{"title":"ललित","description":"\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eविविध ललित पुस्तके\u003c\/p\u003e","products":[{"product_id":"photomantra","title":"फोटोमंत्र","description":"\u003cp\u003eसाधक, साधना आणि साध्य या त्रिसूत्रींना एकत्र बांधतो तो मंत्र. मंत्रोच्चारात जसे सामर्थ्य दडलेले असते तसेच मंत्र या शब्दात एक संदेश आपल्याला दिसून येतो. फोटो म्हणजेच प्रकाश आणि या प्रकाशाचा मंत्र ‘फोटोमंत्र’. फोटोग्राफीचे आपले स्वतंत्र असे अस्तित्व आहे. जन्माला आल्यापासुन मृत्युपर्यंत आपले जीवन विविध रंगांनी समृद्ध होत असते. या रंगांच्या आठवणींचे इंद्रधनुष्य म्हणजेच फोटो. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eबालपण, तरूणपण आणि वार्धक्य या तीन अवस्थातून जाताना अनेक मौज मजेच्या गोष्टी तसेच सुखाचे व आनंदाचे क्षण प्रत्येकाच्या वाट्याला काही प्रमाणात का होईना येतच असतात. निसर्गाच्या सान्निध्यात फिरताना जीवनाची अनुभूती आपल्याला येत असते. अमूल्य अशा या क्षणांना चित्रबद्ध कसे करावे याचा मंत्र म्हणजेच फोटोमंत्र. मनोभावे याचा जप केल्यास फोटोसिद्धी नक्कीच प्राप्त होते.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eसौ.अर्चना देशपांडे जोशी यांचं ‘फोटोमंत्र’ हे पुस्तक प्रकाशित होत आहे याचा मला व्यक्तिशः आनंद होत आहे. फोटोग्राफी हे एक फक्त तंत्रच नाही तर एक कला आहे आणि या कलेला विचारांची बैठक आहे हे अर्चना यांच्या बोलण्यावरून कायमच प्रतीत होत राहतं आणि या कलातंत्राचा मंत्र आता ती आपल्या नव्या पुस्तकातून उलगडत आहे याची उत्सुकता एक कलाकार म्हणून मलाही आहेच.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eसंगीत आणि फोटोग्राफी यात वरवर काही साम्य नसलं तरी या दोहोंमध्ये एक साम्य आहे दोन्ही कलांमध्ये सौंदर्यपूर्ण पद्धतीने अवकाश भरावं लागतं. एकात सुरांनी तर दुसर्यात प्रकाशाने. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eसौ.अर्चना देशपांडे-जोशी यांच्या ‘फोटोमंत्र’ या पुस्तकाला माझ्याकडून लक्ष लक्ष शुभेच्छा !\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e- कौशल इनामदार\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964683542819,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/931f.jpg?v=1750154875"},{"product_id":"maayleki-baapleki","title":"मायलेकी बापलेकी","description":"\u003cp\u003e९ आयांनी आणि ८ बापांनी आपल्या ‘लेकी’विषयी लिहिलेले बहारदार लेख\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eमायलेकी : सोनाली कुलकर्णी, भक्ती चपळगावकर, ममता क्षेमकल्याणी, कीर्ती परचुरे, अमिता दरेकर, प्रिया सुशील, सीमा शेख-देसाई, नयना जाधव, अश्विनी काळे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eबापलेकी : हृषीकेश गुप्ते, दासू वैद्य, किशोर रक्ताटे, राम जगताप, किरण केंद्रे, योगेश गायकवाड, सरफराज अहमद, आसिफ बागवान.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964688294179,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/969f.jpg?v=1750155060"},{"product_id":"prashna-purushbhanache","title":"प्रश्न पुरुषभानाचे","description":"\u003cp\u003eपारंपरिक पुरुषपण न मिरवता थोडा चौकटीबाहेरचा विचार करणाऱ्या, माणुसपणानं जगू पाहणाऱ्या सर्वांसाठी ‘हे प्रश्न पुरुषभानाचे’ !\u003cbr\u003eमित्र-मैत्रीण, आई-बाप, नवरा-बायको, मालक–नोकर अशा कुठल्याही स्वरूपात नातेसंबंधांना सामोरं जाताना तो फक्त अन्यायग्रस्तांचा प्रश्न नसून, आपलं जगणं सुंदर आणि समृद्ध करण्याचा मार्ग आहे. हे समजून जगू पाहणाऱ्या नव्या पीढीला हे ‘प्रश्न पुरुषभानाचे’ आश्वासक साथ देईल. \u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964703432995,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/460f.jpg?v=1750155614"},{"product_id":"ovi-gau-vidyanachi","title":"ओवी गाऊ विज्ञानाची","description":"\u003cp\u003e ‘ओवी गाऊ विज्ञानाची’ हा एक नावीन्यपूर्ण आणि एकमेवाद्वितीय म्हणता येईल असा प्रयोग आहे. विज्ञानातील माहिती आणि संकल्पना ओव्यांच्या स्वरूपात आणण्याची कल्पनाच आश्चर्यचकित करणारी आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  डॉ. पंडित विद्यासागर यांनी ती प्रत्यक्षात आणली आहे. ‘ओवी’ हा प्रकार मराठी माणसाच्या मनाशी जवळीक साधणारा आविष्कार आहे. ओवीची रचना, सोपी, साधी आणि सहज समजणारी असावी लागते. त्यात मुक्तछंद असला, तरी पहिल्या तीन ओळीत यमक साधावे लागते. यासाठी क्लिष्टता टाळून अचूकपणा राखणे आणि त्यासाठी समर्पक शब्द शोधणे ही तारेवरची कसरत आहे. डॉ. विद्यासागर यांनी ती सहजपणे साधली आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  या पुस्तकात समाविष्ट आशयाची व्याप्ती खूपच मोठी आहे. विज्ञानाशी संबंधित प्रमुख विषयांबरोबरच इतर विषयांचाही यात समावेश आहे. विशेष म्हणजे समाज आणि विज्ञान यांचा विचार परिणामकारकपणे केल्याचे यात दिसून येते.