{"title":"इतिहास","description":"","products":[{"product_id":"sultanat-e-khudadad","title":"सुल्तनत-ए-खुदादाद","description":"\u003cp\u003e  ‘टिपू सुलतान’ कसा होता ? तर तो एक उत्तम प्रशासक होता. टिपूने आपल्या राज्यात जलपुनर्भरण, कृषी धोरण, धरणे, व्याजविरहित बँकींग प्रणाली, कृषीपूरक उद्योग, साखर कारखान्यांची उभारणी, आधुनिक यंत्रनिर्मिती, वैद्यकीय क्षेत्रातील सुधारणा अशी विविध धोरणे राबवली. परराष्ट्र संबंध, जहाज बांधणी या क्षेत्रांत अविस्मरणीय कामगिरी केली. इतकेच नव्हे तर, त्याने रयतेसाठी ‘आठ कलमी’ घोषणापत्र प्रसिद्ध केले होते. ‘राज्यकर्ता म्हणून शासकीय खजिन्यात अपहार केल्यास मला फाशीची शिक्षा देण्यात यावी, तसेच कोणत्याही लष्करी मोहिमेवर पाठवल्यास वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार काम करेन, यात कसूर केल्यास फाशी देण्यात यावी’, असे या जाहीरनाम्यात स्पष्ट केले होते. टिपूच्या ग्रंथालयात एक हजार ८८९ इतकी पुस्तके होती.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e   त्यातील सर्व पुस्तके केंब्रीज व ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ग्रंथालयात आजही सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. टिपूने स्वत: ४४ पुस्तकांची निर्मिती केली आहे. टिपूची ही सर्व पुस्तके देशातील विविध पुराभिलेख विभागात जपून ठेवलेली आहेत. दुर्देवाने इतिहासात क्वचितच त्याची ही बाजू समोर आली आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  इतिहास संशोधक सरफराज अहमद यांनी या पुस्तकातून ‘खरा टिपू’ शोधून काढण्याचे महत्त्वाचे काम केले आहे. हे पुस्तक संतुलित, न्यायपूर्ण इतिहास जगासमोर मांडून सामाजिक सौहार्द व एकात्मता सक्षम करण्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य करू शकते. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  हे पुस्तक इतिहासप्रेमी वाचक व संशोधकांच्या निश्चितच पसंतीस पडेल याची खात्री वाटते.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964678398243,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/918f.jpg?v=1750154801"},{"product_id":"bhagini-nivedita-yanche-swatantryasangramatil-yogdan","title":"भगिनी निवेदिता यांचे स्वातंत्र्यसंग्रामातील योगदान","description":"\u003cp\u003eभगिनी  निवेदिता\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eयांचे आयुष्य अत्यंत प्रेरणादायी होते.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eत्यांच्या चरित्रातील महत्त्वाचा कालखंड \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eस्वातंत्र्यसंग्रामाने व्यापलेला आहे. स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे कार्य अतुलनीय आहे. या कार्याचा परिचय करण्याचा हा एक लहानसा प्रयत्न. त्यांच्या सामाजिक जाणिवांबरोबर राष्ट्रभावनादेखील अत्यंत प्रखर होती. ही परदेशी महिला भारताची सुकन्या झाली आणि तिने देशाप्रती असलेले आपले कर्तव्य चोख बजावले. त्यांच्या कार्याची कल्पना त्यांच्या भाषणांमधून आणि लिखाणांमधून येते. त्यांच्या आजवरच्या लिखाणाचे केलेले परिशीलन आणि विचारमंथन यांचा परिपाक म्हणजे हे पुस्तक आहे. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eत्यांनी आपले सारे जीवन देशाच्या विकासासाठी \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eआणि स्वातंत्र्यासाठी झगडण्यात वेचले. अनेक वेळा संकटांना सामोरे जाऊन देशबांधवांच्या खांद्याला खांदा लावून त्या स्वातंत्र्यासाठी लढल्या. त्यांच्या या संघर्षमय जीवनाला \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eशतशः प्रणाम....!\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964683673891,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/932f.jpg?v=1750154882"},{"product_id":"aitihasik-shodhnibandh","title":"ऐतिहासिक शोधनिबंध","description":"\u003cp\u003e डॉ. कांबळे गेली सुमारे साडेतीन दशके रत्नागिरीत राहत आहेत व म्हणूनच कोकणच्या इतिहासाकडे ते साहजिकच ओढले जातात. त्यातूनच कोकणच्या संदर्भातील कोकण गांधींचे कार्य, विजयदुर्गचा इतिहास, कोकणातील इतिहास संशोधक, सावरकर आणि रत्नागिरी, वि. का. राजवाड्यांचे स्मरण, डॉ. आंबेडकरांच्या संदर्भातील आकाशवाणीवर प्रा. कांबळे यांनी दिलेली तीन वेगवेगळी भाषणे त्यांच्या वेगळेपणाची पुन्हा एकदा साक्ष पटवतात. कोकणातील वृत्तपत्रांचा इतिहास, कोकणातील ग्रंथालय चळवळीचा इतिहास, कोकणातील शेतकरी आंदोलनाचा इतिहास असे वेगवेगळे विषय शोधनिबंधात निवडताना दिसतात.  \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e कोकणातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना, इतिहासकार सदाशिव आठवले, मराठेकालीन व्यापार-उद्योग व दळणवळण, मराठेकालीन दुष्काळ, इत्यादी लेख वाचल्यावर लक्षात येते ते असे की, हा शोधनिबंध संग्रह म्हणजे प्राचीन ते अर्वाचीन कोकणसंबंधीचा एक संदर्भ ग्रंथच होय! या संग्रहातील प्रत्येक लेखाच्या शेवटी सविस्तर टिपा जोडल्या असल्यामुळे ग्रंथाचे संदर्भमूल्यही अधिक वाढले आहे. मराठी वैचारिक साहित्यात डॉ. कांबळे यांच्या ‘ऐतिहासिक शोधनिबंध संग्रहा’मुळे चांगलीच भर पडली आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e(प्रस्तावनेतून...)\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964684132643,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/938f.jpg?v=1750154909"},{"product_id":"europatil-arambhichya-vidyapeethancha-uday","title":"युरोपातील आरंभीच्या विद्यापीठांचा उदय","description":"\u003cp\u003eसालेर्नो, बोलोग्ना आणि पॅरिस ही युरोपातील आरंभीची विद्यापीठे होत. या विद्यापीठांचा उदय नेमका केव्हा झाला हे सांगता येत नाही. या विद्यापीठांना संस्थापक नाही. ही विद्यापीठे उदयास आली आणि वाढत गेली. आरंभी या विद्यापीठांना त्यांच्या स्वत:च्या इमारती नव्हत्या. त्यांना त्यांची स्वत:ची ग्रंथालये नव्हती आणि प्रयोगशाळाही नव्हत्या! प्राचीन भारतात तक्षशिला, नालंदा ही प्रसिद्ध विश्वविद्यालयेच होती. बाहेरून आलेल्या आक्रमकांनी ती उद्ध्वस्त केली. इ. स. १८५७मध्ये लंडन विद्यापीठाच्या धर्तीवर हिंदुस्थानात पहिली तीन विद्यापीठे कोलकाता, मुंबई आणि मद्रास (हल्लीचे चेन्नई) येथे सुरू झाली. हिंदुस्थानातील विद्यापीठ शिक्षणाची परंपरा युरोपात स्थापन झालेल्या आरंभीच्या विद्यापीठांपासून येते; नालंदा, तक्षशिलेकडून नव्हे! \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eलेखक रवींद्र लक्ष्मण लोणकर यांनी सर परशुराम भाऊ महाविद्यालय, पुणे येथे ३० वर्षे इतिहास विषयाचे अध्यापन केले. ‘रेनेसॉं’ हा त्यांचा विशेष अध्ययनाचा विषय आहे.