{"title":"राजकीय","description":"","products":[{"product_id":"muslim-rajkiya-vicharwant-ani-rashtravad","title":"मुस्लीम राजकीय विचारवंत आणि राष्ट्रवाद","description":"\u003cp\u003eभारतीय राष्ट्रवादाच्या विचारपरंपरेत मुस्लीम विचारवंतांचे मोठे योगदान आहे. परंतु, पूर्वग्रहदूषित इतिहास लेखनामुळे फुटीरवादी राजकारण करणारे मौलाना महंमद अली, शौकत अली, बॅरिस्टर जिना आणि मोहम्मद इकबाल हेच तेवढे मुस्लीम नेते होते असा समज पसरत गेला, तो आजतागायत ! वास्तविक विभाजनवादी विचारांना छेद देऊन भारतीय राष्ट्रवादाचा पुरस्कार करणारे कैक लहानमोठे मुस्लीम नेते होऊन गेले. या मुस्लीम विचारवंतांनी समकालीन फुटीरवादी मुस्लीम नेत्यांचा वेळोवेळी समाचारही घेतला आहे. सर सय्यद अहमद यांच्या समकालीन असणारे तुफेल अहंमद मंगलोरी यांनी सर सय्यद यांच्या फुटीर राजकारणावर प्रकाश टाकून धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाचा पुरस्कार केला होता. मौलाना हुसैन अहमद मदनी हे भारताच्या संमिश्र राष्ट्रवादाचे पुरस्कर्ते होते. त्यांनी पवित्र कुरआनच्या आधारे संमिश्र राष्ट्रवादाची मांडणी केली होती. मौलाना हसरत मोहानी हे जसे गझलकार म्हणून प्रसिद्ध तसे ते राष्ट्रवादाचे प्रखर समर्थकही होते. लोकमान्य टिळकांचे ते अनुयायी होते. मोहानी यांनीच  प्रथम पूर्ण स्वराज्याचा सिद्धान्त मांडला. तर डॉ. रफिक झकेरीया यांनी बॅरिस्टर जिना यांच्या फुटीरतेवर चर्चा करणारे पुस्तकच लिहिले आहे. अशा या भारतीय मुस्लीम विचारवंतांची आणि त्यांच्या वैचारिक भूमिकेची प्रा. फकरुद्दीन बेन्नूर यांनी निष्पक्षपणे मांडणी केली आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eया पुस्तकात राष्ट्रवादाचा पुरस्कार करणार्या भारतीय मुस्लीम विचारवंतांविषयी वाचणे रोचक तर आहेच शिवाय त्यांच्याविषयी अधिक कुतूहल जागवणारे आहे, हे निश्चित ! \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964682723619,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/926f.jpg?v=1750154850"},{"product_id":"adhunik-rajakiya-vicharpranali","title":"आधुनिक राजकीय विचारप्रणाली","description":"\u003cp\u003eआधुनिक राजकीय विचारप्रणाली' हा विषय महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये शिकवला जातो. नेट\/सेट, संघ आणि लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा यांच्या अभ्यासाक्रमात या विषयाशी निगडित अनेक संकल्पनाचा समावेश आहे. त्यामुळे हे पुस्तक स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आणि महाविद्यालयात अध्यापन करणारे अध्यापक यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ ग्रंथ ठरेल.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eसदर पुस्तकात एकूण बारा प्रकरणांचा समावेश आहे. उदारमतवाद, लोकशाही, राष्ट्रवाद, लोकशाही-समाजवाद, सर्वंकषवाद इत्यादी पारंपरिक संकल्पनांबरोबरच नव-मार्क्सवाद, बहुसंस्कृतिवाद, समुदायवाद, नागरी समाज आदी आधुनिक आणि नवीनतम संकल्पनांविषयीही या पुस्तकात सविस्तर लेखन केलेलं आहे. पुस्तकात समाविष्ट संकल्पना समजण्यासाठी सुकर व्हाव्यात, म्हणून अनेक उदाहरणांचा समावेश केलेला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964685377827,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/947f.jpg?v=1750154954"},{"product_id":"bharatiya-rajyaghatanechi-olakh-ii","title":"भारतीय राज्यघटनेची ओळख","description":"\u003cp\u003eसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कला शाखेच्या (F.Y.B.A.) २०१९-२० च्या सुधारित अभ्यासक्रमानुसार (CBCS पॅटर्न) लिहिलेले क्रमिक पुस्तक. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eतसेच महाराष्ट्रातील इतर सर्व विद्यापीठातील राज्यशास्त्र व स्पर्धा परीक्षा यांच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964686721315,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/957f.jpg?v=1750155004"},{"product_id":"tiheri-talak","title":"तिहेरी तलाक","description":"\u003cp\u003eइस्लामने आपल्या स्त्रियांना आधुनिक लोकशाही राज्य व्यवस्थेला मान्य होण्याइतपत स्वातंत्र्य आणि हक्क दिले आहेत. परंतु इस्लामच्या नावानेच रूढ झालेल्या तिहेरी तलाकच्या प्रथेतून त्यांची सामाजिक सुरक्षितता धोक्यात आणली गेली. त्यासाठी कुरआनबाह्य तरतुदींचा आधार घेण्यात आला. मुस्लीम पुरुषसत्तेने लादलेल्या या गैरइस्लामिक प्रथेमुळे प्रेषित मुहंमद (स) यांच्या समाज सुधारणेचे व स्त्रीमुक्तीसाठी मांडलेले विचार अर्थहीन झाले. इस्लामने स्त्रियांना तलाक (खुला) घेण्याचा अधिकार दिला आहे; त्याला पतीच्या परवानगीची गरज नाही. पण गेल्या काही वर्षांपासून तलाक रद्दबातल करण्याच्या निमित्ताने इस्लामच्या तरतुदींबद्दल अपसमज पसरवत मुस्लिमांना, पर्यायाने इस्लामला शत्रुस्थानी आणले गेले. मुस्लीम महिलांना न्याय मिळवून देण्याचे ढोल बडवून तलाक प्रश्नांचे राजकारण करण्यात आले. त्यामुळे