{"title":"बाल-कुमार साहित्य","description":"","products":[{"product_id":"adrushya-manus","title":"अदृश्य माणूस","description":"\u003cp\u003eती बोलत असतानाच एक अत्यंत अद्भुत गोष्ट घडली. पलंग आणि खुर्चीवरचे कपडे आपोआप गोळा झाले आणि त्या कपड्यांचा गठ्ठा हवेतून उडत जात जिन्यावरून अचानक खाली गेला. जणू कुणीतरी कपड्यांचा ढीग हातात धरून तो खाली फेकला असावा. खुर्चीच्या पाठीला अडकवलेली पाहुण्याची हॅट पुढच्याच क्षणी हवेत गोलगोल फिरायला लागली आणि मि. हॉलच्या दिशेनं अचानक चाल करून आली... खोलीतलं फर्निचर हवेत उडत विजयी नृत्य करत असल्यासारखे आवाज काही क्षण येत राहिले. मग सगळं काही शांत झालं.\u003cbr\u003e    एका इंग्लिश खेडेगावातल्या पथिकाश्रमात ऐन हिवाळ्यात एक विचित्र दिसणारा अनोळखी इसम येतो. पथिकाश्रमाच्या मालकिणीला आणि गावकर्‍यांना हा इसम विक्षिप्त, गूढ  वाटत असतो, पण जेव्हा त्याचं खरं रूप समोर येतं, तेव्हा सगळे जण  हादरून जातात. कारण तो माणूस अदृश्य असतो ! \u003cbr\u003e    प्रसिद्ध विज्ञानकथा लेखक एच.जी. वेल्स यांच्या प्रतिभेतून अवरतेली, पिढ्यान् पिढ्या वाचली गेलेली आणि मानवी मनातल्या दुष्ट प्रवृत्तीला अधोरेखित करणारी ही कादंबरी एकाच वेळी खिळवून ठेवते आणि अंतर्मुखही करते.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964675154211,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/905f.jpg?v=1750154745"},{"product_id":"hans-andersonchya-parikatha","title":"हॅन्स अँडरसन च्या परीकथा","description":"\u003cp\u003eहंस बनलेल्या राजपुत्रांनी ते जाळं आपल्या चोचींमध्ये उचलून घेतलं. आपले विशाल पंख पसरून ते झेपावले. आपल्या बहिणीला घेऊन उंच ढगांपार गेले. एलिझाने भोवती पाहिलं. जमिनीपासून खूप खूप उंचावर होती ती! तिने मावळतीला आलेल्या सूर्याकडे श्वास रोखून पाहिलं.. तेवढ्यात ते हंस इतक्या झर्रकन खाली आले की, तिला वाटलं आता आपण पडणार! पण आता थोड्याच अंतरावर मुक्कामाचा तो खडक दिसू लागला होता.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eखूप खूप वर्षांपूर्वी हॅन्स ख्रिश्चन अँडरसन नावाच्या परीकथाकाराने मुलांसाठी गोष्टींचं एक अद्भुत जग तयार केलं. या जगामध्ये स्वप्नांच्या दुनियेत रमणारी छोटी जलपरी मरमेड होती, आपल्या काळ्याकरड्या रूपामुळे दु:खी झालेलं बदकाचं छोटं पिलू होतं, हंस बनलेल्या आपल्या भावांना शापातून सोडवणारी शूर राजकन्या होती, कुणालाच न दिसणारं कापड विणणारे अजब विणकर होते, रात्र होताच जागं होणारं खेळण्यांचं जग होतं आणि चक्क शेकोटीच्या प्रेमात पडणारा स्नो मॅनसुद्धा होता! इतकी वर्षं झाली, पण या परीकथांमधली जादू ओसरलेली नाही. हॅन्स अँडरसनचं नवलाइने भरलेलं हे जग आम्ही नव्याने तुमच्या भेटीला घेऊन आलोय. त्याच्या जादूच्या पोतडीची मूठ पुन्हा एकदा उघडली आहे. पाहायचं का हळूच आत डोकावून? करायची का सैर या अद्भुत परीकथांच्या भन्नाट जगाची?\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964677677347,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/912f.jpg?v=1750154777"},{"product_id":"martin-luther-king","title":"मार्टिन लुथर किंग","description":"\u003cp\u003e वक्तृत्व स्पर्धेसाठी ‘निग्रो आणि संविधान’ हा विषय मार्टिनने निवडला होता आणि स्पर्धेत पहिलं बक्षीस पटकावलं होतं. स्पर्धेहून घरी जाताना मार्टिनला आणि त्याच्या शिक्षिकेला बसमध्ये बसायला लगेच जागा मिळाली, पण गोर्या प्रवाशांनी बस हळूहळू तुडुंब भरली. पुढच्या थांब्यावर दोन गोरे प्रवासी चढल्यावर त्यांना बसायला जागा नसल्याने कृष्णवर्णीय असलेल्या मार्टिनला आणि त्याच्या शिक्षिकेला चालकाने अतिशय उद्धटपणे जागेवरून उठायला सांगितलं. दोघं खूप दमले असल्याने आणि दोघांनीही आधी चढून जागा मिळवल्या असल्याने चालकाचं न ऐकता ते तसेच बसून राहिले. मग चालकाने भडकून त्यांना शिव्या घालायला सुरुवात केली. अखेरीस, त्यांना त्या जागेवरून उठावंच लागलं !\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  मार्टिनचं संपूर्ण आयुष्य अशा अनेक कडवट प्रसंगांनी भरलेलं होतं; पण त्यामुळे मार्टिन खचला नाही. माणसाच्या रंगावरून त्याचं माणूसपण जोखणार्या व्यवस्थेशी तो शेवटच्या श्वासापर्यंत लढला. त्याच्या प्रखर, पण अहिंसक लढ्याची ताकद सगळ्या जगाने अनुभवली.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  म्हणूनच मार्टिन लुथर किंग आणि त्याचा ध्येयवेडेपणा आजही प्रेरणा देत राहतात !\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964679020835,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/921f.jpg?v=1750154819"},{"product_id":"sherlock-holmes-chya-chaturya-katha","title":"शेरलॉक होम्सच्या चातुर्य कथा","description":"\u003cp\u003eमी जमिनीवर ठेवलेला दिवा अजून तिथंच होता. त्याच्या प्रकाशामध्ये मला ते काळं छत हळूहळू गचके खात माझ्या अंगावर येताना दिसत होतं. मला पक्कं माहीत होतं की, मिनिटभरातच ते छत माझ्यावर इतक्या प्रचंड शक्तीने आदळणार आहे की, माझा पूर्ण चेंदामेंदा होणार आहे. मी किंचाळत, ओरडत दार ठोठावायला लागलो. आता छत माझ्यापासून केवळ एक किंवा दोन फूट दूर राहिलं होतं. मी शेवटची नजर वेगाने इकडेतिकडे फिरवत असताना मला दोन फळ्यांध्ये पिवळ्या प्रकाशाची एक बारीक रेघ दिसली. दुसर्याच क्षणी मी त्या फळ्यांवर झडप घालून बाहेर पडलो. माझ्यापाठीमागे दिव्याचा चक्काचूर होतानाचा आणि धातूच्या दोन तुळया एकमेकांवर आपटल्याचा आवाज ऐकून मी किती थोडक्यात बचावलो होतो ते मला समजलं.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eशेरलॉक होम्सच्या इतर कथांप्रमाणेच या कथाही आपली उत्कंठा शिगेला नेतात. रहस्यातली गुंतागुंत, त्याची वातावरणनिर्मिती आणि त्याची उकल करण्याची कॉनन डॉयल यांची खास शैली यांमुळे या कथा आणखी खुमासदार होतात आणि खिळवून ठेवतात.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964679414051,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/923f.jpg?v=1750154831"},{"product_id":"sherlock-holmes-chya-sahas-katha","title":"शेरलॉक होम्सच्या साहस कथा","description":"\u003cp\u003eती रात्र वादळी होती. बाहेर वारा रोंरावत होता. खिडक्यांवर पावसाचे थेंब थडाथडा आदळत होते. वादळाच्या इतक्या प्रचंड आवाजामध्ये एका घाबरलेल्या स्त्रीची अमानवी किंकाळी अचानक ऐकायला आली. हा माझ्या बहिणीचाच आवाज आहे हे माझ्या लक्षात आलं. मी पलंगावरून ताडकन उठले आणि पडवीमधून पुढे धावत गेले, तर माझ्या बहिणीच्या खोलीचं दार उघडलं आणि सावकाश किलकिलं होत त्याची उघडझाप होत राहिली. मी घाबरून बघत राहिले. आतमधून काय बाहेर येईल याची मला काहीही कल्पना नव्हती. तेवढ्यात माझी बहीण दाराकडे आली. तिचं अख्खं शरीर एखाद्या दारुड्यासारखं झोकांड्या खात होतं. मी तिच्याकडे धावले आणि तिला मिठी मारली, पण त्याच क्षणी ती जमिनीवर कोसळली.