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964722766115,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/670f.jpg?v=1750156037"},{"product_id":"loksatta-sarvkaryeshu-sarvada","title":"लोकसत्ता : सर्वकार्येषु सर्वदा","description":"\u003cp\u003eआनंदाच्या गोष्टी सांगणारे हजारो असतात, पण आपल्या व्यथा सांगणारे कोणी नसते. या सेवाभावींनी या अशा व्यथा जाणून घेतल्या आणि त्यांचे अश्रू पुसले, हे खर्या अर्थाने परमेश्वराचे काम आहे. सेवाभावी कार्य करताना प्रत्ययी जाणवणार्या वेदनांच्या महासागरापुढे रामायण, महाभारत आणि गीताही तोकड्या ठराव्यात. माझ्या दृष्टीने ‘लोकसत्ता’चा ‘सर्वकार्येषु सर्वदा’ हा उपक्रम अनामिक कार्याचा सत्कार आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e - सदाशिव अमरापूरकर\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांना प्रसिद्धीची गरज वाटत नाही. मनापासून केलेल्या कामाच्या बाबतीत असंच घडतं. अशा दहा संस्था, त्यांची माणसं मला भेटली; हे असे आदर्श आपल्यापुढे आहेत. काय लागतं आपल्याला? ङ्गक्त एक ट्रिगर लागतो. अशी किती ट्रिगर्स आहेत आपल्याकडे? किती ‘आदर्श’ आहेत आपल्याकडे...? इतकं पराकोटीचं कार्य करणार्या या संस्थांची दखल एखाद्या वृत्तपत्राने घेणं, ही खूप मोठी गोष्ट आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e - नाना पाटेकर\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964741869859,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/803f.jpg?v=1750156642"},{"product_id":"dhadpad-pradhyapaki","title":"धडपड प्राध्यापकी","description":"\u003cp\u003eआजच्या काळात शिक्षण हा आर्थिक विकासातील महत्त्वाचा घटक मानला जातो. उच्च शिक्षण प्रणालीत (महाविद्यालये, विद्यापीठे) इमारती, प्रयोगशाळा, यंत्रशाळा, ग्रंथालये, अभ्यासक्रम, परीक्षापद्धती इ. केवळ साधनमात्र असतात. अध्यापक हा मानवी घटक म्हणजे शिक्षणसंस्थांची खरी ऊर्जा ! महाविद्यालये, विद्यापीठे यांची उंची ही त्यातील अध्यापक व त्यासोबत विद्यार्थी यावरून ठरते. त्यांना पूरक वातावरण निर्माण करून सक्षम केले तर उपयुक्त ठरणारे कसदार शिक्षण आणि गुणवत्तापूर्ण विद्यार्थी, दोन्ही दृष्टीस पडतात ! \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  कनिष्ठ मध्यमवर्गातील अशाच एका अध्यापकाच्या कारकिर्दीचे टिप्पण म्हणजे ही ‘धडपड प्राध्यापकी’!...\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  कष्ट, स्वावलंबन याद्वारे पदव्युत्तर पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी वयाच्या २०व्या वर्षी रयत शिक्षण संस्थेच्या श्रीरामपूर येथील महाविद्यालयात अध्यापनास सुरुवात केली. त्यानंतर तब्बल ५० वर्षे ग्रामीण, अर्धनागरी, शहरी संस्था, विद्यापीठे येथे प्राचार्य, विभागप्रमुख इ. विविध जबाबदार्या पेलल्या.प्रत्येक काम म्हणजे नवे करून दाखविण्याची संधी असे मानून, अडचणी सोडवून कामाचा वेगळा ठसा उमटविला.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  शिक्षण संस्थांतील राजकारण, प्राध्यापकातील हेवेदावे, यावर आधारित करमणूकप्रधान ललित साहित्यापेक्षा हे आत्मकथन वेगळे आहे.  अध्यापक वर्गाची उभारी वाढवणारे त्यांना व संस्था चालकांना प्रेरणा लाभणारे आहे. शिक्षणाचे भविष्यात कोणते स्थान राहणार आहे? याचा वेध घेणारे हे चिंतन आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  आज महाविद्यालये व विद्यापीठे यातून असे ‘धडपडणारे प्राध्यापक’ मोठ्या प्रमाणात निर्माण होणे गरजेचे आहे.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964743278883,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/819f.jpg?v=1750156698"},{"product_id":"samudrashoadh","title":"समुद्रशोध : एका मनस्वी संशोधकाच्या समुद्रशोधाची विलक्षण कथा","description":"\u003cp\u003eअविरतपणे किनार्‍यावर येऊन आपटणार्‍या आणि गूढ आवाज करीत फुटणार्‍या, फेसाळणार्‍या समुद्र लाटांचं मला लहानपणापासूनच विलक्षण आकर्षण आहे! कदाचित, ते तसं अनेकांना असेल. पण मला वाटणारं आकर्षण हे, समुद्राबद्दल वाटणारी एक अतर्क्य अशी ओढ आहे, याची मला खात्रीच आहे़. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e मनाच्या एका कोपर्‍यात त्याची जागा निश्चित आहे. कधीही डोळे मिटून शांत बसलो तरी घोंघावणार्‍या वार्‍याबरोबर जिवाच्या आकांताने किनार्‍याकडे येणार्‍या आणि सर्वशक्तिनिशी आपटून फुटून फेसाळणार्‍या लाटाच मनाचा ताबा घेतात!\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e या मोहमयी, गूढरम्य किनार्‍यावर अनेक ठिकाणी वास्तव्य केलं. निसर्गाच्या या अनाकलीय आविष्काराचं आकलन करून घेण्याचा प्रयत्न केला. त्याची रहस्यं उलगडली असं वाटलं तेव्हा आनंदानं हुरळून गेलो. त्याने किनार्‍यावर जतन करून ठेवलेले, निर्माण केलेले भूआकार, भूरूपं पाहिली, शोधली आणि अभ्यासली तेव्हा त्यांच्या विलक्षण ताकदीने भारावून गेलो. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e वेडपिसं करणार्‍या, विलक्षण सुंदर आणि मनस्वी किनार्‍याच्या या समुद्रशोधाची ही संशोधन कथा! \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964744360227,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/832f.jpg?v=1750156742"},{"product_id":"peshantche-kisse","title":"पेशंटचे किस्से","description":"\u003cp\u003eडॉक्टर - पेशंट नात्याचा वेध घणारे ललित पुस्तक\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआजच्या काळात ‘फॅमिली डॉक्टर’ ही संकल्पना लोप पावत चालली आहे. डॉक्टर ‘निदान’ करण्याच्या फंदात न पडता  छोट्या मोठ्या आजारांसाठीही भारंभार तपासण्या करण्यास भाग पाडताना दिसतात. रुग्णांची आर्थिक पिळवणूक करणारे डॉक्टर्स जसे समाजात आहेत, तसे देवासारखे धावून येणारे डॉक्टरही आहेत. \u003cbr\u003e डॉक्टर आणि रुग्ण यांचं नातं विविधरंगी असतं. त्यात दु:ख, वैफल्य, वेदना, आनंद, खंबीरपणा, आशा आणि निराशा या भावनांचं इंद्रधनुष्य प्रकट होत असतं. रुग्णांची मानसिकता, त्यांचं अज्ञान, दुर्लक्ष करण्याची वृत्ती, रुग्णांच्या या सर्व गोष्टींना सांभाळून घेणारा डॉक्टर या पुस्तकातून भेटतो.\u003cbr\u003e  \u003cbr\u003e आजच्या धावपळीच्या आणि यांत्रिक बनलेल्या जीवनक्रमात डॉक्टर आणि रुग्णांचं हृदयस्पर्शी नातं उलगडत जाणारे हे प्रत्यक्ष घडलेले किस्से वाचकांना अंतर्मुख करतील.