मूळ समस्या 'जैसे थे' अवस्थेत राहून एकतर्फी घटस्फोटाचा गुंता व त्यातील गैरसमज वाढत गेले. कोणीही या प्रश्नांच्या तळापर्यत जाण्याचा प्रयत्न केल्याचे आढळत नाही. या पुस्तकाच्या माध्यमातून तलाक प्रश्न समजून घेत, त्या गुंतागुंतीची उकल करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मूळ समस्येला इस्लामी न्यायशास्त्र, कुटुंबव्यवस्था, नातेसंबध, लोकशाही, राज्यघटना, धर्म आणि सामाजिक विरेचन अशा वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून समजून घेण्याचा प्रयत्न या पुस्तकातून करण्यात आला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964687212835,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/960f.jpg?v=1750155023"},{"product_id":"samkalin-antarrashtriya-rajkaran","title":"समकालीन आंतरराष्ट्रीय राजकारण","description":"\u003cp\u003e९\/११ने जागतिक राजकारणाची दिशाच बदलली. अनेक जुनी समीकरणे मोडली, नवीन तयार झाली. आजवर अमेरिका-भारतात ङ्गारसे सख्य नव्हते, ते आज मैत्रीच्या आणाभाका घेत आहेत. पाकिस्तानची तळी उचलणारी अमेरिका आज जातायेता त्याला ङ्गटकारतेय. आजवर चीनशी जुळवून घेणारी अमेरिका आता चीनच्या विरोधात आशियाई देशांची मोट बांधायचा प्रयत्न करतेय. भारतही जागतिक राजकारणात मोठ्या प्रमाणावर सक्रिय होऊन विविध करारांच्या माध्यमातून महत्त्वाची भूमिका वठवायचा प्रयत्न करतोय. त्याचा परिणाम भारताच्या अन्य देशांशी असलेल्या समीकरणांवर होतोय. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e एकीकडे अमेरिका-भारत-जपान-ऑस्ट्रेलिया असा चौकोन तयार होत असतानाच आशियात चीन-पाकिस्तान-रशिया असा नवा त्रिकोण तयार झालाय. हिंदी महासागराला जागतिक व्यापार आणि भूधोरणात्मक दृष्टिकोनातून अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त व्हायला सुरुवात झाली आहे. त्याच वेळी श्रीलंका, म्यानमार, मालदीव्ज, नेपाळ यांसारखे देश चीनकडे झुकत चालल्यामुळे भारतासोबत त्यांची ‘लव्ह-हेट रिलेशनशिप’ अधिक तीव्र होत चालली आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e या सगळ्या बदलांचा वेध घेण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964687376675,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/961f.jpg?v=1750155029"},{"product_id":"maharashtratil-parivartanacha-itihas","title":"महाराष्ट्रातील परिवर्तनाचा इतिहास","description":"\u003cp\u003eमहाराष्ट्रातील परिवर्तनाचा इतिहास\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964692357411,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/14f.jpg?v=1750155214"},{"product_id":"ekvisavya-shatkatil-dahashatvad","title":"एकविसाव्या शतकातील दहशतवाद","description":"\u003cp\u003e२१ व्या शतकात दहशतवादाचा प्रसार जगाच्या सर्व भागात झालेला आहे, विशेषत: भारतीय उपखंडात आणि मध्यपूर्वेत, दहशतवादाने नंगानाच घातला आहे. हत्या, बॉम्ब-स्फोट, अपहरण, खंडणी हे शब्द आता सर्वांच्याच परिचयाचे झाले आहेत. श्रीलंकेच्या L.T.T. E. च्या दहशतवादी गटाकडे, स्व:ताचे नाविक दल आणि वैमानिक दल आहे. यांच्या पुढची पायरी अल कायदा या दहशतवादी गटाच्या हातात अण्वस्त्रे पडण्याची भीती आहे. हे सर्व समजून घेण्याकरिता आणि त्याविरुद्ध संघर्ष करण्याकरिता प्रत्येकाने  हा ग्रंथ वाचून ही प्रवृत्ती, राक्षसी विचारधारा, विकृती समजून घेतली पाहिजे. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन त्या विरुद्ध लढा उभारला पाहिजे.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964697731363,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/110f.jpg?v=1750155406"},{"product_id":"gandhi-nawache-mahtma","title":"गांधी नावाचे महात्मा","description":"\u003cp\u003eमहात्मा गांधींचे निधन होऊन ३० जानेवारी २०१२ रोजी ६४ वर्षे पूर्ण होत आहेत. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e या महापुरुषाच्या सर्वंकष अशा जीवनविषयक विचारांचा प्रभाव गेली अनेक वर्षे कायम आहे आणि यापुढेही तो तसाच निरंतर राहणार आहे. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e गांधीजींची अहिंसा, शांतता, संवाद आणि समन्वय ही मूलभूत मूल्ये आजच्या बदलत्या वैज्ञानिक-यांत्रिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक पर्यावरणातही सुसंगत आहेत.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e गांधीजींचे विचार सर्व स्तरांमधील आणि सर्व वर्गांमधील माणसाला अंतर्मुख करणारे आहेत, एवढेच नव्हे तर आजच्या जीवघेण्या जीवनसंघर्षात आपापल्या जीवनशैलीचा पुनर्विचार करायला लावणारे आहेत.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e त्यांच्या या विचारांवरील - म्हणजेच गांधीवादावरील आणि पर्यायाने गांधीजींवरील- नेहरू, आचार्य अत्रे, सुभाषचंद्र बोस, जयप्रकाश नारायण, डॉ. आंबेडकर, शंकरराव खरात... अशा प्रतिभावंत विचारवंतांचे विचारप्रवर्तक लेख या ग्रंथात समाविष्ट केले आहेत. असे लेखक आजच्या काळात किमान वाचण्यास मिळणे, हेही तसे दुर्लभच!