांचे एकरूप चित्र वाचकांसमोर उभे रहावे या हेतूने हा पुस्तकप्रपंच केला आहे.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e अशा प्रकारचे, भूतकाळ व वर्तमानकाळ यांमधील विचारांचे विश्लेषण, भविष्यकाळ रेखताना उपयुक्त ठरते, असा माझा कयास आहे.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964774801699,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/261f.jpg?v=1750157927"},{"product_id":"nisargshala","title":"निसर्गशाळा - पर्यावरण विषयक उपक्रम ( ३ पुस्तकांचा संच)","description":"निसर्ग शिक्षण मुलांपर्यन्त पोहोचवणे या हेतूने ‘निसगर्शाळा’ या पुस्तक संचाची रचना करण्यात आली आहे. निसगर्शाळा हा तीन पुस्तकांचा संच आहे. या पुस्तकांचा आधार घेऊन कुठल्याही शाळेला ‘पयार्वरविषयक विशेष कायर्क्रम’ हाती घेता येईल. प्रत्येक पुस्तकात जवळपास ५० उपक्रम आहेत. इयत्ता ५ वी, ६ वी, ७ वी (मुलांचे वय वर्ष १०-१२) साठी हे उपक्रम योजिले आहेत. \u003cbr\u003e\u003cbr\u003eही पुस्तके शिक्षक व पालक यांच्यासाठी आहेत, जेणेकरून ते मुलांसाठी हा अभ्यासक्रम राबवू शकतील. यात मुलांना निसर्गातील  नदी, डोंगर, माती, झाडं, पशू-पक्षी, किटकादी विविध घटकांची ओळख व्हावी, त्यांचं महत्त्व कळावं तसंच त्यांची जोपासना करणं का आवश्यक आहे, ती कशी करावी हे उपक्रमांच्या माध्यमातून स्वानुभवाने कळेल. या अभ्यासक्रमातले उपक्रम कोणत्या क्रमाने व कशा पद्धतीने घ्यावेत याचा विचार करुन तयार के ले आहेत. निसर्गाची ओळख याबरोबरच मुलांच्या विविध कलागुणांना प्रोत्साहन, त्यांचा व्यक्तिमत्त्वविकास ही सुद्धा या अभ्यासक्रमाची वैशिष्ठ्ये आहेत. निसगर्शाळा हा अभ्यासक्रम आत्तापर्यन्त  घोटावडे, वाई, गोवा, रणथंबोर अशा काही ठिकाणी जिल्हा पिरषदेच्या व इतर शाळांमध्ये, संस्थेने प्रत्यक्ष राबिवलेला आहे. ग्राममंगल या संस्थेच्या मागर्दशर्नाखाली, रचनावादी तत्वावर हे उपक्रम आधारलेले आहेत. यात मुले प्रत्यक्ष अनुभूती घेऊन त्या उपक्रमाची मजा घेत शिकतात. या पुस्तकाचा आधार घेऊन असे उपक्रम काही शाळांमध्ये राबवले जात आहेत. ज्यांना मुलांचा छान प्रतिसाद मिळतो आहे. या अभ्यासक्रमाच्या ‘तयारीसाठी’ व ‘संशोधनासाठी’ महाराष्ट्र शासनाच्या पयार्वरण विभागाच्या ‘हरित  संकल्पना’ योजनेचे आर्थिक  साह्य ऑयकॉसला लाभले. निसर्ग शिक्षण  ही काळाची गरज तर आहेच पण निसर्गाजवळ  जाऊन त्यातल्या गमती जमती प्रत्येकाला कळाव्या, त्यावर मैत्र जडावे, जेणेकरून संवर्धन हा आपल्या स्वभावाचाच एक भाग बनेल, व निसर्ग सहवासाचा निस्सीम आनंद प्रत्येकाला अनुभवता येईल ही या पुस्तकांमागची संकल्पना !","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964776800547,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1034f.jpg?v=1750158060"},{"product_id":"generic-elective-course","title":"डिजिटल साक्षरता, सामाजिक नवोपक्रम, सामाजिक उद्योजकता व नागरी शिक्षण (जेनेरीक इलेकटीव्ह कोर्स )","description":"सद्य:स्थितीत माहिती तंत्रज्ञानाचा वापर अनिवार्य झालेला असून, पुढील काळातही तो वाढणार आहे. संगणक, मोबाईल, लॅपटॉप इत्यादींचा वापर मोठ्याप्रमाणात होत असताना, अतिरिक्त लोकसंख्येमुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्या सोडविण्यासाठी नवकल्पनांचा उपयोग महत्त्वपूर्ण ठरत आहे. सदर पुस्तकात डिजिटल साक्षरता, व्यावसायिक जीवनातील डिजिटल साक्षरतेची भूमिका, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, प्रवाह, संधी स्पष्ट करून सामाजिक नवकल्पना, सामाजिक समस्या, नागरीकृती इत्यादींचे सामाजिक जीवनातील महत्त्व लक्षात येते. सामाजिक उद्योजकता, व्यावसायिक उपक्रम, स्टार्टअप इत्यादी संकल्पनांची निर्मिती त्याचबरोबर नागरी शिक्षणात हक्क आणि कर्तव्ये, सामाजिक न्याय, सीमांत घटक, पंचायत राजची भूमिका स्पष्ट केली आहे. भारताची नवीन ओळख त्यामुळे स्पष्ट होते. सदर पुस्तक विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा, शासन इत्यादींसाठी उपयुक्त आहे. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964777455907,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1043f.jpg?v=1750158112"},{"product_id":"jltrnn-kaushly","title":"जलतरण कौशल्य","description":"\u003cp\u003eजलतरण हा ऑलिंपिक दर्जाचा खेळ आहे. शालेय, महाविद्यालयीन, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर हा खेळ खेळला जातो. डॉ. सोपान कांगणे लिखित सदर पुस्तकात पुस्तकात जलतरणाचा इतिहास, मूलभूत कौशल्ये, दक्षता, साधने, इत्यादी माहिती 150 चित्रांच्या आधारे दिली आहे. खेळ व शारीरिक शिक्षण यासाठी उपयुक्त. Marathi book on the game of Swimming. Useful for Sports education.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964778209571,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/392fJalataranKaushalye.jpg?v=1750158150"},{"product_id":"shikshan-parivartan","title":"शिक्षण : परिवर्तनाची सामाजिक चळवळ","description":"प्रबोधनाच्या चळवळीची दोन अविभाज्य अंगे आहेत. एक आहे ते वैचारिक अंग आणि दुसरे आहे ते भावनिक अंग. या दोन्हीच्या एकत्रित अस्तित्वाशिवाय प्रबोधनाची चळवळ उभीच राहू शकत नाही. एखाद्या चळवळीत, त्याचे वैचारिक अंग प्रधान असेल पण त्याला भावनिक अंग अजिबात नाही, असे असणार नाही. तर दुसर्‍या एखाद्या चळवळीत, त्याच्याप्रबोधन कार्यात भावनिक अंग प्रभावी राहील पण त्याला विचाराची जोड असावीच लागेल. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e आपली प्रबोधनाची चळवळ ही लहान बालकांच्या संदर्भातली चळवळ आहे. त्यामुळे भावनेच्या पातळीवर ती सर्वत्र समाजाला आपलीशी वाटणे सहज शक्य आहे. बालक, बालकाची नैसर्गीक वाढ त्या नैसर्गीक वाढीला पोषक अशी आनंददायी शिक्षणपध्दती, बालकाचे आरोग्य, बालकाचे व्यक्तीमत्व, बालकाचे भवितव्य असे बालजीवनाशी संबंधित असे सर्वच विषय समाजातील प्रत्येक घटकासच जवळचे नि महत्वाचे खासच वाटत असतात. त्यामुळे या सगळ्यांचे शास्त्र गेली दोन-तीन शतके विकसीत होत गेलेले आहे, त्याला आधुनिक मानसशास्त्राचा, शरिरशास्त्राचा नि शिक्षणशास्त्राचा बळकट आधार आहे आणि हे शास्त्र बालशाळातून सहजपणे आंमलात आणता येते, हा विचार आपण प्रभावीपणे लोकापर्यंत पोचवू शकू. उदा: आजच्या शहरी सुशिक्षित पालकांची अपेक्षा अशी असते की, मुलांचा बौध्दिक विकास लवकर व्हावा. शिक्षण म्हणजे केवळ बौध्दिकरित्या शिकणे एवढेच त्यांच्या डोळ्यसमोर असते अशावेळी आपण त्यांना जरा प्रयत्नाने पटवून देऊ शकू की, शालेयपूर्व वयातील बालकांची बौध्दिक वाढ पुढे सरकण्यापूर्वी बालकांच्या शारिरिक, मानसिक नि सामाजिक क्षमतांची काहीएक पूर्वतयारी व्हावी लागते. एवढेच नव्हे तर बौध्दिक क्षमतांच्या बरोबरीने इतरही क्षमता विकसित होत गेल्या तरच बौध्दिक विकास परिपूर्णतेने गाठता येतो. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964778963235,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/35fShikshanParivartanachiSamajikChalval.jpg?v=1750158192"},{"product_id":"aajche-shikshan","title":"आजचे शिक्षण उद्याचे जीवन","description":"शाळांची शैक्षणिक भूमिका अशी असायला हवी की, सर्वच मुलांना सर्वच संधी घेता याव्यात, प्रत्येकाच्या क्षमतेनुसार त्याची त्या त्या बाबतीतील प्रगती होऊ द्यावी. सर्वांनाच विविधांगी कुशलता मिळू द्यावी. सर्वांनाच पुरेसा सर्वांगीण अनुभव आणि आनंद मिळावा. याऐवजी शाळा काही मोजक्या मुलांना ठराविक स्पर्धासाठी तयार करून आपल्या शाळेला विविध स्पर्धातील अधिकाधिक बक्षिसे प्राप्त करून इतर शाळांशी स्पर्धा करीत असते आणि