\u003cbr\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964752093475,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/238f.jpg?v=1750157011"},{"product_id":"stri-sukta","title":"स्त्रीसूक्त","description":"\u003cp\u003e\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  समाज हे कुटुंबाचे व्यापक स्वरूप \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e आणि कुटुंबाचं सार म्हणजे स्त्री. अनादिकाळापासून हे सत्य मानले गेले.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e तसेच हेही सत्य आहे की या ‘सत्याची’ सत्यता टिकवून धरण्यासाठी स्त्रीच एकांगी झिजली, झटली, लुटली गेली. मात्र आता ती पुरातन, जाचक रूढींवर मात करत उभी राहते आहे. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e स्वत:च्या समस्या सोडवण्यासाठी तिने प्रत्येक टप्प्यावर प्रयत्न केले. आत्मविकासाकडे तिचा प्रवास हळूहळू पण नक्की होत गेला आणि अजूनही होत आहे. तिचं स्त्रीत्व, तिचं माणूसपण याचे खरे संदर्भ शोधण्याची तिची धडपड  आजही चालू आहे. त्या आजच्या स्त्रीचा प्रवास; माणूसपण, वैवाहिक जीवन आणि व्यक्तिमत्त्वविकास या तीन पातळ्यांवर\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e लेखिकेला महत्त्वाचा वाटतो.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e तिचा हा प्रवास, तिच्या जीवनातले हे परिवर्तन\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  छोट्या छोट्या उदाहरणांनी, सोप्या आणि संवादी भाषेत\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  जेथे उलगडले ते हे\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  स्त्रीसूक्त.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964757860643,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/315f.jpg?v=1750157222"},{"product_id":"maharashtratil-viabhavshali-daginyanchi-parampara","title":"महाराष्ट्रातील वैभवशाली दागिन्यांची परंपरा","description":"\u003ctable width=\"246\"\u003e\n\u003ctbody\u003e\n\u003ctr\u003e\n\u003ctd width=\"246\"\u003e अलंकार ! मानवाच्या सृजनशीलतेचा मनोरम आविष्कार. निरनिराळ्या गोष्टींपासून स्वत:चे सौंदर्य खुलविण्यासाठी तसेच शरीराच्या हात, पाय, गळा, नाक, कान अशा अवयवांसाठी विविध कलाकृती मानवाने तयार केल्या.  यात हिरे, माणके, रत्ने, मोती, पाचू, खडे यांचा इतका सुंदर वापर केला आहे की त्यावरून नजर हलू नये.\u003cbr\u003e  दागिन्यांबद्दल स्त्रीच्या मनात आकर्षणाचा एक नाजूक, हळवा कोपरा असतो. तसेच पुरुषाच्या मनात त्याबद्दल अभिमानाची भावना असते.\u003cbr\u003e  कलाकुसर, सौंदर्य याबरोबरच मालमत्ता म्हणून ओळखल्या जाणार्‍या दागिन्यांबद्दलचा समावेशक आणि मनोरंजक माहितीचा खजिनाच हे पुस्तक वाचकांपुढे खुला करत आहे. पुस्तक उघडा आणि त्या खजिन्याचा आनंद लुटा\u003cbr\u003e  \u003c\/td\u003e\n\u003c\/tr\u003e\n\u003c\/tbody\u003e\n\u003c\/table\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964762120483,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/406f.jpg?v=1750157396"},{"product_id":"vaidyakiya-vishwatil-samaj-gairsamaj","title":"वैद्यकीय विश्वातील समज-गैरसमज","description":"\u003cp\u003eआपला वैद्यकीय व्यवसाय करताना मानवी शरीराच्या आंतरक्रियांशी तादात्म्य आपवून मानवी शरीर व्याधी मुक्त करण्याचे व्रत घेतलेल्या व्रतस्थाने, सर्वसामान्य रुग्ण ही आपल्या आजाराबाबत जे तर्क मांडतात अथवा त्याचे 'अज्ञानी निदान' करून स्वतःचे आजार असा वाढवतात. व डॉक्टरांनाही कसे अडचणीत टाकतात व गंभीर समस्या ओढवून घेतात, प्रसंगी त्यांना प्राणाचीही किमत मोजावी लागते.  अशा सर्वसामान्यपणे सर्रास घडत असलेल्या घटनांचा अचूक वेध सादर पुस्तकात घेतला असून त्याचा मोठा फायदाच समाजातील सर्वच घटकांना होणार आहे. वैद्यकीय विश्वातील समाज गैरसमज पुस्तकातून रुग्णांबद्दल ची संवेदनशील समाजिक जाणीव अधोरेखित हॉट असून आबालवृद्धाचे सजग वैद्यकीय प्रबोधन करणारे अत्यंत उपयुक्त पुस्तक म्हणून वाचक याची नोंद नक्कीच घेतील . \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964763791651,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/425f.jpg?v=1750157468"},{"product_id":"jaramaran","title":"जरामरण : वृद्धत्व व मरण यांकडे पाहण्याचा सजग दृष्टिकोण","description":"‘म्हातारपण म्हणजे दुसरे बालपण’ असे म्हटले जाते. म्हातारपणाची बालपणाशी केलेली तुलना योग्य असली तरी एका बाबतीत फरक जाणवतो. बाळाला दमदाटी केलेली चालते, बाळ ते विसरूनही जाते; पण, ज्येष्ठांना अशा प्रकारे कह्यात ठेवणे शक्य नसते. वृद्ध माणसे त्यांच्या कर्तृत्वावर जीवन जगतात. त्यामुळे दमबाजी सोडाच त्यांना काही सुचविणेही शक्य नसते. बाळ जसजसे वाढते, तसतसे ते अधिकाधिक स्वावलंबी होत जाते. त्याउलट, ज्येष्ठांचे वय जसे वाढते तसे त्यांचे शारीरिक आणि मानसिक परावलंबित्व वाढत जाते, याचे भान त्यांना रहात नाही.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eवृद्धत्वाची सर्वांनाच धास्ती वाटते. अशा अटळ काळात आयुष्य कसे घालवावे याची आखणी विविध शक्यतांचा विचार करून योग्यप्रकारे केलेली बरी. याबाबत ‘जरामरण’ या पुस्तकात योग्य मार्गदर्शन आहे.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e‘जरा’ म्हणजे म्हातारपण व त्यानंतर मृत्यूही अटळ. त्याबद्दलही पुस्तकात मोलाची माहिती आहे.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e‘जरामरण’ या पुस्तकातून वृद्धांना किंबहुना सर्वांनाच योग्य मार्गदर्शन मिळेल.