\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964716966179,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/591.jpg?v=1750155793"},{"product_id":"1984","title":"1984","description":"\u003cp\u003eकालातीत राजकीय भाष्य करणारी कलाकृती !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसत्तेचा विचार उघड करणारं अद्भुत वास्तव-कथन म्हणजे १९८४ ! माणसाच्या नैसर्गिक विपर्यासालाच अंतिम, सत्य व समर्थनीय ठरवणारी सत्ता, त्यातून घडत जाणारी बिनचेहर्‍याची माणसं आणि यात नैसर्गिक संवेदनशीलतेला पडत जाणारा भकासपणाचा विळखा ही कादंबरी कथानकाबरोबर अधिकाधिक घट्ट करत जाते. सत्तेच्या आकांक्षेनुरूप घडत व बदलत जाणारी समाजाच्या मनाची रचना व त्यासाठी सत्तेने राबवलेल्या मूलगामी पद्धती यांचं अफलातून भविष्यकथन जॉर्ज करत जातो. हे कथन पुढे सरकताना कल्पनेपलीकडचं वाटावं इतकं अस्सल उतरतं. म्हणूनच १९४८ साली लिहिलेली ही कादंबरी आजच्या घडीलाही तिचे कुठलेही संदर्भ हरवत नाही आणि कालातीत होते!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘समाजवादी लोकशाहीची स्थापना’ या भूमिकेवर निष्ठा असणार्‍या जॉर्ज ऑरवेलचं एकूण लेखन म्हणजे ध्येयवादी स्वप्नांना पोखरत जाण्यार्‍या सत्तेचा आलेख आहे. केवळ ‘टेबली लेखक’ म्हणून न मिरवता त्याच्या लेखनातून कृतिशील आणि निर्भीड कार्यकर्ता आपल्यासमोर येत जातो. त्यामुळे उद्ध्वस्त होतानाही वास्तवाशी सामना करण्याची त्याची अभूतपूर्व ताकद वाचकाला घेरून टाकते!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964718702883,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/614f.jpg?v=1750155840"},{"product_id":"manhunt","title":"मॅनहंट","description":"\u003cp\u003eनुकतीच मध्यरात्र झाली असताना बिन लादेन राहत असलेल्या कंपाउंडमधले रहिवासी जवळच कुठेतरी झालेल्या स्फोटांच्या आवाजाने खडबडून जागे झाले. बिन लादेनची मुलगी मरियम 'काय झालं' हे विचारण्यासाठी बिन लादेनच्या शयनगृहाकडे धावली. त्याने तिला ''खाली जाऊन झोप'' असं सांगितलं. त्यानंतर तो त्याची पत्नी अमालला म्हणाला, ''दिवा लावू नकोस.'' नक्कीच, ते बिन लादेनच्या तोंडचे अखेरचे शब्द ठरणार होते.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  ओसामा बिन लादेन आणि अल्-कायदाने अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारल्यानंतर अमेरिकेच्या प्रत्यक्ष धरतीवर झालेला पहिला दहशतवादी हल्ला म्हणजे ९\/११! या हल्ल्याने अमेरिकी नागरिकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण केली आणि प्रशासन, लष्करी यंत्रणा आणि गुप्तचर संस्था यांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्‍न उपस्थित केला. त्यामुळे 'बिन लादेनचा खातमा' हा त्यानंतर अमेरिकेच्या अस्मितेचा प्रश्‍न बनला. तरीसुद्धा तब्बल १० वर्षं अमेरिकेच्या तमाम अत्याधुनिक आणि अद्ययावत यंत्रणेला गुंगारा देण्यात ओसामा बिन लादेन यशस्वी ठरला. त्यामुळे त्याच्या शोधमोहिमेची ही कथा लक्षवेधी आणि थरारक ठरते!\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  पीटर बर्गन हे बिन लादेन आणि अल्-कायदावर लिहिलेल्या 'बेस्टसेलर' पुस्तकांचे लेखक आहेत. लादेनला भेटलेल्या मोजक्या पत्रकारांपैकी ते एक आहेत. ९\/११च्या हल्ल्यापूर्वी त्यांनी बिन लादेनची मुलाखत घेतली होती. ते सीएनएनचे राष्ट्रीय सुरक्षा विश्लेषक आणि न्यू अमेरिकन फाउंडेशनचे संचालकही आहेत. बर्गन यांची सखोल अभ्यासू वृत्ती आणि व्हाइट हाउस अधिकारी, सीआयए, पाकिस्तानी गुप्तचर संस्था आणि लष्कर यांच्याशी असलेला थेट संपर्क यांमुळे हे पुस्तक बिन लादेन आणि अल्-कायदा यांच्या विषयीच्या माहितीचा अधिकृत दस्तऐवज ठरते.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964726960419,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/699f.jpg?v=1750156171"},{"product_id":"western-thinkers1","title":"पाश्चिमात्त्य राजकीय विचारवंत","description":"\u003ctable data-mce-fragment=\"1\" width=\"163\"\u003e\n\u003ctbody data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003ctr data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003ctd data-mce-fragment=\"1\" width=\"163\"\u003e‘पाश्चिमात्य राजकीय विचारवंत’ हा विषय विविध विद्यापीठांमध्ये शिकविला जातो. नेट\/सेट, संघ आणि लोकसेवा आयोग अशा विविध परीक्षांच्या अभ्यासक्रमांत या विषयाचा समावेश आहे. प्रस्तुत पुस्तकाची रचना करताना ह्या सर्व गोष्टींचा विचार करून लेखन केलेले आहे. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e पाश्चिमात्य देशांना राजकीय विचारवंतांची फार मोठी परंपरा लाभलेली आहे. जगातील बहुसंख्य राजकीय विचारधारांचा जन्म पाश्चिमात्य राजकीय विचारवंतांच्या विचारातून झालेला दिसतो. पाश्चिमात्य राजकीय विचार परंपरेतील प्रमुख चौदा विचारवंतांच्या विचारांचा या पुस्तकाद्वारे सविस्तर आढावा घेतलेला आहे. