{"title":"कायदा","description":"","products":[{"product_id":"diamond-vidhishastrakosh","title":"डायमंड विधिशास्त्रकोश","description":"\u003cp\u003eमराठी भाषा समृद्ध व ताकदीची भाषा आहे, परंतु विधिशास्त्र (कायदा) या विषयावर आधारित पुस्तके मराठीत फारच कमी आहेत. भारतातील सर्व कायदे इंग्रजीलिखित आहेत. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाचे सर्व व्यवहारही इंग्रजीतच चालतात. त्यामुळे साहजिकच कायद्यावरील मान्यताप्राप्त पुस्तके इंग्रजीमध्येच जास्त आहेत.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e पण शासनाचे सर्व व्यवहार मराठीतही व्हावेत, असे धोरण गेल्या काही वर्षांपासून मान्य झाले आहे. त्या बाबतीत नियमही झाले आहेत. त्यामुळे आता मराठीतूनही कायदे प्रसिद्ध होत आहेत. जिल्हा पातळीपर्यंतचे अनेक न्यायाधीश काही निकालपत्रे मराठीत तयार करत आहेत. अनेक न्यायालयांत तोंडी पुरावा नोंदवण्याचे कामही मराठीत चालते.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e या पार्श्वभूमीचा विचार केल्यास इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द वापरण्यासाठी ‘कायदा’ या विषयाचा संज्ञाकोश आवश्यक ठरतो. याच हेतूने डॉ. बी. आर. जोशी यांनी या कोशाची रचना केली आहे.  \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e शासनकर्ते, न्यायाधीश, वकील, प्रसारमाध्यमे, संशोधक व कायदा शिकणारे विद्यार्थी या सर्वांच्या दृष्टीने हा कोश अतिशय उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964719194403,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/626f.jpg?v=1750155871"},{"product_id":"samanya-manus-kayda-ani-nyay","title":"सामान्य माणूस कायदा आणि न्याय","description":"\u003cp\u003eसामान्य माणसाचा स्वातंत्र्यप्राप्तीनंतर कायदा-सुव्यवस्था तसेच न्यायदान प्रक्रिया याबद्दल भ्रमनिरास झालेला आहे. ही स्थिती बदलता येईल का व ते शक्य असल्यास कशी बदलता येईल, याबद्दल तो किंकर्तव्यमूढ झालेला आहे. तशात प्रसिद्धीमाध्यमांनी काही नकारात्मक बातम्यांना जास्त भडक प्रसिद्धी दिल्यामुळे तर तो भ्रांतचित्तच झालेला आढळतो. अशा परिस्थितीत त्याला कायदा व न्याय यांची मूलतत्त्वे नीट समजावून देऊन त्यात नेमक्या त्रुटी कुठे आहेत व त्या कशा दूर करता येतील, या दृष्टीने सांगोपांग विचार करून त्याचेमार्फत समाजप्रबोधन करणे जरुरीचे आहे. सामान्य माणसाला मुळातच ही जाणीव करून देणे अत्यंत आवश्यक आहे की, त्याला व पर्यायाने सर्व राष्ट्रालाच विकसनाच्या मार्गावर नेईल अशी  न्याय व्यवस्था व कायदा निर्मिती व त्याची योग्य अंमलबजावणी करणे हे दुसर्‍या कोणाच्याही नव्हे तर ते त्याच्याच हातात आहे. त्यासाठी त्याला एक स्वतंत्र नागरिक म्हणून त्याच्या हक्काची व जबाबदारीची जाणीव करून देणे अत्यंत जरूर आहे. त्यानेच निवडून दिलेल्या व त्याचे सेवक असलेल्या लोकप्रतिनिधींवर योग्य तो दबाव टाकून ही क्रांती तो सजगतेने करू शकतो. सामान्य माणसाला त्याच्या स्वातंत्र्याची अनुभूती घेण्याच्या सामर्थ्यांची जाणीव करून द्यावी हे समाज ऋण फेडण्याच्या जाणीवेनेच हे लेख लिहिले आहेत.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e लेखकाने काही काळ सरकारी वकील म्हणून तसेच न्यायाधीश म्हणून ३०-३५ वर्षे अनेक पदांवर काम पाहिले व जिल्हा न्यायाधीशपदानंतर त्यांची औद्योगिक न्यायालयात सदस्य व अध्यक्ष म्हणूनही नेमणूक झाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे एक सदस्य म्हणून त्यांना न्यायाधीशांच्या नेमणूकीत सहभाग घेता आला. न्यायाधीशांच्या परीक्षेस बसणार्‍या व न्यायाधीश म्हणून नेमणूक झालेल्यांना न्यायदानाबद्दल मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली. अनेक वर्तमानपत्रे व मासिके यातून तसेच विश्‍वकोशात कायदेविषयक लेखन केले.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e प्रदीर्घ अनुभवामुळे विविध दृष्टिकोनातून त्यांना कायदा व न्यायव्यवस्थेचे स्वरूप पहाता आले. या सर्व अनुभवांचे सार या लेखात आले आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e त्यांनी सामान्य माणसाच्या सापेक्षत्वात केलेले हे प्रकट चिंतन सामान्य माणसाप्रमाणेच न्यायाधीशपदाच्या परीक्षेस बसणार्‍या तसेच विधीमहाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाच नव्हे न्यायाधीशपदावर काम करणार्‍यांनाही उपयुक्त ठरेल.