{"title":"पत्रकारिता-प्रसारमाध्यमे","description":"","products":[{"product_id":"madhyam-abhyasatil-pramukh-sankalpana","title":"माध्यम अभ्यासातील प्रमुख संकल्पना","description":"\u003cp\u003eकुठल्याही विषयाचा अभ्यास करत असताना त्या विषयातील मूळ संकल्पना, विचार यांची तोंडओळख तरी असणे आवश्यक असते. माध्यम अभ्यासातील मूळ संकल्पना, सिद्धान्त यांची येथे ओळख तर करून दिली आहेच, त्याचबरोबर अधिक माहितीसाठी संदर्भही दिले आहेत. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e येथे दिलेले शब्द, संकल्पना, सिद्धान्त माध्यम आणि संज्ञापन अभ्यासातील आहेत व यांवर जगभरात भरपूर संशोधन झालेले आहे. यांतील प्रत्येक संकल्पनेचा मागोवा घ्यायचे म्हटले तर तर त्यावर अनेक जण पी.एचडी. करतील. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e हे पुस्तक तरुण संशोधक, माध्यम अभ्यासक व पत्रकारांना उपयोगी पडेल. त्याचबरोबर ज्यांना माध्यम व संज्ञापन व्यवस्था व प्रक्रिया यांचे कौतुक व कुतूहल असेल त्यांनाही उपयोगी पडेल. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964675219747,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/907f.jpg?v=1750154753"},{"product_id":"madhyam-abhyas-va-madhyam-sameeksha","title":"माध्यम अभ्यास व माध्यम समीक्षा","description":"\u003cp\u003eवास्तव... त्या वास्तवाचा मागोवा घेऊन विषयनिर्मिती करणारे पत्रकार, जाहिरातदार, लेखक, नाटककार, नट, चित्रकार, चित्रपटकार इत्यादी. विषयनिर्मिती करणार्या संस्था, त्यांच्यातील प्रक्रियांवर असलेली आर्थिक, सामाजिक, राजकीय, नैतिक, बंधने आणि शेवटी या विषयांचा उपभोग घेणारे ग्राहक, श्रोते, वाचक, प्रेक्षक इत्यादी या सगळ्यांमधील गुंतागुंत वाढत चालली आहे. यांसोबत माहिती तंत्रज्ञान लोकांच्या हाताला लागले आहे. यामुळे या सर्व प्रक्रियेचे संपूर्ण अर्थकारण बदलले आहे, उद्देश बदलले आहेत, उपयोग बदलले आहेत.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e हे सगळे समजून घ्यायचे असेल तर माध्यमांच्या या अनेक पैलूंचा मागोवा, प्रतिमाने आणि अनेक सिद्धान्त तयार करून कसा घेतला गेला, हे समजून घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर माध्यमांची समीक्षा कुठल्या कक्षात झाली आहे व पुढे कशी करावी लागेल, याचाही मागोवा घेणे आवश्यक आहे. हे करण्यासाठी लागणारी माहिती देणे हे या पुस्तकाचे प्रयोजन आहे. माध्यमांशी आणि त्यांच्यातील विषयांशी ज्याचा ज्याचा संबंध आहे त्या व्यक्तीला हे पुस्तक उपयोगाचे ठरेल. माध्यमांचा मागोवा घ्यायचा असेल तर त्यासाठीची ही प्राथमिक आणि आवश्यक पायरी आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964678234403,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/914f.jpg?v=1750154789"},{"product_id":"tvchya-padadyamagacha-vishwa","title":"टीव्हीच्या पडद्यामागचं विश्व","description":"\u003cp\u003e‘टीव्हीच्यापडद्यामागील विश्व’ हे पुस्तक म्हणजे टीव्हीच्यापडद्यामागचं रचनात्मक, प्रक्रियात्मक आणि संशोधनात्मक पैलू उलगडून दाखवण्याचा प्रयत्न आहे. पाश्चिमात्य आणि विकसित देशांमध्ये इतर सर्व समाजमाध्यमांप्रमाणेचटीव्ही या माध्यमाचाही अनेक अंगानी विचार आणि अभ्यास केला गेला. भारतात टीव्ही या विषयावर गांभीर्यपूर्ण आणि अभ्यासपूर्ण लेखन अभावानेच वाचायला मिळते. टीव्हीबद्दलचेबहुतांश लेखन हे इंग्रजी भाषेतच उपलब्ध आहे. मराठी वाचकांना विशेषत: संज्ञापन आणि पत्रकारितेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना टीव्ही या विषयाची ओळख व्हावी हा या पुस्तकाचा मूळ हेतू आहे. टीव्हीवरील कार्यक्रमांची रचना, त्यांची निर्मिती प्रक्रिया, या प्रक्रियांशी संबंधित तांत्रिक बाबी या सगळ्या मुद्दयांचा या पुस्तकात समावेश आहेच शिवाय टीव्हीशी संबंधित संशोधनावरही स्वतंत्र प्रकरणांचा समावेश आहे. त्यामुळे या विषयात संशोधन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक दिशादर्शक ठरेल. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964685181219,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/945f.jpg?v=1750154944"},{"product_id":"loksatta-sarvkaryeshu-sarvada","title":"लोकसत्ता : सर्वकार्येषु सर्वदा","description":"\u003cp\u003eआनंदाच्या गोष्टी सांगणारे हजारो असतात, पण आपल्या व्यथा सांगणारे कोणी नसते. या सेवाभावींनी या अशा व्यथा जाणून घेतल्या आणि त्यांचे अश्रू पुसले, हे खर्या अर्थाने परमेश्वराचे काम आहे. सेवाभावी कार्य करताना प्रत्ययी जाणवणार्या वेदनांच्या महासागरापुढे रामायण, महाभारत आणि गीताही तोकड्या ठराव्यात. माझ्या दृष्टीने ‘लोकसत्ता’चा ‘सर्वकार्येषु सर्वदा’ हा उपक्रम अनामिक कार्याचा सत्कार आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e - सदाशिव अमरापूरकर\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांना प्रसिद्धीची गरज वाटत नाही. मनापासून केलेल्या कामाच्या बाबतीत असंच घडतं. अशा दहा संस्था, त्यांची माणसं मला भेटली; हे असे आदर्श आपल्यापुढे आहेत. काय लागतं आपल्याला? ङ्गक्त एक ट्रिगर लागतो. अशी किती ट्रिगर्स आहेत आपल्याकडे? किती ‘आदर्श’ आहेत आपल्याकडे...? इतकं पराकोटीचं कार्य करणार्या या संस्थांची दखल एखाद्या वृत्तपत्राने घेणं, ही खूप मोठी गोष्ट आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e - नाना पाटेकर\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964741869859,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/803f.jpg?v=1750156642"},{"product_id":"loksatta-agralekh","title":"लोकसत्ता अग्रलेख","description":"\u003cp\u003e\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eतात्कालिकतेच्या पलीकडे...\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e राष्ट्रांच्या वा व्यक्तिसमूहांच्या आयुष्यातील दैनंदिन घटना-घडामोडींचा अन्वयार्थ लावतानाच तात्कालिकतेकडून सार्वकालिकत्वाकडे जाणे, हे अग्रलेखांचे कार्य.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e लोकसत्ताचे अग्रलेख वाचकप्रिय ठरतात ते यामुळेच. सखोल विचार, परखड विवेचन आणि सौष्ठवपूर्ण भाषा यांबरोबरच ठोस भूमिका हे या अग्रलेखांचे वैशिष्ट्य. अशाच काही निवडक अग्रलेखांचे हे संकलन. समकालीन इतिहासाचे साधन म्हणून ते उपयुक्त ठरेलच; परंतु वाचकांना वैचारिक आनंदाचा पुनःप्रत्ययही देईल !\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964743442723,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/821f.jpg?v=1750156703"},{"product_id":"vittarth","title":"वित्तार्थ : भारतासमोरील प्रमुख प्रश्नांना थेट भिडणारे अर्थशास्त्रीय लघुनिबंध","description":"\u003cp\u003eभारताला आजमितीला भेदणाऱ्या प्रमुख आर्थिक समस्या कोणत्या आहेत? त्यामागची आर्थिक, सामाजिक व राजकीय करणे कोणती? राजकीय चौकटीत निर्णय कसे घेतले जातात? राजकीय व्यूहरचनांचा आर्थिक धोरणांवर नक्की कसा प्रभाव पडत असतो? भारताला आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी भारताची राजकीय चौकट व आर्थिक धोरणे अनुकूल आहेत का? अशा अनेक प्रश्नांना भिडणारे अर्थशास्त्रीय लघुनिबंध ‘वित्तार्थ’ ह्या पुस्तकात वाचावयास मिळतात.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e“डॉ. रूपा रेगे नित्सुरे यांचे हे अर्थविषयक लेख म्हणजे एका क्लिष्ट विषयाच्या अनेक पैलूंचे अत्यंत रसाळ शैलीत केलेले अभ्यासपूर्ण विवेचन आहे.”\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eश्री. य. मो. देवस्थळी, अध्यक्ष, एल. अॅड. टी. फायनान्स होल्डिंग्ज व माजी प्रमुख वित्तीय अधिकारी, एल. अॅड. टी. लिमिटेड.