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e पहिल्या दोन प्रकरणांत पाश्चिमात्य राजकीय विचारांची पायाभरणी करणार्‍या ‘प्लेटो’ आणि ‘ऍरिस्टॉटल’ या प्रमुख दोन विचारवंतांच्या विचारांचा समावेश केलेला आहे. त्यानंतर आधुनिक राज्यशास्त्राचा जनक निकोलो मॅकियाव्हेली आणि करारवादी विचारवंत थॉमस हॉब्ज, जॉन लॉक, रूसो या विचारवंतांच्या विचारांची माहिती दिलेली आहे. उदारमतवादी विचारवंत जॉन स्टुअर्ट मिल, राजकीय विचारांच्या क्षेत्रात क्रांतिकारी परिवर्तनाबद्दल सिद्धान्त मांडणारे कार्ल मार्क्स आणि थॉमस हिल ग्रीन यांच्याही विचारांचा या पुस्तकातून परामर्श घेतलेला आहे.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e प्रस्तुत पुस्तकाच्या माध्यमातून पाश्चिमात्य विचार प्रवाहातील बहुआयामी आणि बहुविध विचारप्रवाहांना समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्गास पाश्चिमात्य राजकीय विचारवंतांचे विचार समजण्यास मदत होईल. तसेच अभ्यासू प्राध्यापक वर्गाला अध्यापन करताना संदर्भ ग्रंथ म्हणूनही हे पुस्तक उपयुक्त ठरेल.\u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003c\/tbody\u003e\n\u003c\/table\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964736463139,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/984f.jpg?v=1750156476"},{"product_id":"bharatiya-rajyasanstha-ani-samajik-nyaya","title":"भारतीय राज्यसंस्था आणि सामाजिक न्याय","description":"\u003cp\u003eस्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव ही युरोपच्या प्रबोधनातून जगासमोर आलेली आणि फ्रेंच राज्यक्रांतीने प्रत्यक्षात उतरवण्याचे आव्हान म्हणून स्वीकारलेली तीन मूलभूत मानवी मूल्ये मराठी विचारवंतांना कशी मार्गदर्शक ठरली हे पुस्तकात दाखवून दिले आहे. या राज्यसंस्था आणि सामाजिक न्याय ह्यांचा जुळ्यांचा संबंध असतो हा मुद्दा विस्ताराने मांडला आहे सामाजिक न्यायावर चिंतन करून, त्याची वाढ आणि त्याचा पुरस्कार करणाऱ्या, तसंच अनेक मराठी अभ्यासकांना अजूनही अपरिचित असलेल्या, पण महत्त्वाच्या विचारवंतांचा आणि आपल्या विचारांना प्रत्यक्ष धोरणांतून अमलात आणणाऱ्या राज्यकर्त्यांचा परिचय हा ग्रंथ करून देतो व हे या ग्रंथाचे अत्यंत महत्वाचे योगदान आहे. याचबरोबर हा ग्रंथ सामाजिक शास्त्रांच्या सर्वसामान्य पाठ्यपुस्तकांतून वगळल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या चिंतकांचीदेखील ओळख करून देतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e– डॉ. जयंत लेले. ----\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया पुस्तकात पवारांनी १४ विचारवंतांचे विचार अभ्यासले आहेत. त्यातील रानडे, गोखले, तिळक आणि नेहरू यांचा भर लोकशाही राजवट स्थापन करून त्याद्वारे सामाजिक न्यायाची धोरणे अमलात आणण्याचा होता, तर महात्मा फुले, सयाजीराव गायकवाड, राजर्षी शाहू महाराज, वि. रा. शिंदे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे यांचा भर सामाजिक न्यायावर होता. अर्थात त्यांना पण भारतात राज्यसंस्था उभी करायची होती. पण ती ज्याच्या आधारावर उभी राहणार आहे, त्या नागरी समाजातील जातीवाद आणि अन्याय नष्ट करण्यासाठी त्यांनी अग्रक्रम दिलेला आपणास दिसतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e– डॉ. अशोक चौसाळकर\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964736823587,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/987f.jpg?v=1750156483"},{"product_id":"the-blood-telegram","title":"ब्लड टेलिग्राम : \n\nबांगला देश मुक्तिसंग्रामातल्या अमेरिकेच्या भारतविरोधी कारवायांचा अप्रकाशित अन्वयार्थ","description":"\u003cp\u003eबांगला देशाच्या फाळणीवर बेतलेलं ‘ब्लड टेलिग्राम’ हे पुस्तक म्हणजे शीतयुद्धाच्या काळातल्या आंतरराष्ट्रीय राजकारणातला अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. पूर्व पाकिस्तानमधल्या (आता बांगला देश) जनतेवर पाकिस्तानी लष्कराने अनन्वित अत्याचार केले, लाखोंच्या संख्येने निष्पाप नागरिकांच्या कत्तली केल्या आणि निर्वासितांना देशोधडीला लावून भारताचा आश्रय घेण्यासाठी भाग पाडलं. त्यामुळे बांगला देशाची फाळणी ही विसाव्या शतकातल्या सगळ्यात दयनीय शोकान्तिकांपैकी एक ठरली. केवळ शीतयुद्धातल्या डावपेचाचा भाग म्हणून नव्हे, तर भारत आणि इंदिरा गांधी यांच्याबद्दलच्या वैयक्तिक आकसापोटी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष निक्सन आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार किसिंजर यांनी बांगला देशातल्या अत्याचारांविरुद्ध आवाज उठवणार्यार अमेरिकी अधिकार्यांजची गळचेपी केली, अमेरिकी कायद्याचं उल्लंघन करून पाकिस्तानला शस्त्रपुरवठा केला आणि भारताविरुद्ध युद्धात उतरण्यासाठी चीनची मनधरणी केली. त्यामुळे या युद्धाचा आवाका अकारण वाढला आणि व्यापक युद्धसमान परिस्थिती निर्माण झाली. म्हणूनच १९७१च्या बांगला देशाच्या स्वातंत्रयुद्धाच्या इतिहासाची पुनर्मांडणी करून अमेरिकेच्या भूमिकेतला दुटप्पीपणा उघडकीला आणणारं हे एक महत्त्वाचं पुस्तक ठरतं!