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964684788003,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/942f.jpg?v=1750154932"},{"product_id":"prarambhik-bharat","title":"प्रारंभिक भारत - प्रागैतिहासिक काळ ते मौर्यकाळ","description":"\u003cp\u003eसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कला शाखेच्या (F.Y.B.A.) २०१९-२० च्या सुधारित अभ्यासक्रमानुसार (CBCS पॅटर्न) लिहिलेले क्रमिक पुस्तक.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतसेच महाराष्ट्रातील इतर सर्व विद्यापीठातील इतिहास व स्पर्धा परीक्षा यांच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964685803811,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/950f.jpg?v=1750154970"},{"product_id":"samatanand-anant-hari-gadre","title":"समतानंद अनंत हरी गद्रे","description":"\u003cp\u003eजातिभेद व अस्पृश्यता हे दोन मोठे शाप आपल्या देशाला मिळाले आहेत. त्याचे समूळ निराकरण करण्याकरिता संत, विचारवंत, समाजसुधारक यांनी आपले जीवन समर्पित केले. यामध्ये सध्याच्या काळात विस्मरणात गेलेले एक नाव म्हणजे समतानंद उर्फ अनंत हरी गद्रे. ऑक्टोबर १८९० मध्ये जन्म व १९६७ मधे मृत्यू असा त्यांचा जीवनप्रवास.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eयाप्रवासामध्ये, त्यांच्या शब्दात सांगायचे तर, त्यांनी अनेक ’भानगडी’ केल्या. टिळकांच्या दौर्यातील भाषणांचे शब्दांकन करणारे वृत्तपत्रकार, ’मौज’ व ’निर्भीड’ साप्ताहिकांचे संस्थापक व संपादक आणि सरतेशेवटी अस्पृश्यतानिवारणाचे काम निष्ठेने करणारे समाजसुधारक. सत्यनारायणाच्या पूजेच्या वेळी गोरगरिबांना परवडणारा झुणकाभाकरीचा प्रसाद वाटणे आणि विशेष म्हणजे पूजेला बसलेल्या हरिजन दांपत्याचे चरणतीर्थ पप्राशन करणे हा त्यांच्या अस्पृश्यतानिवारण चळवळीतील परमोच्च बिंदू!\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eअसे हे बहुपेडी, बहुआयामी व्यक्तिमत्त्व त्यांच्या कार्याची दखल, आठवण व नोंद, ही कायमस्वरूपी राहावी म्हणून हा चरित्र लेखनाचा प्रपंच.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964687737123,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/966f.jpg?v=1750155042"},{"product_id":"bharatiya-lokshahicha-itihas","title":"भारतीय लोकशाहीचा इतिहास","description":"\u003cp\u003eभारताच्या हजारो वर्षांच्या गौरवशाली इतिहासाच्या विविध पैलूमध्ये वर्तमान संदर्भात\n\u003cbr\u003eलोकशाही शासन व्यवस्थेचा इतिहाससुद्धा फार प्राचीन आहे . या प्राचीन इतिहासाच्या\n\u003cbr\u003eसंदर्भात सखोल संशोधन करून लेखकाने आजपर्यंत अंधारात असलेल्या\n\u003cbr\u003eमाहितीला या पुस्तकाद्वारे उजाळा दिला आहे.\n\u003cbr\u003eवैदिक काळ, रामायण काळ, महाभारत काळ, बौद्ध काळ , इंग्रज काळ आणि\n\u003cbr\u003eस्वातंत्र्य प्राप्ती नंतरचा काळ या कालावधीत कोणकोणत्या प्रकारच्या जनकल्याणाच्या \n\u003cbr\u003eपरंपरा आणि प्रथा प्रचलित होत्या , इत्यादि बाबी  बद्दल दुर्मिळ माहिती मनोरंजक\n\u003cbr\u003eघटनांसह या पुस्तकात ग्रंथीत केल्या आहेत. या व्यातरिक्त जगातल्या अनेक देशामध्ये\n\u003cbr\u003e 'समकालीन लोकशाही व्यवस्था' अथवा अन्य शासन व्यवस्था च्या समवेशासह\n\u003cbr\u003eहे  पुस्तक भारतीय लोकशाही इतिहासावर लिहिलेला एक संपूर्ण ग्रंथ आहे.  \n\u003cbr\u003e \n\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964688458019,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/970f.jpg?v=1750155067"},{"product_id":"aajkalcha-bharat","title":"आजकालचा भारत","description":"\u003cp\u003eडायमंड पब्लिकेशन्स आणि Indian Council of Historical research यांनी संयुक्तपणे प्रकाशित केलेली नामवंत इतिहास संशोधकांची महत्वाची पुस्तके. रजनी पाम दत्त यांच्या India Today या ग्रंथाचा मराठी अनुवाद \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964690686243,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1f.jpg?v=1750155154"},{"product_id":"bhartiya-itihasacha-abhyas","title":"भारतीय इतिहासाचा अभ्यास","description":"\u003cp\u003eडायमंड पब्लिकेशन्स आणि Indian Council of Historical research यांनी संयुक्तपणे प्रकाशित केलेली नामवंत इतिहास संशोधकांची महत्वाची पुस्तके. डी डी कोसंबी  यांच्या an introduction to the study of Indian History या ग्रंथाचा मराठी अनुवाद\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964690751779,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/2f.jpg?v=1750155159"},{"product_id":"prachin-bharatacha-rajakiya-itihaas","title":"प्राचीन भारताचा राजकीय इतिहास","description":"\u003cp\u003eडायमंड पब्लिकेशन्स आणि Indian Council of Historical research यांनी संयुक्तपणे प्रकाशित केलेली नामवंत इतिहास संशोधकांची महत्वाची पुस्तके. हेमचंद्र रायचौधरी  यांच्या Political History of Ancient India या ग्रंथाचा मराठी अनुवाद\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964690915619,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/3f.jpg?v=1750159654"},{"product_id":"akbar-te-aurangzeb","title":"अकबर ते औरंगजेब","description":"\u003cp\u003eडायमंड पब्लिकेशन्स आणि Indian Council of Historical research यांनी संयुक्तपणे प्रकाशित केलेली नामवंत इतिहास संशोधकांची महत्वाची पुस्तके. डब्लू. एच. मूरलण्ड  यांच्या From Akbar to Aurangzeb या ग्रंथाचा मराठी