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e “डॉ. रूपा रेगे नित्सुरे ह्यांचे विवरण व समीक्षा ही अर्थशास्त्रातील मूलभूत सिद्धांतांच्या आधारावर केलेली    असल्यामुळे एक-दोन वर्षांपूर्वी लिहीलेल्या या लेखांचे ताजेपण कमी झालेले नाही. हा लेखसंग्रह अर्थशास्त्राशी संबंधित सर्व अभ्यासकांना उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटतो.”\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eश्री. शरद काळे, अध्यक्ष, एशिअॅटिक सोसायटी व भूतपूर्व आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e“सर्वसामान्य वाचकांना आर्थिक बाबींची पार्श्वभूमी तसेच सूक्ष्मभेद समजावून देण्याचे काम एखाद्या कार्यकुशल अर्थतज्ञाने करणे गरजेचे असते. माझ्या मते, डॉ रूपा रेगे नित्सुरे ह्यांनी हे काम अतिशय गौरवास्पद पद्धतीने पार पाडले आहे.” \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eडॉ. नीळकंठ रथ, ज्येष्ठ अर्थतज्ञ व भूतपूर्व संचालक, गोखले अर्थशास्त्र संस्था, पुणे. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e“अर्थशास्त्राचे सखोल ज्ञान असलेली व्यक्तीच इतक्या सहजतेने आणि स्पष्टपणे अर्थशास्त्रातल्या कठीण गोष्टींची मांडणी करू शकते आणि रूपाकडे हे दोन्ही गुण आहेत. प्रत्येक सुजाण नागरिकाने हे पुस्तक वाचायलाच हवे.” \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eश्री. निरंजन राजाध्यक्ष, ज्येष्ठ अर्थतज्ञ व मिंट वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक.     \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964745736483,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/839f.jpg?v=1750156795"},{"product_id":"marathi-patrakarita","title":"मराठी पत्रकारिता","description":"\u003cp\u003e लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे वृत्तपत्रसृष्टी. इंग्लंडभूमीत उदय पावलेली लोकशाही भारतात चांगल्या प्रकारे रुजली असे म्हणता येईल. लोकशाही रुजण्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जनतेची जागृतता. वृत्तपत्र हा जागृत पहारेकरी आहे. वृत्तपत्रातून घडणारी लेखणीची करामत ही लोकशाहीची प्रचंड ताकद उभी करू शकते ही वस्तुस्थिती आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e या प्रभावशाली माध्यमाची सुरुवात ज्यांनी केली, ज्यांनी हा मार्ग खोदला, त्याचा आज विशाल राजमार्ग झाला आहे. अशा वर्तमानपत्रसृष्टीच्या प्रारंभाच्या वाटचालीचा हा उद्बोधक व मनोरंजक आढावा.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964759695651,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/361f.jpg?v=1750157299"},{"product_id":"maharashtratil-prasarmadhyame","title":"महाराष्ट्रातील प्रसारमाध्य्मे","description":"\u003cp\u003e प्रसारमाध्यमे हा शब्द सध्या सतत ऐकू येत असतो, पण त्याचा नेमका अर्थ, स्वरूप, दिशा आदी गोष्टी सर्वसामान्यांना माहीत नसतात. म्हणूनच आवर्जून या विषयावर सोप्या भाषेत, सर्वांगीण विचार करून लिहिलेले हे पुस्तक.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e मिडिया मुद्रित असो अगर दुक्श्राव्य. महाराष्ट्रातल्या मिडियाने प्रारंभी ऊब देणार्‍या आणि प्रकाश पसरवणार्‍या सहकार्‍याची भूमिका बजावली असली तर आज मात्र मिडियाचा वापर नेमका कसा होतो आहे याबाबत बरेचजण साशंक आणि भयग्रस्त आहेत. अपेक्षा आहे की प्रसारमाध्यमांनी ज्ञानाची आणि प्रबोधनाची ज्योत लावावी आणि प्रसन्नतेचा प्रकाश पसरावा.