\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964746228003,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/855f.jpg?v=1750156815"},{"product_id":"ladha-sanyukta-maharashtracha","title":"लढा संयुक्त महाराष्ट्राचा","description":"\u003cp\u003e संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सहभागी झालेल्या अनेक नेत्यांनी, पत्रकारांनी त्यावर विपुल लेखन केले असले, तरी ते बरेचसे एकांगी, आत्मसमर्थन करणारे  आहे. संशोधकांनी अस्सल कागदपत्रांचा मागोवा घेत ग्रंथ प्रकाशित केले आहेत. तरीही या लढ्याचा समग्र आणि तटस्थ मागोवा घेणार्‍या ग्रंथाची उणीव भासत होतीच. ही महत्त्वाची कामगिरी ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक रविकिरण साने यांनी या ग्रंथाच्या रूपाने केली आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e संयुक्त महाराष्ट्र समितीचे काम म्हणजेच ङ्गक्त लढा, असा एकांगी विचार न करता कॉंग्रेसच्या प्रयत्नांचीही साधार माहिती या ग्रंथात आहे. मराठी कॉंग्रेस नेत्यांचे प्रयत्न का व कसे ङ्गसले आणि हा लढा विरोधी पक्षांच्या हाती कसा गेला, समितीच्या आंदोलनाने ‘महाराष्ट्र’ मिळाला, तरी ‘मंगल कलश’ मात्र यशवंतराव चव्हाणांच्या हातीच कसा गेला ही सर्व हकीकत ङ्गक्त लढ्याची नाही. विरोधी पक्षांचा वैचारिक गोंधळ, अहंमन्यता, ङ्गूट, महाराष्ट्रातील सामाजिक संघर्षातून आकारलेले नवे राजकारण, या सर्वांचा हा लख्ख आरसा आहे. या घुसळणीमधूनच महाराष्ट्राचे आजचे राजकारण तयार झाले आहे. त्यासाठी हा इतिहास समजून घ्यायला हवा. त्यासाठीच हे ग्रंथलेखन.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964761596195,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/401f.jpg?v=1750157369"},{"product_id":"checkmate","title":"चेकमेट : निवडणूक जिंकूनही भाजपने महाराष्ट्रातील सत्ता का गमावली ?","description":"\u003cdiv class=\"aa-product-details-bottom\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cdiv class=\"tab-content\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cdiv class=\"tab-pane fade in active\" id=\"description\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003e**पूर्वनोंदणी सुरू 15 मार्च रोजी पुस्तक प्रकाशित होईल. **\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003e२८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्राचे अठरावे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्राला खिळवून ठेवणार्‍या एका प्रदीर्घ राजकीय नाट्याची या शपथविधीने अखेर झाली. कुठल्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने राज्यात तोवर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. या सगळ्या काळात महाराष्ट्रातील जनता नव्या मुख्यमंत्र्यांची वाट पाहत असताना, बंद दाराआड घडत-बिघडत असलेल्या राजकीय सत्तासमीकरणांची रंजक आणि प्रसंगी थक्क करणारी सफर हे पुस्तक वाचकाला घडवते.\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eआजवर सर्वसामान्यांपुढे न आलेल्या गोष्टींची हकिकत आतील गोटातील स्रोतांकडून आणि खासगी संवादांच्या माध्यमातून सुधीर सूर्यवंशी यांनी वाचकांपुढे आणली आहे. तसेच या सर्व घडामोडींचा महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाच्या संदर्भात अर्थ लावण्याचा प्रयत्नदेखील केला आहे.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"aa-product-related-item\" data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/div\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964767756579,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/991.jpg?v=1750157657"},{"product_id":"jagatik-rajkaran","title":"जागतिक राजकारण","description":"राज्यशास्त्राच्या अभ्यासाच्या कक्षा रुंदावत असताना पारंपरिक व्याप्ती पलीकडे जाऊन, जगात घडणार्‍या विविध बदलांची नोंद घेऊन, त्यांचा जागतिक राजकारणावर होणारा परिणाम दर्शविणारे मराठीतील विशेष पुस्तक. यामध्ये सैद्धांतिक माहिती बरोबरच विश्लेषणात्मक दृष्टिकोनांचा विचार केला आहे. त्यामुळे पुस्तक अधिक उपयुक्त झाले आहे.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e या पुस्तकात जागतिक राजकारणाचा परिचय, त्यासंबंधीचे विविध सिद्धांत, जागतिकीकरणाची वेगवेगळी परिमाणे, राज्याचे बदलते स्वरूप, युद्ध, अण्वस्त्रप्रसार, मानवी हक्क यांसारख्या विषयांचा सखोल अभ्यास आहे. त्याचबरोबर दहशतवाद, स्थलांतर, पर्यावरण यासारख्या नवीन विषयांचा समावेश केला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘कोरोना महामारी’ मुळे जागतिक राजकारणावर होणार्‍या परिणामांची सर्वंकष माहिती देणारे विस्तृत प्रकरण आणि सर्वात शेवटी भविष्यातील वाटचालीसंबंधी वास्तववादी भूमिका स्वीकारून केलेले विवेचन.