{"title":"साहित्य-समीक्षा","description":"","products":[{"product_id":"sant-janabai","title":"संत जनाबाई - चरित्र व काव्य","description":"\u003cp\u003eनामदेवांची दासी आणि ज्ञानेश्वरांची सखी असणार्या ‘संत जनाबाई’ या जनमानसांत आजही लोकप्रिय आहेत. खेड्यापाड्यातील स्त्रिया आजही दळताना, कांडताना ज्या ओव्या म्हणतात, त्या या जनाईच्याच ! आपल्या दिनचर्येतून विठूची भक्ती करण्याचा जनाबाईंचा हा भाव सर्वसामान्यांना मोहित करतो. जनाबाईंच्या ठायी एक अभिजात प्रतिभा, तरल संवेदनशीलता होती हे त्यांच्या अभंगातून समोर येते. एका दासीपासून ते संत पदापर्यंत त्यांनी प्रवास केला तो स्वयंप्रेरणेने. मध्ययुगीन कवयित्रींमध्ये संत जनाबाई या आपल्या आध्यात्मिक अधिकाराने आणि कार्यकर्तृत्वाने उजव्या ठरल्या.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eसमग्र संतमंडळातही त्यांचे स्थान विशेष आहे. मात्र, तरीही  संत जनाबाई या त्यांच्या समकालीन संतांपेक्षा दुर्लक्षित राहिल्या. त्यांचे जीवनचरित्र, त्यांचे कार्य, त्यंाच्या अभंगांतील गोडवा नव्या पिढीला चाखता यावा यादृष्टीने संत साहित्याचे अभ्यासक असणार्या विविध लेखकांच्या लेखणीतून ‘संत जनाबाई- चरित्र व काव्य’ हा वाचनीय ग्रंथ आकारास आला आहे. या ग्रंथातून जनाबाईंचे व्यक्तित्व तर उलगडतेच परंतु त्यांच्या अभंगांचे समग्र संकलन वाचकांस जनाबाईंच्या आध्यात्मिक व्यक्तिमत्त्वाची अनुभूतीही देतो ! \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964679184675,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/922f.jpg?v=1750154825"},{"product_id":"streevad-sahitya-ani-samiksha","title":"स्त्रीवाद साहित्य आणि समीक्षा","description":"\u003cp\u003eस्त्रीवादी चळवळ ही आधुनिक लोकशाहीवादी राजकारणाचा पाया असणारी चळवळ आहे. पुरुषांनी उभ्या केलेल्या व्यवस्थांचा पुनर्विचार करण्याची गरज आत्मभान आणि सामाजिक व्यवस्थांचा अभ्यास या दोन्हींमधून स्त्रियांच्या लक्षात आली.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्त्रीवादाविषयी बोलणं म्हणजे फक्त स्त्रियांनी स्त्रियांच्या प्रश्नांविषयी बोलणं नाही, तर स्त्री आणि पुरुष दोघांनीही, ते प्रश्न निर्माण करणार्यान व्यवस्थेविषयी बोलणं. मानवी संस्कृतीचं प्रगल्भ रूप अहिंसक, संवादी आणि सत्याधिष्ठित स्त्री-पुरुष नात्यातून घडतं. त्यासाठी दोघांचंही प्रशिक्षण व्हावं लागेल. पुरुषसत्ताक व्यवस्थेने अनेक क्षेत्रात गंभीर प्रश्न उभे केले आहेत. त्यांच्यावर उपाय शोधायचा, तर त्यासाठी स्त्री-पुरुष नात्यात बदल घडवणं पायाभूत ठरेल. या विचारांमधून जे तत्त्वज्ञान निर्माण होतं आहे, त्याला स्त्रीवाद असं म्हणतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया तत्त्वज्ञानाची वाटचाल समजावी म्हणून पाश्चात्त्य स्त्रीवादाच्या आणि भारतीय स्त्रीवादाच्या जडणघडणीचा आढावा या पुस्तकात घेतला आहे. तसंच स्त्रीवादी साहित्य कशाला म्हणता येईल आणि साहित्याची समीक्षा करण्यासाठी स्त्रीवादी निकष असू शकतील काय, याचा शोध घेतला आहे. स्त्रीवादी समीक्षेचे काही नमुनेही या पुस्तकात दिलेले आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्त्रीवादाच्या अभ्यासकांना, तसंच