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eशेरलॉक होम्सच्या या साहस कथा अक्षरश: श्वास रोखून धरायला लावतात; वाचकाला गुंग करून सोडतात. तसंच या कथांमधून आपल्याला सर कॉनन डॉयलच्या प्रतिभेची पावती मिळाल्याशिवाय राहत नाही.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964682232099,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/924f.jpg?v=1750154837"},{"product_id":"unch-udi-khol-budi","title":"उंच उडी खोल बुडी","description":"\u003cp\u003eया उलट्या उलट्या जगाची धमाल सैर आणि गंमत जंमत म्हणजे या कविता. या कवितांमध्ये किंगकॉंग कुटुंब आहे, कावळ्यांचं गाव आहे, उनाडांची शाळा आहे आणि ओरपून पाणीपुरी खाणारे देवसुद्धा आहेत! मग करायचा का या उलट्या चाकाच्या जगात प्रवेश? नुसता नुसता टाइमपास? डोकावून पाहायचं अजब आरशांमध्ये? रंगून चालत राहायचं एकटं? काय हरकत आहे! भावे काकांच्या या कविता आपल्याला एक अद्भुत सफर नक्की घडवतील; नादावून टाकतील आणि अलगद भानावरही आणतील.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964684230947,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/939f.jpg?v=1750154915"},{"product_id":"uchchakpachak-andajpanche","title":"उच्चकपाचक अंदाजपंचे","description":"\u003cp\u003eया उलट्या उलट्या जगाची धमाल सैर आणि गंमत जंमत म्हणजे या कविता. या कवितांमध्ये किंगकॉंग कुटुंब आहे, कावळ्यांचं गाव आहे, उनाडांची शाळा आहे आणि ओरपून पाणीपुरी खाणारे देवसुद्धा आहेत! मग करायचा का या उलट्या चाकाच्या जगात प्रवेश? नुसता नुसता टाइमपास? डोकावून पाहायचं अजब आरशांमध्ये? रंगून चालत राहायचं एकटं? काय हरकत आहे! भावे काकांच्या या कविता आपल्याला एक अद्भुत सफर नक्की घडवतील; नादावून टाकतील आणि अलगद भानावरही आणतील.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964684329251,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/940f.jpg?v=1750154921"},{"product_id":"albert-einstein","title":"अल्बर्ट आईनस्टाईन","description":"\u003cp\u003eती अगदी साधीशीच काचबंद डबी त्याने नीट निरखून पाहिली. अल्बर्टने ती डबी कशीही धरली, तरी त्यातली डुगडुगती सुई मात्र पुन्हा पुन्हा उत्तर दिशेकडेच वळायची! ‘एखादी अदृश्य शक्तीच त्या सुईला असा हट्टीपणा करायला भाग पाडत असणार!’ वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी हाती आलेल्या कंपासने फिजिक्सच्या अदृश्य आणि अद्भुत नियमांचं कौतुक अल्बर्ट  आइनस्टाइनच्या मनात असं पेरलं गेलं आणि या नियमांचा शोध हाच त्याच्या जन्मभराचा ध्यास बनून राहिला.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eप्रकाशाच्या झोतावर स्वार होऊन प्रवास करता आला तर?  दोर कापलेल्या लिफ्टमधून पडताना माणसाला गुरुत्वाकर्षण जाणवेल का? अशा काहीतरी भन्नाट कल्पना त्याला सुचायच्या. वर्षानुवर्षं या कल्पना त्याच्या मनात घर करून असायच्या. याच कल्पनाचित्रांचा माग काढत काढत त्याने सृष्टीची कोडी सोडवायचा प्रयत्न केला. आपल्या कल्पना गणिती भाषेत मांडण्यासाठी खूप खूप कष्ट घेतले. हे शोध विज्ञानाच्या जगासाठी महत्त्वाचे आहेतच, पण वयाच्या तिसर्या-चौथ्या वर्षापर्यंत धड बोलताही न येणारा बुजरा मुलगा; शिक्षकांना नकोसा असलेला, शाळा अर्धवट सोडून देणारा बंडखोर विद्यार्थी; पेटंट ऑफिसमधला साधा कारकून इथपासून विज्ञानाच्या जगाचा सुपरहिरो बनण्यापर्यंतचा त्याचा प्रवाससुद्धा त्याच्या शोधांइतकाच सुरस आहे! \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964686491939,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/955f.jpg?v=1750154994"},{"product_id":"mahabharatatil-nitikatha","title":"डायमंड महाभारतातील नीतिकथा","description":"\u003cp\u003eबाल-कुमारांसाठी महाभारतातील नीतीकथा \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964703564067,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/478f.jpg?v=1750155620"},{"product_id":"the-hobbit","title":"द हॉबिट","description":"\u003cp\u003e‘द हॉबिट’ ही आधुनिक साहित्यातील अभिजात कादंबरी आणि ‘द लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ कादंबरीचा पूर्वरंग.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e बिल्बोनं दारासारख्या खिंडारातून पुन्हा एकदा डोकावून पाहिलं तेव्हा, स्मॉग नक्कीच गाढ झोपल्यासारखा दिसत होता. तो पुढे जमिनीवर पाऊल टाकणार तोच, स्मॉगच्या डाव्या डोळ्याच्या लोंबणार्‍या पापणीखालून बाहेर पडणारा बारीक आणि तीक्ष्ण, तांबडा किरण त्याला दिसला. तर हा झोपण्याचं नुसतं ढोंग करतोय ! त्याचं लक्ष भुयाराच्या खिंडाराकडे होतं...\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e बॅग एन्ड येथील त्याच्या हॉबिट-बिळातील सुखासीन आणि फारशा महत्त्वाकांक्षा नसलेल्या आयुष्यातून विझार्ड गँडाल्फ आणि ड्वार्फ्सच्या गँगने हुसकावून लावल्यावर, बिल्बो बॅगीन्स एका प्रचंड मोठ्या आणि अतिशय धोकादायक अशा स्मॉग द मॅग्निफिसन्ट, ड्रॅगनच्या खजिन्यावर हल्ला करायच्या योजनेत सामील होतो. या मोहिमेत सहभागी होण्यास बिल्बो जरी आधी अतिशय नाखूष असला तरी नंतर स्वत:च्याच युक्तिबाजपणाने आणि चोरटेपणाच्या कौशल्याने तो स्वत:च  आश्चर्यचकित  होतो !\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e ही कादंबरी जे.आर.आर. टॉल्कीन यांनी स्वत:च्या  मुलांसाठी लिहिली होती. १९३७ साली प्रकाशित झालेल्या या कादंबरीच्या प्रथम प्रकाशनाला ६० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने १९९७ साली ऍलन ली यांनी काढलेल्या रेखाटनांनी चित्ररूप केलेली ही आवृत्ती प्रकाशित झाली. ही कादंबरी ‘या पिढीतील अत्यंत  प्रभावशाली  पुस्तकांमध्ये  गणली जाते.’\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e द  टाइम्स\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964714508579,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/576f.jpg?v=1750155750"},{"product_id":"robin-hood-ani-robinson-crusoe","title":"दोन जगप्रसिध्द साहसकथा : रॉबिन हूड आणि रॉबिन्सन क्रुसो","description":"\u003cp\u003eगेल्या अनेक पिढ्यांपासून \u003cspan style=\"font-size: 0.875rem;\"\u003eआपले मनोरंजन करणारे \u003c\/span\u003eरॉबिन हूड आणि रॉबिन्सन क्रूसो हे आपले साहसी मित्र पुन्हा एकदा नव्या रूपात आपल्या भेटीला आले आहेत ..