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964774408483,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1021f.jpg?v=1750157910"},{"product_id":"dakshin-maharashtra","title":"दक्षिण महाराष्ट्र : राजकीय चळवळी व नेतृत्व","description":"दक्षिण महाराष्ट्रातील संस्थानांस सामाजिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या व सांस्कृतिकदृष्ट्या मोठी वैशिष्ट्यपूर्ण परंपरा लाभलीआहे. आजवर या संस्थानांचा फारसा अभ्यास झालेला नाही. इतिहासाचे नामवंत अभ्यासक डॉ. अरुण भोसले यांच्या या ग्रंथाद्वारे प्रथमच दक्षिण महाराष्ट्रातील संस्थानांतील घडामोडींचा सुसंगत असा पट मांडला गेला आहे. संस्थानांतील राजकीय नेतृत्व व सामाजिक इतिहास यांत केंद्रस्थानी आहेत. वासहतिक सत्तासंबंध, स्वातंत्र्याचे धुमारे, चळवळींतील अंतरंग, अंतःप्रवाह आणि अंतर्विरोध यांनी गजबजलेला हा काळ होता. त्यामुळे संस्थांनी जीवनातील धामधूम काळाचे टकराव, एकमेकांना शह देणार्‍या घटना-घडामोडींचे इतिहासकथन या ग्रंथात आले आहे. छत्रपती शाहू कालखंड, ब्राह्मणेतर चळवळ, प्रजापक्षीय चळचळ, बाज्या-बैज्याचे बंड (रामोशी उठाव) या चळवळींबरोबरच फलटण, अक्कलकोट, औंध या चिमुकल्या संस्थांनांतील घडामोडींवर प्रस्तुत ग्रंथाद्वारे टाकलेला प्रकाशझोत महत्त्वाचा आहे. तसेच दक्षिण महाराष्ट्रातील राजकीय नेतृत्वाचे (संस्थानिक, चळवळीतील नेते, सनदी अधिकारी) नवे आकलन, नेतृत्व-तुलना-संबंध, तसेच काही प्रमाणात आलेला वंचितांच्या लढ्याचा इतिहास यादेखील महत्त्वाच्या नोंदी आहेत. प्रादेशिक-स्थानिक इतिहास म्हणून त्यास वेगळे महत्त्व आहे. डॉ. भोसले यांच्या या इतिहासदृष्टीत लोकशाहीच्या उदयापूर्वीच्या रंगभरणाची मीमांसा आहे.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e लोकप्रवादामागे दडलेल्या घडामोडींचे विश्लेषण, अन्वयार्थास त्यांनी महत्त्व दिले आहे. हे इतिहासकथन व्यक्ती व घटना-घडामोडी-केंद्रित ठेवल्यामुळे या ‘सांगण्या’ला बहुकक्षा प्राप्त झाली आहे. स्थानिक इतिहासाची मोठी सामग्री या ग्रंथात आहे. तटस्थ्यता आणि वस्तुनिष्ठतेचा अभाव असला की, इतिहासकथने सामाजिक रणसंग्रामाची, भावनादुःखीची कथने होतात. या पार्श्वभूमीवर हे इतिहासकथन जागरूक व विवेकी स्वरूपाचे आहे. दक्षिण महाराष्ट्रातील संस्थानांच्या दुर्लक्षित अशा फेरमांडणीमुळे संस्थानी व स्थानिक इतिहासलेखनाला नव्या दिशा प्राप्त होतील.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964774474019,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1022f.jpg?v=1750157917"},{"product_id":"dhumasata-afghanistan","title":"धुमसता अफगाणिस्तान","description":"गेली चार दशकं अफगाणिस्तान पूर्णपणे अस्थिर आहे. अफगाणिस्तानातील समाजाची मानसिकता, राष्ट्र या संकल्पनेचा अभाव, टोळीवादी निष्ठा या पैलूंबरोबरच अफगाणिस्तानच्या शेजारील देश आणि विश्व समुदायातील राष्ट्रं यांच्या भूराजनीतिक खेळीत अफगाणिस्तानचे सामाजिक, आर्थिक, राजकीय अपयश सामावलेले आहे. शस्त्रास्त्रांची तस्करी, मादक पदार्थांची पैदास, आतंकवादी गटांच्या राष्ट्रविरोधी कारवाया आणि त्यांना असलेली इतर देशांची फूस या सर्व गोष्टींमुळे अफगाणिस्तानात वणवे पेटले आहेत. त्या वणव्यांच्या आगीत समाज होरपळत आहे. दिशाहीन झाला आहे. अफगाणिस्तान हे आज एक अपयशी राष्ट्र म्हणून ओळखले जाते. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eया पुस्तकात अफगाणिस्तानच्या अपयशाच्या अनेक पैलूंचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. अफगाणिस्तानच्या आजच्या परिस्थितीचा आढावा आणि पुढील शक्याशक्यतेची मीमांसा या पुस्तकांत केली आहे. अफगाणिस्तानच्या ऐतिहासिक, भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक पैलूंचं आणि त्याचबरोबर त्याच्या अपयशाचं वस्तुनिष्ठ विश्लेषण ह्या पुस्तकात केलं आहे. रशियन फौजा बाहेर पडल्यानंतर आणि तालिबान व अल्-कायदा या गटांच्या विरोधात अमेरिकेने केलेल्या मोहिमेनंतर अफगाणिस्तानची परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय गटांनी कोणकोणते प्रयत्न केले; त्या प्रयत्नांमध्ये कोणत्या त्रुटी राहून गेल्या आणि त्यांचा अफगाणिस्तानवर काय परिणाम झाला, अशा सर्व घटकांवर हे पुस्तक भाष्य करतं. त्याचप्रमाणे पाकिस्तानचे दुटप्पी धोरण आणि त्यांची तालिबान संघटनेला असलेली साथ आणि त्याचे भूराजकीय परिणाम यावरही पुस्तकात चर्चा केली आहे. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eआता परस्परपूरक सुरक्षाव्यवस्था राबवण्यापेक्षा एकमेकांच्या आधाराने जगायचं कसं, ह्याचा विचार करण्याची वेळ आली आहे, असंही लेखकाने सूचित केलं आहे.