{"title":"पालकत्व","description":"","products":[{"product_id":"maayleki-baapleki","title":"मायलेकी बापलेकी","description":"\u003cp\u003e९ आयांनी आणि ८ बापांनी आपल्या ‘लेकी’विषयी लिहिलेले बहारदार लेख\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eमायलेकी : सोनाली कुलकर्णी, भक्ती चपळगावकर, ममता क्षेमकल्याणी, कीर्ती परचुरे, अमिता दरेकर, प्रिया सुशील, सीमा शेख-देसाई, नयना जाधव, अश्विनी काळे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eबापलेकी : हृषीकेश गुप्ते, दासू वैद्य, किशोर रक्ताटे, राम जगताप, किरण केंद्रे, योगेश गायकवाड, सरफराज अहमद, आसिफ बागवान.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964688294179,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/969f.jpg?v=1750155060"},{"product_id":"balshikshan-swaroop-aani-navi-disha","title":"बालशिक्षण : स्वरुप व नवी दिशा","description":"\u003cp\u003eमज्जामानसशास्त्रातील घडणार्‍या घटनांकडे जागरूकतेने पाहिल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत आहे ती अशी की, आता लहान मुलाकडे, शिकत असलेल्या शाळकरी मुलाकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलली आहे. एवढेच नव्हे तर या नव्या दृष्टीतून न्याहाळलेले बालकही आता वेगळे दिसू लागले आहे. आता घरी वा शाळेत आपल्यासमोर उभे राहणारे मूल, हे या सर्व शोधांच्या आधारावर आपण समजून घेतलेले बालक म्हणून आपल्यासमोर उभे राहणार आहे. आपण आजवर मानत आलो तसे अज्ञानाने गृहित धरलेले ते बालक नाही. तर आपल्या अतर्ंगत शक्तींच्या नि आपल्या आजूबाजूच्या आजवरच्या उभ्या राहिलेल्या संस्कृतीच्या आधारे, स्वतःच जगाची ओळख करून घेणारे असे ते मूल आहे. जगातील विविध वस्तू, नि घटनांचे आपल्या पद्धतींनी अर्थ लावणारे, नि त्याचे स्वतःपुरते स्वतंत्र सिद्धान्त बांधणारे असे ते बालक आहे. ते ज्ञाननिर्मिती करणारे शास्त्रज्ञही आहे नि ते तेवढेच प्रभावी असे निर्मितीक्षम कलावंतही आहे.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964692980003,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/37f.jpg?v=1750155252"},{"product_id":"adarsh-palakatwa","title":"आदर्श पालकत्व","description":"\u003cp\u003eवाढती महागाई व वाढत्या गरजांना तोंड देण्यासाठी पालकांनी नोकरी करणे दिवसेंदिवस अपरिहार्य होत आहे. बदलत्या जीवनशैलीमध्ये पालकत्व निभावून नेणे, ही खरोखरच तारेवरची कसरत आहे. त्यातच विभक्त कुटुंबपद्धतीमुळे घरातल्या जुन्या-जाणत्या माणसांचा सहवास आणि संस्कार मुलांना मिळेनासे झाले आहेत. अशा गुंतागुंतीच्या आणि बिकट परिस्थितीत पालकत्व निभावून नेण्यासाठी मार्गदर्शनाची आवश्यकता भासू लागली आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e पालकांना उपलब्ध असलेल्या वेळेत आपल्या पाल्याशी सुसंवाद कसा साधावा, त्यांना समजून कसे घ्यावे, त्यांना लैंगिकतेची समज\/ओळख कशी करून द्यावी... थोडक्यात, त्यांना आदर्श नागरिक कसे बनवावे, हे या पुस्तकाच्या माध्यमातून पालकांना सहज समजेल. तसेच ‘आजचे पालक’ होण्यासाठी निश्चित मदत होईल.