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964768936227,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/995f.jpg?v=1750157733"},{"product_id":"nakshtralok","title":"नक्षत्रलोक - नक्षत्रांच्या वैज्ञानिक माहिती बरोबरच त्यांच्या सुरस आणि पौराणिक कथा सांगणारी लेखमालिका","description":"\u003cdiv class=\"aa-product-details-bottom\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cdiv class=\"tab-content\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cdiv class=\"tab-pane fade in active\" id=\"description\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eन्याय, व्याकरण, ज्योतिष, ऋग्वेद आणि यजुर्वेद यांचे सांगलीच्या पाठशाळेत शिक्षण झाल्यावर नक्षत्रांच्या भविष्यवेधापेक्षा नभोमंडलातील त्यांचे स्थान तसेच त्यांचे लोकमानसातील स्थान यांच्याकडे पं. महादेवशास्त्री जोशी यांचे लक्ष वेधले गेले आणि याच दृष्टिकोनातून त्यांनी नक्षत्रलोकाचा हा प्रवास वाचकांना घडवून आणला आहे.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"aa-product-related-item\" data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/div\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964771131683,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/548-3d-nakshtralok.png?v=1750157754"},{"product_id":"maharashtratil-vakte","title":"महाराष्ट्रातील वक्ते","description":"\u003cp\u003eमहाराष्ट्राची पवित्रभूमी ही येथील संतमहात्म्यांमुळे जशी अधिक पावन झाली तशीच महाराष्ट्रातील सरस्वतीपुत्रांच्या वाग्विलासामुळे अधिकच चैतन्यमय झाली. महाराष्ट्रातील या सरस्वतीपुत्रांच्या आशीर्वादाने अनेक वाक्पटू महाराष्ट्राला लाभले. आपल्या अमोघ वक्तृत्वाने अनेक व्यासपीठे त्यांनी गाजवली. त्या बॅ. नाथ पै. श्री. म. माटे, सेतू महादेवराव पगडी, पु. ल. देशपांडे ते प्राचार्य शिवाजीराव भोसले यांसार‘या दिग्गज वक्त्यांचा परिचय महाराष्ट्रातील वाचकांना व्हावा या उद्देशाने झालेली ग‘ंथनिर्मिती म्हणजे ‘महाराष्ट्रातील वक्ते.’\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964771295523,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/415f.jpg?v=1750157766"},{"product_id":"alexander-the-great","title":"अलेक्झांडर द ग्रेट - विश्वसाम्राज्य उभं करणारा  जगज्जेता","description":"\u003cp\u003eकित्येक युद्धांचा अनुभव असलेल्या अलेक्झांडच्या साहसी सैन्यापुढे पुरूच्या सैन्याचा निभाव लागत नव्हता. पुरूला पराभव समोर दिसत असूनही तो चिवटपणे झुंज देत होता. त्याची जिद्द आणि धाडस पाहून अलेक्झाडंर प्रचंड प्रभावित झाला आणि त्याला शरण येण्याचा निरोप पाठवला. निरोप घेऊन जाणार्‍या एका तुकडीला पुरूने ठार करायचा प्रयत्न करूनही अलेक्झांडरनं युद्ध थांबवण्यासाठी पुरूचं मन वळवलं. खरंतर अलेक्झांडरचा विजय झाला होता. पुरूला ठार करून एका क्षणात युद्ध थांबवणं अलेक्झांडरला सहज शक्य होतं, पण या भारतीय राजाच्या शौयानं त्याचं मन जिंकलं होतं. म्हणूनच अनेक दिवसांची मेहनत, प्रचंड नियोजन, शेकडो सैनिकांचे मृत्यू आणि घनघोर लढाईनंतर मिळवलेलं पुरूचं राज्य अलेक्झांडरनं त्याला परत देऊन टाकलं! इतकंच नाही, तर आजूबाजूची आणखी जमीनही त्यात भर घालून दिली!\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआज आपण अलेक्झांडरला ‘अजिंक्य योद्धा’ म्हणून ओळखतो. पण त्याचं चरित्र वाचताना अलेक्झांडर हे काळाच्या पुढे जाणारं रसायन असल्याचा पदोपदी प्रत्यय येतो. जितका क्रूर तितका उदार, जितका शिस्तबद्ध तितकाच प्रयोगशील, जितका विजिगीषू तितकाच तत्त्वज्ञानाचं आकर्षण असलेला.... अलेक्झांडर चिमटीत पकडता येत नाही. त्याला कुठल्याही चौकटीत बंद करता येत नाही. किंबहुना त्याचं सतत चौकटी मोडत राहणंच वेध लावतं. म्हणूनच आज हजारो वर्षांनतरही त्याच्याबद्दल होणारी संशोधनं आणि टीकाही कायम आहे. तो अजूनही लहान-मोठ्यांच्या उत्सुकतेला आव्हान देतोच आहे!\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eExciting new biography of Greek Warrior Alexander the Great. Alexander was a brilliant and ambitious general who wanted to conquer all of the earth. His life's account is still fascinating even after more than two thousand years.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964772999459,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1014f.jpg?v=1750157842"},{"product_id":"maneaters-of-kumaon","title":"कुमाऊँचे नरभक्षक","description":"\u003cp\u003eउताराच्या अगदी कडेला असताना गवताचा भारा बांधायला मी खाली वाकलो, तेवढ्यात वाघाने माझ्या अंगावर उडी घेतली आणि त्याच्या चार सुळ्यांपैकी एक माझ्या उजव्या डोळ्याखाली, दुसरा माझ्या हनुवटीमध्ये आणि उरलेले दोन माझ्या मानेत रुतवले. मी पाठीवर पडलो आणि वाघ माझ्या छाताडावर होता. त्याचं पोट माझ्या पायांवर होतं. पाठीवर पडताना माझे हात पसरले गेले होते. माझ्या उजव्या हाताला ओकचं एक रोपटं लागलं...तेव्हाच माझ्या मनात एक कल्पना चमकली - वरच्या बाजूला असलेलं ते ओकचं रोपटं मी हातांनी पकडलं असतं आणि मोकळे असलेले दोन्ही पाय जुळवून वाघाच्या पोटाला टेकवले असते, तर मी त्याला लांब ढकलू शकलो असतो आणि पळून जाऊ शकलो असतो. वाघाला अजिबात जाणवू न देता मी अगदी हळूहळू माझे दोन्ही पाय वर घेतले आणि त्याच्या पोटांवर टेकवले. त्यानंतर माझा डावा हात वाघाच्या छातीवर टेकवला आणि सगळ्या ताकदीनिशी त्याला विरुद्ध दिशेने ढकललं.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजिम कॉर्बेट यांच्या या शिकार कथा अत्यंत चित्तवेधक आहेत. मात्र शिकार कथा म्हणजे रूढार्थाने ‘शिकारीचा आनंद देणार्‍या कथा’ असा यांचा बाज नाही. कॉर्बेट यांची वाघाबद्दलची आत्यंतिक आत्मीयता, अभ्यास आणि शिकार करतानाची तितकीच अगतिकताही या कथा वाचताना सतत जाणवत राहते. म्हणूनच या कथा थरारक असल्या, तरी त्यांच्यात उन्माद नाही. थरार अनुभवताना वाघाबद्दल आणि एकूणच प्राणिजीवनाबद्दल त्या वाचकाला समंजस केल्याशिवाय राहत नाहीत.