स्त्रीवादाविषयी जिज्ञासा असणार्याद सर्वांनाच हे पुस्तक निश्चित उपयुक्त ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964683378979,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/929f.jpg?v=1750154868"},{"product_id":"prachin-marathi-vandmayache-swarup","title":"प्राचीन मराठी वाडःमयाचे स्वरुप","description":"\u003cp\u003e‘प्राचीन मराठी वाङ्मयाचे स्वरूप’ या ग्रंथाचे लेखक - प्रा. ह. श्री. शेणोलीकर यांचा जन्म २२ जानेवारी १९२० रोजी जमखंडी (कर्नाटक) येथे झाला. त्यांचे एम.ए.पर्यंतचे शिक्षण पुण्याला डेक्कन एज्युकेशन सोसायटी या संस्थेतून झाले. बी.ए.ला त्यांना मराठीचे ‘तर्खडकर सुवर्णपदक’ मिळाले.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e दैनिक ‘ज्ञानप्रकाश’ व ‘महाराष्ट्र मासिक’ यांमध्ये काही वर्षे ते संपादकवर्गात होते. ‘नवा महाराष्ट्र’ नावाचे एक त्रैमासिकही त्यांनी चालविले. बेळगावच्या लिंगराज आणि राणी पार्वतीदेवी महाविद्यालयांत अकरा वर्षे काम केल्यानंतर धुळ्याच्या एस. एस. व्ही. पी. कॉलेजमध्ये मराठी विभागाचे प्रमुख म्हणून १९६६ पर्यंत ते काम करीत होते. त्यानंतर धुळे येथील विद्यावर्धिनी संस्थेच्या वाङ्मय आणि वाणिज्य महाविद्यालयातून मराठी विभागप्रमुख व उपप्राचार्य म्हणून ते १९८० च्या जानेवारीत निवृत्त झाले.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e प्राचीन मराठी वाङ्मय, विशेषत: संतवाङ्मय हा त्यांचा व्यासंगाचा खास विषय आहे. सूक्ष्म शास्त्रीय अभ्यासाच्या जोडीला सामाजिक दृष्टी असल्यामुळे         प्रा. शेणोलीकरांच्या लेखनात व संपादनात एकप्रकारचा नवा दृष्टिकोन दिसून येतो. ‘ज्ञानेशांची अमृतवाणी’, ‘नामयाची अमृतवाणी’ आणि ‘महाराष्ट्र संस्कृती : घडण आणि विकास’ (सहकार्याने) हे त्यांचे ग्रंथ अभ्यासकांना एक नवी दृष्टी देतात. ‘मायणीची मंजुळा’ सारखी त्यांची ललितकृती अशीच लक्ष्यवेधी आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e निवृत्तीनंतरच्या काळात विद्यापीठ अनुदान मंडळाच्या प्रोत्साहनाने \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e श्री. शेणोलीकरांनी ‘मध्ययुगीन मराठी वाङ्मयातील तत्त्वज्ञानात्मक संज्ञांचा वर्णनात्मक कोश’ (टंकलिखित पृष्ठे सुमारे ९५०) सिद्ध केला आहे. त्यासाठी त्यांनी लिहिलेली आठपानी प्रस्तावना मराठी संतांच्या तत्त्वज्ञानावर नवा प्रकाश टाकते.  (प्रस्तुत ग्रंथाचे परिशिष्ट पहा.)\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964717195555,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/592f.jpg?v=1750155798"},{"product_id":"marathi-kadambariche-prarmbhik-valan","title":"मराठी कादंबरीचे प्रारंभिक वळण","description":"\u003cp\u003e या ग्रंथात मराठी कादंबरीचा उगम या सांस्कृतिक वस्तुस्थितीची अपूर्णमित संकल्पनेच्या आधारे मीमांसा केली आहे. तसंच तिचं प्रारंभीच्या काळातलं रूप समजून घेण्याचं आव्हान एकोणिसाव्या शतकातल्या लुप्तप्राय झालेल्या १३५ कादंबर्‍यांच्या साहाय्याने पेललं आहे. एकोणिसाव्या शतकातल्या सुशिक्षितांप्रमाणेच तत्कालीन कादंबरीही साम्राज्यवादी आणि राष्ट्रवादी या दोन विरोधी भूमिकांमध्ये आंदोलत होती. प्रस्तुत ग्रंथात या दोन विरोधी भूमिकांना अनुसरून पुढे आलेल्या तिच्या रूपाचं वस्तुनिष्ठपणे आणि अनेक बारकाव्यांसह विवेचन केलं आहे. त्यामुळे हे विवेचन साहित्याच्या अभ्यासाला नक्कीच नवी दिशा देईल. एक ऐतिहासिक भाष्य आणि दुर्मीळ दस्तऐवज म्हणून या ग्रंथाचं महत्त्व आहेच, पण सध्याच्या काळातल्या साहित्याच्या संशोधकांसाठीसुद्धा हा एक उत्तम संदर्भ ग्रंथ आहे.