{"title":"मानसशास्त्र","description":"\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eमानसशास्त्र विषयासाठी उपयुक्त पुस्तके\u003c\/p\u003e","products":[{"product_id":"adhyatmik-buddhumattecha-anvayartha","title":"आध्यात्मिक बुद्धिमत्तेचा अन्वयार्थ","description":"\u003cp\u003e आध्यात्मिक बुद्धिमत्ता या शब्दाने आणि संकल्पनेने सध्या अनेक विचारवंत, मानसशास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ यांचे लक्ष वेधून घेतलेले आहे. तार्किक बुद्धिमत्ता, भावनिक बुद्धिमत्ता, सामाजिक बुद्धिमत्ता, बहुविध बुद्धिमत्ता यांच्या पार्श्वभूमीवर आता शैक्षणिक मानसशास्त्रात आध्यात्मिक बुद्धिमत्ता (Spiritual Intelligence) ही संकल्पना नव्याने येऊ घातली आहे. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e आध्यात्मिकता हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा स्थायी भाव आहे. तो जीवनाच्या अत्युच्च सुखाशी व ध्येयाशी जोडलेला आहे. सर्व धर्म, पंथ, संप्रदाय, संस्कृती यांच्या पलीकडे जाऊन ही आध्यात्मिक वृत्ती माणसाला जीवनाच्या आकलनाकडे प्रेरित करीत असते. जीवनाचा अर्थ लावण्याला साहाय्य करते. नीतिमान व मूल्याधिष्ठित जीवन जगायला दिशा देते. खरी आध्यात्मिकता ही कोणत्याही प्रकारची धार्मिक कट्टरता, दुराग्रह, द्वेष, अंधश्रद्धा इत्यादी अनिष्ट गोष्टींपासून अलिप्त असते. ती ढोंगबाजीला बळी पडत नाही आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला दूर लोटीत नाही. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964683706659,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/933f.jpg?v=1750154887"},{"product_id":"manasshastrachi-multatve","title":"मानसशास्त्राची मुलतत्वे","description":"\u003cp\u003eसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कला शाखेच्या (F.Y.B.A.) २०१९-२० च्या सुधारित अभ्यासक्रमानुसार (CBCS पॅटर्न) लिहिलेले क्रमिक पुस्तक. \n\u003cbr\u003eतसेच महाराष्ट्रातील इतर सर्व विद्यापीठातील मानसशास्त्र व स्पर्धा परीक्षा यांच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त.\n\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964686328099,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/953f.jpg?v=1750154981"},{"product_id":"diamond-manasshastra-kosh","title":"डायमंड मानसशास्त्र कोश","description":"\u003cp\u003eप्रस्तुत स्पष्टीकरणात्मक कोश म्हणजे एक संक्षिप्त ज्ञानकोशच आहे. या कोशामध्ये प्रथम इंग्रजी संज्ञा घेऊन त्यांना मराठी प्रतिसंज्ञा दिलेल्या आहेत. नंतर त्या संज्ञा-सिध्दांताचे मराठी भाषेत स्पस्टीकरण दिले आहे. त्यामुळे इंग्रजी भाषेतील ग्रंथ वाचत असताना अर्थाविषयी येणार्‍या अडचणी दूर होणार आहेत. एवढेच नव्हे तर प्रत्येक विषयाच्या कोशाच्या शेवटी मराठी-इंग्रजी पारिभाषिक शब्दावली दिलेली असल्याने मराठी भाषेतील ग्रंथ वाचकांचीही सोय झालेली आहे. आज मराठी भाषेत एकतर प्रदीर्घ स्वरूपातील ज्ञानकोश आहेत किंवा केवळ मराठी प्रतिशब्द देणारे शब्दकोश आहेत. परंतु मराठी प्रतिशब्दासह मराठीमध्ये संक्षिप्त स्वरूपात स्पष्टीकरण देणारे कोश उपलब्ध नाहीत. ॠामाजिक शास्त्रांच्या बाबतीत ही गरज या कोशामुळे भागणार आहे. प्रस्तुत कोशाचे सर्वच भाग ज्ञानेच्छू अशा सर्व ज्ञानशाखामधील जिज्ञासूंना उपयुक्त ठरतील असा विश्‍वास वाटतो. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964695896355,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/83f.jpg?v=1750155351"},{"product_id":"vaikasik-manasshastra","title":"वैकासिक मानसशास्त्र","description":"\u003cp\u003eवैकासिक मानसशास्त्र ही मानसशास्त्राची मुलभूत शाखा आहे. या शाखेद्वारे विकास प्रक्रिया कशी सुरू होते? विकासाच्या प्रत्येक अवस्थेत बोधात्मक, मानसिक, सामाजिक व भावनिक विकास कसा होतो? त्यात येणार्‍या अडचणी व त्यातून कसा मार्ग काढावा? याविषयी मानसशास्त्रीय मार्गदर्शन या पुस्तकातून आपणास मिळणार आहे. तसेच पुस्तकाच्या अध्ययनाद्वारे बालकांपासून तर वृद्ध व्यक्तींपर्यंत जीवनात होणार्‍या बदलांनुसार समायोजन कसे करावे? विकास कसा साध्य करावा. या संदर्भात बालक, पालक व शिक्षक यांना मदत होईल अशी अपेक्षा आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964699042083,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/134f.jpg?v=1750155457"},{"product_id":"samanya-manasshshastra","title":"सामान्य मानसशास्त्र","description":"\u003cp\u003eमानसशास्त्र  विषयासाठी उपयुक्त क्रमिक पुस्तक. मानसशास्त्र तसेच स्पर्धा परीक्षा विषयाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964723716387,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/677f.jpg?v=1750156073"},{"product_id":"vastunishtha-manasshastra","title":"वस्तुनिष्ठ मानसशास्त्र  नेट-सेट पेपर २","description":"\u003cp\u003eनेट-सेट व मानसशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964725518627,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/691f.jpg?v=1750156136"},{"product_id":"samajik-manasshastra","title":"सामाजिक मानसशास्त्र","description":"\u003cp\u003eसामाजिक मानसशास्त्र  विषयासाठी उपयुक्त क्रमिक पुस्तक. मानसशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964731777315,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/731f.jpg?v=1750156309"},{"product_id":"audyogik-ani-sanghatanatmak-mansashastra-tyba","title":"ओद्योगिक आणि संघटनात्मक मानसशास्त्र","description":"\u003cp\u003eऔद्योगिक व संघटनात्मक मानसशास्त्र या विषयाची सखोल माहिती करून देणारा संदर्भ ग्रंथ. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील मानसशास्त्र   विषयाच्या विद्यार्थ्याना व अभ्यासकांना उपयुक्त. स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.  \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964740034851,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/785f.jpg?v=1750156572"},{"product_id":"sakaratmak-manasshastra","title":"सकारात्मक मानसशास्त्र","description":"\u003cp\u003eसकारात्मक मानसशास्त्र ही नव्याने उदयास आलेली शाखा आहे. मार्टिन सेलिग्मन हा या शास्त्राचा जनक समजला जातो. ‘लोकांचे सामर्थ्य प्रगट करण्याचा आणि त्यांच्या सकारात्मक कार्यात्मकतेला वाढविण्याचा वैज्ञानिक आणि उपयोजित दृष्टिकोन म्हणजे ‘सकारात्मक मानसशास्त्र’ होय.’ सकारात्मक मानसशास्त्र हे सुख आणि मानवी सामर्थ्याचे शास्त्र आहे. सुखाचे अनेक घटक आहेत. गुणविशेष, सद्गुण, भाव-भावना, आशावाद, खुशाली, कणखरपणा, अस्मिता, आत्मसुख, ध्येय, काम, सावधपणा, भानावस्था, तृप्ती, समाधान, आस्वाद इत्यादी बाबी जीवनात वृद्धिंगत (भरभराट) करण्याची ताकद या सकारात्मक मानसशास्त्रात आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e‘आजारपण (Illness)’ विरुद्ध ‘खुशाली (Wellness)’ या साठीचा प्रयत्न सकारात्मक मानसशास्त्रात दिसतो. आर्थिक आणि सामाजिक निर्देशकांमधून आपल्या खुशालीचे मूल्यमापन होत असते. हा निर्देशक सुखाच्या विरुद्ध दिशेने वाढतच असलेला आढळतो. जवळ-जवळ २०% अमेरिकन लोक हे वैफल्यग्रस्त म्हणून ओळखले जातात. भारतामध्ये मात्र सुखाचे हे प्रमाण ४१% इतके आहे. अशा प्रकारे अनेक असंतुलित क्षेत्रांची गुंफण करण्याचे काम सकारात्मक मानसशास्त्रात चालू आहे. चांगले जीवन आणि चांगला समाज या लोकांच्या संकल्पनेत सुख हा एक अत्यंत महत्त्वाचा मध्यवर्ती घटक आहे. सुख बाहेर नसते, तर ते व्यक्तीच्या अंतर्मनात असते. सुख हे प्रत्येकाच्या विचार करावयाच्या पद्धतीवर अवलंबून असते. विलासी ‘सुख’ हे इंद्रियजन्य सुख समजले जाते. आत्मसुख हे आपल्या सुप्त सामर्थ्यातून निर्माण होत असते. सुख हे आत्म-वास्तविकीकरणाच्या पराकाष्ठेतून निष्पन्न होत असते; सुख व्यक्तिनिष्ठ असते. ‘सुख म्हणजे जीवन समाधान आणि सकारात्मक-नकारात्मक भावनेचा समतोल होय.’