या बक्षिसांचे प्रदर्शन करून आपला अहंगंड जोपासत असते. \u003cbr\u003e या शाळाशाळातील अशा गैरवाजवी स्पर्धामुळेच शाळाशाळांमधून विषमता निर्माण होते आणि जी शाळा अभ्यासात आणि इतर गोष्टीमध्ये स्पर्धेत अधिक पुढे जाते तीच शाळा चांगली अशी पालकांची भावना बनते. वास्तविक अशी चांगली शाळा ही थोड्या मुंलांसाठी चांगली आणि अनेक मुलांसाठी चांगली नसलेली शाळा असते हे सत्य सहजपणे जाणवत नाही. त्यामुळेच अशा शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालक-मुलांची झुंबड उडते आणि मग प्रवेशापासूनच मुलांमध्ये स्पर्धेचे मानसिक ताण निर्माण व्हायला सुरवात होते.\u003cbr\u003e\u003cbr\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964779061539,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/38f.jpg?v=1750158199"},{"product_id":"snshodhn-krtaanaa","title":"संशोधन करताना","description":"संशोधन क्षेत्रात करण्यासारखे खूप आहे. एम्.फिल. व मुख्यत: पीएच.डी.पदवीसाठी संशोधन करावेच लागते. तसेच एम्.ए., एम.कॉम, एम्.बी.ए. या पदवी अभ्यासासाठीही संशोधन उपयुक्त ठरते, हे सर्वांना ज्ञात आहेच. याशिवाय शिष्यवृत्तीसाठी, स्वतःला रूची आहे म्हणून अनेकजण संशोधन करीत असतात. पत्रकारिता करतानाही एखाद्या समस्येवर संशोधन करुन त्याची मांडणी व त्यावर उपाय सुचवावे लागतात.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e संशोधन करताना हे पुस्तक वरील सर्व अभ्यासकांना उपयोगी पडेल. याशिवाय व्यावसायिक संशोधक म्हणून काम करताना, सल्लागार म्हणून काम करतानाही हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल यात शंका नाही.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964779290915,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/213f.jpg?v=1750158217"},{"product_id":"karta-karvita","title":"कर्ता करविता : आधुनिक मेंदूसंशोधन व आपले जीवन | रमेश पानसे, राजश्री क्षीरसागर , अनिता देशमुख-बेल्हेकर","description":"या विश्वातील सर्वात मोठे कोडे म्हणजे मानवाचा मेंदू होय. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eभाषा, गणित, परिसराची जाण, स्मृती , विचार , ऊहापोह , निर्णय आणि कार्यवाही यांचा उगम मेंदूतच असतो. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eश्वसन, रुधिराभिसरण आणि पचनक्रिया जीवनाला पायाभूत असतात. या क्रियांवर देखील मेंदूचेच नियंत्रण असते. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eमनाचे कार्य म्हणजे मेंदूचे कार्य. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eशरीरावर मनाच्या होणाऱ्या परिणामांमुळे मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, आणि पचनसंस्थेशी निगडीत असे अनेक आजार उद्भवतात. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eमेंदूच्या कार्यातील सर्वात मोठे गूढ म्हणजे जाणीव. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eआधुनिक मेंदूसंशोधनातून मेंदूच्या कार्याची जसजशी माहीती मिळत गेली, तसतसा या सर्व विषयांवर प्रकाश पडू लागला आहे. या संशोधनाचा आढावा घेण्याचे कठीण काम ‘कर्ता-करविता’ हे पुस्तक कर्ते. मराठी भाषेला अभिमान वाटावा इतक्या चांगल्या प्रकारे हे पुस्तक झाले आहे. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e- डॉ. ह. वि. सरदेसाई \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964780667171,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/karta-karvita-3d.png?v=1750158296"},{"product_id":"tumcii-klaa-tumce-kriar-tumchi-kala-tumache-career","title":"तुमची कला तुमचे करिअर  | Tumchi Kala Tumache Career","description":"\u003cp\u003e\"कोणतीही क्रिया कौशल्यपूर्ण करणं म्हणजे कला, असं म्हणता येईल. भारतीय परंपरेत चौसष्ट कलांचा उल्लेख आहे. कला हे रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात विरंगुळा मिळवण्याचं एक साधन आहे, तसंच तो ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग आहे, असं मानण्यात येतं. तरीही भारतीय परंपरेत कलेकडे अर्थार्जनाचं साधन म्हणून बघितलेलं आपल्याला दिसत नाही.