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964773097763,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1015f.jpg?v=1750157849"},{"product_id":"clicktrick","title":"क्लिक ट्रिक - युक्त्या कलात्मक फोटोग्राफीच्या","description":"छायाचित्र कलेवर सोप्या मराठीत; सुंदर, नेमक्या शब्दांत भाष्य करत वाचनीय केलेलं, अर्चना देशपांडे जोशी यांचं “क्लिक ट्रिक” हे पुस्तक आहे. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e‘छायाप्रकाशाचा खेळ म्हणजे प्रकाश-रंगातून रंगलेली स्मरणचित्रे’ असं म्हणत फोटोंचं आठवणींशी निगडित असलेल नातं सांगत, नमनालाच ‘सावलीच्या छटा’ फार छान मांडल्या आहेत.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eफोटो कुठे कुठे असतो, हे मांडत, ‘फोटोग्राफर चित्रकलेतून कल्पनेला आकार देतो’ असं सांगत ‘रस्त्यावरून फिरणाऱ्या वाहनांकडे नीट निरखून बघा, विविध मानवी चेहरे-भाव दिसतात’ म्हणत, पुढे त्यांनी गमतीशीर टीप्पणी केलीए. ती अशी - एस. टी. हिरमुसलेली, रिक्षा नाक उडवणारी, ऍम्बेसिडर मोकळेपणाने हसणारी... काय नेमकं भाष्य फोटोग्राफिक नजरेचं!\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e‘फोटो काढण्यापूर्वी गरज शोधक नजरेची’ असं सांगत प्रवेशद्वाराच्या कमानीतून दिसणार्‍या ताजमहालचं उदाहरण देत तो फोटो बघायची उत्सुकता वाढवलीए. ‘उसळत्या समुद्राला क्षितिजाची पार्श्वभूमी फोटोत नसेल, तर भकास वाटेल’ ही टिप्पणी विविध कोनांतून, आकारातून,Triangle कम्पोझीशन दिसणे, हा त्या फोटोग्राफरच्या कल्पनाशक्तीचा अविष्कार असतो. चित्रकारांनी काढलेल्या चित्राचे अवलोकन करणे, हे उत्तम फोटोग्राफी करण्यसाठी मार्गदर्शक ठरते. फोटो काढण्यापूर्वी, फोटो का काढत आहोत, कशाचा काढत आहोत, याचा विचार हवाच. फोटोग्राफीचा छंद हृदयातून जन्माला आला, विचारातून साकारला गेला, तर येणारा प्रत्येक फोटो मनाची सतार झंकारत जाईल, असे अप्रतिम मुद्दे अर्चनाने मांडलेत. फोटोंना कविता सुचणे, फोटोंच्या वेगवेगळ्या वेळा असे छायाचित्र-कलेशी संबंधित अनेक रंग पुस्तकात मांडले आहेत. असे हे फोटो बोलकं पुस्तक फोटोत रस असलेल्यांनी मनात फोटो काढून ठेवावा असं हे अर्चनाचं “क्लिक ट्रिक”.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e- श्री. सुधीर गाडगीळ, नामवंत मुलाखतकार आणि लेखक \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964775358755,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1025f.jpg?v=1750157964"},{"product_id":"swapnapurty","title":"स्वप्नपूर्ती - प्रेरणा नवउद्योजकांच्या","description":"वाडवडलांकडून चालत आलेला कोणताही उद्योग अथवा व्यवसाय नसताना केवळ स्वत:च्या हिमतीवर, स्वकर्तृत्वाने ज्यांनी आपला उद्योग स्थापन केला, असे हे एकवीस प्रथम पिढीतील नवउद्योजक! त्यांच्या अंत:प्रेरणा काय होत्या, त्यांना बोलते करावे, त्यांना लिहिते करावे आणि ज्यांना उद्योगाचा प्रारंभ करायचा आहे, त्यांना प्रेरणा मिळावी या उद्दिष्टाने हे संकलन केले आहे. त्यांच्या स्वप्नांची पूर्तता झाली, म्हणून ही स्वप्नपूर्ती!\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eकाहींनी स्वत: लेखन केले, काहींच्या कहाणीचे शब्दांकन दुसऱ्याने केले. काही युवती व काही युवक त्यांच्या प्रेरणेत काही साम्य आहे. काही विविधता आहे. ज्या तरुण-तरुणींना स्वत:च्या कर्तबगारीवर काही करावयाचे मनात आहे; नोकरी न करता नोकऱ्या निर्माण करायच्या आहेत, त्यांना या छोटेखानी पुस्तकातून प्रेरणा मिळेल या विश्वासाने एकवीस वेगवेगळ्या उद्योगांच्या संदर्भातले तसेच व्यवसायांच्या संदर्भातले हे संकलन आपल्या हातात देत आहोत. ते उपयोगी राहील आणि संपादकांची ही स्वप्नपूर्ती होईल असे वाटते. ते आपल्या नव्या, उद्यमशील वाटेवर घेऊन जाईल आणि संपादकांचीही स्वप्नपूर्ती होईल, अशी आशा वाटते.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964775457059,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1024f.jpg?v=1750157970"},{"product_id":"devalacha-wagh","title":"देवळाचा वाघ आणि कुमाऊँचे आणखी काही नरभक्षक","description":"\"“नरभक्षक वाघाला मारण्याचं काम मनाला अतिशय समाधान देतं, यात शंकाच नाही. ‘जे काम कुणीतरी करणं अत्यावश्यक होतं आणि आपण ते केलं’ याचं ते समाधान असतं. आपण आपल्या बलाढ्य शत्रूला त्याच्याच परिसरात जाऊन मात दिल्याचं समाधान असतं; आणि या सगळ्याच्या पलीकडे, पुतळीसारख्या धाडसी मुलीला वावरण्यासाठी पृथ्वीवरचा लहानसा का होईना, एक कोपरा सुरक्षित केल्याचं समाधान असतं.”\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eनरभक्षक वाघांची प्रचंड दहशत बसलेल्या, दुर्गम म्हणाव्या अशा पूर्वोत्तर राज्यांमध्ये कॉर्बेट यांनी केलेल्या वाघांच्या शिकारींमागची त्यांची ही प्रामाणिक भावना आहे. साहजिकच, या सगळ्या शिकारकथा थरारकच आहेत. मात्र वाघाची शिकार करणार्या या माणसाची माणसाइतकीच वाघाबाबतची संवेदनशीलता अनेकदा रोमांचित करते आणि कॉर्बेट यांचं वेगळेपणदेखील अधोरेखित करते. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eम्हणूनच ‘शिकार करण्याचा आनंद घेणारा शिकारी’ या घट्ट, निष्ठुर चौकटीत या माणसाला बंदिस्त करता येत नाही. उलट जंगलाचं जिवंतपण, सळसळतेपण आणि रांगडा पण नितळ कारभार हा माणूस ज्या तरलेतेने टिपतो, त्यातून ‘शिकारी’ या काहीशा आक्रमक चौकटीच्या कितीतरी योजनं तो पुढे जातो आणि माणसाच्या ‘विकसित’ म्हणवल्या जाणार्या मेंदूमुळे निर्माण झालेल्या अनेक वर्तन विसंगती, त्याच्या मनातल्या सूक्ष्मात रुतून बसलेलं मतलबी क्रौय यांना सहज, नर्मविनोदीपणे पृष्ठभागावर आणतो. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eत्यामुळेच ‘थरारक’ म्हणून या कथा आनंद देतातच, पण त्याच वेळी कॉर्बेटबरोबर त्या आपल्यालाही खोल जंगलात उतरायला भाग पाडतात आणि त्याहूनही पुढे जात ‘माणूस’ नावाच्या रसायनाबाबत अनेक प्रश्नचिन्हं उपस्थित करतात.