{"title":"माहितीपर","description":"","products":[{"product_id":"peshvekalin-pune","title":"पेशवेकालीन पुणे","description":"\u003cp\u003eजो समाज आपल्या ऐतिहासिक वारश्याबद्दल जागरुक असतो त्या समाजाचा भविष्यकाळ हा उज्जवल असतो.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e ऐतिहासिक वारसा हा शहराच्या निर्मितीपासुन विविध टप्प्यांवर झालेला विकास, घडलेल्या घटना यांतून सापडतो. ‘पूना इन बायगॉन डेज’ या इंग्रजी ग्रंथात द. ब. पारसनीस यांनी पुणे शहराच्या निर्मितीपासुन पेशवाईच्या अंतापर्यंत विविध स्थळे, घडामोडी, वास्तू, सण-उत्सव यांचे निवेदन केले आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e या मुळ इंग्रजी ग्रंथाचा सुरस अनुवाद.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964702318883,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/153f.jpg?v=1750155567"},{"product_id":"saundaryasadhana","title":"सौंदर्यसाधना","description":"\u003cp\u003eमाणसाला सौंदर्याची ओढ पूर्वीपासूनच होती. ही ओढ आजही तेवढीच टिकून आहे; किंबहुना थोडी अधिकच वाढल्याचे दिसते.\u003cbr\u003e आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे, वातावरणातील बदलांमुळे, वाढत्या ताणतणावांमुळे एकीकडे उपजत सौंदर्य टिकविण्याची गरज वाढत असली तरी प्रत्येक वेळी ब्युटीपार्लरमध्ये जाणे आणि पैसे खर्च करणे शक्य होतेच असे नाही. अशा वेळी घरच्या घरी करता येणारे असे सहजसोपे उपाय या पुस्तकात ‘सुंदर’ रीतीने सांगितले आहेत.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964702515491,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/450f.jpg?v=1750155578"},{"product_id":"shastrokt-masaj","title":"शास्त्रोक्त मसाज","description":"लहान बाळांपासून वृद्धावस्थेपर्यंत आरोग्य टिकवणारी उपचारपद्धती म्हणजे अभ्यंग-मसाज !\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e सहज-सुलभ, स्वास्थ्योपचार !सौंदर्य वाढवणारी उपचारपद्धती !\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e शारीरिक व मानसिक दोन्ही स्तरांवर कार्य करणारी उपचारपद्धती !\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e अनेक व्याधींमध्येसुद्धा निश्चित फलदायी ठरणारी उपचारपद्धती !\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e सर्व थरातील व्यक्तींच्या स्वास्थ्यासाठीची \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e आवश्यक व उपयुक्त उपचारपद्धती !\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964702777635,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/454f.jpg?v=1750155594"},{"product_id":"diamond-quiz-series-maharashtra","title":"डायमंड क्विझ सीरीज : महाराष्ट्र","description":"\u003cp\u003eस्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त प्रश्नसंच \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964704383267,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/521f.jpg?v=1750155650"},{"product_id":"diamond-quiz-series-bharat","title":"डायमंड क्विझ सीरिज : भारत","description":"\u003cp\u003eस्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त प्रश्नसंच \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964704481571,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/522f.jpg?v=1750155655"},{"product_id":"diamond-quiz-series-samanya-dnyan","title":"डायमंड क्विझ सीरिज : सामान्यज्ञान","description":"\u003cp\u003eस्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त प्रश्नसंच \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964704776483,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/526f.jpg?v=1750155674"},{"product_id":"kautumbik-hinsachar","title":"कौटुंबिक हिंसाचार (वास्तवाला सामोरे जाताना)","description":"\u003cp\u003eकौटुंबिक हिंसाचार म्हटलं की, मनात येते शारीरिक इजा! पण एखाद्या स्त्रीवर शारीरिक आघाताबरोबर इतर प्रकारचाही अत्याचार होत असतो. समाजातल्या सर्व स्तरांमधील स्त्रियांवर घरामध्ये कमीअधिक प्रमाणात दररोज अत्याचार होत असतो.