अनुवाद\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964691112227,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/4f.jpg?v=1750155168"},{"product_id":"aurangzeb","title":"औरंगजेब","description":"\u003cp\u003eडायमंड पब्लिकेशन्स आणि Indian Council of Historical research यांनी संयुक्तपणे प्रकाशित केलेली नामवंत इतिहास संशोधकांची महत्वाची पुस्तके. यदूनाथ सरकार  यांच्या Aurangzeb  या ग्रंथाचा मराठी अनुवाद\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964691276067,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/5f.jpg?v=1750155174"},{"product_id":"britishanchi-bharatatil-rajniti","title":"ब्रिटीशांची भारतातील राजनिती","description":"\u003cp\u003eडायमंड पब्लिकेशन्स आणि Indian Council of Historical research यांनी संयुक्तपणे प्रकाशित केलेली नामवंत इतिहास संशोधकांची महत्वाची पुस्तके. एस. गोपाल  यांच्या british Policy In India या ग्रंथाचा मराठी अनुवाद\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964691439907,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/6f.jpg?v=1750155179"},{"product_id":"mauryottar-ani-guptkalin-rajaswa-paddhati","title":"मौर्योत्तर व गुप्तकालीन राजस्व पध्द्ती","description":"\u003cp\u003eडायमंड पब्लिकेशन्स आणि Indian Council of Historical research यांनी संयुक्तपणे प्रकाशित केलेली नामवंत इतिहास संशोधकांची महत्वाची पुस्तके. डी. एन.  झा  यांच्या Revenue Systems in Post Maurya and Gupta Times या ग्रंथाचा मराठी अनुवाद\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964691538211,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/7f.jpg?v=1750155184"},{"product_id":"prachin-bharartatil-rajakiya-vichar-aani-sanstha","title":"प्राचीन भारतीय राजकीय विचार आणि संस्था","description":"\u003cp\u003eडायमंड पब्लिकेशन्स आणि Indian Council of Historical research यांनी संयुक्तपणे प्रकाशित केलेली नामवंत इतिहास संशोधकांची महत्वाची पुस्तके. राम शरण शर्मा  यांच्या Aspects of Political Ideas and Institutions in Ancient  India  या ग्रंथाचा मराठी अनुवाद\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964691570979,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/8f.jpg?v=1750155188"},{"product_id":"mogalkalin-mahsul-paddhati","title":"मोगलकालीन महसूल पद्धती","description":"\u003cp\u003eडायमंड पब्लिकेशन्स आणि Indian Council of Historical research यांनी संयुक्तपणे प्रकाशित केलेली नामवंत इतिहास संशोधकांची महत्वाची पुस्तके. एन. ए. सीद्दीकी यांच्या Land Revenue administrations under the Mughals या ग्रंथाचा मराठी अनुवाद\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964691669283,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/9-mogalkalinmahsulpaddhati-3d.jpg?v=1750155193"},{"product_id":"prachin-bharatiya-sanskruti-va-sabhyata","title":"प्राचीन भारतीय संस्कृती व सभ्यता","description":"\u003cp\u003eडायमंड पब्लिकेशन्स आणि Indian Council of Historical research यांनी संयुक्तपणे प्रकाशित केलेली नामवंत इतिहास संशोधकांची महत्वाची पुस्तके. डी डी कोसंबी यांच्या Culture and Civilization of Ancient India या ग्रंथाचा मराठी अनुवाद\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964691800355,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/10f.jpg?v=1750155198"},{"product_id":"akbarkalin-hindustan","title":"अकबरकालीन हिन्दुस्थान","description":"\u003cp\u003eडायमंड पब्लिकेशन्स आणि Indian Council of Historical research यांनी संयुक्तपणे प्रकाशित केलेली नामवंत इतिहास संशोधकांची महत्वाची पुस्तके. डब्लू. एच. मूरलण्ड यांच्या India at the Death of Akbar या ग्रंथाचा मराठी अनुवाद\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964691996963,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/11f.jpg?v=1750155204"},{"product_id":"maharashtratil-parivartanacha-itihas","title":"महाराष्ट्रातील परिवर्तनाचा इतिहास","description":"\u003cp\u003eमहाराष्ट्रातील परिवर्तनाचा इतिहास\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964692357411,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/14f.jpg?v=1750155214"},{"product_id":"aitihasik-shabdkosh","title":"ऐतिहासिक शब्दकोश","description":"\u003cp\u003eसन १८७८ च्या सुमारास काव्येतिहास-संग्रहाने इतिहास-साधन-प्रकाशनाचा पहिला पद्धतशीर पाया घातला. आधुनिक काळातील मराठी इतिहाससाधन-प्रसिद्धीचा तो उष:कालच असल्यामुळे कै. सान्यांनी त्या साधनांचा परिचय करून देताना जुन्या अवघड किंवा अपरिचित शब्दांची शक्य तितकी फोड करून व अर्थाच्या टीपा देऊन ती सुलभ केली. त्यांनी तसे केले नसते तर त्यांनी छापलेल्या बखरी किंवा पत्रे, यादी वगैरे वाचकांना सुबोध झाली नसती. काव्येतिहाससंग्रहाच्या जन्मानंतर खरे, राजवाडे यांचे मराठी इतिहास-साधन-संशोधनाचे प्रचंड उद्योग सुरू झाले आणि  त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन मराठी इतिहाससंशोधनाचा एक महान उद्योग महाराष्ट्रात सुरू झाला व आजतागायत तो विविध शाखांनी अगदी भरगच्च झाला आहे. इतका की, मराठी इतिहाससाधन-ग्रंथांची अद्ययावत मोजदाद करावयाची म्हटल्यास ती हजारांनी करावी लागेल.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e पटवर्धनांचा कोश फारशी शब्दांपुरता झाला; परंतु मराठीतील शेकडो अपरिचित शब्द आढळत. त्यांचाही अर्थ लागण्याची पंचाईत होई. कारण सर्व ऐतिहासिक साधनांचा उपयोग करून त्यांत आलेल्या कठीण शब्दांचा केलेला असा कोणताच कोश उपलब्ध नव्हता. १९३० साली जी अडचण कायम होती ती आजतागायतही तशी कायम आहे म्हणून ती कायमची दूर करता आली तर पहावी या हेतूने माझ्या या ऐतिहासिक शब्दकोशाचा उपक्रम झालेला आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964696387875,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/86f.jpg?v=1750155369"},{"product_id":"madhyayugin-maharashtra","title":"मध्ययुगीन महाराष्ट्र","description":"\u003cp\u003eमराठ्यांच्या राजकीय इतिहासाची चौकट आता सगळ्यांनाच साधारण माहीत झाली आहे. परंतु मध्ययुगीन मराठ्यांचे सामाजिक जीवन आणि त्यांचा आर्थिक विकास यावर म्हणावे तितके लक्ष दिले गेलेले नाही. प्रस्तुत ग्रंथात मध्ययुगीन महाराष्ट्राच्या समाजिक आर्थिक जीवनाच्या आणि त्या आनुषंगिक विषयांचा परिचय काही शोध निबंधांच्या द्वारे करून देण्याचा प्रयत्न केला आहे. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964696518947,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/91f.jpg?v=1750155375"},{"product_id":"maharashtra-aani-marathe","title":"मराठे आणि महाराष्ट्र","description":"\u003cp\u003eमहाराष्ट्राच्या मध्ययुगीन इतिहासावर प्रकाश पाडणारे शोध निबंध \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964696813859,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/92f.jpg?v=1750155380"},{"product_id":"marathyanche-itihaskar","title":"मराठयांचे  इतिहासकार","description":"\u003cp\u003e जगाच्या इतिहासात मध्ययुगाला एक विशिष्ट स्थान आहे. त्याचे कारण या कालखंडात राष्ट्र-राज्यांचा (Nation State) उदय झाला. भारत याला अपवाद नव्हता. मोगल साम्राज्यशाहीच्या विघटनाला सतराव्या शतकातच प्रारंभ झाला होता, अन्य विदेशी सत्ताही लोप पाऊ लागल्या होत्या. अशा या काळात महाराष्ट्राची संस्कृती, धर्म, भाषा आणि स्वतंत्रता यांच्या संरक्षणासाठी आणि अभ्युदयासाठी शिवाजी महाराजांची सतराव्या शतकात ‘हिंदवी स्वराज्या’ची स्थापना केली आणि ‘मराठी राष्ट्र’ उदयास आले.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e अठराव्या शतकात मराठी सत्तेने सारा भारत उपखंड प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या आपल्या वर्चस्वाखाली आणला. त्यामुळे देशी-विदेशी लोकांना मराठ्यांच्याविषयी कुतूहल वाटू लागले. मराठी सत्तेचा उदय, विस्तार आणि र्‍हास या चित्तवेधक विषयावर स्थानिक, राष्ट्रीय आणि विलायती पातळीवर, विविध भाषांतून आणि विविध स्तरांतील व्यक्तीकडून लेखन होऊ लागले आणि आजही होत आहे. संस्कृत, मराठी, फार्सी, पोर्तुगीज, इंग्रजी, जर्मन, फ्रेंच, डच आणि अन्य भाषांतून मराठ्यांच्या कार्याची नोंद होऊ लागली. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964697338147,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/107f.jpg?v=1750155391"},{"product_id":"maharashtratil-chalanacha-itihas","title":"महाराष्ट्रातील चलनाचा इतिहास (१६७४- १९४७)","description":"\u003cp\u003e कोणतेही चलन ही तत्कालीन अर्थव्यवस्थेची नाडी असते. सध्याचे चलन हाताळताना या चलनाच्या इतिहासाबाबत आपोआप उत्सुकता निर्माण होते. विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्राला, लेणी, किल्ले या परंपरांप्रमाणे चलनाची, नाण्यांची मोठी परंपरा आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e आधुनिकपूर्व महाराष्ट्रातील चलनाला, नाण्यांना केंद्रस्थानी ठेऊन, इतिहासाच्या साक्षीने मांडलेला हा एक छोटा अभ्यास आहे. आधुनिक चलनाचा पाया म्हणून, मराठा चलन व ब्रिटिश चलन यांच्यातील सातत्य बदलाचा हा एक मनोरंजक व माहितीपूर्ण असा वेध आहे.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964697600291,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/109f.jpg?v=1750155401"},{"product_id":"raja-shivchhatrapati","title":"श्री राजा शिवछत्रपती भाग 1 व 2","description":"\u003cp\u003eज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे लिखित शिवचरित्र. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964698419491,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/118f.jpg?v=1750155432"},{"product_id":"bharatiya-itihas-upsc-mpsc","title":"भारतीय इतिहास (एम. पी.एस. सी.- यु,पी.एस. सी.)","description":"\u003cp\u003eराज्यशास्त्र विद्यार्थी व प्राध्यापकांना उपयुक्त संदर्भ ग्रंथ. MPSC \/ upsc च्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त पुस्तक.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964698845475,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/125f.jpg?v=1750155447"},{"product_id":"adilshahi-farmane","title":"आदिलशाही फर्माने","description":"\u003cp\u003eहे पुस्तक विजापूरच्या आदिलशाहीच्या फर्मनांचे  आहे. महाराष्ट्राच्या बहुअंशी भूभागवर आदिलशाही राजवट होती. आदिलशाहां ची धोरणे आणि राज्यकारभार यांच्या अभ्यासासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. यापुस्तकात फारसी फर्मनांची प्रतिरूपे दिली आहेत. त्याचबरोबर ओळवार फार्सी संहिता, मराठी सारांश आणि टीपा दिल्या आहेत. मध्ययुगीन भारताच्या विशेषतः आदिलशाही फर्मनांच्या अभ्यासकांना ही पुस्तक उपयोगी ठरेल. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964701335843,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/144f.jpg?v=1750155543"},{"product_id":"adhunik-jag","title":"आधुनिक जगाचा इतिहास","description":"\u003cp\u003eआधुनिक जगाच्या इतिहासाला आदि आहे पान अंत नाही. एकविसाव्या शतकात छायाचित्रण, दूरदर्शन आणि विविध प्रसारमध्यमांनी जग आपल्या घरात आणलं आहे. क्षणोक्षणी इतिहास घडत आहे. तो अक्षरबद्ध करणे अधिक आव्हानात्मक होत  चालले आहे. विविध संदर्भाच्या माध्यमातून आधुनिक जगाच्या इतिहासाकडे बघण्याचा झरोका म्हणजे हा ग्रंथ. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964701466915,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/148f.jpg?v=1750155549"},{"product_id":"senapati-hambirrao-mohite","title":"सेनापती हंबीरराव मोहिते","description":"\u003cp\u003eशिवप्रभुंच्या चतुर आणि चाणाक्ष नजरेत भरलेले हंबीरराव हे स्वराज्याचे सरलष्कर झाले आणि महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात पंतप्रधान आणि युवराजांच्या श्रेणीत विराजमान झाले. तळबीडच्या पाटील-देशमुख घराण्यातील शौर्याची परंपरा लाभलेले हंबीरराव एक अस्सल हिरा म्हणून महाराजांच्या राजमुकुटात शोभायमान झाले.