\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eMarathi translation of two classic childrens stories Robin Hood and Robinson Crusoe. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964717359395,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/601f.jpg?v=1750155803"},{"product_id":"the-hound-of-baskervilles","title":"शेरलॉक होम्स : द हाउंड ऑफ बास्करव्हिल्स","description":"\u003cp\u003eशेरलॉक होम्स च्या मोजक्या चारच कादंबर्‍यांपैकी ही महत्त्वाची कादंबरी.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e हिच्यावर अनेक सिनेमे, टी.व्ही. सिरियल्स निघाल्या; जगभरातल्या अनेक भाषांतून भाषांतरे झाली.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e आता मराठीतून वाचकांच्या भेटीला येत आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e सर चार्ल्स यांच्या मृत्यूचे रहस्य,\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e हेन्री बास्करव्हिलच्या खुनाचा कट... \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e घराण्याला असलेला विचित्र मृत्यूचा शाप...\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e इंग्लंडच्या डेव्हेनशायरच्या एकाकी उजाड पार्श्वभूमीवर घडणारं थरारनाट्य !\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e द हाउंड ऑफ बास्करव्हिल्स\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964717556003,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/607f.jpg?v=1750155809"},{"product_id":"ranjak-vidnyan-prayog","title":"रंजक विज्ञान प्रयोग","description":"\u003cp\u003eविज्ञान म्हणजे प्रयोगशाळेतच ते गुंतलेलं हवं असं नाही. खरं म्हणजे विज्ञान आपण ठायी ठायी जगतो. विज्ञानाचे प्रयोग आपण दैनंदिन जीवनात अगदी साध्या साध्या वस्तू वापरून नकळत करतच असतो, पण जरा ठराविक किंवा मुद्दाम केलेली उपकरणं वापरून विशिष्ट जागी सुबकतेनं, शिस्तीनं, जाणीवपूर्वक काही संगतवार ज्ञान व्हावं म्हणून काही केलं की, त्याला आपण ‘विज्ञानप्रयोग’ म्हणतो. घरगुती वस्तू वापरूनही प्रयोग करता येतात. अशाच साध्या साध्या वस्तू वापरून हवा, पाणी,उष्णता, प्रकाश, ध्वनी यांसारख्या रोजच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटकांबाबत स्वत: प्रयोग करून माहिती करून घ्या आणि मित्र-मैत्रिणींनाही सांगा.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964717752611,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/608f.jpg?v=1750155814"},{"product_id":"prachin-bharatiya-shastradnya-aani-sanshodhak","title":"प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ आणि संशोधक","description":"\u003cp\u003eकुठलेही ज्ञान, कुठलीही घटना, कुठलाही नवा विचार, आचार, प्रगती ही वास्तव वैज्ञानिक कसोटीवर तपासून घेऊनच मिळालेला निष्कर्ष ग्राह्य धरणे, हीच चालू पिढीची विचारसरणी.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e जुन्या काळपासून ते अगदी आधुनिक काळापर्यंतची वैज्ञानिक प्रगती, वैज्ञानिक नवविचार हे कष्टसाध्यच ठरले आहेत. त्यांपैकीच काही प्राचीन भारतीय वैज्ञानिकांच्या जीवनकथा येथे ठराविक घटनांच्या आधाराने कथारूपात मांडल्या आहेत.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e कथेचा कल्पनाविष्कार आणि वैज्ञानिकांचे सत्य अशा या रंजक आणि उद्बोधक समन्वयामागचा हेतू हाच की  मनोरंजनातूही व्हावे शिक्षण.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964717916451,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/609f.jpg?v=1750155819"},{"product_id":"nivadak-paschimattya-shastradnya-ani-sanshodhak","title":"निवडक पाश्चात्य शास्त्रज्ञ आणि संशोधक","description":"\u003cp\u003eकुठलेही ज्ञान, कुठलीही घटना, कुठलाही नवा विचार, आचार, प्रगती ही वास्तव वैज्ञानिक कसोटीवर तपासून घेऊनच मिळालेला निष्कर्ष ग्राह्य धरणे, हीच चालू पिढीची विचारसरणी.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e जुन्या काळपासून ते अगदी आधुनिक काळापर्यंतची वैज्ञानिक प्रगती, वैज्ञानिक नवविचार हे कष्टसाध्यच ठरले आहेत. त्यांपैकीच काही निवडक पाश्‍चात्त्य वैज्ञानिकांच्या जीवनकथा येथे ठराविक घटनांच्या आधाराने कथारूपात मांडल्या आहेत.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e कथेचा कल्पनाविष्कार आणि वैज्ञानिकांचे सत्य अशा या  रंजक आणि उद्बोधक समन्वयामागच कुठलेही ज्ञान, कुठलीही घटना, कुठलाही नवा विचार, आचार, प्रगती ही वास्तव वैज्ञानिक कसोटीवर तपासून घेऊनच मिळालेला निष्कर्ष ग्राह्य धरणे, हीच चालू पिढीची विचारसरणी.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e जुन्या काळपासून ते अगदी आधुनिक काळापर्यंतची वैज्ञानिक प्रगती, वैज्ञानिक नवविचार हे कष्टसाध्यच ठरले आहेत. त्यांपैकीच काही निवडक पाश्‍चात्त्य वैज्ञानिकांच्या जीवनकथा येथे ठराविक घटनांच्या आधाराने कथारूपात मांडल्या आहेत.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e कथेचा कल्पनाविष्कार आणि वैज्ञानिकांचे सत्य अशा या  रंजक आणि उद्बोधक समन्वयामागचा हेतू हाच की  मनोरंजनातूही व्हावे शिक्षण.ा हेतू हाच की  मनोरंजनातूही व्हावे शिक्षण.र्ीं\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964718145827,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/610f.jpg?v=1750155824"},{"product_id":"sampurn-katharamayan","title":"संपूर्ण कथारामायण","description":"\u003cp\u003eश्रीरामचरित्राचे वाचन आणि श्रवण या देशात शतकानुशतके चालू आहे. रामकथेचं सौंदर्य आणि थोरवी स्वयंभू आहे. तिची अनुकृती घडवणार्‍यांचे हात तिच्या पुन:प्रकटीकरणाने धन्य होतात. आदिकवींचा मर्यादापुरुषोत्तम असलेला ‘श्रीराम’  आजवर कित्येकांनी कित्येकदा निरनिराळ्या माध्यमांतून  पुन:पुन: सांगितला आहे, अजूनही सांगत आहेत....\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e पण खास कुमारांसाठी  रामायणकथेची आणखी एक सुबक प्रतिमा प्रसिद्ध लेखक श्री. वि. के. फडके यांनी घडवली. १९७१ मध्ये वाचकांनी गौरवलेले हे संपूर्ण रामायण पुन्हा एकदा आपल्या भेटीला.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964718342435,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/611f.jpg?v=1750155830"},{"product_id":"coraline","title":"कोरलाइन","description":"\u003cp\u003eकोरलाइन जेव्हा तो दरवाजा ओलांडून जाते, तेव्हा पलीकडे अगदी तिच्या घरासारखंच हुबेहूब (त्याहून जरा मजेदारच) घर तिला सापडतं.