\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eअर्थात, उपरोक्त अनुषंगाने प्रस्तुत पुस्तकात सुखाचा अर्थ आणि त्याची मोजमापे, सकारात्मक भावना आणि खुशाली, स्थितिस्थापकत्व (कणखरपणा), सुख आणि जीवनाची वस्तुस्थिती, व्यक्तिगत ध्येये, सकारात्मक गुणविशेष, सद्गुण आणि शून्यापलीकडचे जग म्हणजेच ‘अर्थपूर्ण जीवनाचा अर्थ’ इत्यादी बाबींचा अभ्यास केला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964744196387,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/831f.jpg?v=1750156737"},{"product_id":"manasshastriya-chachanya","title":"मानसशास्त्रीय चाचण्या","description":"\u003cp\u003eमानसशास्त्रीय चाचण्या\/Psychological Testing या विषयाची सखोल माहिती देणारे संदर्भ पुस्तक. मानशास्त्र विषयांच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964752978211,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/246.jpg?v=1750157045"},{"product_id":"diamond-manasshastra-shabdkosh","title":"डायमंड मानसशास्त्र शब्दकोश","description":"\u003cp\u003eडायमंड मानसशास्त्र शब्दकोश | Diamond Dictionary of Psychology\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964757205283,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/305f.jpg?v=1750157190"},{"product_id":"sudrudh-manasikatesathi","title":"सुदृढ मानसिकतेसाठी","description":"\u003cp\u003eसध्या अग्रेसर असणारे दोन आजार, हृदयविकार आणि मनोविकार-नैराश्य. दोघांच्या मुळाशी एकच तत्त्व ‘मानसिक ताण!’\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e त्यात मानसिक आजाराभोवती अज्ञान, गैरसमज आणि सामाजिक कलंक यासारख्या कल्पनांची भीती, त्यावर असणारे, अंधश्रद्धेचे सावट आणि शरीरासारखी सुदृढ मनासाठी काळजी न घेण्याची वृत्ती. या पार्श्वभूमीवर माधवी कुंटे यांचे हे पुस्तक सर्वांना निरामय आनंदी जगण्याची ओळख देते, तर मनोरुग्णांना आपल्या आजाराविरुद्ध कलंकाची कोणतीही भीती व बाळगता उभे राहण्याचे बळ देणारे आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e साध्या सोप्या भाषेत मनोविकाराची ओळख, त्याची कारणे आणि त्यासाठी घ्यावी लागणारी काळजी यांची मांडणी हा या पुस्तकाचा उद्देश. आपल्यातला असला तरी आपल्यापासून हा आजार दूर कसा ठेवावा, हे छोट्या-मोठ्या टिपस् आणि उदाहरणांसह सांगणे ही या पुस्तकाची खासियत.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964757696803,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/314f.jpg?v=1750157217"},{"product_id":"vyaktimatva-fultana","title":"व्यक्तीमत्व फुलताना...","description":"\u003cp\u003eकाळाची गरज लक्षात घेऊन ‘व्यक्तिमत्त्वविकास’ या विषयावरची अनेक पुस्तके सध्या बाजारात येत आहेत. याच प्रवाहातले हे आणखी एक पुस्तक म्हणून या पुस्तकाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही; कारण लेखिकेने ओघवत्या भाषेत या पुस्तकाची रचनाच अशी केली आहे की, जे काही मांडायचे, ते मुद्दा घेऊनच! त्यामुळे व्यक्तिमत्त्वाच्या आठ-दहा पैलूंवर अतिशय महत्त्वाचे, मुद्देसूद आणि तरीही रोचक असे लिखाण या पुस्तकात एकत्र वाचायला मिळते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eव्यक्तिमत्त्वाच्या इतक्या विविध पैलूंवर एकाच पुस्तकात मार्गदर्शन करणारे मराठीतले हे बहुधा पहिलेच पुस्तक. यात सांगितलेल्या अनेक गोष्टी अशा आहेत की, त्या तरुणांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच उपयोगी पडणार आहेत, त्यांचे आयुष्य समृद्ध करणार आहेत.