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून औरंगजेबाच्या आक्रमणास सहस्रार्जुनाप्रमाणे थोपवून धरण्यासाठी ते सात वर्षे शंभू राजांसमवेत रणभूमीवर झुंजले आणि त्यातच त्यांना वीरमरण आले! संभाजीराजांच्या जिरेटोपातील ते सुवर्णालंकार तर होतेच, पण त्यांच्या बाहुतील रसरसता स्नायू आणि हृदयातील धमनीचा अंत:पटलसुद्धा होते.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e सेनापती हंबीरराव मोहिते यांचे पहिलेवहिले समग्र चरित्र प्रत्येक मराठी वाचकाने जरूर वाचावे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964702187811,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/151f.jpg?v=1750155558"},{"product_id":"zansi-sansthanchya-maharani-laxmibai","title":"झांशी संस्थानच्या महाराणी लक्ष्मीबाईसाहेब यांचे चरित्र","description":"\u003cp\u003e झाशी संस्थानच्या महाराणी लक्ष्मीबाई हे भारतीय इतिहासाच्या कालपटलावर अजरामर झालेलं\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eव्यक्तिमत्त्व ... १८५७ च्या ऐतिहासिक घटनेला ‘बंड’, ‘जिहाद’, ‘स्वातंत्रसमर’\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकिंवा ‘शिपाईगर्दी’ कुणी काहीही म्हणो. ज्या वीरांनी ब्रिटिशांविरुद्ध झुंज दिली त्यामध्ये या ‘अद्वितीय स्त्रीरत्ना’चे स्थान अव्वल दर्जाचे आहे ...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eज्येष्ठ इतिहास संशोधक रावबहादूर दत्तात्रेय बळवंत पारसनीस यांनी १८९४ साली ‘महाराणी लक्ष्मीबाईसाहेब’ यांचे चरित्र मराठीमध्ये प्रसिद्ध करून प्रापल्याला उपकृत केले ...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e१८५७ च्या ऐतिहासिक घटनेला दीडशे वर्ष होऊन गेल्यावर हा ग्रंथ पुनःप्रकाशित होत आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअशा या वीरांगनेला आमचा मानाचा मुजरा ...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964702220579,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/152f.jpg?v=1750155562"},{"product_id":"peshvekalin-pune","title":"पेशवेकालीन पुणे","description":"\u003cp\u003eजो समाज आपल्या ऐतिहासिक वारश्याबद्दल जागरुक असतो त्या समाजाचा भविष्यकाळ हा उज्जवल असतो.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e ऐतिहासिक वारसा हा शहराच्या निर्मितीपासुन विविध टप्प्यांवर झालेला विकास, घडलेल्या घटना यांतून सापडतो. ‘पूना इन बायगॉन डेज’ या इंग्रजी ग्रंथात द. ब. पारसनीस यांनी पुणे शहराच्या निर्मितीपासुन पेशवाईच्या अंतापर्यंत विविध स्थळे, घडामोडी, वास्तू, सण-उत्सव यांचे निवेदन केले आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e या मुळ इंग्रजी ग्रंथाचा सुरस अनुवाद.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964702318883,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/153f.jpg?v=1750155567"},{"product_id":"bharatache-sanskruti-vaibhav","title":"भारताचे संस्कृतीवैभव","description":"भारताच्या संस्कृतिवैभवाच्या खुणा प्राचीन शिलालेख- ताम्रपट, यांमध्ये विखुरलेल्या आहेत. प्राचीन नाणी, लेणी, गुंफा इत्यादींच्या अभ्यासाने सम्राट अशोक, सातवाहन राजकुल, शिलाहार राजे यांच्याबद्दल नवीन माहिती मिळते इतकेच नव्हे तर तत्कालीन शहरांची आणि जनजीवनाचीही कल्पना स्पष्ट होते. कान्हेरीस नव्याने सापडलेल्या शिलालेखांवरून कान्हेरी हे एक बौद्ध शैक्षणिक केंद्र होते हे सिद्ध झाले. पुरातत्त्वाचे अभ्यासक, संशोधक आणि जनसामान्य अशा बहुविध रुचीच्या वाचकांना आवडेल असा भुरळ पाडणारा आशय अत्यंत आकर्षक शैलीत या पुस्तकात मांडला आहे.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964703105315,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/457f.jpg?v=1750155603"},{"product_id":"diamond-quiz-series-history","title":"डायमंड क्विझ सीरीज : इतिहास","description":"\u003cp\u003eस्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त प्रश्नसंच \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964704612643,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/524f.jpg?v=1750155665"},{"product_id":"marathyanchi-lashkari-vyavastha","title":"मराठयांची लष्करी व्यवस्था","description":"\u003cp\u003eथोर इतिहास संशोधक डॉ एस एन सेन यांनी मराठी, ईग्रजी व पोर्तुगीज साधनांचा अभ्यास करून प्रस्तुत ग्रंथ लिहिला. मराठ्यांची लष्करी व्यवस्था समजून घेण्यासाठी हा अत्यंत मोलाचा ग्रंथ आहे. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964709036323,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/563f.jpg?v=1750155708"},{"product_id":"gandhi-nawache-mahtma","title":"गांधी नावाचे महात्मा","description":"\u003cp\u003eमहात्मा गांधींचे निधन होऊन ३० जानेवारी २०१२ रोजी ६४ वर्षे पूर्ण होत आहेत. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e या महापुरुषाच्या सर्वंकष अशा जीवनविषयक विचारांचा प्रभाव गेली अनेक वर्षे कायम आहे आणि यापुढेही तो तसाच निरंतर राहणार आहे. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e गांधीजींची अहिंसा, शांतता, संवाद आणि समन्वय ही मूलभूत मूल्ये आजच्या बदलत्या वैज्ञानिक-यांत्रिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक पर्यावरणातही सुसंगत आहेत.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e गांधीजींचे विचार सर्व स्तरांमधील आणि सर्व वर्गांमधील माणसाला अंतर्मुख करणारे आहेत, एवढेच नव्हे तर आजच्या जीवघेण्या जीवनसंघर्षात आपापल्या जीवनशैलीचा पुनर्विचार करायला लावणारे आहेत.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e त्यांच्या या विचारांवरील - म्हणजेच गांधीवादावरील आणि पर्यायाने गांधीजींवरील- नेहरू, आचार्य अत्रे, सुभाषचंद्र बोस, जयप्रकाश नारायण, डॉ. आंबेडकर, शंकरराव खरात... अशा प्रतिभावंत विचारवंतांचे विचारप्रवर्तक लेख या ग्रंथात समाविष्ट केले आहेत. असे लेखक आजच्या काळात किमान वाचण्यास मिळणे, हेही तसे दुर्लभच!