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e कौटुंबिक अत्याचार म्हणजे काय, आपण किंवा आपल्याजवळचे कोणी पीडित आहे का? अत्याचार होत असताना मदत कशी मागाल? कायदा काय सांगतो? आणि समाजातील स्त्रियांचा ह्या प्रश्‍नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे? ह्याची सखोल माहिती ह्या पुस्तकात दिली आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e व्यवसायाने मार्केट रिसर्च कन्सल्टंट असलेल्या मेधा ताडपत्रीकर ह्यांनी गेली अनेक वर्षे भारतातील व परदेशातील असंख्य पीडित महिलांशी प्रत्यक्ष संवाद साधून, त्यांना बोलते करून ‘कौटुंबिक हिंसाचार’ ह्या विषयाचा सखोल अभ्यास केला आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964720636195,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/641f.jpg?v=1750155950"},{"product_id":"manhunt","title":"मॅनहंट","description":"\u003cp\u003eनुकतीच मध्यरात्र झाली असताना बिन लादेन राहत असलेल्या कंपाउंडमधले रहिवासी जवळच कुठेतरी झालेल्या स्फोटांच्या आवाजाने खडबडून जागे झाले. बिन लादेनची मुलगी मरियम 'काय झालं' हे विचारण्यासाठी बिन लादेनच्या शयनगृहाकडे धावली. त्याने तिला ''खाली जाऊन झोप'' असं सांगितलं. त्यानंतर तो त्याची पत्नी अमालला म्हणाला, ''दिवा लावू नकोस.'' नक्कीच, ते बिन लादेनच्या तोंडचे अखेरचे शब्द ठरणार होते.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  ओसामा बिन लादेन आणि अल्-कायदाने अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारल्यानंतर अमेरिकेच्या प्रत्यक्ष धरतीवर झालेला पहिला दहशतवादी हल्ला म्हणजे ९\/११! या हल्ल्याने अमेरिकी नागरिकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण केली आणि प्रशासन, लष्करी यंत्रणा आणि गुप्तचर संस्था यांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्‍न उपस्थित केला. त्यामुळे 'बिन लादेनचा खातमा' हा त्यानंतर अमेरिकेच्या अस्मितेचा प्रश्‍न बनला. तरीसुद्धा तब्बल १० वर्षं अमेरिकेच्या तमाम अत्याधुनिक आणि अद्ययावत यंत्रणेला गुंगारा देण्यात ओसामा बिन लादेन यशस्वी ठरला. त्यामुळे त्याच्या शोधमोहिमेची ही कथा लक्षवेधी आणि थरारक ठरते!\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  पीटर बर्गन हे बिन लादेन आणि अल्-कायदावर लिहिलेल्या 'बेस्टसेलर' पुस्तकांचे लेखक आहेत. लादेनला भेटलेल्या मोजक्या पत्रकारांपैकी ते एक आहेत. ९\/११च्या हल्ल्यापूर्वी त्यांनी बिन लादेनची मुलाखत घेतली होती. ते सीएनएनचे राष्ट्रीय सुरक्षा विश्लेषक आणि न्यू अमेरिकन फाउंडेशनचे संचालकही आहेत. बर्गन यांची सखोल अभ्यासू वृत्ती आणि व्हाइट हाउस अधिकारी, सीआयए, पाकिस्तानी गुप्तचर संस्था आणि लष्कर यांच्याशी असलेला थेट संपर्क यांमुळे हे पुस्तक बिन लादेन आणि अल्-कायदा यांच्या विषयीच्या माहितीचा अधिकृत दस्तऐवज ठरते.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964726960419,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/699f.jpg?v=1750156171"},{"product_id":"jerusalem","title":"जेरुसलेम : एक चरित्रकथा","description":"\u003cp\u003eजेरुसलेम ही एक वैश्विक नगरी आहे. ती दोन समुदायांची राजधानी आहे आणि तीन धर्मांचं तीर्थस्थान आहे. कयामतच्या दिवसाचं हेच ठिकाण आहे आणि आजच्या इस्लाम आणि पाश्चात्त्य संस्कृतींमधल्या संघर्षाची हीच युद्धभूमी आहे. ही छोटीशी दुर्गम नगरी ‘पवित्र नगरी’ कशी बनली? कशी सार्या जगाचा केंद्रबिंदू बनली? मध्यपूर्वेत शांतता राखण्याची किल्ली या नगरीच्या हाती कशी आली?\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eनव्या स्रोतांतून माहिती मिळवून आणि आयुष्यभराच्या अभ्यासावरून मांटफिऑरी यांनी या सतत बदलत्या नगरीचा इतिहास आपल्याला उलगडून दाखवला आहे. जेरुसलेमची निर्मिती करणारे, तिचा विध्वंस करणारे, तिचा इतिहास लिहिणारे आणि तिच्यावर श्रद्धा ठेवणारे निरनिराळे स्त्री-पुरुष, राजे-राण्या, प्रेषित, कवी, जेते आणि वारांगना यांच्या हकिकती, प्रेमप्रकरणं आणि युद्धकथांच्या माध्यमातून मांटफिऑरी यांनी आपल्यासमोर हा लक्षवेधी इतिहास मांडला आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eराजा डेव्हिडपासून ते बराक ओबामापर्यंत आणि ज्यू, ख्रिश्चन, इस्लाम या धर्मांच्या जन्मापासून ते इस्राइल-पॅलेस्ताईनच्या संघर्षापर्यंतचा हा ३००० वर्षांचा भव्य इतिहास आहे. श्रद्धा, कत्तली, धर्मांधता आणि सहिष्णुतेचा हा इतिहास आहे. एक नगरी, जिचं अस्तित्व इहलोकात आणि परलोकातही आहे. हा जेरुसलेमचा इतिहास आहे.