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964722045219,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/655AdarshPalakatva3d.jpg?v=1750156007"},{"product_id":"jadanghadan","title":"जडणघडण","description":"\u003cp\u003eमुलाचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व घडवण्यात पालकांची भूमिका समजावणारं पथदर्शी पुस्तक. या पुस्तकात मुलांच्या जडणघडणीच्या दृष्टीने कोणता काळ विशेष महत्त्वाचा असतो, वयोमानानुसार मुलांची ‘जडणघडण’ कशी होत असते व ती होत असताना पालकांची भूमिका कशी असावी याचे मार्गदर्शन आहे. नऊ महिने ते पाच वर्षे हा काळ मुलांच्या जडणघडणीच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो; पण या काळाचे महत्त्व पालकांना कळत नाही. ‘मूल लहान आहे, त्याला काय कळणार?’ या विचारापोटी मुले दुर्लक्षित राहतात. एकदा हा काळ हातातून निसटला की, पालकानी स्वतःची मते मुलांवर लादल्याने मग मुलांची ‘जडणघडण’ योग्य प्रकारे होणे कठीण जाते. मुलांमध्ये स्वतंत्र विचारसरणी विकसित होत नाही; अशा प्रकारची स्वतंत्रपणे विचार करण्याची प्रवृत्ती वाढीस लागण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे, हेच जडणघडणीचे गमक आहे.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964734005539,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/748f.jpg?v=1750156392"},{"product_id":"shikshan-parivartan","title":"शिक्षण : परिवर्तनाची सामाजिक चळवळ","description":"प्रबोधनाच्या चळवळीची दोन अविभाज्य अंगे आहेत. एक आहे ते वैचारिक अंग आणि दुसरे आहे ते भावनिक अंग. या दोन्हीच्या एकत्रित अस्तित्वाशिवाय प्रबोधनाची चळवळ उभीच राहू शकत नाही. एखाद्या चळवळीत, त्याचे वैचारिक अंग प्रधान असेल पण त्याला भावनिक अंग अजिबात नाही, असे असणार नाही. तर दुसर्‍या एखाद्या चळवळीत, त्याच्याप्रबोधन कार्यात भावनिक अंग प्रभावी राहील पण त्याला विचाराची जोड असावीच लागेल. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e आपली प्रबोधनाची चळवळ ही लहान बालकांच्या संदर्भातली चळवळ आहे. त्यामुळे भावनेच्या पातळीवर ती सर्वत्र समाजाला आपलीशी वाटणे सहज शक्य आहे. बालक, बालकाची नैसर्गीक वाढ त्या नैसर्गीक वाढीला पोषक अशी आनंददायी शिक्षणपध्दती, बालकाचे आरोग्य, बालकाचे व्यक्तीमत्व, बालकाचे भवितव्य असे बालजीवनाशी संबंधित असे सर्वच विषय समाजातील प्रत्येक घटकासच जवळचे नि महत्वाचे खासच वाटत असतात. त्यामुळे या सगळ्यांचे शास्त्र गेली दोन-तीन शतके विकसीत होत गेलेले आहे, त्याला आधुनिक मानसशास्त्राचा, शरिरशास्त्राचा नि शिक्षणशास्त्राचा बळकट आधार आहे आणि हे शास्त्र बालशाळातून सहजपणे आंमलात आणता येते, हा विचार आपण प्रभावीपणे लोकापर्यंत पोचवू शकू. उदा: आजच्या शहरी सुशिक्षित पालकांची अपेक्षा अशी असते की, मुलांचा बौध्दिक विकास लवकर व्हावा. शिक्षण म्हणजे केवळ बौध्दिकरित्या शिकणे एवढेच त्यांच्या डोळ्यसमोर असते अशावेळी आपण त्यांना जरा प्रयत्नाने पटवून देऊ शकू की, शालेयपूर्व वयातील बालकांची बौध्दिक वाढ पुढे सरकण्यापूर्वी बालकांच्या शारिरिक, मानसिक नि सामाजिक क्षमतांची काहीएक पूर्वतयारी व्हावी लागते. एवढेच नव्हे तर बौध्दिक क्षमतांच्या बरोबरीने इतरही क्षमता विकसित होत गेल्या तरच बौध्दिक विकास परिपूर्णतेने गाठता येतो. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964778963235,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/35fShikshanParivartanachiSamajikChalval.jpg?v=1750158192"},{"product_id":"aajche-shikshan","title":"आजचे शिक्षण उद्याचे जीवन","description":"शाळांची शैक्षणिक भूमिका अशी असायला हवी की, सर्वच मुलांना सर्वच संधी घेता याव्यात, प्रत्येकाच्या क्षमतेनुसार त्याची त्या त्या बाबतीतील प्रगती होऊ द्यावी. सर्वांनाच विविधांगी कुशलता मिळू द्यावी. सर्वांनाच पुरेसा सर्वांगीण अनुभव आणि आनंद मिळावा. याऐवजी शाळा काही मोजक्या मुलांना ठराविक स्पर्धासाठी तयार करून आपल्या शाळेला विविध स्पर्धातील अधिकाधिक बक्षिसे प्राप्त करून इतर शाळांशी स्पर्धा करीत असते आणि या बक्षिसांचे प्रदर्शन करून आपला अहंगंड जोपासत असते. \u003cbr\u003e या शाळाशाळातील अशा गैरवाजवी स्पर्धामुळेच शाळाशाळांमधून विषमता निर्माण होते आणि जी शाळा अभ्यासात आणि इतर गोष्टीमध्ये स्पर्धेत अधिक पुढे जाते तीच शाळा चांगली अशी पालकांची भावना बनते. वास्तविक अशी चांगली शाळा ही थोड्या मुंलांसाठी चांगली आणि अनेक मुलांसाठी चांगली नसलेली शाळा असते हे सत्य सहजपणे जाणवत नाही. त्यामुळेच अशा शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालक-मुलांची झुंबड उडते आणि मग प्रवेशापासूनच मुलांमध्ये स्पर्धेचे मानसिक ताण निर्माण व्हायला सुरवात होते.\u003cbr\u003e\u003cbr\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964779061539,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/38f.jpg?v=1750158199"},{"product_id":"karta-karvita","title":"कर्ता करविता : आधुनिक मेंदूसंशोधन व आपले जीवन | रमेश पानसे, राजश्री क्षीरसागर , अनिता देशमुख-बेल्हेकर","description":"या विश्वातील सर्वात मोठे कोडे म्हणजे मानवाचा मेंदू होय. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eभाषा, गणित, परिसराची जाण, स्मृती , विचार , ऊहापोह , निर्णय आणि कार्यवाही यांचा उगम मेंदूतच असतो. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eश्वसन, रुधिराभिसरण आणि पचनक्रिया जीवनाला पायाभूत असतात. या क्रियांवर देखील मेंदूचेच नियंत्रण असते. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eमनाचे कार्य म्हणजे मेंदूचे कार्य. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eशरीरावर मनाच्या होणाऱ्या परिणामांमुळे मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, आणि पचनसंस्थेशी निगडीत असे अनेक आजार उद्भवतात. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eमेंदूच्या कार्यातील सर्वात मोठे गूढ म्हणजे जाणीव. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eआधुनिक मेंदूसंशोधनातून मेंदूच्या कार्याची जसजशी माहीती मिळत गेली, तसतसा या सर्व विषयांवर प्रकाश पडू लागला आहे. या संशोधनाचा आढावा घेण्याचे कठीण काम ‘कर्ता-करविता’ हे पुस्तक कर्ते. मराठी भाषेला अभिमान वाटावा इतक्या चांगल्या प्रकारे हे पुस्तक झाले आहे. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e- डॉ. ह. वि. सरदेसाई \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964780667171,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/karta-karvita-3d.png?v=1750158296"}],"url":"https:\/\/kanakbook.in\/collections\/paalktv.oembed","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}