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e पण तिकडे तिचे दुसरे आईबाबा असतात, ज्यांना त्यांची छोटी मुलगी म्हणून तिला कायमचंच आपल्याकडे ठेवून घ्यायचं होतं आणि तिथून कधीच जाऊन द्यायचं  नव्हतं.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e स्वत:ची सुटका करून घेऊन परत आपल्या नेहमीच्या घरी जाण्यासाठी आता कोरलाइनला आपली सगळी बुद्धी आणि धैर्य पणाला लावायचं आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964718506275,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/612f.jpg?v=1750155835"},{"product_id":"chhandmitra","title":"छंदमित्र","description":"\u003cp\u003eबाल - कुमारांना घरगुती टाकाऊ वस्तूंपासून सुंदर कलावस्तू बनवण्याचे प्रात्यक्षिक देणारे पुस्तक. मुलांच्या कलागुणांना जोपसणारे पुस्तक. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964718932259,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/617f.jpg?v=1750155852"},{"product_id":"sherlock-holmes-a-study-in-scarlet","title":"शेरलॉक होम्स : अ स्टडी इन स्कार्लेट","description":"\u003cp\u003eसर आर्थर कॉनन डॉयल यांनी लिहलेल्या शेरलॉक होम्सच्या मोजक्या चारच कादंबऱ्यांपैकी ही सगळ्यात पहिली कादंबरी आणि त्यामुळे अर्थातच वाचकाला होणारी होम्सची ही पहिली-वहिली ओळख...\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  ... मि. ड्रेबर आिण मि. स्टँगरसन यांचा रहस्यमय खून आणि त्यांच्या खुनामागे लपलेलं पूर्ववैमनस्याचं कारण...\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  या दोन वेगवेगळ्या पार्श्वभूमींवर घडणाऱ्या कथांमधला होम्सला सापडलेला एक  रंग-\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eअ स्टडी इन स्कार्लेट\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964722405667,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/658f.jpg?v=1750156022"},{"product_id":"sherlock-holmes-the-valley-of-fear","title":"शेरलॉक होम्स : द व्हॅली ऑफ फीअर","description":"\u003cp\u003e‘बर्‍याचदा सत्यकल्पनेपेक्षाही थरारक असतं!’- शेरलॉक होम्स.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e दैवजात तीक्ष्ण बुद्धी लाभलेल्या होम्स समोर अत्यंत अवघड कोडं सोडवायला आलं; ज्याची पाळंमुळं अमेरिका आणि युरोप अशा दोन खंडांमध्ये रुजली होती. एका धाडसी माणसाचं आयुष्य भीतीने झाकोळून टाकणारी अकराळविकराळ दरी...‘द व्हॅली ऑफ फिअर’....\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eही शेरलॉक होम्सची खूप गाजलेली कादंबरी.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964726829347,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/698f.jpg?v=1750156165"},{"product_id":"goshtirup-shivdarshan","title":"गोष्टीरुप शिवदर्शन","description":"\u003cp\u003eबाळ-कुमारांसाठी छत्रपती शिवरायांच्या पराक्रम कथा \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964727615779,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/703f.jpg?v=1750156190"},{"product_id":"malakaaitchi-manjusha","title":"मालाकाईटची मंजुषा","description":"\u003cp\u003eउराल पर्वतातील रशियन लोककथा.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e‘मालाकाईट ’ नावाचा हिरवानिळा, मोरपिशी रंगाचा दगड रशियातल्या उराल परिसरातल्या तांब्याच्या समृद्ध खाणींमध्ये सापडतो. या खडकांतल्या रंगछटांमुळे हा दगड कोरीव वस्तू, विलासी वस्तू, अलंकार यांसाठी रशियात फारच प्रसिद्ध आहे. या परिसरात या खडकाच्या बरोबरच अनेक रत्नं, मौल्यवान धातूही सापडतात. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  या खाणींच्या परिसरातल्या जमीनदारांच्या, झारच्या गुलामीत काम करणारे खाणकामगार, त्यांची कुटुंबं आणि गावं यांचं एक वैशिष्ट्यपूर्ण समाजजीवन होतं. त्यांच्या कष्टपूर्ण जीवनात घडीभर विसावा देणार्या अनेक कहाण्या, लोककथा  आहेत. ‘ताम्रपर्वताची राणी’ हे त्यातलं प्रमुख पात्र. सुंदर, मायावी, न्यायी असं हे काल्पनिक व्यक्तिमत्त्व या कथांतून एखाद्या कोपिष्ट देवीची भूमिका बजावतं.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  ‘पावेल बाज्झोव’ या लेखकाने या सर्व कहाण्या एकत्र करून लिहिल्या आणि त्यामुळे जगाला एका वेगळ्याच प्रकारच्या कल्पनारम्य कथांची देणगी मिळाली.  यातल्या ‘मालाकाईटची मंजुषा’ आणि ‘पाषाणपुष्प’ या कथा तर रशियन कलाकारांनी नाट्यकृती, चित्रपट आणि रंगचित्रं अशा त्रिविध माध्यमांतून जिवंत केल्या आहेत. यातल्या अनेक कलाकृती इंटरनेटवर, यू ट्यूबवरही पाहायला मिळतात.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  उरालच्या या आगळ्या वेगळ्या आणि प्राचीन लोककथा लहानांबरोबरच मोठ्यांनाही आवडतील, इतक्या मनोरम आहेत.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964729418019,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/711f.jpg?v=1750156220"},{"product_id":"ameilia-earhart","title":"अमिलिया एयरहार्ट","description":"\u003cp\u003eअग्रेसर महिला पायलट अमिलिया एयरहार्टची विलक्षण कथा!\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e ‘अटलांटिक समुद्रावरून विमान चालवणारी पहिली महिला पायलट’ असा मान मिळवण्यासाठी अमिलिया निघाली होती. संपूर्ण सफरीतला प्रत्येक क्षण तिच्या धैर्याची कसोटी पाहणारा होता. पहिल्या काही तासांनंतरच विमानाच्या पंख्यावर ठेवलेल्या इंधनाने पेट घेतला. तितक्यात विमानासमोर अचानक ढग जमा झाले आणि काचांवर बर्फाचा थर साचला. त्यानंतर विमान प्रचंड वेगाने स्वतःभोवतीच गरागरा फिरू लागलं आणि कुठल्याही क्षणी कोसळेल अशा स्थितीला येऊन ठेपलं...\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e शंभर वर्षांपूर्वी अमेरिकेत जन्मलेल्या अमिलिया एयरहार्टला आकाशाला गवसणी घालण्याचं प्रचंड वेड होतं. या वेडापायी तिने अचाट धाडसं आणि अनेक विक्रम केले. एव्हिएशन क्षेत्रात स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचं स्थान मिळावं म्हणून ती अखेरपर्यंत झटत राहिली आणि आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या आणि महत्त्वाकांक्षेच्या बळावर अजरामर झाली.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964729647395,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/712AmeiliaEarhart.jpg?v=1750156225"},{"product_id":"the-sign-of-four","title":"शेरलॉक होम्स : द साईन ऑफ फोर","description":"\u003cp\u003eभारतात लपवलेला गुप्त खजिना...