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964733186339,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/742f.jpg?v=1750156362"},{"product_id":"bharatiya-va-antarrashtriya-visesh-din","title":"भारतीय व आंतरराष्ट्रीय विशेष दिन","description":"\u003cp\u003e\tसंपूर्ण जगभर काही ‘विशेष दिन’ साजरे केले जातात. जसे पर्यावरण दिन, जागतिक लोकसंख्या दिन, वाचन प्रेरणा दिन, मानवी हक्क दिन. अशा विशेष दिनांबद्दल आपल्याला फारच थोडी माहिती असते.\n\u003cbr\u003e\tकाही विशेष दिन पूर्वापार चालत आलेले असतात. काही राष्ट्रसंघाने घोषित केलेले असतात. असे विशेष दिन राज्य, राष्ट्रीय, जागतिक स्तरावर वर्षभर साजरे केले जातात. हे दिवस विशेष दिन का मानायचे, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्यांचे महत्त्व काय? याविषयी आवश्यक असलेली माहिती पुस्तकात अद्ययावत, मुद्देसूद व विस्ताराने दिली आहे.\n\u003cbr\u003e\tया पुस्तकाचा उपयोग शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरिता व विविध स्पर्धा परीक्षेला बसू इच्छिणार्‍या स्पर्धकांना उपयुक्त ठरेल. म्हणून प्रत्येक शाळा व महाविद्यालयात असायलाच हवे असे पुस्तक.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964745638179,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/838f.jpg?v=1750156790"},{"product_id":"mahiti-tantradnyan","title":"माहिती तंत्रज्ञान संपूर्ण ओळख","description":"सध्या जगामध्ये ‘माहिती तंत्रज्ञान’ हे चलनी नाणे झालेले आहे. पाश्चात्त्य भाषांमध्ये या विषयावर भरपूर साहित्य आढळते; पण मराठीत असे साहित्य फारच दुर्मिळ आहे.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e संगणक, संगणकाचे महत्त्व, त्याचा इतिहास, त्याचे तंत्रज्ञान व माहिती यांची सांगड, इ-मेल, बहुविध प्रसारमाध्यमे, विश्वव्यापी जाळे इ. गोष्टींविषयीचे ज्ञान सोप्या भाषेत सर्वांना करून देण्याचा हा प्रयत्न.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e आत्मविकास व देशाच्या विकासासाठी ‘माहिती तंत्रज्ञान’ आवश्यक असल्यामुळे विद्यार्थी, सामान्यजन,अभ्यासू यांच्यासाठी हे पुस्तक उपयोगी आहे.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964759433507,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/350_Mahiti_Tantradyan_3.jpg?v=1750157284"},{"product_id":"maharashtratil-sant-kavyitri","title":"महाराष्टातील संत कवयित्री","description":"\u003cp\u003e अगणित गुणांचा संगम करून विधात्यानं स्त्रीमूर्ती घडवली. स्त्रीपणात सृजनाच्या नवनवीन दिशा आहेत. वेदकाळापासून संतकाळापर्यंत स्त्रीजीवनाचा आढावा घेतला तर लक्षणीय चढ-उतार दिसतात. वेदकालीन स्त्री स्वयंप्रकाशित होती तर - पुढील काळात स्त्रीचा दर्जा खालावला. स्त्रियांना भक्तीचं स्वातंत्र्य देऊन  संतांनी स्त्रीला प्रकाशाची, विकासाची वाट दाखवली. त्यांना सुखदु:खाकडे बघण्याची डोळस वैचारिक दृष्टी दिली.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e स्त्रीजीवनाचा हा अर्थपूर्ण सूर दाखवणार्‍या महाराष्ट्रातील संतस्त्रिया दीपस्तंभ आहेत. त्यांचं जीवन समजून घेताना आपलं मन स्वत:त डोकावतं. ‘मी कोण’ याचा शोध घ्यायला लागतं. नवी जाग येते आणि माणुसकीचं अजरामर सत्य कानामनात घुमू लागतं.....\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964761170211,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/390f.jpg?v=1750157341"},{"product_id":"maharashtratil-viabhavshali-daginyanchi-parampara","title":"महाराष्ट्रातील वैभवशाली दागिन्यांची परंपरा","description":"\u003ctable width=\"246\"\u003e\n\u003ctbody\u003e\n\u003ctr\u003e\n\u003ctd width=\"246\"\u003e अलंकार ! मानवाच्या सृजनशीलतेचा मनोरम आविष्कार. निरनिराळ्या गोष्टींपासून स्वत:चे सौंदर्य खुलविण्यासाठी तसेच शरीराच्या हात, पाय, गळा, नाक, कान अशा अवयवांसाठी विविध कलाकृती मानवाने तयार केल्या.  यात हिरे, माणके, रत्ने, मोती, पाचू, खडे यांचा इतका सुंदर वापर केला आहे की त्यावरून नजर हलू नये.\u003cbr\u003e  दागिन्यांबद्दल स्त्रीच्या मनात आकर्षणाचा एक नाजूक, हळवा कोपरा असतो. तसेच पुरुषाच्या मनात त्याबद्दल अभिमानाची भावना असते.