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964733022499,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/741f.jpg?v=1750156357"},{"product_id":"shree-sant-tukaramanchya-gathyacha-abhyas","title":"श्री संत तुकारामांच्या गाथ्याचा अभ्यास","description":"\u003cp\u003e श्री. रा. शं. नगरकर यांनी अतिशय परिश्रम घेऊन तुकारामांचे अनेक प्रकाशित गाथे मिळवले. जे गाथे मिळत नव्हते त्यासाठी प्रयत्नपूर्वक परिश्रम घेऊन त्यांनी ते प्राप्त करून घेतले आणि गेली अनेक वर्षे सातत्याने या गाथ्यांचा अभ्यास करून त्यांचा प्रमाणभूत आलेख या ग्रंथाद्वारे प्रसिद्ध केला आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  या सर्व गाथ्यांचा अभ्यास करताना अभ्यासाचा दृष्टिकोन हा ठेवला की, त्या गाथ्यांचा, संकलनकारांचा इतिहास यांची यथासांग माहिती व्यवस्थित यावी. त्याकाळी या गाथ्यांवर काय प्रतिक्रिया दिल्या गेल्या याच्याही नोंदी दिल्या आहेत.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  या गाथ्यांची मांडणी करताना तौलनिक दृष्टी वापरून त्यांनी हा अभ्यास केला आहे. ही तुलना करताना पुढील मुद्दे विचारात घेतले आहेत- १) अभंग संख्या २) प्रक्षिप्त चिकित्सा ३) दुबार अभंग ४) तोडलेले अभंग ५) नामसादृश्यामुळे समाविष्ट झालेले अभंग ६) वेगवेगळ्या लोकांचे समाविष्ट झालेले अभंग ७) ओळीचे अभंग ८) वर्गीकृत अभंग इत्यादी.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  तुलनेसाठी त्यांनी कोष्टके तयार केली आहेत. त्यामुळे गाथ्यांचे स्पष्ट चित्र डोळ्यासमोर उभे राहते. अपार परिश्रम करून या गाथ्यांचा अभ्यास श्री. नगरकरांनी या ग्रंथाद्वारे आपल्यासमोर प्रस्तुत केला आहे. या ग्रंथाची भाषा सरळ सोपी असली तरी आपले मुद्दे मात्र नगरकरांनी परखडपणे मांडले आहेत. ह्या वाटेला आत्तापर्यंत कोणी गेलेले नाही. हा अक्षुन्न अशा तर्हेचा या मार्गाने केलेला प्रवास आहे. ज्ञानपीठकार श्री. भालचंद्र नेमाडे यांनीही या लेखांची दखल घेतली आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e डॉ. कल्याण काळे\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964744786211,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/816f.jpg?v=1750156753"},{"product_id":"striyanchya-niyatkalikancha-itihas","title":"स्त्रियांच्या नियतकालिकांचा इतिहास","description":"\u003cp\u003eएकोणिसावं शतक स्त्री-भान, स्त्री-जाणिवा सर्वार्थानं सजग होण्यात उल्लेखनीय स्थित्यंतर घेऊन आलं. सार्वजनिक अवकाशात अनेकानेक माध्यमांतून स्त्रियांच्या विचारजाणिवा प्रखरतेनं अभिव्यक्त होण्याचा हा काळ होता. याला मोलाची साथ मिळाली ती स्त्री-विषयक नियतकालिकांची. कैक काळ थोपवलेली, दडपलेली, दबून राहिलेली स्त्रियांच्या भावविश्वातली स्पंदनं, शब्द नि लेखणीतून या नियतकालिकांमधून असोशीनं व्यक्त होऊ लागली. या अर्थी स्त्रियांचं समाज-सांस्कृतिक तथा राजकीय विचारभान व्यापक करण्यात, स्त्री विकासाची बिजं भवतालात रुजवण्यात ती मदतगार ठरली. स्त्री प्रबोधनाची धुरा जोपासण्यात, दृढमूल करण्यातही त्यांचा लक्षणीय वाटा आहे. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  १८५५ मध्ये प्रथमतः सुरू झालेलं ‘सुमित्र’ ते आजघडीचं ‘मिळून सार्याजणी’, ‘माहेर’, ‘मानिनी’, ‘प्रपंच’, ‘बहिणा’ असा हा प्रदीर्घ प्रवास रेखता येतो. या सर्व ज्ञात-अज्ञात नियतकालिकांचा खोलवर धांडोळा प्रस्तुत ग्रंथामधून डॉ. स्वाती कर्वे यांनी घेतला आहे. स्त्रियांच्या नियतकालिकांचं ऐतिहासिक दस्तऐवजीकरणच त्यांनी साकार केलं आहे. स्त्री-अभ्यासातही यामुळे मौलिक भर पडलेली आहे.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964765724963,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/871f.jpg?v=1750157570"},{"product_id":"janwadi-sahityik-anna-bhau-sathe","title":"जनवादी साहित्यिक अण्णा भाऊ साठे","description":"\u003cp\u003e\tशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जीवनप्रवास हा पारंपरिक आणि आधुनिक काळाच्या सीमारेषेवर व्यतीत झाला. त्यामुळेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वात पारंपरिक ज्ञान,  अनुभव आणि आधुनिक विचारांचा सुरेख संगम होता. त्यातूनच त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व फुलत गेले. त्यांच्या विचारातील पारदर्शकता, सखोलता, स्पष्टता आणि संवेदनशीलता या सर्व बाबी भावून आणि भारावून टाकतात. शिक्षण कमी असूनही अंतःकरणातील ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांनी सभोवतालच्या प्रतिकूल परिस्थितीचा वाङ्मयीन निर्मिती आणि मूल्यांवर परिणाम होऊ दिला नाही. ते आपल्या वाङ्मयीन जाणिवांशी नेहमीच प्रामाणिक राहिले. हेच शाहीर अण्णा भाऊ साठेंचे सर्वांत मोठे गुणवैशिष्ट्य मानावे लागेल. उत्तम कथाकार, कादंबरीकार, कामगारनेता आणि समाजसुधारक अशा अनेक भूमिका त्यांनी लिलया पेलल्या. ‘स्मशानातील सोनं’ या कथेत त्यांची गुणवैशिष्ट्ये प्रकर्षाने दिसून येतात. प्रतिकूल परिस्थितीशी झगडताना माणूस कसा असाहाय्य होत जातो याचे विदारक दर्शन त्यात घडते. महाविद्यालयीन जीवनात त्यांच्या ‘फकिरा’, ‘वारणेचा वाघ’ या कादंबर्‍यांनी माझे मनोविश्व व्यापून टाकले होते. शाहीर अण्णा भाऊ साठे यांचे जीवन आणि कार्य यावर दर्जेदार ग्रंथ लिहावा अशी माझी मनोमन इच्छा होती. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राच्या’ पुढाकाराने  निघणार्‍या या ग्रंथाने ती पुरी होत आहे.\n\u003cbr\u003e\t या ग्रंथासाठी मान्यवर लेखकांनी लेखन केले आहे. या लिखाणांमधून ‘शाहीर अण्णा भाऊ साठे’ यांच्या जीवनावर नव्याने प्रकाश पडेल आणि त्यांचे अनेक अज्ञात पैलू वाचकांसमोर येतील याबद्दल मला खात्री आहे. या ग्रंथाचे मार्गदर्शक म्हणून भूमिका निभावताना मला अतिशय समाधान लाभत आहे. डॉ. पी. विठ्ठल, डॉ. राजेश्वर दुडूकनाळे यांनी ग्रंथनिर्मितीसाठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964765790499,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/874f.jpg?v=1750157575"},{"product_id":"saad-padsaad","title":"साद-पडसाद  : स्त्री-प्रश्नांचे चित्रण करणाऱ्या निवडक कादंबऱ्यांचा वेध ..'