\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964716966179,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/591.jpg?v=1750155793"},{"product_id":"shivcharitra-sahitya-15","title":"शिवचरित्र साहित्य खंड 15 वा","description":"\u003cp\u003eअस्सल कागदपत्रांच्या साहाय्याव्यतिरिक्त ह्या बखरीं वाचूं गेले असतां एक प्रकारची चमत्कारिक चूक होते. ह्या बखरींतून जो मजकूर खरा असतो तो त्यांत असलेल्या खोट्या मजकुरापासून विलग काढून घेतां येत नाही. सारांश, केवळ ह्या बखरींवर भिस्त ठेवून इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केल्यास, सत्यासत्यतेच्या निर्णयाची कसोटी जवळ नसल्यामुळें, तो वायफळ जाण्याची बहुतेक खात्री आहे. पुष्कळ बखरींतून एकच मजकूर एकसारिखा आल्यास, बहुमताच्या न्यायानें, तो खरा मानण्याचीहि ह्या बखरींच्या संबंधाने सोय नाही. पुष्कळ ऐतिहासिक गोष्टींच्या अभावाचें साधारणत्व ह्या बखरींतून सांपडतें; परंतु, तेवढ्यावरून त्या गोष्टी झाल्याच नाहीत असे विधान करणे मोठे धोक्याचें काम होईल. तात्पर्य, एक अस्सल चिटोरें सर्व बखरींच्या बहुमताला हाणून पाडण्यास बस्स आहे.... कांकी विश्वासार्ह अस्सल कागदाच्या एका चिटोर्‍यावर जितका विश्वास ठेवितां येतो तितका स्वदेशीय व विदेशीय बखरकारांच्या व बखरवजा इतिहासांच्या भाकड कथांवरती अर्थात् ठेवितां येत नाही.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964721586467,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/646f.jpg?v=1750155976"},{"product_id":"samanya-adhyayan-paper-1-itihas","title":"सामान्य अध्ययन पेपर - 1 इतिहास (एमपीएससी)","description":"\u003cp\u003eMPSC च्या सुधारित अभ्यासक्रमनुसार लिहिलेले सामान्य अध्ययन पेपर - 1 इतिहास विषयाचे पुस्तक\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964722700579,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/669f.jpg?v=1750156032"},{"product_id":"chhatrapati-shivaji-maharaj-ani-shivkal","title":"छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवकाल (सन 1630-1707)","description":"\u003cp\u003eइतिहास  विषयासाठी उपयुक्त क्रमिक पुस्तक. इतिहास  तसेच स्पर्धा परीक्षा विषयाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964723749155,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/678f.jpg?v=1750160025"},{"product_id":"ekonisawya-shatakatilhibdu-dharm-sudharana-chalwal","title":"एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील हिंदू धर्म सुधारणा चळवळ","description":"\u003cp\u003eएकोणिसाव्या शतकात व्यक्तिस्वातंत्र्य , सामाजिक धार्मिक बंधानांची मर्यादा, मानवतावाद, बुद्धीप्रामाण्य वाद या पाश्चात्य  विचारांची ओळख भारतीय समाजाला झाली. त्यानंतर भारतीय व विशेषत: महाराष्ट्रातील समाज व धर्म सुधारकांनी स्त्री व शुद्रांच्या हक्कांसाठी जवळजवळ शतकभर कार्य केले. त्यातूनच पुढे राष्ट्रवादाचा उदय झाला. या समाज सुधारकात मुख्यत: वेदमूर्ती बाळशास्त्री जांभेकर , लोकहितवादी , महात्मा फुले, न्या. रानडे, स्वामी दयानंद सरस्वती व गोपाळ गणेश आगरकर यांचे कार्य महत्वपूर्ण ठरते. \n\u003cbr\u003eप्रस्तुत पुस्तकाद्वारे आपल्याला या शतकातील महाराष्ट्रातील समाजाचे समाजाचे स्वरूप व सुधारकांचे कार्य यांचे आकलन होण्यास निश्चितच मदत होईल. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964727255331,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/701f.jpg?v=1750156181"},{"product_id":"adhunik-bharatacha-itihas","title":"आधुनिक भारताचा इतिहास","description":"\u003cp\u003eइतिहास  विषयासाठी उपयुक्त क्रमिक पुस्तक. इतिहास विषयाच्या व स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964732104995,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/735f.jpg?v=1750156329"},{"product_id":"etihasatil-nave-pravah","title":"इतिहासातील नवे प्रवाह","description":"\u003cp\u003eइतिहास-लेखन हे मानवाचे बौद्धिक अपत्य आहे. मानवी जीवनाशी निगडित कोणत्याही प्रश्नाचा वेध घेताना ऐतिहासिक दृष्टीचाच अवलंब करावा लागतो. त्या अर्थाने इतिहास ही भूतकाळाची कहाणी असली, तरी वर्तमानाची निकड आहे. गतकाळाच्या विश्लेषणातून मानवी जीवनाचा वर्तमान सुकर होतो ; तसेच हे विश्लेषण भविष्याचेही दिग्दर्शन करू शकते.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eगेल्या काही वर्षांत इतिहासविषयक मोठे तत्त्वमंथन घडून आले. इतिहास म्हणजे काय, त्याचे अभ्यास-विषय, इतिहासाचे तत्त्वज्ञान, इतिहासाची संशोधनपद्धती, इतिहासलेखनातील वस्तुनिष्ठता अशा अनेक विषयांवर गहन चर्चा घडून आल्या. १८व्या शतकापासून इतिहासविषयक रूढ धारणांना आव्हान देणारे नवनवे प्रवाह अवतरू लागले. या प्रवाहांनी इतिहास या विद्याशाखेच्या कक्षा अपरिमित रुंदावल्या आहेत. मात्र, त्यांचा परामर्श घेणारे ग्रंथ मराठीत फारसे उपलब्ध नाहीत. प्रस्तुत पुस्तकाद्वारे ही उणीव दूर करण्याचा एक अल्पसा प्रयत्न केला आहे. इतिहास या विद्याशाखेच्या क्षितिजावर  स्थानिक इतिहास, प्रादेशिक इतिहास, खाद्यसंस्कृतीचा इतिहास, पर्यावरणाचा इतिहास, स्त्रियांचा इतिहास, पुरुषत्वाचा इतिहास, अब्राह्मणी इतिहास, सबाल्टर्न अर्थात वंचितांचा इतिहास असे अनेक प्रवाह अवतीर्ण झाले आहेत. तसेच नवमार्क्सवाद, स्त्रीवाद, प्राच्य-प्रणाली, उत्तराधुनिकतावाद, जमातवाद अशा विविध विचारप्रणालींनी इतिहासलेखन प्रभावित केले. प्रस्तुत ग्रंथात या प्रवाहांचा व विचारप्रणालींचा परामर्श घेतला आहे. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eइतिहास विषयातील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थीगण, संशोधक व प्राध्यापकवर्ग यांना या ग्रंथाचा एक संदर्भग्रंथ म्हणून उपयोग होईल. तसेच या ग्रंथातील लेखांचा मानव्यविद्या, सामाजिकशास्त्रे व साहित्य यांच्या अभ्यासकांना व अन्य जिज्ञासू वाचकांनासुद्धा लाभ घेता येईल.