\"\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964775784739,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1027f.jpg?v=1750157993"},{"product_id":"shodh-chirantanacha","title":"शोध चिरंतनाचा","description":"स्वीस चित्रकार, शिल्पकार, कलाइतिहास तज्ज्ञ आणि भारतविद्येच्या केवळ शुष्क अभ्यासक नव्हे; तर भारताबद्दल अंतरात जिव्हाळा बाळगणाऱ्या ॲलिस बोनर यांचे हे चरित्र. अतिशय संपन्न घरात जन्मलेल्या ॲलिस सदैव नैसर्गिक, साध्या जीवन शैलीच्या आणि चिरंतनाच्या शोधात राहिल्या. भारताबद्दलच्या ओढीने त्या इथे आल्या. त्यांनी पर्यटकाच्या नजरेने भारत पाहिला नाही; तर भारताच्या आत्म्याचा धांडोळा घेतला. थोडी थोडकी नाही तर त्रेचाळीस वर्षे त्या वाराणसीत राहिल्या. रमल्या. भारतीय देवता, शिल्पाकृती आणि मंदिरे हे त्यांचे उत्कट आवडीचे विषय होते. मंदिर स्थापत्यकलेवर देखील त्यांनी लिखाण केले. देश-विदेशात भ्रमण करून भारतीय शिल्पकलेची बलस्थाने त्या आग्रहाने मांडत राहिल्या. १९७४ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. त्या म्हणतात की, \"\"सूक्ष्म, तरल, सारगर्भ संवेदनांचा, कलांचा केवढा अनमोल वारसा भारतीय लोकांच्या रक्तात वारसाहक्काने वाहतो आहे बरं. त्यांचं मूल्य भारतीय लोकांना कधी खऱ्या अर्थाने जाणवेल?\"\"\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eअशा या विलक्षण विदुषीची चरित्रगाथा वाचकाला ही समृद्ध करेल अशी आशा वाटते. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964777390371,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1042f.jpg?v=1750158104"},{"product_id":"rudraprayag","title":"रुद्रप्रयागचा नरभक्षक बिबट्या | सुप्रसिद्ध शिकारी व निसर्गसंवर्धक जिम कॉर्बेटच्या अजरामर शिकारकथा","description":"\u003cp\u003eएका अवलिया शिकार्‍याच्या या अजब शिकारकथा आहेत. या थरारक आहेत, पण फक्त थराराचाच अनुभव देणार्‍या कथा नाहीत. माणूस आणि प्राणी यांच्यातला निसर्ग सांगणार्‍या, त्यांच्यातली पेचात टाकणारी समीकरणं दर्शवणार्‍या कथा आहेत. आजच्या गतिमान युगाला अपेक्षित टिपेच्या अनुभवाची कुठलीही कळ त्या दाबत नाहीत, पण पाऊलही न वाजवता निसर्गासोबतच्या दीर्घ प्रवासाची खुमारी आणि त्याच्या सूक्ष्म निरीक्षणांचे अमीट तरंग त्या मनावर उमटवल्याशिवाय राहत नाहीत.\u003cbr\u003eखड्ड्यात मरून पडलेला बिबट्या नरभक्षकच असल्याचं सिद्ध करण्यासाठीचा कोणताही पुरावा माझ्यासमोर नव्हता, पण तो नरभक्षक बिबट्याच असल्याचं समजायला मला एका सेकंदाचाही वेळ लागला नव्हता. मात्र तो त्या पंडितच्या भाषेतला कुणी सैतान नव्हता. मला रात्र रात्र जागायला लावून कुठूनतरी मला बघत असलेला, त्याला मारण्याचे माझे प्रयत्न व्यर्थ चाललेले बघून विकट हसत असलेला, माझ्या बेसावध होण्याची जिभल्या चाटत वाट बघणारा, माझ्या गळ्यात आपले सुळे रोवायच्या संधीची वाट बघत असणारा कुणी दुष्ट प्राणी नव्हता. इथे तर एक साधा, वय झालेला बिबट्या मरून पडला होता. त्याचा गुन्हा एकच होता. तोही निसर्गाच्या कायद्याच्या विरुद्ध केलेला गुन्हा नव्हता, तर मानवतेच्या विरुद्ध केलेला गुन्हा होता. तो म्हणजे, त्याने माणसाचं रक्त सांडलं होतं. त्यातून त्याला माणसांमध्ये दहशत माजवायची होती, असंही नव्हतं. तर त्याला स्वत:ला जगायचं होतं. त्यासाठी त्याने हे सगळे उद्योग केले होते!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eMarathi translation of Man-eating Leopard of Rudraprayag by Jim Corbett. Translation by Vaishali Chitnis\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964778504483,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1047fRudrapyagchaNarbhakshakBibtya.jpg?v=1750158174"},{"product_id":"mahabharatatil-dharm-nitivichar","title":"महाभारतातील धर्म व नीती विचार","description":"महर्षी व्यासांचा धर्म व नीतिविषयक ज्ञानाने ओतप्रोत भरलेला विशाल ग्रंथराज भारतीय संस्कृतीचा अमोल ठेवा आहे. धर्माची तत्त्वे व नैतिक मूल्ये यांची सखोल चर्चा या ग्रंथात अठराही पर्वांत जागोजागी केलेली आढळते; ती भगवद्गीतेपुरतीच मर्यादित नाही. इतकी विस्तृत व मूलगामी चर्चा इतरत्र कुठेही आढळत नाही. मूळ संविधानक कुरुवंशातल्या कौरव-पांडवांच्या संघर्षावर आधारित आहे. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eशरशय्येवरून भीष्मांनी धर्मराजाला दिलेले ज्ञान, विदुरनीती, यक्ष प्रश्न, अनेक ऋषींचे उपदेश, हंसगीता, अनुगीता, विविध उपाख्याने, धर्माच्या तीन सत्त्वपरीक्षा, वेदान्तातील दार्शनिक विचार, कर्मसिद्धान्त इत्यादींमधून धर्म व नीती यांचे विचारधन या महाकाव्यात मांडले आहे. ह्या विचारधनाचा, लेखकाने प्रस्तुत ग्रंथात सविस्तरपणे परामर्श घेतला आहे. भगवान श्रीकृष्णाच्या दिव्य वाणीने अर्जुनाला केलेला गीतोपदेश हा व्यासांच्या संहितेचा मुकुटमणी होय. ह्या प्रदीर्घ दिव्य उपदेशाचे विवरण लेखकाने येथे लेखांक एक्कावन्न ते चौसष्ट यांत केले आहे. महाभारतातील ‘सूक्ष्म धर्माचे’ विवेचन म्हणजे धर्मसंकल्पनेवर नवीन प्रकाश टाकल्यासारखे आहे; त्याचाही इथे मागोवा घेतला आहे. रसिक वाचकांना ह्या धर्म विवेचनातून उद्बोधन मिळावे, हेच या लिखाणाचे उद्दिष्ट आहे.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964779192611,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1049f.jpg?v=1750158211"},{"product_id":"chitrapat-abhyas","title":"चित्रपट अभ्यास","description":"\u003cp\u003eप्रा. सतीश बहादूर यांनी भारतात चित्रपटशिक्षणाचा पाया घातला, आपली स्वतंत्र अभ्यासपद्धती व चित्रपट-अध्यापनाची शैली विकसित केली आणि अनेक पिढ्यांचे चित्रपट-शिक्षण केले. त्यांच्यासोबत प्रदीर्घ काळ काम केलेल्या डॉ. श्यामला वनारसे आज घडीला ‘बहादूर-परंपरे’तल्या एकमेव बौद्धिक वारसदार आहेत. श्यामलाताईंनी या पुस्तकात १९४० ते १९६० या कालखंडातल ‘अभिजात’ म्हणून गणले जाणाऱ्या  १२ चित्रपटसंहितांचे विश्लेषण केले आहे. यात अभ्यासाची शिस्त, तात्त्विक मर्मदृष्टी आणि नीर-क्षीर विवेकाने केलेली चिकित्सा पाहायला मिळते. चित्रपटाचा अभ्यास ही काहीतरी खुळचट कल्पना आहे, ही समजूत मोडीत काढणारे हे पुस्तक आहे.