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964775883043,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1031f.jpg?v=1750158001"},{"product_id":"modi-mahabharat","title":"मोदी महाभारत","description":"\u003cp\u003e‘कनिष्ठांशी मुजोरी आणि वरिष्ठांशी लाचारी’ दाखवणारे संपादक मराठी पत्रकारितेत अनेक आहेत. हल्ली तर तो संपादकांचा ट्रेडमार्कच झाला आहे. पण याला निखिल वागळे सणसणीत अपवाद आहेत. ते लोकप्रिय पत्रकार आहेत, पण लोकानुनयी नाहीत. ते स्वच्छतावादी आहेत, पण तुच्छतावादी नाहीत.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e ...तर अशा या वागळे यांचं हे नवं पुस्तक. २५ जानेवारी २०१८ ते ६ जून २०१९ या कालावधीत वागळे यांनी ‘अक्षरनामा’ या फीचर्स पोर्टलवर ‘सडेतोड’ हे साप्ताहिक सदर लिहिलं. त्याचं हे पुस्तकरूप. यात पंतप्रधान मोदींच्या सत्ताकाळातल्या प्रमुख राजकीय घडामोडींचा समाचार आहे. तसेच विरोधी पक्ष आणि त्यांचे नेते यांच्यावरही टीकालेख आहेत.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e एका सडेतोड पत्रकाराचे हे रोकडे विश्लेषण आपल्याला अपप्रचारांच्या अनेक मायाजालांमधून ओढून काढून भानावर आणते!\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964776767779,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1028f.jpg?v=1750158054"},{"product_id":"rajarshi-shahu-chhatrapati","title":"राजर्षी शाहू छत्रपती : विचारवेध | Rajarshi Shahu Chhatrapati | संपादक : अवनीश पाटील | Edtr : Avnish Patil","description":"\u003cp\u003e\"लोकराजा छत्रपती शाहू महाराजांनी केलेले कार्य दीपस्तंभासारखे आहे. त्यांचे कार्य आपणाला जगाकडे पाहण्याची व्यापक दृष्टी देते. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक अशा सर्वच क्षेत्रात त्यांचे काम आदर्शवत असून ते आजदेखील दिशादर्शक आहे. म्हणूनच स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राच्या जडणघडणीत शाहू महाराज आपले आदर्श आणि मार्गदर्शक ठरतात. त्यादृष्टीने सिद्ध केलेला हा ग्रंथ त्यांच्या कार्याचे स्वरूप आणि योगदान अधोरेखित करणारा आहे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशाहू महाराजांनी विविध क्षेत्रांमध्ये केलेले अभिनव प्रयोग तत्कालीन काळाच्या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी होते. त्यांचे निर्णय घेण्याचे धारिष्ट्य, त्यामागील सर्जनशीलता, बौद्धिक चमक दाखवणारी कल्पकता, ती अमलात आणण्याची विलक्षण इच्छाशक्ती आणि गतिमानता आजच्या राज्यकर्त्यांना विचारप्रवृत्त करायला लावणारी आहे. त्यांची ही प्रयोगशीलता अभ्यासाच्या अनेक नव्या दिशा सूचित करणारी आहे. त्यादृष्टीने केलेले प्रस्तुत ग्रंथाचे संपादन अतिशय मौलिक ठरते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया ग्रंथात मान्यवर अभ्यासकांनी शाहू महाराजांच्या योगदानाचे स्वरूप नेमकेपणाने समोर आणले आहे. महाराजांची दृष्टी अभिनव होतीच. याबद्दल ग्रंथामध्ये अभ्यासपूर्ण लेख आले आहेत. या लेखांमधून शाहू महाराजांकडे पाहण्याचा एक व्यापक दृष्टिकोन मिळतो. तथापि, रूढ राजकीय इतिहास लेखनाची पद्धती अव्हेरून राजकीय इतिहास लेखनाला नवे परिमाण देणारी दृष्टी या ग्रंथातून सर्वप्रथमच समोर येत आहे. एखाद्या निर्णयात किंवा घटना-प्रसंगांमध्ये राजकारणाची दिशा बदलण्याची क्षमता असते, त्याचा मागोवा ग्रंथामधील लेखात घेतला आहे. हा ग्रंथ वाचकांना छत्रपती शाहू महाराजांकडे पाहण्याची नवी दृष्टी प्रदान करणारा असल्यामुळे त्याचे महत्त्व अधिक वाढले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e डॉ. नंदकुमार मोरे\u003cbr\u003eप्राध्यापक व प्रमुख, मराठी विभाग, \u003cbr\u003eशिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर \"\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964783812899,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/rajarshishahuchhatrapati3d.jpg?v=1750158430"},{"product_id":"bharatiya-rajyaghatana","title":"भारतीय राज्यघटना | Bharatiya Rajyaghatana","description":"\u003cp\u003eNEP 2020 अभ्यासक्रम. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 2024 FYBA च्या सुधारित अभ्यासक्रमानुसार लिहिलेले क्रमिक पुस्तक. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील राज्यशास्त्र  अभ्यासक्रमाच्या तसेच स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त पुस्तक. \u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964785385763,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1108BhartiyRajyaghtnechOlakh.jpg?v=1750158486"},{"product_id":"rajyashastrachi-olakh-satra-1","title":"राज्यशास्त्राची ओळख सत्र 1 | Rajyashastrachi Olakh Satra 1","description":"\u003cp\u003eNEP 2020 अभ्यासक्रम. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 2024 FYBA च्या सुधारित अभ्यासक्रमानुसार लिहिलेले क्रमिक पुस्तक. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील राज्यशास्त्र  अभ्यासक्रमाच्या तसेच स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त पुस्तक. \u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964785451299,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1109rajyashastrachiolakh-CTC.jpg?v=1750158492"},{"product_id":"international-relations-and-strategic-studies-shrikant-paranjpe","title":"International Relations and Strategic Studies | Shrikant Paranjpe","description":"\u003cp\u003e\"This book brings various concepts, issues, debates and other developments in international relations, strategic studies and security studies together for the convenience of the student community. Concepts and issues including nation state, national power, national security, war and peace, internal security, regionalism, regional organisations, nuclear strategies, etc. along with approaches to conflict management and conflict resolution are spelt out. \u003cbr\u003eThe book also seeks to explain the evolution of strategic studies and nuclear strategies of various countries. Finally, the discussions done in the earlier chapters is used as a base to understand and analyse some of the contemporary security issues.\"\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964785549603,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1084internationarelations3d.jpg?v=1750158499"},{"product_id":"lokprashasan-ani-vittiya-prashasan","title":"लोकप्रशासन आणि वित्तीय प्रशासन | Lokprashasan ani Vittiya Prashasan","description":"\u003cp\u003e\"२१ व्या शतकात झालेल्या क्रांतिकारी बदलांचा लोकप्रशासन शास्त्र या विषयावर व्यापक प्रभाव पडलेला दिसून येतो. सामाजिक शास्त्रांमध्ये लोकप्रशासन ही महत्वपूर्ण ज्ञानशाखा मानली जाते. या शाखेचा संबंध शासनाशी येतो. शासनासंदर्भातल्या पारंपारिक भूमिकेत आधुनिक काळात अनेक व्यापक बदल झाल्यामुळे लोकप्रशासन शास्त्रात अनेक नवनवीन संकल्पना उदयाला आलेल्या आहेत. या नवनवीन संकल्पनांचा विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना परिचय व्हावा या उद्देशाने प्रस्तुत पुस्तकाची रचना केलेली आहे. \u003cbr\u003eप्रस्तुत पुस्तकात एकूण आठ प्रकरणांचा समावेश आहे. पहिल्या चार प्रकरणांमध्ये लोकप्रशासन विषयातील मूलभूत संकल्पनांचा आढावा घेतलेला आहे तर उरलेल्या चार प्रकरणात प्रशासनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, संरचना, वित्तीय आणि कार्मिक प्रशासनाबद्दल सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुस्तकात आवश्यक तेथे मूळ संदर्भांचा वापर केलेला आहे. त्यामुळे हे पुस्तक लोकप्रशासन व स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी निश्चितच एक उपयुक्त संदर्भ ग्रंथ ठरेल.\" \u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964786270499,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1112-lokprashasan-front.jpg?v=1750158555"},{"product_id":"rajyashastrachi-olakh-satra-2","title":"राज्यशास्त्राची ओळख सत्र 2 | Rajyashastrachi Olakh Satra 2 | Dr. Vaishali Pawar","description":"\u003cp\u003eNEP 2020 अभ्यासक्रम. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 2024 FYBA च्या सुधारित अभ्यासक्रमानुसार लिहिलेले क्रमिक पुस्तक. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील राज्यशास्त्र  अभ्यासक्रमाच्या तसेच स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त पुस्तक. \u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964788498723,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1121-rajyashastrachiolakh-CTC.jpg?v=1750158623"},{"product_id":"loksatta-anyatha-bhag-2","title":"लोकसत्ता अन्यथा खंड २ - २०१३  -२०२४ | Loksatta Anyatha Bhag 2","description":"\u003cp\u003e\"\u003cbr\u003eलोकसत्ता अन्यथा  खंड २ (२०१३  ते  २०२४)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eबातमीच्या पलीकडचे आणि अग्रलेखाच्या अलीकडचे अनेक असे काही जगात नित्यनेमाने घडत असते. या घटनांचा आपल्या जगण्याशी प्रत्यक्ष नसला तरी अप्रत्यक्ष असा संबंध असतोच असतो. जाणते डोळे तो टिपत असतात. म्हटले तर या घटना तात्कालिक असतात. पण तरीही त्या घटनांच्या खुणा आपल्या जगण्यावर कायमस्वरूपी परिणाम करणार्‍या असतात. त्या खुणांची दखल घेणे हाच ‘अन्यथा’ या सदराचा उद्देश. वर्तमानपत्रीय लेखनाची नियती असलेल्या तात्कालिकतेवर मात करून उरणारे हे लेखन. अन्यथा...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\"\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964789809443,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1133LOKSATTAANYATHABhag23d.jpg?v=1750158654"}],"url":"https:\/\/kanakbook.in\/collections\/raajkiiy.oembed?page=2","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}