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964757958947,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/318-vyaktimatvafultana3d.jpg?v=1750157231"},{"product_id":"arogyache-manasshastra","title":"आरोग्याचे मानसशास्त्र","description":"\u003cp\u003eसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या २०२०-२०२१ च्या द्वितीय वर्ष कला शाखेच्या (S.Y.B.A) सुधारित अभ्यासक्रमानुसार नामवंत लेखकांनी लिहिलेले उपयुक्त क्रमिक पुस्तक. तसेच महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांना व महाविद्यालयातील मानसशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्याना व अभ्यासकांना उपयुक्त पुस्तक।\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964767658275,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/990AarogyacheManasshastra.jpg?v=1750157646"},{"product_id":"generic-elective-course","title":"डिजिटल साक्षरता, सामाजिक नवोपक्रम, सामाजिक उद्योजकता व नागरी शिक्षण (जेनेरीक इलेकटीव्ह कोर्स )","description":"सद्य:स्थितीत माहिती तंत्रज्ञानाचा वापर अनिवार्य झालेला असून, पुढील काळातही तो वाढणार आहे. संगणक, मोबाईल, लॅपटॉप इत्यादींचा वापर मोठ्याप्रमाणात होत असताना, अतिरिक्त लोकसंख्येमुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्या सोडविण्यासाठी नवकल्पनांचा उपयोग महत्त्वपूर्ण ठरत आहे. सदर पुस्तकात डिजिटल साक्षरता, व्यावसायिक जीवनातील डिजिटल साक्षरतेची भूमिका, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, प्रवाह, संधी स्पष्ट करून सामाजिक नवकल्पना, सामाजिक समस्या, नागरीकृती इत्यादींचे सामाजिक जीवनातील महत्त्व लक्षात येते. सामाजिक उद्योजकता, व्यावसायिक उपक्रम, स्टार्टअप इत्यादी संकल्पनांची निर्मिती त्याचबरोबर नागरी शिक्षणात हक्क आणि कर्तव्ये, सामाजिक न्याय, सीमांत घटक, पंचायत राजची भूमिका स्पष्ट केली आहे. भारताची नवीन ओळख त्यामुळे स्पष्ट होते. सदर पुस्तक विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा, शासन इत्यादींसाठी उपयुक्त आहे. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964777455907,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1043f.jpg?v=1750158112"},{"product_id":"shikshan-parivartan","title":"शिक्षण : परिवर्तनाची सामाजिक चळवळ","description":"प्रबोधनाच्या चळवळीची दोन अविभाज्य अंगे आहेत. एक आहे ते वैचारिक अंग आणि दुसरे आहे ते भावनिक अंग. या दोन्हीच्या एकत्रित अस्तित्वाशिवाय प्रबोधनाची चळवळ उभीच राहू शकत नाही. एखाद्या चळवळीत, त्याचे वैचारिक अंग प्रधान असेल पण त्याला भावनिक अंग अजिबात नाही, असे असणार नाही. तर दुसर्‍या एखाद्या चळवळीत, त्याच्याप्रबोधन कार्यात भावनिक अंग प्रभावी राहील पण त्याला विचाराची जोड असावीच लागेल. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e आपली प्रबोधनाची चळवळ ही लहान बालकांच्या संदर्भातली चळवळ आहे. त्यामुळे भावनेच्या पातळीवर ती सर्वत्र समाजाला आपलीशी वाटणे सहज शक्य आहे. बालक, बालकाची नैसर्गीक वाढ त्या नैसर्गीक वाढीला पोषक अशी आनंददायी शिक्षणपध्दती, बालकाचे आरोग्य, बालकाचे व्यक्तीमत्व, बालकाचे भवितव्य असे बालजीवनाशी संबंधित असे सर्वच विषय समाजातील प्रत्येक घटकासच जवळचे नि महत्वाचे खासच वाटत असतात. त्यामुळे या सगळ्यांचे शास्त्र गेली दोन-तीन शतके विकसीत होत गेलेले आहे, त्याला आधुनिक मानसशास्त्राचा, शरिरशास्त्राचा नि शिक्षणशास्त्राचा