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964757434659,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/312f.jpg?v=1750157205"},{"product_id":"mahilansathi-adhar-kayadacha","title":"महिलांसाठी आधार कायद्याचा","description":"\u003cp\u003eस्त्री भ्रूण हत्या आणि त्यामुळे स्त्रियांच्या संख्येत होणारी घट रोखायला हवी.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहुंड्याचा धोंडा डोक्यावरून उतरायला हवा. विनाकारण होणारा अत्याचार थांबायला हवा. तिच्या शरीरावर तिचाच हक्क - त्यावरची बळजबरी का खपवून घ्यायची?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्त्रियांनाही माणूस म्हणून सन्मानाने जगता यायला हवं. त्यांचे हक्क, त्यांचे अधिकार काय आहेत, त्यासाठी काय करायला हवं हे साध्या, सरळ, सोप्या भाषेत समजून देण्यासाठीचा हा प्रयत्न. या बाबतीत कायद्याची काय मदत मिळू शकते याची माहिती जाणून घेण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरू शकेल अशी आशा वाटते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964758810915,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/334f.jpg?v=1750157257"},{"product_id":"snshodhn-krtaanaa","title":"संशोधन करताना","description":"संशोधन क्षेत्रात करण्यासारखे खूप आहे. एम्.फिल. व मुख्यत: पीएच.डी.पदवीसाठी संशोधन करावेच लागते. तसेच एम्.ए., एम.कॉम, एम्.बी.ए. या पदवी अभ्यासासाठीही संशोधन उपयुक्त ठरते, हे सर्वांना ज्ञात आहेच. याशिवाय शिष्यवृत्तीसाठी, स्वतःला रूची आहे म्हणून अनेकजण संशोधन करीत असतात. पत्रकारिता करतानाही एखाद्या समस्येवर संशोधन करुन त्याची मांडणी व त्यावर उपाय सुचवावे लागतात.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e संशोधन करताना हे पुस्तक वरील सर्व अभ्यासकांना उपयोगी पडेल. याशिवाय व्यावसायिक संशोधक म्हणून काम करताना, सल्लागार म्हणून काम करतानाही हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल यात शंका नाही.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964779290915,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/213f.jpg?v=1750158217"},{"product_id":"abhivyaktiswatantrya","title":"अभिव्यक्तिस्वातंत्र्य - प्रसारमाध्यमे आणि कायदा","description":"मराठी भाषेत अभिव्यक्तिस्वातंत्र्य याविषयावर अत्यंत तुरळक लेखन उपलब्ध आहे. जे आहे ते अद्ययावत नाही. सदर पुस्तकाचे लिखाण दोन विद्यापीठांचा अभ्यासक्रम समोर ठेवून केलेले आहे. त्यात प्रसंगोचित नवनवीन विषयांची भर टाकली आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे बहुतांश सर्व पैलू पुस्तकात समाविष्ट करण्याचा अटोकाट प्रयत्न केला आहे. या पुस्तकाच्या लेखनात कायद्याच्या तरतुदी जशाच्यातशा पुनर्मुद्रित न करणे, शक्यतो या तरतुदींचे शब्दश: भाषांतर टाळणे याकडे विशेष कटाक्ष होता. विशिष्ट पाठामागची मूळ संकल्पना, मूलभूत व्याख्या या अधिक सुलभ आणि रोचकपणे वाचकांपुढे ठेवाव्यात यावर भर दिला आहे. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eसमाजमाध्यमे, ओटीटी यांसारख्या नवीन माध्यमांमुळे अभिव्यक्तीचे क्षितिज अभूतपूर्वरीत्या विस्तारत आहे, नवनवीन आयामांद्वारे लोक अभिव्यक्तीचे नवीन प्रयोग उत्साहापूर्वक स्वीकारत आहेत. हा विस्तार असाच होत राहील. अभिव्यक्तीच्या नित्य नव्या परिमाणांना आजमावत व्यक्तिस्वातंत्र्याचा मूलमंत्र उपलब्ध मर्यादांच्या कक्षेत अधिकाधिक प्रभावीपणे कसा उच्चारता येईल हे बघणे गरजेचे आहे. या प्रवासात वाचकांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eMarathi language book on Freedom of expression and law in the context of media journalism. Advocate Chaitanya Dharurkar has elaborated on subjects of freedon of speech, Journalism, Film and televison, Theatre and literaruture, contempt of court, social media etc. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964782666019,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1067-abhiwyaktiSwatantrya-3d.jpg?v=1750158374"}],"url":"https:\/\/kanakbook.in\/collections\/kaaydaa.oembed","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}