लंडनमध्ये बार्थोलेमी शोल्टोचा विचित्रपणे खून...अंदमानमध्ये सजा भोगणारे चार जण...आणि मिस मॉर्स्टनला दरवर्षी मिळणारी निनावी भेट...या सगळ्या रहस्यमय गोष्टींना जोडणारा एकच समान दुवा; जुनाट नकाशावर केलेली खूण - ‘द साइन ऑफ फोर’\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\"जेव्हा सगळ्या अशक्य गोष्टी वजा होतात तेव्हा,\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअवघड वाटत असली तरी उरलेली गोष्टच निखळ सत्य असते.\"\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e- शेरलॉक होम्स\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964733219107,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/743f.jpg?v=1750156368"},{"product_id":"shrinivas-ramanujan","title":"श्रीनिवास रामानुजन : गणितविश्वातील आढळ तारा","description":"\u003cp\u003eनेहमीप्रमाणे गणिताचा तास सुरू होता आणि सर भागाकार शिकवत होते. ‘‘तीन फळं तीन जणांमध्ये वाटली, तर प्रत्येकाला एक फळ मिळतं. म्हणजेच एखाद्या संख्येला त्याच संख्येने भागलं, तर उत्तर एक येतं.’’\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्या वेळी वर्गातल्या एका बुजर्या मुलाने विचारलं, ‘‘शून्याला शून्याने भागलं, म्हणजे कुठलंच फळ कुणामध्येच वाटलं नाही, तरी उत्तर एक येणार का?’’\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया प्रश्नाने वर्गात सगळीकडे शांतता पसरली.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवर्गातला हा बुजरा मुलगा म्हणजे प्रसिद्ध गणिती रामानुजन. लहान वयापासूनच गणिताने झपाटून गेलेल्या या थोर गणितीचं प्रेरणादायी चरित्र या पुस्तकातून आपल्यासमोर येणार आहे. तसंच संपूर्ण जगात मान्यता मिळवण्यासाठीचा त्याचा अतोनात संघर्ष आणि शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहिलेल्या गणिताच्या अनोख्या प्रतिभेचं दर्शनही या पुस्तकातून आपल्याला होणार आहे.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964734365987,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/752f.jpg?v=1750156407"},{"product_id":"abraham-lincoln","title":"अब्राहम लिंकन : गुलामगिरीमुक्त देशाचं स्वप्न पाहणारा राष्ट्राध्यक्ष","description":"\u003cp\u003e ‘त्याने भल्यांशी भलाईनं वागावं आणि टग्यांना अद्दल घडवावी... धिक्कार करणार्यांच्या झुंडी आल्या, तर कानाडोळा करायला शिकवा त्याला आणि ठसवा त्याच्या मनावर सत्य आणि न्यायासाठी पाय रोवून लढत राहण्याचं महत्त्व.’ अमेरिकेतून गुलामगिरी निपटून काढणार्या अब्राहम लिंकनचे हे उद्गार इतिहासात अजरामर झाले आहेत. त्याचं संपूर्ण आयुष्य आणि मृत्यूसुद्धा ‘सर्व माणसं समान आहेत’ या ध्यासालाच वाहिलेला होता.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  याच अब्राहम लिंकनचं अतिशय प्रेरक चरित्र आणि त्याचा झगडा या पुस्तकातून आपल्यासमोर उलगडणार आहे. तसंच सर्वसामान्यांचा नेता, कुशल राजकारणी आणि चतुर राष्ट्राध्यक्ष म्हणूनही तो आपल्याला या पुस्तकात जागोजागी भेटणार आहे.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964734497059,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/753f.jpg?v=1750156412"},{"product_id":"don-cheharyacha-her","title":"दोन चेहर्यांचा हेर","description":"\u003cp\u003eबाळ-कुमारांसाठी रंजक माहितीने भरलेल्या सुरस कथा. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964741280035,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/799f.jpg?v=1750156624"},{"product_id":"dusre-mahayudh","title":"दुसरे महायुध्द","description":"\u003cp\u003eबाळ-कुमारांसाठी रंजक माहितीने भरलेल्या सुरस कथा. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964741411107,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/800f.jpg?v=1750156629"},{"product_id":"magari-manatalya","title":"मगरी मनातल्या","description":"\u003cp\u003eबाळ-कुमारांसाठी रंजक माहितीने भरलेल्या सुरस कथा. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964741542179,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/801f.jpg?v=1750156633"},{"product_id":"dongargavachee-chetkin","title":"डोंगरगावची चेटकीण","description":"\u003cp\u003eबाळ-कुमारांसाठी रंजक माहितीने भरलेल्या सुरस कथा. \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964741738787,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/802f.jpg?v=1750156638"},{"product_id":"sherlock-holmes-cha-punaragaman","title":"शेरलॉक होम्सचं पुनरागमन","description":"\u003cp\u003eर्‍हाईनबाक धबधब्यावरून शेरलॉक कोसळल्यावर असं वाटत होतं, जणू या जगातून तो नाहीसा झाला..जितक्या रहस्यमयरीत्या तो गायब झाला तितक्याच रहस्यमयरीत्या तो तीन वर्षांनी परत आलाय. अनेक थरारक कामगिर्‍या त्याची आणि त्याचा साथीदार वॉटसनची वाट बघतायत; पण आता होम्सचा सामना त्याच्या सर्वांत क्रूर प्रतिस्पर्ध्याशी आहे : चार्ल्स ऑगस्टस मिल्वर्टन.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e जगभरातल्या सगळ्या वाचकांचं सर्वांत लाडकं काल्पनिक पात्र, म्हणजे शेरलॉक होम्स! सर आर्थर कॉनन डॉयल यांनी कथा-जिवंत केलेला हा भन्नाट डिटेक्टिव्ह केवळ असामान्य बुद्धी आणि तर्काच्या जोरावर चक्रावून टाकणार्‍या रहस्यांचा उलगडा करतो.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e या संग्रहात अशाच रोमांचक रहस्यकथांमधून तो आपल्याला भेटणार आहे आणि आणखीच चक्रावून टाकणार आहे.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964742590755,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/809f.jpg?v=1750156671"},{"product_id":"sherlock-holmse-chya-rahasyakatha","title":"शेरलॉक होम्सच्या रहस्यकथा","description":"\u003cp\u003eसुरुवातीला तिला कसलीही जखम दिसली नाही; पण तिनं त्याला उठवायचा प्रयत्न करताच तिला त्याच्या मानेच्या खालच्या बाजूला वाहत असलेलं रक्त दिसलं. त्याला छोटीशीच, पण खूप खोल जखम झाली होती. तिने त्याच्या तोंडावर पाणी शिंपडल्यावर त्याने क्षणभरा डोळे उघडले.‘प्राध्यापक -ती होती’, तो पुटपुटला. त्यानं आणखी काहीतरी बोलण्याचा अतोनात प्रयत्न केला; पण त्यानंतर तो लगेचच मरण पावला. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e शेरलॉक होम्सच्या कथांमधून वाढत जाणारी रहस्यामायाता वाचकाची उत्सुकता शिगेला पोहोचवते. वरकरणी थेट वाटणार्‍या खुनांची अजब गुंतागुंत सर आर्थर कॉनन डॉयल शेरलॉक होम्सच्या माध्यमातून अधिक जिवंत आणि रोमांचक करतात आणि वाचकाला अक्षरश: खिळवून ठेवतात!