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964779487523,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1062f.jpg?v=1750158234"},{"product_id":"kraantijyotii-saavitriibaaii-phule-strii-shikssnnaacaa-paayaa-rcnnaarii-dhgdhgtii-mshaal","title":"क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले - स्त्री-शिक्षणाचा पाया रचणारी धगधगती मशाल","description":"एक दिवस तर हद्दच झाली. सावित्रीबाई शाळेत निघालेल्या असताना त्यांच्या वाटेत एक धटिंगण गुंड येऊन उभा राहिला. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e‘‘ए बाई, बर्‍या बोलानं घरी जा... न्हाईतर फुडं जे व्हईल, त्याची जिम्मेदारी माझी नव्हं!’’ त्याने दम दिला. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eत्या गुंडाचा अविर्भाव बघून सावित्रीबाई क्षणभर गांगरल्या, पण त्यांनी लगेचच सगळं अवसान गोळा केलं आणि पुढे होऊन त्या गुंडाला एक जोरदार थप्पड लगावली. गुंडाला याची अजिबातच अपेक्षा नव्हती. सावित्रीबाईंनी त्याच्या धमकावण्याला उत्तरही दिलं, पण ते ऐकायला तो तिथे थांबलाच नव्हता. त्याने तडक पोबारा केला होता!\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eसमाजाचं काम करणार्‍या माणसाकडे जितकी आत्मीयता, तितकीच धमक आणि तितकाच संयमही लागतो. या तिन्हींचा अर्क म्हणजे ‘सावित्रीबाई फुले’! अर्थात अशा बाईला जर जोतिरावांसारख्या जोडीदाराची साथ मिळाली, तर ’स्त्री-पुरुष समानता’ हे फक्त शब्द राहत नाहीत. त्या संपूर्ण समाज-बदलाच्या पाऊलखुणा ठरतात.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eम्हणूनच हे पुस्तकं वाचकांच्या हाती ठेवणं, म्हणजे एका अर्थी उत्तम नागरिक घडवण्याच्या दिशेने छोटंसं पाऊल टाकणं!\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964779749667,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1055f.jpg?v=1750158240"},{"product_id":"kaaldhar","title":"कालधर - वैनतेय एक गरुड योद्धा द्वितीय अध्याय","description":"आठशे वर्षांच्या प्रदीर्घ काळनिद्रेनंतर, राष्ट्रक सम्राट कालधर पुन्हा जिवंत झाला आहे. महाकापालिक रुद्रकेशीच्या तांत्रिक शक्तींच्या बळावर त्याला पृथ्वीचा सम्राट व्हायचं आहे. त्याच्या या महत्त्वाकांक्षेला गंधर्वयोद्धा कालक आणि गरुडयोद्धा वैनतेय यांचा अडसर आडवा येतोय. अंधारवनातील शुभ्र देवतेनं कालकला आपल्या ताब्यात ठेवलंय आणि भविष्यातून भूतकाळात येणाऱ्या, वैनतेयचा जन्म व्हायला अजून तीन हजार वर्षांचा कालावधी बाकी आहे. तर्कशक्ती आणि कल्पनेच्या पलीकडच्या या रहस्यमयी, अनाकलनिय जगांत, सर्प आणि गरुडांचा, त्यांच्या अस्तित्त्वासाठीचा तीव्र संघर्ष सुरू झालाय. ‘महान संकटा’च्या पार्श्वभूमिवर एक अतिव भयंकर युद्ध लढलं जाणार आहे, ज्यांत मानव, सर्प, गरुड, यक्ष, पाताळी, गंधर्व, मृतात्मे, सिद्ध, आसरा, तृतीयपंथी, गण, कापालिक, वनदेवता अशा सर्वांचा समावेश आहे. मृतात्म्यांचा राजा कालधर आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करेल की वज्रप्रियेच्या मदतीने, विश्वाचा संहार होण्यापासून वाचवण्यात, भविष्ययोद्धा वैनतेय यशस्वी होईल?\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eसर्प-गरुड-मानव यांच्यातील प्राचीन संघर्षाची ही अद्भूत कथा वाचकाला पानोपानी खिळवून ठेवते. प्रतिक पुरी यांच्या लेखणीतून साकारलेली, ‘मराठीतील पहिला अतिनायकः वैनतेय’ याची ही साहसयात्रा लहानथोर प्रत्येकाने अनुभवावी अशीच आहे.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964779913507,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/vanitey-3d.jpg?v=1750158254"},{"product_id":"tumcii-klaa-tumce-kriar-tumchi-kala-tumache-career","title":"तुमची कला तुमचे करिअर  | Tumchi Kala Tumache Career","description":"\u003cp\u003e\"कोणतीही क्रिया कौशल्यपूर्ण करणं म्हणजे कला, असं म्हणता येईल. भारतीय परंपरेत चौसष्ट कलांचा उल्लेख आहे. कला हे रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात विरंगुळा मिळवण्याचं एक साधन आहे, तसंच तो ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग आहे, असं मानण्यात येतं. तरीही भारतीय परंपरेत कलेकडे अर्थार्जनाचं साधन म्हणून बघितलेलं आपल्याला दिसत नाही.\u003cbr\u003eअनेक मुलांच्या अंगात विविध कला असतात. मात्र ‘अर्थार्जन’ हेच बहुतेक सर्वांच्याच शिक्षणाचं ध्येय असल्याने आणि कलेतून अर्थार्जन अशक्य असल्याची बहुतेक पालकांची ठाम श्रद्धा असल्याने अशा मुलांची कला छंदापुरती मर्यादित राहते. यातून ही मुलं केवळ अर्थार्जनासाठी नावडतं काम करत राहतात आणि कामातल्या आनंदाला पारखी होतात.\u003cbr\u003eमागच्या वीस-पंचवीस वर्षांत जसजशी देशाची आर्थिक प्रगती झाली, तसतशी कलांना ऊर्जितावस्था आली. आज औपचारिक क्षेत्रांखेरीज कलाधिष्ठित अनेक क्षेत्रं उपलब्ध आहेत. त्या कलांचं व्यवसायात रूपांतर करून पुरेसं अर्थार्जन तर करता येतंच, पण आपल्याला आवडणार्‍या क्षेत्रात काम करण्याचा अतुलनीय आनंदही मिळविता येतो. अशा प्रकारे कलेकडे व्यवसाय म्हणून पाहणार्‍या, अंगभूत कला असणार्‍या अनेक व्यक्ती व्यावसायिक कलाकार झाल्या. कला हेच त्यांच्या उपजीविकेचं साधन झालं. अशा २० व्यक्तींनी कलेतून यशस्वीरित्या व्यवसाय कसा केला, हे सांगण्याचा आम्ही या पुस्तकाद्वारे प्रयत्न केला आहे.