{"title":"कला-छंद","description":"\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eकला-छंद विषयक माहितीपर पुस्तके\u003c\/p\u003e","products":[{"product_id":"photomantra","title":"फोटोमंत्र","description":"\u003cp\u003eसाधक, साधना आणि साध्य या त्रिसूत्रींना एकत्र बांधतो तो मंत्र. मंत्रोच्चारात जसे सामर्थ्य दडलेले असते तसेच मंत्र या शब्दात एक संदेश आपल्याला दिसून येतो. फोटो म्हणजेच प्रकाश आणि या प्रकाशाचा मंत्र ‘फोटोमंत्र’. फोटोग्राफीचे आपले स्वतंत्र असे अस्तित्व आहे. जन्माला आल्यापासुन मृत्युपर्यंत आपले जीवन विविध रंगांनी समृद्ध होत असते. या रंगांच्या आठवणींचे इंद्रधनुष्य म्हणजेच फोटो. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eबालपण, तरूणपण आणि वार्धक्य या तीन अवस्थातून जाताना अनेक मौज मजेच्या गोष्टी तसेच सुखाचे व आनंदाचे क्षण प्रत्येकाच्या वाट्याला काही प्रमाणात का होईना येतच असतात. निसर्गाच्या सान्निध्यात फिरताना जीवनाची अनुभूती आपल्याला येत असते. अमूल्य अशा या क्षणांना चित्रबद्ध कसे करावे याचा मंत्र म्हणजेच फोटोमंत्र. मनोभावे याचा जप केल्यास फोटोसिद्धी नक्कीच प्राप्त होते.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eसौ.अर्चना देशपांडे जोशी यांचं ‘फोटोमंत्र’ हे पुस्तक प्रकाशित होत आहे याचा मला व्यक्तिशः आनंद होत आहे. फोटोग्राफी हे एक फक्त तंत्रच नाही तर एक कला आहे आणि या कलेला विचारांची बैठक आहे हे अर्चना यांच्या बोलण्यावरून कायमच प्रतीत होत राहतं आणि या कलातंत्राचा मंत्र आता ती आपल्या नव्या पुस्तकातून उलगडत आहे याची उत्सुकता एक कलाकार म्हणून मलाही आहेच.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eसंगीत आणि फोटोग्राफी यात वरवर काही साम्य नसलं तरी या दोहोंमध्ये एक साम्य आहे दोन्ही कलांमध्ये सौंदर्यपूर्ण पद्धतीने अवकाश भरावं लागतं. एकात सुरांनी तर दुसर्यात प्रकाशाने. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eसौ.अर्चना देशपांडे-जोशी यांच्या ‘फोटोमंत्र’ या पुस्तकाला माझ्याकडून लक्ष लक्ष शुभेच्छा !\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e- कौशल इनामदार\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964683542819,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/931f.jpg?v=1750154875"},{"product_id":"chhandmitra","title":"छंदमित्र","description":"\u003cp\u003eबाल - कुमारांना घरगुती टाकाऊ वस्तूंपासून सुंदर कलावस्तू बनवण्याचे प्रात्यक्षिक देणारे पुस्तक. मुलांच्या कलागुणांना जोपसणारे पुस्तक. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964718932259,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/617f.jpg?v=1750155852"},{"product_id":"artography-lagnachee-photo-gosht","title":"आर्टोग्राफी : लग्नाची फोटो गोष्ट","description":"\u003cp\u003eविवाह आणि फोटोग्राफी या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. विवाह समारंभात प्रत्येक गोष्ट कलात्मकतेची जाणीव ठेवून केलेली असते. भावनांचा कोलाज, प्रेमळ मनांचा मिलाफ आणि वधू वरांचे लाजून हासणे कायमस्वरूपी आठवण म्हणून जपावे, असे वाटायला लावणारी फोटोग्राफीची संकल्पना आर्टोग्राफीच्या माध्यमातून साकारता येते. काय? कुठे? कधी? आणि का?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे समजले की लग्नाची फोटो गोष्ट तयार होते... न संपणारी गोष्ट... आर्टोग्राफी!