\u003cbr\u003e  कलाकुसर, सौंदर्य याबरोबरच मालमत्ता म्हणून ओळखल्या जाणार्‍या दागिन्यांबद्दलचा समावेशक आणि मनोरंजक माहितीचा खजिनाच हे पुस्तक वाचकांपुढे खुला करत आहे. पुस्तक उघडा आणि त्या खजिन्याचा आनंद लुटा\u003cbr\u003e  \u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003c\/tbody\u003e\n\u003c\/table\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964762120483,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/406f.jpg?v=1750157396"},{"product_id":"maharashtratil-sant-kavi","title":"महाराष्ट्रातील संतकवी","description":"\u003cp\u003e आपला महाराष्ट्र ही संतांची जन्मभूमी, कर्मभूमी म्हणून पुण्यभूमी आहे. महाराष्ट्राच्या मातीला संतत्वाचा सुगंध आहे. या सुगंधामुळे महाराष्ट्राला शतकानुशतके संतांची मांदियाळी लाभली. या आपल्या संतांनी विश्वकल्याणाच्या जाणिवेतून महाराष्ट्र भूमी, महाराष्ट्रातील माणसांची मनं पावन केली. आपले संत, त्यांची चरित्रं, त्यांचं कार्य, त्यांचं साहित्य हा आपला अमूल्य ठेवा आहे, प्रसन्न मनानं जगण्याची शक्ती आहे. आपल्या जीवनाचं ते अधिष्ठान आहे. ‘या संतांसी भेटता| हरे संसाराची व्यथा|’ हा अनुभव त्यांच्या तत्त्वज्ञानाच्या मनन-चिंतनानं येतो.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e प्रेम ही प्रत्येकाची जगण्याची शक्ती आहे. प्रेम म्हणजे भक्ती. ‘आम्ही प्रेमसुखाची लेकरं’ ही ओळख करून देणारे संत म्हणजे आपली सुखाची सोबत. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराजांनी भक्तीचं मंदिर उभं केलं. भक्तराज नामदेवांनी किंकर वृत्तीने भक्तीची पताका पंढरपूरपासून पंजाबपर्यंत नेली. प्रपंच्याचा परमार्थ करणार्‍या शांतिब्रह्म एकनाथांनी अनाथांना सनाथ केलं, ‘भागवत’ रूपी कणा दिला. जगद्गुरू तुकारामांची अभंगवाणी म्हणजे महाराष्ट्राचं वैचारिक धन. संत तुकोबारायांना भागवताच्या मंदिराचा कळस होण्याचं भाग्य लाभलं. या कळसावरील ध्वज म्हणजे भक्तीला शक्तीची जोड देणारे समर्थ रामदास.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e हे पाचही संत म्हणजे महाराष्ट्राचे पंचप्राण. या पाचही संतांचा विश्वधर्म मानवजातीच्या उत्क्रांतीसाठी होता. हे पाचही संत विश्वशांतीच्या ध्येयाने झपाटले होते. ध्येय गाठण्याचा प्रत्येकाचा मार्ग निराळा असला तरी अंतिम ध्येय एकच होते. समर्थ रामदासांच्या उक्तीतून याची प्रचीती येते \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e ‘साधु दिसती वेगळाले| परि ते स्वरुपी मिळाले|\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e अवघे मिळौनि एकचि जाले| देशातीत वस्तू॥\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e देवा, या संतांच्या सोबतीचं दान नित्य दे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964762284323,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/407f.jpg?v=1750157402"},{"product_id":"maharashtratil-teerthkshetre","title":"महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र","description":"\u003cp\u003eमहाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांचा अधिकाधिक माहिती देऊन परिचय करून देण्याचा प्रयत्न या पुस्तकातून दिलेला आहे. चांदयापासून बांदयापर्यंत गोंदिया पासून गोमंतकापर्यंत तसेच मुंबईपासून माहुरपर्यंत अनेकानेक तीर्थक्षेत्रांचा करून दिलेला सचित्र परिचय आपणास आवडेल आणि ही पुस्तक संग्रही असावे असे वाटेल . \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964762612003,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/410f.jpg?v=1750157418"},{"product_id":"maharashtratil-rajkiya-vyaktimatve","title":"महाराष्ट्रातील राजकीय व्यक्तिमत्वे","description":"\u003cp\u003eमहाराष्ट्राच्या राजकारणाला एक अतिशय समृद्ध असा राजकीय नेत्यांचा वारसा लाभला आहे. या नेत्यांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत असलेले योगदान व त्या संदर्भात त्यांचा परिचय करून देणारे ‘महाराष्ट्रातील राजकीय व्यक्तिमत्त्वे’ हे पुस्तक.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभारताची स्वातंत्र्य चळवळ, संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचे आंदोलन यांतून पुढे आलेल्या कालच्या पिढीतील मा. यशवंतराव चव्हाणापंासून आजच्या पिढीतील मा. अशोक चव्हाण यांसारख्या राजकीय व्यक्तिमत्त्वांनी दिलेल्या योगदानाचा आढावा.