बळकट आधार आहे आणि हे शास्त्र बालशाळातून सहजपणे आंमलात आणता येते, हा विचार आपण प्रभावीपणे लोकापर्यंत पोचवू शकू. उदा: आजच्या शहरी सुशिक्षित पालकांची अपेक्षा अशी असते की, मुलांचा बौध्दिक विकास लवकर व्हावा. शिक्षण म्हणजे केवळ बौध्दिकरित्या शिकणे एवढेच त्यांच्या डोळ्यसमोर असते अशावेळी आपण त्यांना जरा प्रयत्नाने पटवून देऊ शकू की, शालेयपूर्व वयातील बालकांची बौध्दिक वाढ पुढे सरकण्यापूर्वी बालकांच्या शारिरिक, मानसिक नि सामाजिक क्षमतांची काहीएक पूर्वतयारी व्हावी लागते. एवढेच नव्हे तर बौध्दिक क्षमतांच्या बरोबरीने इतरही क्षमता विकसित होत गेल्या तरच बौध्दिक विकास परिपूर्णतेने गाठता येतो. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964778963235,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/35fShikshanParivartanachiSamajikChalval.jpg?v=1750158192"},{"product_id":"aajche-shikshan","title":"आजचे शिक्षण उद्याचे जीवन","description":"शाळांची शैक्षणिक भूमिका अशी असायला हवी की, सर्वच मुलांना सर्वच संधी घेता याव्यात, प्रत्येकाच्या क्षमतेनुसार त्याची त्या त्या बाबतीतील प्रगती होऊ द्यावी. सर्वांनाच विविधांगी कुशलता मिळू द्यावी. सर्वांनाच पुरेसा सर्वांगीण अनुभव आणि आनंद मिळावा. याऐवजी शाळा काही मोजक्या मुलांना ठराविक स्पर्धासाठी तयार करून आपल्या शाळेला विविध स्पर्धातील अधिकाधिक बक्षिसे प्राप्त करून इतर शाळांशी स्पर्धा करीत असते आणि या बक्षिसांचे प्रदर्शन करून आपला अहंगंड जोपासत असते. \u003cbr\u003e या शाळाशाळातील अशा गैरवाजवी स्पर्धामुळेच शाळाशाळांमधून विषमता निर्माण होते आणि जी शाळा अभ्यासात आणि इतर गोष्टीमध्ये स्पर्धेत अधिक पुढे जाते तीच शाळा चांगली अशी पालकांची भावना बनते. वास्तविक अशी चांगली शाळा ही थोड्या मुंलांसाठी चांगली आणि अनेक मुलांसाठी चांगली नसलेली शाळा असते हे सत्य सहजपणे जाणवत नाही. त्यामुळेच अशा शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालक-मुलांची झुंबड उडते आणि मग प्रवेशापासूनच मुलांमध्ये स्पर्धेचे मानसिक ताण निर्माण व्हायला सुरवात होते.\u003cbr\u003e\u003cbr\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964779061539,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/38f.jpg?v=1750158199"},{"product_id":"snshodhn-krtaanaa","title":"संशोधन करताना","description":"संशोधन क्षेत्रात करण्यासारखे खूप आहे. एम्.फिल. व मुख्यत: पीएच.डी.पदवीसाठी संशोधन करावेच लागते. तसेच एम्.ए., एम.कॉम, एम्.बी.ए. या पदवी अभ्यासासाठीही संशोधन उपयुक्त ठरते, हे सर्वांना ज्ञात आहेच. याशिवाय शिष्यवृत्तीसाठी, स्वतःला रूची आहे म्हणून अनेकजण संशोधन करीत असतात. पत्रकारिता करतानाही एखाद्या समस्येवर संशोधन करुन त्याची मांडणी व त्यावर उपाय सुचवावे लागतात.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e संशोधन करताना हे पुस्तक वरील सर्व अभ्यासकांना उपयोगी पडेल. याशिवाय व्यावसायिक संशोधक म्हणून काम करताना, सल्लागार म्हणून काम करतानाही हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल यात शंका नाही.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964779290915,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/213f.jpg?v=1750158217"},{"product_id":"karta-karvita","title":"कर्ता करविता : आधुनिक मेंदूसंशोधन व आपले जीवन | रमेश पानसे, राजश्री क्षीरसागर , अनिता देशमुख-बेल्हेकर","description":"या विश्वातील सर्वात मोठे कोडे म्हणजे मानवाचा मेंदू होय. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eभाषा, गणित, परिसराची जाण, स्मृती , विचार , ऊहापोह , निर्णय आणि कार्यवाही यांचा उगम मेंदूतच असतो. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eश्वसन, रुधिराभिसरण आणि पचनक्रिया जीवनाला पायाभूत असतात. या क्रियांवर देखील मेंदूचेच नियंत्रण असते. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eमनाचे कार्य म्हणजे मेंदूचे कार्य. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eशरीरावर मनाच्या होणाऱ्या परिणामांमुळे मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, आणि पचनसंस्थेशी निगडीत असे अनेक आजार उद्भवतात. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eमेंदूच्या कार्यातील सर्वात मोठे गूढ म्हणजे जाणीव. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eआधुनिक मेंदूसंशोधनातून मेंदूच्या कार्याची जसजशी माहीती मिळत गेली, तसतसा या सर्व विषयांवर प्रकाश पडू लागला आहे. या संशोधनाचा आढावा घेण्याचे कठीण काम ‘कर्ता-करविता’ हे पुस्तक कर्ते. मराठी भाषेला अभिमान वाटावा इतक्या चांगल्या प्रकारे हे पुस्तक झाले आहे. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e- डॉ. ह. वि. सरदेसाई \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964780667171,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/karta-karvita-3d.png?v=1750158296"},{"product_id":"bhavanik-buddhimatta-emotional-intelligence","title":"भावनिक बुद्धिमत्ता | Bhavanik Buddhimatta | Emotional Intelligence | Jayprakash Zende | जयप्रकाश झेंडे |","description":"भावना जाणण्याची, मूल्यांकन करण्याची, व्यक्त करण्याची आणि नियंत्रित करण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता (इक्यू). केवळ बौद्धिक क्षमता (आयक्यू) आयुष्यात यश मिळवण्यासाठी पुरेशी नाही. आयक्यू आणि इक्यू एकमेकांना पूरक ठरतात, तेव्हाच ते प्रभावी असतात.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eभावनिक बुद्धिमत्ता म्हणजे, भावनांना प्रभावीपणे समजून घेण्याची आणि त्यांचं व्यवस्थापन करण्याची क्षमता. कामाच्या ठिकाणी भावनिक बुद्धिमत्ता महत्त्वपूर्ण फायदे मिळवून देऊ शकते आणि अधिक चांगले संबंध निर्माण करण्यासाठी, तसंच सकारात्मक वातावरण-निर्मितीसाठी मदत करू शकते. भावनिक बुद्धिमत्ता महत्त्वाची आहे, कारण ती वैयक्तिक आणि व्यावसायिक असे दोन्ही प्रकारचे संबंध सुधारण्यासाठी मदत करू करते. सामाजिक गुंतागुंतीतून मार्ग काढण्यासाठी, नेतृत्व करण्यासाठी, करिअरमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी उच्च भावनिक बुद्धिमत्ता मदत करू शकते.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e सदर पुस्तकात लेखकाने मेंदूचं कार्य आणि त्यामागची भावनिक आणि तार्किक प्रक्रिया सोप्या शब्दांत मांडलेली आहे. तसंच भावनिक बुद्धिमत्तेचं संगोपन कसं करता येऊ शकतं आणि ती कशी वृद्धिगंत करता येऊ शकते, हे दाखवून दिलं आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात हमखास यश मिळवण्यासाठी सदर पुस्तक वाचकांना निश्चितच उपयुक्त ठरेल.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eMarathi book on emotional intelligence. Everyone must understand the concepts of emotional intelligence to lead asuccessful personal and professional life. It is a concept pioneered by Daniel Goleman.