\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964746129699,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/852f.jpg?v=1750156811"},{"product_id":"clicktrick","title":"क्लिक ट्रिक - युक्त्या कलात्मक फोटोग्राफीच्या","description":"छायाचित्र कलेवर सोप्या मराठीत; सुंदर, नेमक्या शब्दांत भाष्य करत वाचनीय केलेलं, अर्चना देशपांडे जोशी यांचं “क्लिक ट्रिक” हे पुस्तक आहे. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e‘छायाप्रकाशाचा खेळ म्हणजे प्रकाश-रंगातून रंगलेली स्मरणचित्रे’ असं म्हणत फोटोंचं आठवणींशी निगडित असलेल नातं सांगत, नमनालाच ‘सावलीच्या छटा’ फार छान मांडल्या आहेत.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eफोटो कुठे कुठे असतो, हे मांडत, ‘फोटोग्राफर चित्रकलेतून कल्पनेला आकार देतो’ असं सांगत ‘रस्त्यावरून फिरणाऱ्या वाहनांकडे नीट निरखून बघा, विविध मानवी चेहरे-भाव दिसतात’ म्हणत, पुढे त्यांनी गमतीशीर टीप्पणी केलीए. ती अशी - एस. टी. हिरमुसलेली, रिक्षा नाक उडवणारी, ऍम्बेसिडर मोकळेपणाने हसणारी... काय नेमकं भाष्य फोटोग्राफिक नजरेचं!\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e‘फोटो काढण्यापूर्वी गरज शोधक नजरेची’ असं सांगत प्रवेशद्वाराच्या कमानीतून दिसणार्‍या ताजमहालचं उदाहरण देत तो फोटो बघायची उत्सुकता वाढवलीए. ‘उसळत्या समुद्राला क्षितिजाची पार्श्वभूमी फोटोत नसेल, तर भकास वाटेल’ ही टिप्पणी विविध कोनांतून, आकारातून,Triangle कम्पोझीशन दिसणे, हा त्या फोटोग्राफरच्या कल्पनाशक्तीचा अविष्कार असतो. चित्रकारांनी काढलेल्या चित्राचे अवलोकन करणे, हे उत्तम फोटोग्राफी करण्यसाठी मार्गदर्शक ठरते. फोटो काढण्यापूर्वी, फोटो का काढत आहोत, कशाचा काढत आहोत, याचा विचार हवाच. फोटोग्राफीचा छंद हृदयातून जन्माला आला, विचारातून साकारला गेला, तर येणारा प्रत्येक फोटो मनाची सतार झंकारत जाईल, असे अप्रतिम मुद्दे अर्चनाने मांडलेत. फोटोंना कविता सुचणे, फोटोंच्या वेगवेगळ्या वेळा असे छायाचित्र-कलेशी संबंधित अनेक रंग पुस्तकात मांडले आहेत. असे हे फोटो बोलकं पुस्तक फोटोत रस असलेल्यांनी मनात फोटो काढून ठेवावा असं हे अर्चनाचं “क्लिक ट्रिक”.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e- श्री. सुधीर गाडगीळ, नामवंत मुलाखतकार आणि लेखक \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964775358755,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1025f.jpg?v=1750157964"},{"product_id":"shodh-chirantanacha","title":"शोध चिरंतनाचा","description":"स्वीस चित्रकार, शिल्पकार, कलाइतिहास तज्ज्ञ आणि भारतविद्येच्या केवळ शुष्क अभ्यासक नव्हे; तर भारताबद्दल अंतरात जिव्हाळा बाळगणाऱ्या ॲलिस बोनर यांचे हे चरित्र. अतिशय संपन्न घरात जन्मलेल्या ॲलिस सदैव नैसर्गिक, साध्या जीवन शैलीच्या आणि चिरंतनाच्या शोधात राहिल्या. भारताबद्दलच्या ओढीने त्या इथे आल्या. त्यांनी पर्यटकाच्या नजरेने भारत पाहिला नाही; तर भारताच्या आत्म्याचा धांडोळा घेतला. थोडी थोडकी नाही तर त्रेचाळीस वर्षे त्या वाराणसीत राहिल्या. रमल्या. भारतीय देवता, शिल्पाकृती आणि मंदिरे हे त्यांचे उत्कट आवडीचे विषय होते. मंदिर स्थापत्यकलेवर देखील त्यांनी लिखाण केले. देश-विदेशात भ्रमण करून भारतीय शिल्पकलेची बलस्थाने त्या आग्रहाने मांडत राहिल्या. १९७४ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. त्या म्हणतात की, \"\"सूक्ष्म, तरल, सारगर्भ संवेदनांचा, कलांचा केवढा अनमोल वारसा भारतीय लोकांच्या रक्तात वारसाहक्काने वाहतो आहे बरं. त्यांचं मूल्य भारतीय लोकांना कधी खऱ्या अर्थाने जाणवेल?\"\"\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eअशा या विलक्षण विदुषीची चरित्रगाथा वाचकाला ही समृद्ध करेल अशी आशा वाटते. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964777390371,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1042f.jpg?v=1750158104"},{"product_id":"chitrapat-abhyas","title":"चित्रपट अभ्यास","description":"\u003cp\u003eप्रा. सतीश बहादूर यांनी भारतात चित्रपटशिक्षणाचा पाया घातला, आपली स्वतंत्र अभ्यासपद्धती व चित्रपट-अध्यापनाची शैली विकसित केली आणि अनेक पिढ्यांचे चित्रपट-शिक्षण केले. त्यांच्यासोबत प्रदीर्घ काळ काम केलेल्या डॉ. श्यामला वनारसे आज घडीला ‘बहादूर-परंपरे’तल्या एकमेव बौद्धिक वारसदार आहेत. श्यामलाताईंनी या पुस्तकात १९४० ते १९६० या कालखंडातल ‘अभिजात’ म्हणून गणले जाणाऱ्या  १२ चित्रपटसंहितांचे विश्लेषण केले आहे. यात अभ्यासाची शिस्त, तात्त्विक मर्मदृष्टी आणि नीर-क्षीर विवेकाने केलेली चिकित्सा पाहायला मिळते. चित्रपटाचा अभ्यास ही काहीतरी खुळचट कल्पना आहे, ही समजूत मोडीत काढणारे हे पुस्तक आहे.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964779487523,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1062f.jpg?v=1750158234"},{"product_id":"tumcii-klaa-tumce-kriar-tumchi-kala-tumache-career","title":"तुमची कला तुमचे करिअर  | Tumchi Kala Tumache Career","description":"\u003cp\u003e\"कोणतीही क्रिया कौशल्यपूर्ण करणं म्हणजे कला, असं म्हणता येईल. भारतीय परंपरेत चौसष्ट कलांचा उल्लेख आहे. कला हे रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात विरंगुळा मिळवण्याचं एक साधन आहे, तसंच तो ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग आहे, असं मानण्यात येतं. तरीही भारतीय परंपरेत कलेकडे अर्थार्जनाचं साधन म्हणून बघितलेलं आपल्याला दिसत नाही.\u003cbr\u003eअनेक मुलांच्या अंगात विविध कला असतात. मात्र ‘अर्थार्जन’ हेच बहुतेक सर्वांच्याच शिक्षणाचं ध्येय असल्याने आणि कलेतून अर्थार्जन अशक्य असल्याची बहुतेक पालकांची ठाम श्रद्धा असल्याने अशा मुलांची कला छंदापुरती मर्यादित राहते. यातून ही मुलं केवळ अर्थार्जनासाठी नावडतं काम करत राहतात आणि कामातल्या आनंदाला पारखी होतात.\u003cbr\u003eमागच्या वीस-पंचवीस वर्षांत जसजशी देशाची आर्थिक प्रगती झाली, तसतशी कलांना ऊर्जितावस्था आली. आज औपचारिक क्षेत्रांखेरीज कलाधिष्ठित अनेक क्षेत्रं उपलब्ध आहेत. त्या कलांचं व्यवसायात रूपांतर करून पुरेसं अर्थार्जन तर करता येतंच, पण आपल्याला आवडणार्‍या क्षेत्रात काम करण्याचा अतुलनीय आनंदही मिळविता येतो. अशा प्रकारे कलेकडे व्यवसाय म्हणून पाहणार्‍या, अंगभूत कला असणार्‍या अनेक व्यक्ती व्यावसायिक कलाकार झाल्या. कला हेच त्यांच्या उपजीविकेचं साधन झालं. अशा २० व्यक्तींनी कलेतून यशस्वीरित्या व्यवसाय कसा केला, हे सांगण्याचा आम्ही या पुस्तकाद्वारे प्रयत्न केला आहे.\u003cbr\u003eज्यांना आपल्या कलेतून उपजीविका करण्याची इच्छा आहे त्यांना व त्यांच्या पालकांना हे पुस्तक प्रेरणादायी ठरू शकेल असा विश्वास वाटतो. \u003cbr\u003eThis book chronicles the success stories of people who have made successful careers in ARTS. The books inspires and guides the young people who wish to make their career in Arts.  \"\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964783092003,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1085TumachiKalaTumacheCareer-3d.jpg?v=1750158405"}],"url":"https:\/\/kanakbook.in\/collections\/klaa-chnd.oembed","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}