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964763332899,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/419f.jpg?v=1750157450"},{"product_id":"vaidyakiya-vishwatil-samaj-gairsamaj","title":"वैद्यकीय विश्वातील समज-गैरसमज","description":"\u003cp\u003eआपला वैद्यकीय व्यवसाय करताना मानवी शरीराच्या आंतरक्रियांशी तादात्म्य आपवून मानवी शरीर व्याधी मुक्त करण्याचे व्रत घेतलेल्या व्रतस्थाने, सर्वसामान्य रुग्ण ही आपल्या आजाराबाबत जे तर्क मांडतात अथवा त्याचे 'अज्ञानी निदान' करून स्वतःचे आजार असा वाढवतात. व डॉक्टरांनाही कसे अडचणीत टाकतात व गंभीर समस्या ओढवून घेतात, प्रसंगी त्यांना प्राणाचीही किमत मोजावी लागते.  अशा सर्वसामान्यपणे सर्रास घडत असलेल्या घटनांचा अचूक वेध सादर पुस्तकात घेतला असून त्याचा मोठा फायदाच समाजातील सर्वच घटकांना होणार आहे. वैद्यकीय विश्वातील समाज गैरसमज पुस्तकातून रुग्णांबद्दल ची संवेदनशील समाजिक जाणीव अधोरेखित हॉट असून आबालवृद्धाचे सजग वैद्यकीय प्रबोधन करणारे अत्यंत उपयुक्त पुस्तक म्हणून वाचक याची नोंद नक्कीच घेतील . \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964763791651,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/425f.jpg?v=1750157468"},{"product_id":"maharashtratil-sant-parampara","title":"महाराष्ट्रातील-  संतपरंपरा","description":"\u003cp\u003e‘आपला महाराष्ट्र ही संतांची पवित्र, पावन भूमी आहे. या भूमीत जन्म घेतलेल्या समाजाला संतांपासून संस्कारक्षम, शाश्वत मूल्यांचा खजिना मिळाला. संस्कारांचा संपन्न वारसा या भूमीनं मराठी मनाला दिला. त्यामुळे मराठी मनाचा कणा ताठ झाला. महाराष्ट्रात संत-परंपरेची मौक्तिकमाला आहे. संत म्हणजे साक्षात देव. जगाच्या कल्याणासाठी विधात्यानं संतांना इहलोकी पाठविलेलं असतं. ‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती | देह झिजवीती ऊपकारे |’ हे संतांचे मुख्य लक्षण !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसंतांनी आपल्या आचरणातून मानवी मूल्यांचा केलेला विचार आदर्श आहे. या आदर्शामुळे महाराष्ट्राच्या लोकजीवनावर उत्तम संस्कार झाले. संतांनी मानवतावादाची गुढी उभारली. संतांनी माणुसकीला प्रतिष्ठा मिळवून दिली. ‘जनी जनार्दन’ हा त्यांचा सहज भाव. संत हे समाजापुढील आदर्श असल्यामुळे त्यांचं जीवन समजून घेण्याची ओढ प्रत्येक मनाला वाटते. अनासक्त माणूस लोकोद्धाराचं केवढं प्रचंड कार्य करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपली महाराष्ट्रातील संत-परंपरा ! खरंच महाराष्ट्रातील संतमंडळी म्हणजे आपल्या संस्कृतीचे कळस !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e ‘काय मानू मी संतांचे उपकार\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमज निरंतर जागविती|’\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eMarathi Book on Saints of Maharashtra by Dr. Arti Datar. \u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964764152099,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/430f.jpg?v=1750157480"},{"product_id":"maharashtratil-paryatan","title":"महाराष्ट्रातील पर्यटन","description":"\u003cp\u003e महाराष्ट्रातील प्रत्येक पर्यटनप्रेमी व्यक्तीला आपल्या जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन क्षेत्रासहित फारशी परिचित नसलेली; परंतु अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असलेली स्थळे, याशिवाय त्यांच्या मनातील पर्यटन क्षेत्राची ऐतिहासिक व भौगोलिक संदर्भासहित परिपूर्ण माहिती सदर पुस्तकात दिली असल्याने पर्यटकांना आणि सर्वांनाच या पुस्तकाच्या माध्यमातून पर्यटनाचा आनंद मनमुराद लुटणे शक्य होईल.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964764315939,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/432f.jpg?v=1750157487"},{"product_id":"maharahtratil-samajsudharak","title":"महाराष्ट्रातील समाजसुधारक","description":"\u003cp\u003e महाराष्ट्रात समाजसुधारणा, समाजसुधारकांची मोठी परंपरा आहे. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात समाजातील विविध घटकांच्या अनेकविध समस्या सोडविण्यासाठी व्यापक प्रमाणात कार्य केले गेले. त्यातील काही समाजसुधारकांविषयी आणि त्यांच्या कार्याविषयी लिहिले आहे. तसेच जास्तीत जास्त कार्यक्षेत्रांचा समावेश करण्याचा प्रयत्न केला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964764479779,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/433f.jpg?v=1750157492"},{"product_id":"maharashtrache-shasan-va-rajkaran","title":"महाराष्ट्राचे शासन व राजकारण","description":"\u003cp\u003e महाराष्ट्राच्या राजकारणाचा वेध घेणारा हा गेल्या केवळ ५० वर्षांतील घटनाक्रम सांगणारा, मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीची माहिती देणारा, निवडणुकींचे विश्लेषण करणारा किंवा राजकीय पक्षांच्या आजवरच्या प्रवासाचा मागोवा घेणारा ग्रंथ नाही. महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम करणार्‍या राष्ट्रीय घडामोडी, बदलते अर्थकारण, विविध जनआंदोलनांतून उभे राहिलेले कळीचे प्रश्न यांचाही वेध या ग्रंथात घेतला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा प्रवास कॉंग्रेसवर्चस्वाकडून बहुपक्षीय आघाड्यांकडे कसा झाला आणि महाराष्ट्र राज्यनिर्मितीच्या वेळी प्रमुख असणारे विरोधी पक्ष नगण्य बनून, शिवसेना-भाजपसारखे हिंदुत्ववादी पक्ष सत्तेवर कसे आले, याची चर्चाही इथे केली आहे. या ५० वर्षांतील राजकारणाचा समग्रपणे वेध घेण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964764643619,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/434f.jpg?v=1750157498"},{"product_id":"maharashtrachi-mandirshaili","title":"महाराष्ट्राची मंदिरशैली","description":"\u003cp\u003e उत्तर आणि दक्षिण भारतातील स्थापत्यशैलींचा संगम घडवून ‘भूमिज’ स्थापत्य शैलीचा उगम झाला. महाराष्ट्रात सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली भूमिज स्थापत्यशैली उत्तर भारतातील नागर शैलीच्या अधिक जवळ जाणारी आहे. गावोगाव विखुरलेल्या अक्षरश: शेकडो मंदिरांनी आपल्या समग्र जीवनावर एकेकाळी लक्षणीय प्रभाव पाडला. त्यांपैकी किमान २००-२५० मंदिरे आज भग्नावस्थेत इतिहासाची साक्ष देत उभी आहेत.\u003cbr\u003e ‘मंदिर’ केवळ धार्मिक उपयोगाचे स्थान नसून आर्थिक, राजकीय, सामाजिक, कौटुंबिक आणि सांस्कृतिक घडामोडींचेही ते महत्त्वपूर्ण केंद्र होते. कला, स्थापत्य आणि भारतीय जीवनाच्या विविध पैलूंचे दर्शन मंदिर- स्थापत्यातून होते. त्याचाच परामर्श घेण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे.\u003cbr\u003eMarathi book on Architecture of Temples in Maharashtra by Dr. Bhagyashree Kale-Patskar.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964764741923,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/436f.jpg?v=1750157504"},{"product_id":"maharashtratil-sangitparampara","title":"महाराष्ट्रातील संगीतपरंपरा","description":"\u003cp\u003eसंगीत हे एखाद्या पुरातन पण सतत वाढत्या अजरामर वटवृक्षासारखे आहे. त्याला किती फांद्या आणि पारंब्या फुटत राहतील याला सीमा नाही. ते असीम आनंदाने भरलेले आहे.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e रागसंगीताच्या आणि भावशब्द- संगीताच्या परंपरेत महाराष्ट्राने भरीव आणि मोलाची भर घातली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्र बहुतेक बाबतीत नेहमीच सर्वसमावेशक राहिलेला आहे. संगीतकलाकारांसाठी रसिक आणि धनिक यांनी महाराष्ट्रात उदार, परंतु विचक्षण असे धोरण ठेवलेले आहे. कोणत्याही नवीन सौंदर्यप्रणालीचे स्वागत आपल्या विचक्षण बुद्धीला साक्षी ठेवून महाराष्ट्र आजवर अतिशय साक्षेपाने आणि उदारमतवादी धोरणाने करत राहिलेला आहे.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e या पुस्तकात रागसंगीत, नाट्यसंगीत, लावणी आणि शब्द-भावसंगीत यांचा प्रामुख्याने परामर्श घेतलेला आहे. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eMarathi Book on Musical traditions of Maharashtra.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964764840227,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/437f.jpg?v=1750157509"},{"product_id":"sampurn-arogyavardhini","title":"संपूर्ण आरोग्यवर्धिनी","description":"\u003cp\u003eवैद्य परशुराम यशवंत वैद्य खडीवाले हे व्यापक राष्ट्रहिताचा विचार करून गेली ४८ वर्षं आरोग्य सेवेसाठी व्रतस्थपणे झटत आहेत. आयुर्वेदामधल्या संशोधनाबरोबरच ‘आयुर्वेद’ लोकप्रिय व्हावा, या दुहेरी उद्देशाने त्यांनी १९७४ साली ‘वैद्य खडीवाले वैद्यक संशोधन’ संस्थेची स्थापना केली. तसेच त्यांनी ‘हरी परशुराम औषधालय’ आणि ‘आयुर्वेदिक औषध भांडार’ सुरू केलं असून  २०० प्रकारच्या आयुर्वेदिक पद्धती आणि आयुर्वेदाच्या वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकणारी १५०हून अधिक ग्रंथसंपदा वैद्य खडीवाले यांच्या नावावर आहे. १९८२ साली ‘जनकल्याण रक्तपेढी’ आणि १९८८ साली ‘जनकल्याण नेत्रपेढी’ सुरू करून त्याद्वारे त्यांनी हजारो गरजूंना मदत केली. तसेच बीड जिल्ह्यामध्ये मोफत आयुर्वेद चिकित्सालयाद्वारे ५ वर्षं आरोग्यसेवा राबवली. राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ आणि केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने त्यांची ‘राष्ट्रीय गुरू’ म्हणून निवड केली आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  पुरस्कार : • २००९ साली मा.राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या तर्फे दिल्ली येथे ‘शताब्दी महर्षी’ म्हणून गौरव. • २०१५ साली मा.श्रीपादजी नाईक यांच्या हस्ते महाराष्ट्रातील सर्व आयुर्वेद महाविद्यालयातर्फे ‘आयुर्वेद भूषण’ पुरस्कार प्रदान. • २०१६ साली दिल्ली येथे मा.आयुष आरोग्य मंत्री श्रीपादजी नाईक यांच्या हस्ते पहिला ‘राष्ट्रीय धन्वंतरी पुरस्कार’ प्रदान.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964766871843,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/878a.jpg?v=1750157599"},{"product_id":"maharshtra-sanskruti","title":"महाराष्ट्र संस्कृती : घडण आणि विकास","description":"‘महाराष्ट्र संस्कृती : घडण आणि विकास’ या ग्रंथात प्रारंभापासून इ. स. १८८५ पर्यंतच्या महाराष्ट्र संस्कृतीच्या घडणीचा सर्व अंगांनी विचार करण्यात आला आहे. महाराष्ट्राची भूमी- तिचे भौगोलिक विशेष, महाराष्ट्राचा प्राक्कालीन व मध्ययुगीन इतिहास, मराठी लोकांचा वंश, मर्‍हाटी भाषेची प्रारंभीक घडण इत्यादींचा विचार करण्यात आला असून तो करताना अभ्यासकांच्या विविध मतांचा परामर्श घेण्यात आला आहे. महाराष्ट्राची राजकीय दृष्ट्या ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट व्हावी म्हणून यादवपूर्व राजवटींचा इतिहास देण्यात आला आहे. तसेच यादवकालीन महाराष्ट्राचे संपूर्ण चित्र रेखाटले आहे. बहामनीकालीन महाराष्ट्र, शिवकाल, पेशवाई आणि अव्वल इंग्रजी अंमल या कालखंडातील महाराष्ट्रीय जीवनाचे बदलते चित्र रंगवण्यात आले आहे. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eनाथ संप्रदाय व वारकरी पंथ आणि एकनाथ, तुकाराम, रामदास यांच्या कार्याचा व शिकवणुकीचा उद्बोधक परामर्श घेण्यात आला आहे.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eग्रंथाचा समारोप महाराष्ट्राच्या शिल्प, चित्र, नृत्य, नाट्य इत्यादि कला व क्रीडा आणि मराठी साहित्य यांच्या माहितीने होतो.","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964767330595,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/988f.jpg?v=1750157623"},{"product_id":"nakshtralok","title":"नक्षत्रलोक - नक्षत्रांच्या वैज्ञानिक माहिती बरोबरच त्यांच्या सुरस आणि पौराणिक कथा सांगणारी लेखमालिका","description":"\u003cdiv class=\"aa-product-details-bottom\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cdiv class=\"tab-content\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cdiv class=\"tab-pane fade in active\" id=\"description\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eन्याय, व्याकरण, ज्योतिष, ऋग्वेद आणि यजुर्वेद यांचे सांगलीच्या पाठशाळेत शिक्षण झाल्यावर नक्षत्रांच्या भविष्यवेधापेक्षा नभोमंडलातील त्यांचे स्थान तसेच त्यांचे लोकमानसातील स्थान यांच्याकडे पं. महादेवशास्त्री जोशी यांचे लक्ष वेधले गेले आणि याच दृष्टिकोनातून त्यांनी नक्षत्रलोकाचा हा प्रवास वाचकांना घडवून आणला आहे.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"aa-product-related-item\" data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/div\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964771131683,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/548-3d-nakshtralok.png?v=1750157754"},{"product_id":"maharashtratil-vakte","title":"महाराष्ट्रातील वक्ते","description":"\u003cp\u003eमहाराष्ट्राची पवित्रभूमी ही येथील संतमहात्म्यांमुळे जशी अधिक पावन झाली तशीच महाराष्ट्रातील सरस्वतीपुत्रांच्या वाग्विलासामुळे अधिकच चैतन्यमय झाली. महाराष्ट्रातील या सरस्वतीपुत्रांच्या आशीर्वादाने अनेक वाक्पटू महाराष्ट्राला लाभले. आपल्या अमोघ वक्तृत्वाने अनेक व्यासपीठे त्यांनी गाजवली. त्या बॅ. नाथ पै. श्री. म. माटे, सेतू महादेवराव पगडी, पु. ल. देशपांडे ते प्राचार्य शिवाजीराव भोसले यांसार‘या दिग्गज वक्त्यांचा परिचय महाराष्ट्रातील वाचकांना व्हावा या उद्देशाने झालेली ग‘ंथनिर्मिती म्हणजे ‘महाराष्ट्रातील वक्ते.’