\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964742721827,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/811f.jpg?v=1750156682"},{"product_id":"the-call-of-the-wild","title":"द कॉल ऑफ द वाईल्ड","description":"\u003cp\u003e‘द कॉल ऑफ द वाइल्ड’ ही युकॉनच्या बर्फमय प्रदेशातल्या बक नावाच्या एका कुत्र्याची त्याच्याच दृष्टिकोनातून सांगितलेली कहाणी आहे. सुसंस्कृतपणाकडून आदिम हिंस्रपणाकडे त्याने केलेल्या प्रवासाचा हा लेखाजोखा आहे; पण या श्वानाच्या रोमांचक कथेतून आपल्यासमोर एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी सोन्याच्या हव्यासाने कॅनडामधल्या क्लोंडाईक प्रातांत गोळा झालेल्या लोकांचं जग उभं राहतं. एकीकडे हिंसक आणि निष्ठुर जगाचं वर्णन करणारी ही कथा दुसरीकडे माणसाच्या आणि प्राण्याच्या नात्याविषयी सांगितलेली एक हळुवार साहसकथाही आहे. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e मुक्या प्राण्यांवर अतोनात प्रेम करणार्‍या लंडनला स्लेडला जुंपल्या जाणार्‍या कुत्र्यांच्या मनीची व्यथा उमजून आली आणि अपार कणवेने भारून, श्वानजीवनाचे अंतरंग उलगडून दाखविणारी ‘बकची’ कहाणी त्याने जगापुढे मांडली. जगभरातल्या साहित्याप्रेमींमध्ये तुफान लोकप्रिय असलेली आणि निर्विवादपणे ‘अभिजात’ ठरलेली ही कथा आता मराठी वाचकांच्याही भेटीला येत आहे. ही कहाणी वाचकांना मोहून टाकते, थरारून सोडते आणि विचार करायलाही भाग पाडते.\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964742918435,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/812f.jpg?v=1750156688"},{"product_id":"thomas-alva-edison","title":"थॉमस अल्वा एडिसन","description":"\u003cp\u003eऍल लहानपणापासूनच खूप खोडकर होता. त्याला प्रत्येक गोष्टीचं कुतूहल वाटायचं. एकदा तो बदकांसाठी आणि कोंबड्यांसाठी केलेल्या घरामागच्या खुराड्यात असाच काहीतरी उद्योग करत बसला होता. त्याच्या बहिणीला तो सापडला, तेव्हा त्याचे सगळे कपडे आणि पाय पिवळे झाले होते. ‘‘कपड्यांना काय झालं?’’ असं विचारल्यावर तो म्हणाला, ‘‘बदकं किंवा कोंबड्या अंड्यांवर बसल्या, तर त्यांच्यातून छोटी छोटी पिल्लं बाहेर येतात, पण मी बसल्यावर मात्र अंडी फुटली! असं का झालं काय माहीत !’’\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e सतत कुतूहलाने घेरलेला हा मुलगा म्हणजे प्रसिद्ध शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन! एडिसन अक्षरशः अथकपणे आयुष्यभर स्वतःच्या कुतूहलाचा चिकाटीने पाठलाग करत राहिला. विजेच्या दिव्याचा क्रांतिकारक शोध तर त्याने लावलाच, पण सर्वसामान्य लोकांना उपयोगी पडतील असे इतरही अनेक शोध त्याने लावले. कठीण परिस्थितीमुळे कधीही न खचलेल्या आणि संकटाला कायम संधी मानणार्या या भन्नाट माणसाचं असामान्य चरित्र आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळणार आहे; आणि त्याचं ध्येयासाठीचं झपाटलेपण आपल्याला निश्चित स्तिमित करणार आहे !\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964743508259,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/823f.jpg?v=1750156708"},{"product_id":"the-count-of-monte-cristo","title":"द काऊंट ऑफ मॉन्टे क्रिस्टो","description":"\u003cp\u003e१०० पेक्षा अधिक भाषांमध्ये अनुवादित झालेल्या आलेक्झान्द्र द्यूमास यांच्या जगप्रसिद्ध कादंबरीचा संक्षिप्त अनुवाद \n\u003cbr\u003eसगळ्यांचं भलं चिंतणार्‍या, हुशार आणि साध्या-सरळ एडमंड डान्टेला लवकरच जहाजाच्या कप्तानपदी बढती मिळणार असते. मग तो जिवापाड प्रेम असणार्‍या त्याच्या प्रेयसीशी लग्न करून सुखाने संसार थाटणार असतो; पण डान्टेकडे असलेल्या एका पत्राने त्याच्या आयुष्यात अचानक एक भयंकर वादळ घोंगावत येतं आणि त्याचं सगळं आयुष्यच उद्ध्वस्त करून टाकतं. जिगरबाज एडमंड डान्टेशी दगाफटका करून त्याचे शत्रू त्याला एका गुप्त तुरुंगाच्या काळकोठडीत डांबून टाकतात आणि सर्वस्व गमावून अवघं आयुष्य त्या अंधार्‍या तुरुंगात घालवणं त्याच्या नशिबी येतं !\n\u003cbr\u003eडान्टेच्या सगळ्या स्वप्नांचा, इच्छा-आकांक्षांचा चुराडा होतो. तो इतका निराश होतो की, आत्महत्येचा विचार करायला लागतो; पण तोच त्याला एक आशेचा किरण दिसतो, ज्यामुळे त्याची तुरुंगातून चमत्कारिकरीत्या सुटका होते; पण तुरुंगातून बाहेर पडलेला डान्टे पूर्वीचा ‘साधा-सरळ’ डान्टे राहिलेला नसतो. तो झालेला असतो, हुशार, कपटी आणि सुडाच्या आगीने पेटलेला - ‘द काउन्ट ऑफ मॉन्टे कि‘स्टो’! \n\u003cbr\u003eआलेक्झान्द्र द्यूमासच्या जवळपास सगळ्या कादंबर्‍या नेपोलियनच्या वादळी पर्वाच्या पार्श्वभूमीवर घडतात. त्यांपैकी ‘द काउन्ट ऑफ मॉन्टे कि‘स्टो’ ही थरारक साहसकथा जगातल्या सर्वांत लोकप्रिय रोमांचक कादंबर्‍यांपैकी एक गणली जाते. ऐश्वर्याच्या, प्रभावाच्या शिखरावर असलेल्या नेत्रदीपक, जोशपूर्ण फ‘ांसचं कादंबरीतलं वर्णन अजरामर ठरलं आहे. तसंच सुष्ट-दुष्ट यांच्यातला नाट्यमय संघर्ष आणि विलक्षण गुंतागुंतीचं कथानक असल्याने ही कादंबरी वाचकाला अक्षरशः खिळवून ठेवते !\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964744622371,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/815f.jpg?v=1750156748"},{"product_id":"the-three-musketeers","title":"द थ्री मस्कटिअर्स","description":"\u003cp\u003eविख्यात कादंबरीकार आलेक्झान्द्र द्यूमासलिखित ‘द थ्री मस्कटिअर्स’ या रोमांचक, नाट्यमय कादंबरीचा मराठी अनुवाद !\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  ही कथा आहे दार्तान्यॉ या शूर तरुणाची आणि त्याच्या धाडसी मोहिमांची ! फ्रान्सच्या राजाचं संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या शिलेदारांच्या म्हणजेच मस्कटिअर्सच्या तुकडीमध्ये सामील व्हायचं स्वप्न घेऊन दार्तान्यॉ पॅरिसमध्ये येतो आणि त्याची मैत्री ऍथॉस, पार्थोस आणि आरामिस या मस्कटिअर्सशी होते. राजाचा मित्र कार्डिनल रिशलिय आणि रमणी गुप्तहेर मिलेडी यांच्या छुप्या आणि धूर्त कारस्थानांपासून राजाचे प्राण आणि त्याची प्रतिष्ठा जपण्यासाठी मस्कटिअर्सना प्रयत्नांची शर्थ करावी लागते.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  रहस्य, षड्यंत्र, थरार, विस्मयकारक घटना, तलवारबाजीच्या अखंड करामती, प्रेमप्रकरणं, गनिमी छापे, जिवानिशी झालेल्या सुटका आणि बेफाम साहसं असा सगळा ऐवज या अजरामर कादंबरीमध्ये पानोपानी वाचायला मिळतो ! द्यूमासने साकारलेल्या या कादंबरीतल्या जगात अशक्य काहीच नाही. तसंच सगळं काही भव्यदिव्य आहे!