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964732301603,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/737f.jpg?v=1750156339"},{"product_id":"jerusalem","title":"जेरुसलेम : एक चरित्रकथा","description":"\u003cp\u003eजेरुसलेम ही एक वैश्विक नगरी आहे. ती दोन समुदायांची राजधानी आहे आणि तीन धर्मांचं तीर्थस्थान आहे. कयामतच्या दिवसाचं हेच ठिकाण आहे आणि आजच्या इस्लाम आणि पाश्चात्त्य संस्कृतींमधल्या संघर्षाची हीच युद्धभूमी आहे. ही छोटीशी दुर्गम नगरी ‘पवित्र नगरी’ कशी बनली? कशी सार्या जगाचा केंद्रबिंदू बनली? मध्यपूर्वेत शांतता राखण्याची किल्ली या नगरीच्या हाती कशी आली?\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eनव्या स्रोतांतून माहिती मिळवून आणि आयुष्यभराच्या अभ्यासावरून मांटफिऑरी यांनी या सतत बदलत्या नगरीचा इतिहास आपल्याला उलगडून दाखवला आहे. जेरुसलेमची निर्मिती करणारे, तिचा विध्वंस करणारे, तिचा इतिहास लिहिणारे आणि तिच्यावर श्रद्धा ठेवणारे निरनिराळे स्त्री-पुरुष, राजे-राण्या, प्रेषित, कवी, जेते आणि वारांगना यांच्या हकिकती, प्रेमप्रकरणं आणि युद्धकथांच्या माध्यमातून मांटफिऑरी यांनी आपल्यासमोर हा लक्षवेधी इतिहास मांडला आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eराजा डेव्हिडपासून ते बराक ओबामापर्यंत आणि ज्यू, ख्रिश्चन, इस्लाम या धर्मांच्या जन्मापासून ते इस्राइल-पॅलेस्ताईनच्या संघर्षापर्यंतचा हा ३००० वर्षांचा भव्य इतिहास आहे. श्रद्धा, कत्तली, धर्मांधता आणि सहिष्णुतेचा हा इतिहास आहे. एक नगरी, जिचं अस्तित्व इहलोकात आणि परलोकातही आहे. हा जेरुसलेमचा इतिहास आहे.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964733186339,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/742f.jpg?v=1750156362"},{"product_id":"20vya-shatakatil-aashiyacha-itihas","title":"२० व्या शतकातील आशियाचा इतिहास","description":"\u003cp\u003eAn excellent primer on History of twentieth century Asia. Useful for all Universities in Maharashtra. आधुनिक आशियाचा इतिहास या  विषयाची सखोल मांडणी करणारे संदर्भ ग्रंथ. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातील इतिहास  विषयाच्या विद्यार्थ्याना व अभ्यासकांना उपयुक्त. स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.  \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964738625827,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/781f.jpg?v=1750156552"},{"product_id":"marahyanchya-itihasatil-chimaji-appanche-yogdan","title":"मराठ्यांच्या इतिहासातील चिमजिअप्पन्चे योगदान","description":"\u003cp\u003e‘चिमाजी आप्पा’ म्हटले की, वसईची लढाई हे सर्वसामान्यांना आणि अभ्यासकांनाही ठाऊक आहे. मराठ्यांचा हा विजय भारतीय इतिहासातील एक ‘गौरवशाली प्रकरण’ आहे. या मोहिमेमुळे चिमाजी राष्ट्रीय वीर पुरुष ठरले. वसईचा विजय हा त्यांच्या कल्पक व धाडसी नेतृत्वाचा परिणाम होता. ते एक पराक्रमी लढवय्ये तसेच मुत्सद्दीही होते. पेशव्यांच्या कौटुंबिक तसेच आर्थिक जबाबदार्‍या अतिशय बारकाईने आणि प्रामाणिकपणे पार पाडणारे कुटुंबवत्सल माणूस होते. धीरोदात्तपणा, नम्रता, सत्शील चारित्र्य, मनमिळाऊपणा इत्यादी विशेष गुण त्यांच्या ठायी होते. अठराव्या शतकाचा विचार करता, त्या काळातील ते एक आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व होते. \u003cbr\u003e    अशा या आगळ्यावेगळ्या माणसाच्या आयुष्याचा पट अनेक प्रकाशित, अस्सल आणि काही अप्रकाशित, मूळ संदर्भसाधनांच्या साहाय्याने उलगडण्याचा केलेला हा एक प्रयत्न !\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964740067619,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/787f.jpg?v=1750156577"},{"product_id":"the-blood-telegram","title":"ब्लड टेलिग्राम : \n\nबांगला देश मुक्तिसंग्रामातल्या अमेरिकेच्या भारतविरोधी कारवायांचा अप्रकाशित अन्वयार्थ","description":"\u003cp\u003eबांगला देशाच्या फाळणीवर बेतलेलं ‘ब्लड टेलिग्राम’ हे पुस्तक म्हणजे शीतयुद्धाच्या काळातल्या आंतरराष्ट्रीय राजकारणातला अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. पूर्व पाकिस्तानमधल्या (आता बांगला देश) जनतेवर पाकिस्तानी लष्कराने अनन्वित अत्याचार केले, लाखोंच्या संख्येने निष्पाप नागरिकांच्या कत्तली केल्या आणि निर्वासितांना देशोधडीला लावून भारताचा आश्रय घेण्यासाठी भाग पाडलं. त्यामुळे बांगला देशाची फाळणी ही विसाव्या शतकातल्या सगळ्यात दयनीय शोकान्तिकांपैकी एक ठरली. केवळ शीतयुद्धातल्या डावपेचाचा भाग म्हणून नव्हे, तर भारत आणि इंदिरा गांधी यांच्याबद्दलच्या वैयक्तिक आकसापोटी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष निक्सन आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार किसिंजर यांनी बांगला देशातल्या अत्याचारांविरुद्ध आवाज उठवणार्यार अमेरिकी अधिकार्यांजची गळचेपी केली, अमेरिकी कायद्याचं उल्लंघन करून पाकिस्तानला शस्त्रपुरवठा केला आणि भारताविरुद्ध युद्धात उतरण्यासाठी चीनची मनधरणी केली. त्यामुळे या युद्धाचा आवाका अकारण वाढला आणि व्यापक युद्धसमान परिस्थिती निर्माण झाली. म्हणूनच १९७१च्या बांगला देशाच्या स्वातंत्रयुद्धाच्या इतिहासाची पुनर्मांडणी करून अमेरिकेच्या भूमिकेतला दुटप्पीपणा उघडकीला आणणारं हे एक महत्त्वाचं पुस्तक ठरतं!\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964746228003,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/855f.jpg?v=1750156815"},{"product_id":"jwaljwalantejas-sambhajiraja","title":"ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा","description":"\u003cp\u003eमहाराष्ट्राच्या जागृतीची पहाट श्रीशिवरायांच्या अद्भुत कर्तृत्वातून अवतरली आणि स्वराज्याचा महन्मंगल अरुणोदय झाला. त्यानंतरची छत्रपती शंभूराजांची सारी नऊ वर्षांची कारकीर्द; पण अशी विलक्षण की कल्पित कथेलाही फिकी ठरवील. मानवी जीवनाचे एवढे उत्कट, अचाट आणि रोमांचकारी दर्शन इतिहासाने क्वचितच घेतले असावे. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e ‘राजेश्री आबासाहेबांचें जें संकल्पित तेंच करणें आम्हांस अगत्य,’ \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e हे त्यांच्या  छत्रपतित्वाच्या अनुष्ठानाचे सूत्र होते आणि आपल्या जीवनाची आहुती देईपर्यंत ते त्यापासून कधीही ढळले नाहीत. त्यामुळेच त्यांच्या अतुल्य बलिदानानंतरच्या अभूतपूर्व परिस्थितीत महाराष्ट्र असा काही खवळून उठला की, त्या अंगारात औरंगजेबाच्या बादशाहीची निम्म्याहून अधिक वर्षे होरपळून निघाली. महाराष्ट्राच्या जिवाची घालमेल शंभूराजांच्या कालखंडात एकसारखी वाढत गेली आणि अखेर तो रुद्र कोपला. मनाला गलबलवून टाकणार्‍या त्या कालावधीतील अनेक गुंतागुंतीच्या आणि अज्ञात घटनांचे पदर उलगडून सांगणार्‍या शंभूराजांच्या ह्या चरित्राइतके साधार, विस्तृत आणि समतोल भूमिकेने लिहिलेले दुसरे चरित्र नाही, असा निर्वाळा महाराष्ट्राच्या इतिहाससमीक्षकांनी एकमुखाने दिला आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964747342115,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/162f.jpg?v=1750156850"},{"product_id":"ramchandra-aamyatanche-adnyapathra","title":"रामचंद्र आमात्यांचे आज्ञापत्र","description":"\u003cp\u003e\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e रामचंद्रपंत आमात्यांचा ‘आज्ञापत्र’ अथवा शिवकालीन ‘राजनीति’ हा ग्रंथ मराठ्यांच्या इतिहासाचे एक अव्वल साधन म्हणून मानला जातो. या आज्ञापत्राचे वर्णन करताना ‘ऐतिहासिक वाङ्मयातील ‘अमूल्य रत्न’ (म. म. द. वा. पोतदार), ‘प्राचीन ऐतिहासिक वाङ्मयात असा दुसरा सर्वांगसुंदर ग्रंथ क्वचितच आढळेल’ (प्रा. वि. भि. कोलते), ‘मराठी वाङ्मयाचा अमूल्य आणि अपूर्व अलंकार’ असे उद्गार काढले आहेत. शिवकालीन राज्यकारभाराच्या तसेच मध्ययुगीन मराठी भाषेच्या अभ्यासासाठी हा ग्रंथ मौलिक स्वरूपाचा आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e प्राध्यापक अ. रा. कुलकर्णी संपादित प्रस्तुत आवृत्तीचे एक वैशिष्ट्य म्हणजे, यात सर्वमान्य आज्ञापत्राची मोडी संहिता मूळ स्वरूपात मोडी लिपीत दिली असून त्याचे ओळीबरहुकूम मराठी लिप्यंतर आणि राज्यशास्त्राचे प्राध्यापक श्री. व्यं. पुणतांबेकर यांनी केलेले इंग्रजी भाषांतर येथे एकत्रित दिले आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964747702563,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/169.jpg?v=1750156871"},{"product_id":"jedhe-shakavali","title":"जेधेशकावली","description":"\u003cp\u003eशिवछत्रपतींच्या ‘मर्‍हाष्ट राज्य’ अथवा ‘हिंदवी स्वराज्या’च्या स्थापनेत महत्त्वाची कामगिरी ‘मावळप्रांत’, मावळे आणि मावळचे देशमुख यांनी बजावली. या सर्वांचे नेतृत्व, शहाजीराजे यांच्या आज्ञेनुसार, कारीचे देशमुख कान्होजी जेधे यांचेकडे होते. ‘जेधे शकावली-करीना’ ही जेधे घराण्याचा इतिहास सांगणारी साधने मूळ मोडी लिपी, त्याचे देवनागरी लिप्यंतर आणि इंग्रजी भाषांतरासह प्रथमच ग्रंथरूपाने अभ्यासकांच्या समोर येत आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e मोगल सम्राट औरंगजेबाच्या जन्मापासून (२४ ऑक्टोबर, १६१८) ते त्याने जिंजीला वेढा घातला (८ नोव्हेंबर १६९७) पर्यंतच्या बहुतांशी प्रत्यंतर पुराव्याने सिद्ध झालेल्या ऐतिहासिक घटनांच्या नोंदी या शकावलीत आल्या आहेत.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e ‘जेधे करीना’, म्हणजे ‘कान्होजी जेध्यांच्या मर्‍हास्टाचे पहाडी कलम’ अथवा जेधे घराण्याचा इतिहास. ही दोन्ही शिवकालीन प्रकरणे परस्परांना पूरक असून सतराव्या शतकाच्या इतिहासाची विश्वसनीय साधने आहेत.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964747866403,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/170f.jpg?v=1750156875"},{"product_id":"shivpatni-saibai","title":"शिवपत्नी सईबाई","description":"\u003cp\u003eमराठ्यांच्या इतिहासामध्ये \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e अनेक कर्तृत्ववान स्त्रिया होऊन गेल्या.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  या स्त्रियांनी कधी प्रत्यक्ष तर कधी पडद्यामागे राहून आपली तेजस्वी प्रतिमा राज्यकारभारात उमटवली. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e शिवछत्रपतींच्या यशस्वी कारकिर्दीमध्ये\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  जसा मातोश्री जिजाऊंचा सहभाग होता\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  तसाच पत्नी सईबाईंचा सुद्धा होता.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  या ऐतिहासिक ललित वाङ्मयामध्ये शिवाजीमहाराज आणि सईबाई यांचे राजकीय तसेच व्यक्तिगत भावजीवन लेखकाने चित्रित केले आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e ‘प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते’ या आधुनिक म्हणीकरिता हा ऐतिहासिक पुरावाच ठरेल.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964747997475,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/172f.jpg?v=1750156880"},{"product_id":"raajkosh","title":"राजकोश","description":"\u003cp\u003eया कोशाचा अभ्यास अनेक पद्धतींनी करता येऊ शकेल. कोशातील विविध क्षेत्रांतील लोकांचे, वस्तूंचे, व्यवहाराचे आणि परंपरांचे निदर्शक असे जे शब्द आलेलेे आहेत ते शिवकालीन महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय जीवनावर कितीतरी प्रकाश पाडून जातात.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e या कोशात १६७८ मध्ये रूढ असलेल्या दक्षिणी उर्दूतील १००० हून  अधिक शब्द आलेले आहेत. या दृष्टीने शिवाजीमहाराज हे उर्दू भाषेचे पहिले कोशकार ठरतातच, पण उर्दू- संस्कृत या एकमेव कोशाचे प्रेरक ठरतात हे लक्षात घेतले पाहिजे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  अभ्यासकांना ही मोठी पर्वणीच आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964749635875,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/212.jpg?v=1750156942"}],"url":"https:\/\/kanakbook.in\/collections\/itihaas.oembed?page=2","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}