\u003cbr\u003eअनेक मुलांच्या अंगात विविध कला असतात. मात्र ‘अर्थार्जन’ हेच बहुतेक सर्वांच्याच शिक्षणाचं ध्येय असल्याने आणि कलेतून अर्थार्जन अशक्य असल्याची बहुतेक पालकांची ठाम श्रद्धा असल्याने अशा मुलांची कला छंदापुरती मर्यादित राहते. यातून ही मुलं केवळ अर्थार्जनासाठी नावडतं काम करत राहतात आणि कामातल्या आनंदाला पारखी होतात.\u003cbr\u003eमागच्या वीस-पंचवीस वर्षांत जसजशी देशाची आर्थिक प्रगती झाली, तसतशी कलांना ऊर्जितावस्था आली. आज औपचारिक क्षेत्रांखेरीज कलाधिष्ठित अनेक क्षेत्रं उपलब्ध आहेत. त्या कलांचं व्यवसायात रूपांतर करून पुरेसं अर्थार्जन तर करता येतंच, पण आपल्याला आवडणार्‍या क्षेत्रात काम करण्याचा अतुलनीय आनंदही मिळविता येतो. अशा प्रकारे कलेकडे व्यवसाय म्हणून पाहणार्‍या, अंगभूत कला असणार्‍या अनेक व्यक्ती व्यावसायिक कलाकार झाल्या. कला हेच त्यांच्या उपजीविकेचं साधन झालं. अशा २० व्यक्तींनी कलेतून यशस्वीरित्या व्यवसाय कसा केला, हे सांगण्याचा आम्ही या पुस्तकाद्वारे प्रयत्न केला आहे.\u003cbr\u003eज्यांना आपल्या कलेतून उपजीविका करण्याची इच्छा आहे त्यांना व त्यांच्या पालकांना हे पुस्तक प्रेरणादायी ठरू शकेल असा विश्वास वाटतो. \u003cbr\u003eThis book chronicles the success stories of people who have made successful careers in ARTS. The books inspires and guides the young people who wish to make their career in Arts.  \"\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964783092003,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1085TumachiKalaTumacheCareer-3d.jpg?v=1750158405"},{"product_id":"praaciin-bhaartiiy-shikssnnpddhtii-prachin-bharatiya-shikshanpaddhati-annt-sdaashiv-altekr","title":"प्राचीन भारतीय शिक्षणपद्धती | Prachin Bharatiya Shikshanpaddhati | अनंत सदाशिव अळतेकर","description":"\u003cp\u003eवेदिक कालापासून ते सुमारे इ. स. १२०० पर्यंतच्या भारतीय शिक्षण पद्धतीच्या स्वरूपाचे विवेचन या पुस्तकात करण्यात आले आहे. बौद्ध, जैन व हिंदू धर्म व संस्कृति या एकाच वृक्षाच्या शाखा असल्यामुळे प्रस्तुत पुस्तकात बौद्धादि धर्मग्रंथात मिळणार्‍या माहितीचाही उपयोग करण्यात आलेला आहे. प्राचीन इतिहासाचा काल मुसलमानी अंमल प्रस्थापन होण्याच्या वेळी संपतो, असा सामन्यात: संकेत असल्यामुळे या विषयाचा इतिहास तेराव्या शतकाच्या प्रारंभापर्यंत नेण्यात आला आहे. पुस्तक वाचून आपल्या शिक्षणपद्धतीत जे अनेक गुण होते, त्यांची वाचकांना योग्य कल्पना येईल. \u003cbr\u003eनविन शैक्षणिक धोरणानुसार (छएझ) भारतीय ज्ञानप्रणाली (खपवळरप घपेुश्रशवसश डूीींशा) हा विषय सर्व ज्ञान शाखांसाठी अनिवार्य करण्यात आला आहे. भारतीय ज्ञानप्रणाली या विषयाच्या विद्यार्थ्यांना सदर पुस्तक निश्चितच उपयुत ठरेल असा विश्वास वाटतो.  A book on Education in Ancient India by renowned Indologist and Historian Anant Altekar. Useful for the students Indian Knowledge System as per New Education Policy (NEP)\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964789612835,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1129PrachinBharatiyaShikshanPaddhat-fr.jpg?v=1750158647"}],"url":"https:\/\/kanakbook.in\/collections\/shikssnnshaastr.oembed?page=2","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}