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964763955491,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/429f.jpg?v=1750157474"},{"product_id":"loksatta-anyatha","title":"लोकसत्ता अन्यथा(2nd Edn)","description":"\u003cp\u003e\tबातमीच्या पलीकडचे आणि अग्रलेखाच्या अलीकडचे अनेक असे काही जगात नित्यनेमाने घडत असते. या घटनांचा आपल्या जगण्याशी प्रत्यक्ष नसला तरी अप्रत्यक्ष असा संबंध असतोच असतो. जाणते डोळे तो टिपत असतात. म्हटले तर या घटना तात्कालिक असतात. पण तरीही त्या घटनांच्या खुणा आपल्या जगण्यावर कायमस्वरूपी परिणाम करणार्‍या असतात. त्या खुणांची दखल घेणे हाच ‘अन्यथा’ या सदराचा उद्देश. वर्तमानपत्रीय लेखनाची नियती असलेल्या तात्कालिकतेवर मात करून उरणारे हे लेखन. अन्यथा...\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964765167907,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/863f.jpg?v=1750157531"},{"product_id":"loksatta-tukaramdas","title":"लोकसत्ता : तुका'राम'दास","description":"\u003cp\u003e\tमहाराष्ट्राच्या सांस्कृतिक संचिताचे प्रतीक म्हणजे तुकाराम आणि रामदास हे संतद्वय. या समकालीन संतांच्या वाङ्मयाचा धांडोळा घेण्याचे प्रयत्न आज इतक्या वर्षांनंतरही अजून जोमाने सुरू आहेत. दै. लोकसत्ताने २०१६ साली या दोन संतांच्या कार्याचा, आयुष्याचा आणि अर्थातच वाङ्मयाचा वेध घेण्याचा प्रयत्न असाच दोन सदरांच्या माध्यमांतून केला. त्यास उदंड प्रतिसाद लाभला. ही पुण्याई अर्थातच या दोन संतांची. या दोघांतील अद्वैत असेच वर्तमानपत्राच्या दैनंदिनतेच्या पलीकडेही टिकून रहावे, याच उद्देशाने त्यास ग्रंथरूप दिले जात आहे. तुका‘राम’दास या त्याच्या प्रतीकातून.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964765233443,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/864f.jpg?v=1750157536"},{"product_id":"checkmate","title":"चेकमेट : निवडणूक जिंकूनही भाजपने महाराष्ट्रातील सत्ता का गमावली ?","description":"\u003cdiv class=\"aa-product-details-bottom\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cdiv class=\"tab-content\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cdiv class=\"tab-pane fade in active\" id=\"description\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003e**पूर्वनोंदणी सुरू 15 मार्च रोजी पुस्तक प्रकाशित होईल. **\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003e२८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्राचे अठरावे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्राला खिळवून ठेवणार्‍या एका प्रदीर्घ राजकीय नाट्याची या शपथविधीने अखेर झाली. कुठल्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने राज्यात तोवर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. या सगळ्या काळात महाराष्ट्रातील जनता नव्या मुख्यमंत्र्यांची वाट पाहत असताना, बंद दाराआड घडत-बिघडत असलेल्या राजकीय सत्तासमीकरणांची रंजक आणि प्रसंगी थक्क करणारी सफर हे पुस्तक वाचकाला घडवते.\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eआजवर सर्वसामान्यांपुढे न आलेल्या गोष्टींची हकिकत आतील गोटातील स्रोतांकडून आणि खासगी संवादांच्या माध्यमातून सुधीर सूर्यवंशी यांनी वाचकांपुढे आणली आहे. तसेच या सर्व घडामोडींचा महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाच्या संदर्भात अर्थ लावण्याचा प्रयत्नदेखील केला आहे.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"aa-product-related-item\" data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/div\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964767756579,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/991.jpg?v=1750157657"},{"product_id":"clicktrick","title":"क्लिक ट्रिक - युक्त्या कलात्मक फोटोग्राफीच्या","description":"छायाचित्र कलेवर सोप्या मराठीत; सुंदर, नेमक्या शब्दांत भाष्य करत वाचनीय केलेलं, अर्चना देशपांडे जोशी यांचं “क्लिक ट्रिक” हे पुस्तक आहे. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e‘छायाप्रकाशाचा खेळ म्हणजे प्रकाश-रंगातून रंगलेली स्मरणचित्रे’ असं म्हणत फोटोंचं आठवणींशी निगडित असलेल नातं सांगत, नमनालाच ‘सावलीच्या छटा’ फार छान मांडल्या आहेत.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eफोटो कुठे कुठे असतो, हे मांडत, ‘फोटोग्राफर चित्रकलेतून कल्पनेला आकार देतो’ असं सांगत ‘रस्त्यावरून फिरणाऱ्या वाहनांकडे नीट निरखून बघा, विविध मानवी चेहरे-भाव दिसतात’ म्हणत, पुढे त्यांनी गमतीशीर टीप्पणी केलीए. ती अशी - एस. टी. हिरमुसलेली, रिक्षा नाक उडवणारी, ऍम्बेसिडर मोकळेपणाने हसणारी... काय नेमकं भाष्य फोटोग्राफिक नजरेचं!\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e‘फोटो काढण्यापूर्वी गरज शोधक नजरेची’ असं सांगत प्रवेशद्वाराच्या कमानीतून दिसणार्‍या ताजमहालचं उदाहरण देत तो फोटो बघायची उत्सुकता वाढवलीए. ‘उसळत्या समुद्राला क्षितिजाची पार्श्वभूमी फोटोत नसेल, तर भकास वाटेल’ ही टिप्पणी विविध कोनांतून, आकारातून,Triangle कम्पोझीशन दिसणे, हा त्या फोटोग्राफरच्या कल्पनाशक्तीचा अविष्कार असतो. चित्रकारांनी काढलेल्या चित्राचे अवलोकन करणे, हे उत्तम फोटोग्राफी करण्यसाठी मार्गदर्शक ठरते. फोटो काढण्यापूर्वी, फोटो का काढत आहोत, कशाचा काढत आहोत, याचा विचार हवाच. फोटोग्राफीचा छंद हृदयातून जन्माला आला, विचारातून साकारला गेला, तर येणारा प्रत्येक फोटो मनाची सतार झंकारत जाईल, असे अप्रतिम मुद्दे अर्चनाने मांडलेत. फोटोंना कविता सुचणे, फोटोंच्या वेगवेगळ्या वेळा असे छायाचित्र-कलेशी संबंधित अनेक रंग पुस्तकात मांडले आहेत. असे हे फोटो बोलकं पुस्तक फोटोत रस असलेल्यांनी मनात फोटो काढून ठेवावा असं हे अर्चनाचं “क्लिक ट्रिक”.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e- श्री. सुधीर गाडगीळ, नामवंत मुलाखतकार आणि लेखक \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964775358755,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1025f.jpg?v=1750157964"},{"product_id":"snshodhn-krtaanaa","title":"संशोधन करताना","description":"संशोधन क्षेत्रात करण्यासारखे खूप आहे. एम्.फिल. व मुख्यत: पीएच.डी.पदवीसाठी संशोधन करावेच लागते. तसेच एम्.ए., एम.कॉम, एम्.बी.ए. या पदवी अभ्यासासाठीही संशोधन उपयुक्त ठरते, हे सर्वांना ज्ञात आहेच. याशिवाय शिष्यवृत्तीसाठी, स्वतःला रूची आहे म्हणून अनेकजण संशोधन करीत असतात. पत्रकारिता करतानाही एखाद्या समस्येवर संशोधन करुन त्याची मांडणी व त्यावर उपाय सुचवावे लागतात.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e संशोधन करताना हे पुस्तक वरील सर्व अभ्यासकांना उपयोगी पडेल. याशिवाय व्यावसायिक संशोधक म्हणून काम करताना, सल्लागार म्हणून काम करतानाही हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल यात शंका नाही.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964779290915,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/213f.jpg?v=1750158217"},{"product_id":"abhivyaktiswatantrya","title":"अभिव्यक्तिस्वातंत्र्य - प्रसारमाध्यमे आणि कायदा","description":"मराठी भाषेत अभिव्यक्तिस्वातंत्र्य याविषयावर अत्यंत तुरळक लेखन उपलब्ध आहे. जे आहे ते अद्ययावत नाही. सदर पुस्तकाचे लिखाण दोन विद्यापीठांचा अभ्यासक्रम समोर ठेवून केलेले आहे. त्यात प्रसंगोचित नवनवीन विषयांची भर टाकली आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे बहुतांश सर्व पैलू पुस्तकात समाविष्ट करण्याचा अटोकाट प्रयत्न केला आहे. या पुस्तकाच्या लेखनात कायद्याच्या तरतुदी जशाच्यातशा पुनर्मुद्रित न करणे, शक्यतो या तरतुदींचे शब्दश: भाषांतर टाळणे याकडे विशेष कटाक्ष होता. विशिष्ट पाठामागची मूळ संकल्पना, मूलभूत व्याख्या या अधिक सुलभ आणि रोचकपणे वाचकांपुढे ठेवाव्यात यावर भर दिला आहे. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eसमाजमाध्यमे, ओटीटी यांसारख्या नवीन माध्यमांमुळे अभिव्यक्तीचे क्षितिज अभूतपूर्वरीत्या विस्तारत आहे, नवनवीन आयामांद्वारे लोक अभिव्यक्तीचे नवीन प्रयोग उत्साहापूर्वक स्वीकारत आहेत. हा विस्तार असाच होत राहील. अभिव्यक्तीच्या नित्य नव्या परिमाणांना आजमावत व्यक्तिस्वातंत्र्याचा मूलमंत्र उपलब्ध मर्यादांच्या कक्षेत अधिकाधिक प्रभावीपणे कसा उच्चारता येईल हे बघणे गरजेचे आहे. या प्रवासात वाचकांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eMarathi language book on Freedom of expression and law in the context of media journalism. Advocate Chaitanya Dharurkar has elaborated on subjects of freedon of speech, Journalism, Film and televison, Theatre and literaruture, contempt of court, social media etc. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964782666019,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1067-abhiwyaktiSwatantrya-3d.jpg?v=1750158374"},{"product_id":"loksatta-agralekh-2","title":"लोकसत्ता अग्रलेख खंड २ (२०१७-२०२४) | Loksatta Agralekh | Girish Kuber","description":"\u003cp\u003eलोकसत्ता अग्रलेख खंड २ (२०१७ ते  २०२४)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतात्कालिकतेच्या पलीकडे...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eराष्ट्रांच्या वा व्यक्तिसमूहांच्या आयुष्यातील दैनंदिन घटना-घडामोडींचा अन्वयार्थ लावतानाच तात्कालिकतेकडून सार्वकालिकत्वाकडे जाणे, हे अग्रलेखांचे कार्य.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलोकसत्ताचे अग्रलेख वाचकप्रिय ठरतात ते यामुळेच. सखोल विचार, परखड विवेचन आणि सौष्ठवपूर्ण भाषा यांबरोबरच ठोस भूमिका हे या अग्रलेखांचे वैशिष्ट्य. अशाच काही निवडक अग्रलेखांचे हे संकलन. समकालीन इतिहासाचे साधन म्हणून ते उपयुक्त ठरेलच; परंतु वाचकांना वैचारिक आनंदाचा पुनःप्रत्ययही देईल !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eThe book contains select editorials of Loksatta by Girish Kuber from the year 2017 to 2024. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964787679523,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1128-LoksattaAgralekh-bhag2-3d.jpg?v=1750158610"},{"product_id":"loksatta-anyatha-bhag-2","title":"लोकसत्ता अन्यथा खंड २ - २०१३  -२०२४ | Loksatta Anyatha Bhag 2","description":"\u003cp\u003e\"\u003cbr\u003eलोकसत्ता अन्यथा  खंड २ (२०१३  ते  २०२४)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eबातमीच्या पलीकडचे आणि अग्रलेखाच्या अलीकडचे अनेक असे काही जगात नित्यनेमाने घडत असते. या घटनांचा आपल्या जगण्याशी प्रत्यक्ष नसला तरी अप्रत्यक्ष असा संबंध असतोच असतो. जाणते डोळे तो टिपत असतात. म्हटले तर या घटना तात्कालिक असतात. पण तरीही त्या घटनांच्या खुणा आपल्या जगण्यावर कायमस्वरूपी परिणाम करणार्‍या असतात. त्या खुणांची दखल घेणे हाच ‘अन्यथा’ या सदराचा उद्देश. वर्तमानपत्रीय लेखनाची नियती असलेल्या तात्कालिकतेवर मात करून उरणारे हे लेखन. अन्यथा...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\"\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964789809443,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1133LOKSATTAANYATHABhag23d.jpg?v=1750158654"}],"url":"https:\/\/kanakbook.in\/collections\/ptrkaaritaa-prsaarmaadhyme.oembed","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}