\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964771295523,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/415f.jpg?v=1750157766"},{"product_id":"financial-literacy","title":"वित्तीय साक्षरता व आधुनिक बँकिंग  | Financial Literacy and Adhunik Banking","description":"\u003cp\u003e\"आज २१ व्या शतकाच्या तिसर्‍या दशकात मोबाईल फोन आणि त्याचा वापर हा लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला असल्याचे चित्र आहे. या फोनचा आणि त्यामध्ये असलेल्या आंतरजालाचा (इंटरनेटचा) वापर करून वापरकर्त्यास अनेक प्रकारच्या माहितीची उपलब्धता होते आहे. त्याचबरोबर त्याचे आर्थिक व्यवहारही आता या फोनवरील उपलब्ध संकेतस्थळांच्यामार्फत बोटाच्या टिचकीवर होऊ लागले आहेत. वित्तीय आणि बँकिंग क्षेत्रातील ह्या क्रांतीकारी बदलामुळे आधुनिक बँकिंग सेवा-सुविधेच्या स्वरुपात खूप मोठा बदल घडून आला आहे.\u003cbr\u003eबँकिंगच्या बदलत्या स्वरुपाची ओळख सर्वसामान्य लोकांना व्हावी यासाठी ह्यापुस्तकामध्ये गतकालीन बँकिंग सेवा-सुविधांची थोडक्यात माहिती दिली आहे. तर बदल्यात काळानुरुप आणि बदलत्या आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानावर आधारीत बँकिंगच्या सेवा-सुविधांची माहितीसुद्धा यापुस्तकात करून देण्यात आली आहे. \u003cbr\u003eबँकिंग आणि वित्तीय सेवांचे स्वरुप कोणतेही असो काही प्रसंगी बँकिंग सेवांच्या उपलब्धतेमध्ये काही अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते. काही प्रसंगी बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रात फसवणूकही होण्याची शक्यता असते. त्यामुळे बँकिंग आणि वित्तीय साक्षरता महत्त्वाची आहे. त्याचबरोबर बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील कोणत्या सुविधांची नेमकी आपणास गरज आहे हे सर्वसाधारण ग्राहकास समजले पाहिजे यासाठी यापुस्तकाचे प्रायोजन केले आहे. आज वेगवेगळ्या बँका आणि वित्तीय सेवा पुरविणार्‍या कंपन्यांचे वेगवगेळे अ‍ॅप-उपयोजित संकेतस्थळ सहजपणे उपलब्ध झाले आहे. परंतु ग्राहकाने आपली गरज ओळखून आणि वापरण्यास सहजता आणि सुरक्षितता तपासून अशा सुविधेचा वापर करणे योग्य ठरते.\u003cbr\u003eवित्तीय साक्षरता यापुस्तकात आधुनिक बँकिंग व वित्तीय सेवा-सुविधांविषयीची आवश्यक ती सर्व माहिती दिलेली आहे. त्यामुळे हे पुस्तक शैक्षणिक म्हणजे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तर उपयोगी आहेच, त्याचबरोबर हे पुस्तक सर्वसामान्य लोकांनासुद्धा उपयुक्त ठरणारे आहे. तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परिक्षा आणि नोकरीसाठीच्या परिक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांनासुद्धा यापुस्तकातील मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त ठरणारे आहे. \"\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964783911203,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1094-vittiyasaksharata-cover-front.jpg?v=1750158437"},{"product_id":"loksatta-anyatha-bhag-2","title":"लोकसत्ता अन्यथा खंड २ - २०१३  -२०२४ | Loksatta Anyatha Bhag 2","description":"\u003cp\u003e\"\u003cbr\u003eलोकसत्ता अन्यथा  खंड २ (२०१३  ते  २०२४)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eबातमीच्या पलीकडचे आणि अग्रलेखाच्या अलीकडचे अनेक असे काही जगात नित्यनेमाने घडत असते. या घटनांचा आपल्या जगण्याशी प्रत्यक्ष नसला तरी अप्रत्यक्ष असा संबंध असतोच असतो. जाणते डोळे तो टिपत असतात. म्हटले तर या घटना तात्कालिक असतात. पण तरीही त्या घटनांच्या खुणा आपल्या जगण्यावर कायमस्वरूपी परिणाम करणार्‍या असतात. त्या खुणांची दखल घेणे हाच ‘अन्यथा’ या सदराचा उद्देश. वर्तमानपत्रीय लेखनाची नियती असलेल्या तात्कालिकतेवर मात करून उरणारे हे लेखन. अन्यथा...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\"\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964789809443,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1133LOKSATTAANYATHABhag23d.jpg?v=1750158654"}],"url":"https:\/\/kanakbook.in\/collections\/maahitiipr.oembed?page=2","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}