\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e  त्या काळातली राजकीय समीकरणं आणि परिस्थिती यांच्या गुंफणीतून आकाराला आलेली, कधीही संपू नये असं वाटायला लावणारी एक अभिजात कादंबरी खास ‘वर्ल्ड क्लासिक्स सीरिजमधून’ वाचकांच्या भेटीला आली आहे !\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964746031395,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/851f.jpg?v=1750156805"},{"product_id":"the-strange-case","title":"द स्ट्रेंज केस ऑफ डॉ जेकिल अँड मि हाईड","description":"‘‘माणसाची ओळख जसजशी पटत जाते, तसतसे सगळेच सुष्ट-दुष्ट वृत्तींच्या अनोख्या मिश्रणातून उगवलेले आहेत, हे कळत जाते...’’\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eअटरसन वकील दूरच्या नात्यातल्या एनफिल्ड यांच्यासोबत लंडनच्या गल्ल्यांमधून फेरफटका मारत असतात. तेव्हा एनफिल्ड काही महिन्यांपूर्वी स्वत: अनुभवलेल्या एका बीभत्स घटनेविषयी त्यांना सांगतात. ही गोष्ट असते, बघताच भीती वाटावी अशा मि. हाईडची! हा हाईड एका लहान मुलीला आधी निर्दयपणे तुडवतो आणि मग एका गूढ घराच्या दारामागे गुप्त होतो. काही क्षणानंतर मुलीच्या नातेवाइकांना नुकसान भरपाई म्हणून द्यायच्या रकमेचा चेक घेऊन अवतरतो. त्या चेकवर एका अत्यंत प्रतिष्ठित सद्गृहस्थाची सही असते. पुढे कळतं, हा प्रतिष्ठित माणूस म्हणजे दुसरा-तिसरा कुणी नव्हे, तर अटरसन यांचा एक जुना मित्र आणि अशीलही असणारा डॉ. जेकिल असतो.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eमग मि. हाईड कोण?\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eडॉ. जेकिल कोण?\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eया दोघांना जोडणारं काही रहस्य तर नसेल? काही गूढ...\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eरॉबर्ट स्टीव्हन्सनची अतिशय झपाटून टाकणारी ही गोष्ट वाचकांना गोंधळात टाकणारं एक कोडं घालते आणि शेवटी रहस्यावरचा पडदा उघडते.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eचांगल्या-वाइटाची अभिजात म्हणावी अशी ही भयकथा एकोणिसाव्या शतकातल्या मूलभूत विरोधाभासाविषयी भाष्य करते. बाहेरून प्रतिष्ठेची आणि आतून तीव्र लालसेची आस असणार्‍या माणसामधल्या विरोधाभासाचं चित्रण करणारी, ‘व्हिक्टोरियन एरा’मधलं अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शी लेखन मानली जाणारी ही लघुकादंबरी इंग्रजी वाङ्मयातली ‘वाचकप्रिय कादंबरी’ म्हणून आपलं स्थान आजही राखून आहे.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964772901155,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1013f.jpg?v=1750157836"},{"product_id":"alexander-the-great","title":"अलेक्झांडर द ग्रेट - विश्वसाम्राज्य उभं करणारा  जगज्जेता","description":"\u003cp\u003eकित्येक युद्धांचा अनुभव असलेल्या अलेक्झांडच्या साहसी सैन्यापुढे पुरूच्या सैन्याचा निभाव लागत नव्हता. पुरूला पराभव समोर दिसत असूनही तो चिवटपणे झुंज देत होता. त्याची जिद्द आणि धाडस पाहून अलेक्झाडंर प्रचंड प्रभावित झाला आणि त्याला शरण येण्याचा निरोप पाठवला. निरोप घेऊन जाणार्‍या एका तुकडीला पुरूने ठार करायचा प्रयत्न करूनही अलेक्झांडरनं युद्ध थांबवण्यासाठी पुरूचं मन वळवलं. खरंतर अलेक्झांडरचा विजय झाला होता. पुरूला ठार करून एका क्षणात युद्ध थांबवणं अलेक्झांडरला सहज शक्य होतं, पण या भारतीय राजाच्या शौयानं त्याचं मन जिंकलं होतं. म्हणूनच अनेक दिवसांची मेहनत, प्रचंड नियोजन, शेकडो सैनिकांचे मृत्यू आणि घनघोर लढाईनंतर मिळवलेलं पुरूचं राज्य अलेक्झांडरनं त्याला परत देऊन टाकलं! इतकंच नाही, तर आजूबाजूची आणखी जमीनही त्यात भर घालून दिली!\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआज आपण अलेक्झांडरला ‘अजिंक्य योद्धा’ म्हणून ओळखतो. पण त्याचं चरित्र वाचताना अलेक्झांडर हे काळाच्या पुढे जाणारं रसायन असल्याचा पदोपदी प्रत्यय येतो. जितका क्रूर तितका उदार, जितका शिस्तबद्ध तितकाच प्रयोगशील, जितका विजिगीषू तितकाच तत्त्वज्ञानाचं आकर्षण असलेला.... अलेक्झांडर चिमटीत पकडता येत नाही. त्याला कुठल्याही चौकटीत बंद करता येत नाही. किंबहुना त्याचं सतत चौकटी मोडत राहणंच वेध लावतं. म्हणूनच आज हजारो वर्षांनतरही त्याच्याबद्दल होणारी संशोधनं आणि टीकाही कायम आहे. तो अजूनही लहान-मोठ्यांच्या उत्सुकतेला आव्हान देतोच आहे!\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eExciting new biography of Greek Warrior Alexander the Great. Alexander was a brilliant and ambitious general who wanted to conquer all of the earth. His life's account is still fascinating even after more than two thousand years.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964772999459,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1014f.jpg?v=1750157842"},{"product_id":"maneaters-of-kumaon","title":"कुमाऊँचे नरभक्षक","description":"\u003cp\u003eउताराच्या अगदी कडेला असताना गवताचा भारा बांधायला मी खाली वाकलो, तेवढ्यात वाघाने माझ्या अंगावर उडी घेतली आणि त्याच्या चार सुळ्यांपैकी एक माझ्या उजव्या डोळ्याखाली, दुसरा माझ्या हनुवटीमध्ये आणि उरलेले दोन माझ्या मानेत रुतवले. मी पाठीवर पडलो आणि वाघ माझ्या छाताडावर होता. त्याचं पोट माझ्या पायांवर होतं. पाठीवर पडताना माझे हात पसरले गेले होते. माझ्या उजव्या हाताला ओकचं एक रोपटं लागलं...तेव्हाच माझ्या मनात एक कल्पना चमकली - वरच्या बाजूला असलेलं ते ओकचं रोपटं मी हातांनी पकडलं असतं आणि मोकळे असलेले दोन्ही पाय जुळवून वाघाच्या पोटाला टेकवले असते, तर मी त्याला लांब ढकलू शकलो असतो आणि पळून जाऊ शकलो असतो. वाघाला अजिबात जाणवू न देता मी अगदी हळूहळू माझे दोन्ही पाय वर घेतले आणि त्याच्या पोटांवर टेकवले. त्यानंतर माझा डावा हात वाघाच्या छातीवर टेकवला आणि सगळ्या ताकदीनिशी त्याला विरुद्ध दिशेने ढकललं.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजिम कॉर्बेट यांच्या या शिकार कथा अत्यंत चित्तवेधक आहेत. मात्र शिकार कथा म्हणजे रूढार्थाने ‘शिकारीचा आनंद देणार्‍या कथा’ असा यांचा बाज नाही. कॉर्बेट यांची वाघाबद्दलची आत्यंतिक आत्मीयता, अभ्यास आणि शिकार करतानाची तितकीच अगतिकताही या कथा वाचताना सतत जाणवत राहते. म्हणूनच या कथा थरारक असल्या, तरी त्यांच्यात उन्माद नाही. थरार अनुभवताना वाघाबद्दल आणि एकूणच प्राणिजीवनाबद्दल त्या वाचकाला समंजस केल्याशिवाय राहत नाहीत.