\u003cbr\u003eज्यांना आपल्या कलेतून उपजीविका करण्याची इच्छा आहे त्यांना व त्यांच्या पालकांना हे पुस्तक प्रेरणादायी ठरू शकेल असा विश्वास वाटतो. \u003cbr\u003eThis book chronicles the success stories of people who have made successful careers in ARTS. The books inspires and guides the young people who wish to make their career in Arts.  \"\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964783092003,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1085TumachiKalaTumacheCareer-3d.jpg?v=1750158405"},{"product_id":"bhagavadgeeta","title":"भगवदगीता : जीवन-व्यवस्थापनशास्त्र | Bhagavadgeeta jeevan vyavastpanshastra","description":"\u003cp\u003eभगवद्गीता, केवळ एक धार्मिक ग्रंथ नाही, ती मानवी जीवनाचे व्यवस्थापन करणारी एक शास्त्रशुद्ध प्रणाली आहे. गीता आपल्याला काठावर उभी राहून निव्वळ कोरडे तत्त्वज्ञान सांगत नाही. तर आपण सर्व समस्यांमधून, स्वतःला सावरून उत्तर शोधावं, ह्यासाठी मायेचा हात पुढे करते. ह्या दीपस्तंभाच्या उर्जादायी प्रकाशस्त्रोतामध्ये कुणीही यावं आणि आयुष्य उजळून टाकावं हे तिचं अंगभूत सामर्थ्य आहे.\u003cbr\u003eकाळानुरूप परिस्थिती बदलते. समाज रचना, परंपरा बदलत रहातात. पण माणसाची अमर्याद लालसा आणि त्या विरुद्ध उभी रहाणारी निस्पृहता यांच्यातील संघर्ष मात्र चिरंतन सुरूच रहातो. इथे गीता आपल्याला शाश्वत नितीमूल्यांकडे निर्देश करून सांगते की, केवळ सत्गुणांच्या अधिष्ठानावरच आपल्याला सुसंस्कृत आणि सभ्य जीवनाची अपेक्षा करता येते.\u003cbr\u003eव्यक्तीने धर्म, अर्थ, काम, मोक्ष ह्या चार पुरुषार्थांमध्ये, धर्माधिष्ठीत मर्यादांमध्ये राहूनच आणि कामाचा उपभोग घ्यावा आणि मोक्षाकडे वाटचाल करावी. ही संयमित मानसिकता निर्माण करण्यासाठीच गीतेेचं मार्गदर्शन महत्त्वपूर्ण आहे. गीतेचा कटाक्ष केवळ व्यक्तिगत मोक्षप्राप्तीवर नसून, गीतेने मोक्षाची परिभाषा व्यापक केली आणि त्यामध्येच लोककल्याणार्थ, निष्काम कर्मयोगाचे सूत्र समाविष्ट केलं.\u003cbr\u003eगीतेचा मूळ गाभा आणि सर्व सिद्धांत विचारात घेऊन सदर पुस्तकाची मांडणी करण्यात आली आहे. वाचकांना, संकल्पना समजून घ्यायला सोपं जावं म्हणून मी, जिथे जिथे शक्य असेल तिथे चार्टस्, सूत्र ह्या द्वारे सादरीकरण केलं आहे. \u003cbr\u003eवाचकांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी सदर पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटतो.\u003cbr\u003eIn this book author Sandhya Sapre has used the timeless teachings of the Bhagavadgeeta to help the reader make positive changes in their lives and live a more content and fulfilled life. \u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964783419683,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1083BhagavadgeetetunJeevanvyavasthapanshastra-cover-3d.jpg?v=1750158423"},{"product_id":"jungle-lore-ani-tree-tops","title":"जंगल लोर आणि ट्री टॉप्स  | Jungle Lore ani Tree Tops | Jim Corbett in Marathi","description":"\u003cdiv class=\"gs\" style=\"margin: 0px; min-width: 0px; padding: 0px 0px 20px; width: initial; color: rgb(34, 34, 34); font-family: 'Google Sans', Roboto, RobotoDraft, Helvetica, Arial, sans-serif; font-size: medium; font-style: normal; font-variant-ligatures: normal; font-variant-caps: normal; font-weight: 400; letter-spacing: normal; orphans: 2; text-align: start; text-indent: 0px; text-transform: none; widows: 2; word-spacing: 0px; -webkit-text-stroke-width: 0px; white-space: normal; background-color: rgb(255, 255, 255); text-decoration-thickness: initial; text-decoration-style: initial; text-decoration-color: initial;\"\u003e\n\u003cdiv class=\"\"\u003e\n\u003cdiv id=\":3dn\" class=\"ii gt\" style=\"direction: ltr; margin: 8px 0px 0px; padding: 0px; position: relative; font-size: 0.875rem; overflow-x: hidden;\" jslog=\"20277; u014N:xr6bB; 1:WyIjdGhyZWFkLWY6MTgwNjA4Mzg1NDUyMTk1OTI2OCJd; 4:WyIjbXNnLWY6MTgwNjA4Mzg1NDUyMTk1OTI2OCJd\"\u003e\n\u003cdiv id=\":3do\" class=\"a3s aiL\" style=\"direction: initial; font: small \/ 1.5 Arial, Helvetica, sans-serif; overflow: auto hidden; position: relative;\"\u003e\n\u003cdiv dir=\"ltr\"\u003eआता माझ्यापासून वीस यार्डांवर एक वाघ उभा होता. त्याच्या त्या सुंदर, चमकदार त्वचेवर हिवाळ्यातलं ऊन पडून ती आणखी चमकत होती. असं छायाचित्र मिळवण्यासाठी मी एरवी कुठेही गेलो असतो आणि काहीही दिलं असतं. मी अनेकदा तासन्तास किंवा दिवसच्या दिवस वाघाच्या मागावर राहिलो आहे आणि तो दिसल्यावर रायफल उंचावून, काळजीपूर्वक नेम धरून ती तशीच खाली घेतली आहे. नंतर त्या वाघाचं लक्ष वेधून घेऊन, डोक्यावरची टोपी उचलून त्याला अभिवादन केलं आहे. मला त्याला पाहण्याचा मिळालेला आनंद मी या पद्धतीने व्यक्त केला आहे.\u003cbr\u003e\u003cbr\u003e\n\u003cdiv\u003eरूढार्थाने ‘शिकारी’ असणार्‍या या माणसाचा प्रवास म्हणूनच शूटिंगपासून शूटिंगपर्यंत (शिकारीपासून चित्रीकरणापर्यंत) पोहोचल्याचं लक्षात येतं. शिकार करण्याने त्याला सावध, अभ्यासू आणि चिकित्सक केलं असलं, तरी हे सजगपण त्याला केवळ निसर्गाचा उपभोग घ्यायला शिकवत नाही... उलट ही त्याच्या निसर्गात विरघळत जाण्यासाठीची नांदी ठरते.\n\u003cdiv class=\"yj6qo\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"adL\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"adL\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964784107811,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1097-junglelore-3d.jpg?v=1750158451"}],"url":"https:\/\/kanakbook.in\/collections\/llit.oembed","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}