यमुना पर्यटन ते ब्र'","description":"एकोणिसाव्या शतकातील प्रबोधन पर्वात ‘स्त्री जीवन’ सांस्कृतिक जीवनात केंद्रवर्ती आले. स्त्री जीवना विषयीचे नवे भान येऊन स्त्रियांच्या प्रश्नांत नवे मार्ग काढण्याची कालसंगत प्रेरणाही निर्माण झाली. त्याचवेळी समाजजीवनाचे, माणसांच्या जीवनानुभवांचे चित्रण व्यापक पटावर करणार्‍या ‘कादंबरी’ या कथात्म साहित्य प्रकाराच्या लेखनाला सुरुवात झाली. साहजिकच ‘स्त्री जीवन’ कादंबरी लेखनाचा मुख्य विषय झाले.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e१८५७ साली प्रसिद्ध झालेली पहिली मराठी सामाजिक कादंबरी ‘यमुना पर्यटन’ तत्कालीन स्त्रीप्रश्नांचे चित्रण करणारीच होती. गेल्या १५० वर्षात ‘स्त्री’ हा समाजातील महत्त्वाचा परिवर्तनशील घटक आहे. या दीर्घकाळात स्त्री जीवन बदलत आले. स्त्रियांच्या प्रश्नांचे स्वरूप पालटत आले. बदलत्या स्त्री प्रश्नांचे ‘साद-पडसाद’ सामाजिक कादंबरीतून उमटले. स्त्री प्रश्नांची मांडणी करणार्‍या कादंबर्‍यांचा एक स्वतंत्र प्रवाहच विकसित झाला.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eविधवा विवाह, विषम विवाह, परित्यक्तेचे जीवन, घटस्फोट, पतिपत्नींचे बदलते नाते, १९७५ नंतर स्त्रीचे जागृत होणारे आत्मभान आणि स्त्रीची विकसित स्वयंनिर्णय क्षमता, इत्यादी प्रश्नांचे ‘साद-पडसाद’ कादंबर्‍यांतून चित्रित झाले. ‘यमुना पर्यटन’ (१८५७) ते ‘ब्र’ (२००५) या काळातील महत्त्वाच्या निवडक कादंबर्‍यांतील ‘साद-पडसादांचा’ आस्वादक व चिकित्सक वेध डॉ. स्वाती कर्वे यांनी घेतला आहे. स्त्री प्रश्नांबरोबर विकसनशील स्त्री जीवनाचा, बदलत्या सामाजिक, सांस्कृतिक जीवनाचा आलेखही प्रातिनिधिक स्वरूपात त्यांनी यामधून साकार केला आहे.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e- डॉ. रेखा साने-इनामदार\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964768805155,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/993f.jpg?v=1750157727"},{"product_id":"marathi-sant-tatvdnyan-kosh","title":"मराठी संत-तत्त्वज्ञान संज्ञा-कोश","description":"\u003cp\u003eसंत साहित्यातील तत्त्वज्ञान विषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याचा प्रगत अभ्यासासाठी दुहेरी दृष्टीने उपयुक्त होणार आहे. तात्विक संज्ञांपाठीमागील संकल्पना स्पष्ट करून घेण्याच्या दृष्टीने वाङमय अभ्यासकाला सदर कोश मार्गदर्शक होईल आणि संतसाहित्यातील अवतरणांच्या द्वारा तात्विक संज्ञांच्या उपयोजनांवर प्रकाश पडत असल्यामुळे भारतीय तत्वज्ञानाच्या अभ्यासकांनाही सदर कोश उपयुक्त वाटेल. शिवाय जिज्ञासू भाविकांच्या श्रद्धेला डोळस करण्यासाठी हा संज्ञाकोश उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटतो.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964771393827,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/994f.jpg?v=1750157772"},{"product_id":"snshodhn-krtaanaa","title":"संशोधन करताना","description":"संशोधन क्षेत्रात करण्यासारखे खूप आहे. एम्.फिल. व मुख्यत: पीएच.डी.पदवीसाठी संशोधन करावेच लागते. तसेच एम्.