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964782305571,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1076bhavanikbuddhimatta3d.jpg?v=1750158349"},{"product_id":"ashtpaillu-vyaktimattva","title":"Ashtpaillu vyaktimattvasathi samarth ramdasanchi shikavan | अष्टपैलू व्यक्तिमत्वासाठी समर्थ रामदासांची शिकवण | Self Help | Personality Development | Marathi Books | मराठी पुस्तक","description":"\u003cp\u003eसमर्थ रामदासांचा ‘दासबोध’ हा ग्रंथ अभ्यासून आत्ताच्या काळात उपयुक्त ठरतील अशा काही ओव्या निवडल्या आहेत आणि सदर पुस्तकात त्यांचे साध्यासोप्या भाषेत विवरण केले आहे. समकालीन उदाहरणे देऊन दासबोधात सांगितलेला विचार अधिक स्पष्ट केला आहे. मराठीमध्ये अनेक संतांचे उत्तमोत्तम ग्रंथ आहेत, परंतु रामदासांच्या साहित्याचे स्थान वेगळे आहे. रामदास केवळ ज्ञान सांगत नाहीत, तर सृष्टीतील ज्ञान आत्मसात कसे करावे, त्यासाठीची साधने कोणती, उत्तम ग्रंथांचा अभ्यास कसा करावा याही विषयी मार्गदर्शन करतात. विद्याभ्यासाला त्यांनी अनन्य महत्त्व दिले आहे. व्यावसायिक जीवनात उपयुक्त असणार्‍या वेळचे व्यवस्थापन, नेतृत्वकला, ताण-तणावांचे व्यवस्थापन, सकारात्मक दृष्टीकोन अशा अनेक विषयांवर दासबोधामध्ये विवेचन आहे. समर्थ रामदासांना आळस, निष्क्रियता, निराशा यांचा अगदी तिटकारा होता. प्रयत्नवाद, चतुराई, सारासार विचार यांवर त्यांचा भर होता. दासबोधामध्ये राजकारण, समाजकारण, चातुर्यलक्षण, लोकसंग्रह या महत्त्वाच्या विषयांवर तर विस्ताराने सांगितले आहेच, पण बोलावे कसे (कम्युनिकेशन स्कील्स), अक्षर कसे काढावे, वैयक्तिक स्वच्छता कशी राखावी इथपासून ते ज्ञानोपासना करणार्‍या व्यक्तीचा दिनक्रम कसा असावा इथपर्यंत विवेचन केले आहे. व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करून एक कार्यक्षम आणि यशस्वी आयुष्य जगण्यासाठी सदर पुस्तक वाचकांना निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास वाटतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eMarathi book on teachings of Samarth Ramdas. The book helps us understand how the teachings of Samarth Ramadas can help us develop an all rounder personality. His teachings can help us develop good habits and leadership qualities, and help us live a successful professional and persoanl life.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964782469411,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1075ashpailluvyaktimattva-3d.jpg?v=1750158358"},{"product_id":"tattvadnyan-va-samajik-sashtre-yatil-sanshodhan-paddhati","title":"तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रे यातील संशोधन-पद्धती | Tattvadnyan Va Samajik Sashtre Yatil Sanshodhan-paddhati","description":"\u003cp\u003e\"विसाव्या शतकाच्या मध्याला पाश्चिमात्य जगतात आंतरविद्याशाखीय अभ्यासाची लाट विशेषत्वाने उफाळून आली. कालांतराने ही लाट भारतीय ज्ञानक्षेत्रसुद्धा व्यापू लागली. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठासारखी संस्था यात अग्रेसर होती...भारताच्या नव्या शैक्षणिक धोरणात आंतरविद्याशाखीय अभ्यासाला पूर्वीपेक्षा अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रातील २०१६च्या विद्यापीठ कायद्यात आंतरविद्याशाखीय अभ्यासक्षेत्रासाठी स्वतंत्र पूर्णवेळ अधिष्ठाता नियुक्त करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e...याबाबत आपल्याकडची स्थितीसुद्धा बदलत चाललेली आहे. कायदा असो, साहित्य असो, कला असो वा क्रीडा असो, अशा विविध क्षेत्रांना आंतरविद्याशाखीयतेने व्यापून टाकलेले आहे. किंबहुना आंतरविद्याशाखीयता हा आजचा युगधर्म आहे.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eप्रस्तुत ग्रंथ हा वर उल्लेखिलेल्या युगधर्माचे भान राखणारा ग्रंथ आहे. हा ग्रंथ सिद्ध करणे हे एक आव्हानात्मक काम होते. ते काम प्रा. मीनल कातर्णीकर व प्रा. लता छत्रे यांनी केलेले असल्याने त्या दोघी अभिनंदनास पात्र आहेत. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e- डॉ. राजा दीक्षित\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eसुप्रतिष्ठित प्राध्यापक (Emeritus Professor),\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eअध्यक्ष व प्रमुख संपादक, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ\"\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eA Marathi language book on Research Methodology in Philosophy and Social Sciences . Edited by Prof. Meenal Katarnikar and Prof. Lata Chhatre.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964782567715,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/3d-1077-tattvadnyancover.jpg?v=1750158366"},{"product_id":"swabhavala-aushadh-aste","title":"स्वभावाला औषध असते  | Swabhavala Aushadh Aste","description":"\u003cp\u003e\"‘स्वभावाला औषध नाही’ हे आपल्या मनावर इतके बिंबवले गेले आहे\u003cbr\u003eकी, स्वत:त बदल करण्याच्या प्रयत्नांबद्दलही आपण साशंक होऊ लागतो.\u003cbr\u003eमग त्या विषयीची तंत्रे, प्रशिक्षण किंवा त्यातील यशाचे दाखलेही थापाच वाटू लागतात, आणि तरीही प्रत्येकाला कधी ना कधी, कोणाच्या ना कोणाच्या बाबतीत, स्वभावाला औषध शोधण्याची गरज वाटलेली असते, यात शंका नाही. ही गरज लक्षात घेऊनच या पुस्तकाची योजना आखली आहे.\u003cbr\u003e \u003cbr\u003eमानवी जीवन सर्वस्वी ताणमुक्त होणार नाही, हे मान्य केले की, आपले\u003cbr\u003eध्येयही ‘ताण कमी करणे’ अशा चढण्याजोग्या पायरीवर येते आणि त्यातूनही जे ताण उरतील, अपरिहार्य असतील ते पेलण्याची ताकद कमावणे हाही उद्देश या प्रयत्नाच्या पाठीशी उभा राहतो. या पुस्तकातील विवेचन अंतिम किंवा परिपूर्ण नाही, हे मान्यच आहे. परंतु आधुनिक मनोविज्ञानाच्या मार्गाने प्राप्त झालेली तंत्रे वापरून बघण्यासाठी उपलब्ध व्हावीत, यासाठी हा प्रयत्न आहे.\u003cbr\u003e \u003cbr\u003eयामुळे, हे पुस्तक वाचत असताना जागोजाग थबकून आपल्या अनुभवाशी\u003cbr\u003eताळा घेत राहणे महत्त्वाचे आहे. शांत निरीक्षणाने काय दिसते, काय लक्षात येते, यावरच स्वभावासाठीचे औषध सिद्ध होणार असते. आपण जसे आपल्या हाताने पायावर धोंडा पाडून घेऊ शकतो, त्याचप्रमाणे आपण स्वत:शी संवादही करू शकतो. हे पुस्तक अशा संवादाचा निश्चित आरंभ करून देईल!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003eWritten Renowned Psychologists, Sudheer  and shyamala Vanarase, the book helps the reader access his own personality and helps him\/her make positive changes in their life through scientific methods.  It helps th ereader in reducing stress and anxiety and also develop better relationships.  \"\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964783124771,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1086Swabhavalaaushadaste-3d.jpg?v=1750158414"},{"product_id":"manasshastracha-muladhar","title":"मानसशास्त्राचा मूलाधार  | Manasshastracha Muladhar","description":"\u003cp\u003eNEP 2020 अभ्यासक्रम. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 2024 FYBA च्या सुधारित अभ्यासक्रमानुसार लिहिलेले क्रमिक पुस्तक. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील मानसशास्त्र  अभ्यासक्रमाच्या तसेच स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त पुस्तक. \u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eFoundations of Psychology Textbook for Savitribai Phule Pune university FYBA revised syllabus according to NEP 2020.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964786106659,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1101ManasshastrachaMualdadharfront.jpg?v=1750158541"}],"url":"https:\/\/kanakbook.in\/collections\/maansshaastr.oembed?page=2","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}