ए., एम.कॉम, एम्.बी.ए. या पदवी अभ्यासासाठीही संशोधन उपयुक्त ठरते, हे सर्वांना ज्ञात आहेच. याशिवाय शिष्यवृत्तीसाठी, स्वतःला रूची आहे म्हणून अनेकजण संशोधन करीत असतात. पत्रकारिता करतानाही एखाद्या समस्येवर संशोधन करुन त्याची मांडणी व त्यावर उपाय सुचवावे लागतात.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e संशोधन करताना हे पुस्तक वरील सर्व अभ्यासकांना उपयोगी पडेल. याशिवाय व्यावसायिक संशोधक म्हणून काम करताना, सल्लागार म्हणून काम करतानाही हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल यात शंका नाही.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964779290915,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/213f.jpg?v=1750158217"},{"product_id":"phule-ambedkar-kosh","title":"फुले-आंबेडकरी वाङमय कोश | Phule-Ambedkari Vangmay Kosh | संपादक : डॉ. महेंद्र भवरे | Sampdak : Dr. Mahendra Bhaware","description":"\u003cp\u003eसामाजिक-सांस्कृतिक जीवनात प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध एखादे बंड झाले की, त्यातून समाज आणि साहित्य यांना नवी मूल्ये प्राप्त होत असतात. एकोणिसाव्या शतकात जोतीराव फुले आणि विसाव्या शतकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अशा एका बंडाचा प्रारंभ केला. फुले-आंबेडकरी प्रेरणेतून निर्माण झालेल्या वाङ्मयाला दलित वा फुले-आंबेडकरी वाङ्मय असे संबोधले जाते. या वाङ्मयाचे स्वरूप आणि मूल्ये यांचे विवेचन, तसेच आंबेडकरी विचार आणि साहित्यिक यांच्या योगदानाविषयीचे विस्तृत विवेचन हा या कोशाचा गाभा आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003eज्या भाषेत विविध विषयांच्या कोशाची निर्मिती होते, ती भाषा ज्ञानक्षेत्रात संपन्न बनते. हा कोश म्हणजे ज्ञानक्षेत्रातील मराठी भाषेचा महत्त्वपूर्ण हस्तक्षेप असून संस्कृती आणि विचार यांचे संचित आहे. या कोशातील ज्ञान-संकलन अधिकृत आणि मान्यताप्राप्त माहितीवर अधिष्ठित असून गरजेनुसार ससंदर्भ चर्चा केलेली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003eसामाजिक, सांस्कृतिक, भाषिक आणि ज्ञानविज्ञानपर इयत्तेचा ठसा या कोशाच्या अंतर्बाह्य स्वरूपावर उमटला आहे. कोशातील नोंदींचे स्वरूप जास्तीत जास्त वस्तुनिष्ठ असून विषयाच्या स्वभावानुरूप त्यांची रचना केलेली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003eआंबेडकरपूर्व, आंबेडकरकालीन आणि आंबेडकरोत्तर कालखंडातील सामाजिक, सांस्कृतिक इतिहासाचे स्वरूप, या कालखंडातील वाङ्मय, लेखकांचे योगदान या विषयी अधिकृत, विश्वसनीय माहिती आणि एक महत्त्वाचा ज्ञानस्रोत म्हणजे फुले-आंबेडकरी  वाङ्मयकोश!\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eAn important encyclopedia of Phule-Ambedkarite literature edited by Dr Mahendra Bhaware.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964785975587,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1089-phuleambedkarkoshcover3d.jpg?v=1750158534"}],"url":"https:\/\/kanakbook.in\/collections\/saahity-smiikssaa.oembed","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}