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964773097763,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1015f.jpg?v=1750157849"},{"product_id":"shahid-bhagatsing","title":"शहीद भगतसिंग - देशासाठी हौतात्म्य स्वीकारणारा क्रांतिकारी विचारवंत","description":"\"‘‘वीरजी, शाईची बाटलीये ना ही?’’ अमरकौरने विचारलं.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e‘‘माती आहे ती!’’\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e‘‘पण लाल दिसतेय’’\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e‘‘हो, तिच्यात मिसळलेल्या रक्तामुळे. अमृतसरला जालियनवाला बागेत सभेसाठी जमलेल्या लोकांवर ब्रिटिशांनी गोळ्या झाडल्या. त्यांच्या रक्ताने सगळं मैदान लाल झालं होतं. त्या मैदानावरची माती आहे ही!’’\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eमग भगतसिंग आणि अमरकौर यांनी देशबांधवांचं रक्त मिसळलेल्या त्या मातीला कळ्या वाहिल्या. भगतसिंग मनातल्या मनात म्हणाला, ‘शपथ या मातीची! आम्हाला गुलामगिरीत जखडणार्‍यांना आम्ही इथून हाकलून लावू! जालियनवाला बागेतल्या शहिदांचं बलिदान मी व्यर्थ जाऊ देणार नाही!’ \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eही शपथ घेतली, तेव्हा भगतसिंग जेमतेम बारा वर्षांचा होता.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eआज आपल्याला घेता येणार्‍या प्रत्येक मोकळ्या श्वासासाठी अनेक लहान-मोठ्या, सामान्य-असामान्य भारतीयांनी फार मोठी किंमत मोजली आहे; स्वतःचं आयुष्य अक्षरशः पणाला लावलं आहे; जीव ओवाळून टाकला आहे. मात्र त्यांनी आपल्याला दिलेला हा वारसा केवळ हौतात्म्याचा नाही, तर मूल्यांचा आणि विचारीपणाचासुद्धा आहे, याची पक्की खूणगाठ आपण मनाशी बांधायला हवी. \"\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964773589283,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1017f.jpg?v=1750157856"},{"product_id":"marathekalin-shouryakatha","title":"मराठेकालीन शौर्यकथा","description":"संपूर्ण भारताच्या इतिहासात मराठ्यांच्या इतिहासाचे स्थान काही आगळेच आहे. थोर विचारवंत प्रा. डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे म्हणतात, ‘‘मराठ्यांनी हिंदुस्थान बांधला.’’ थोडक्यात मराठ्यांचा इतिहास हा भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास आहे. मराठ्यांनी केवळ महाराष्ट्रापुरते न पाहता संपूर्ण हिंदुस्थान आणि त्याचे स्वातंत्र्य आपल्या डोळ्यांसमोर ठेवले. मराठे महाराष्ट्राच्या बाहेर पडले, संकुचित दृष्टी न ठेवता विशाल दृष्टी बाळगून अहद कावेरी तहद दिल्ली, अटक ते कटक सर्वदूर ते पसरले. भारतीय स्वातंत्र्यासाठी ते धावून गेले. कविवर्य प्रा. वसंत बापट यांच्या शब्दांत \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e ‘अन्याय घडो शेजारी | की दुनियेच्या बाजारी| \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e धावून तिथेही जाऊ| स्वातंत्र्यमंत्र हा गाऊ| \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e मर्दूनी शत्रु उद्दंड | नवा इतिहास पुन्हा घडवू॥\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e ध्वज उंच उंच चढवू॥\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e तर अशा या महान स्वातंत्र्यप्रयत्नात लाखभर मराठे धारातीर्थी पडलेले आहेत. मोठाच त्याग आहे हा ! तर छत्रपती श्री शिवाजीमहाराजांपासून थेट \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e देवी श्री अहल्याबाई होळकर ह्या कालखंडातील काही तेजस्वी कथांचा हा संग्रह, स्त्री-पुरुष, लहान थोर, साक्षर-सुशिक्षित सर्वांनाच अतिशय आवडेल. आपण अवश्य वाचावे, आपल्या संग्रही असावे असे हे पुस्तक...","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964775031075,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/304f.jpg?v=1750157940"},{"product_id":"rajanchya-katha","title":"राजांच्या कथा","description":"अनेक राजांनी आदर्शांचे हिमालय उभे केलेले आहेत. महान उदाहरणे जगापुढे ठेवलेली आहेत. सर्वभक्षक काळही त्यांची नावे पुसू शकला नाही. विस्मृतीच्या वाळवंटातही त्यांची न पुसली जाणारी पावले उमटलेली आहेत. लोकशाहीतील नेत्यांनीही त्यांचा अभ्यास, गुणानुकरण करावे असे हे महान नृपती आहेत. अशा राजांच्या गुणांचे संस्कार नवीन पिढीवर अवश्यमेव झाले पाहिजेत, नवीन पिढीला आणि सर्वांनाच त्यांची माहिती झाली पाहिजे. राजा याचा अर्थ इथे राष्ट्रनेता असा करूया. राजा असो वा राष्ट्राध्यक्ष वा पंतप्रधान - रक्षण आणि पोषण ही त्यांची आद्य कर्तव्ये होत. तसेच पुलंच्या भाषेत शीत (अन्न), सूत (वस्त्र), आणि छत (निवारा) या किमान गोष्टी त्याने जनतेला पुरवल्याच पाहिजेत. म्हणूनच संस्कृतमध्ये म्हटलेले आहे, ‘राजा प्रकृतिरंजनात्’ जो प्रजेचे रंजन करतो तोच राजा. पाचही गरजा पूर्ण झाल्या तरच रंजन होणार हे खरेच आहे. तर या पाचही गरजा (अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, वैद्यकीय साहाय्य) पूर्ण करून काही राजांनी जनतेला आणखीही खूप काही दिले आहे, अशा काही अज्ञात, अल्पज्ञात, उपेक्षित नि प्रसिद्धही अशा राजांचा हा कालपट आपल्यापुढे उलगडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न !\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964775129379,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/336f.jpg?v=1750157946"},{"product_id":"santanchya-goshti","title":"संताच्या गोष्टी","description":"संतजीवनावर आधारित संस्कारक्षम कथा \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964775227683,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/337f.jpg?v=1750157952"},{"product_id":"santanchya-katha","title":"संतांच्या कथा","description":"संतजीवनावर आधारित संस्कारक्षम कथा \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964775325987,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/338f.jpg?v=1750157958"},{"product_id":"devalacha-wagh","title":"देवळाचा वाघ आणि कुमाऊँचे आणखी काही नरभक्षक","description":"\"“नरभक्षक वाघाला मारण्याचं काम मनाला अतिशय समाधान देतं, यात शंकाच नाही. ‘जे काम कुणीतरी करणं अत्यावश्यक होतं आणि आपण ते केलं’ याचं ते समाधान असतं. आपण आपल्या बलाढ्य शत्रूला त्याच्याच परिसरात जाऊन मात दिल्याचं समाधान असतं; आणि या सगळ्याच्या पलीकडे, पुतळीसारख्या धाडसी मुलीला वावरण्यासाठी पृथ्वीवरचा लहानसा का होईना, एक कोपरा सुरक्षित केल्याचं समाधान असतं.”\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eनरभक्षक वाघांची प्रचंड दहशत बसलेल्या, दुर्गम म्हणाव्या अशा पूर्वोत्तर राज्यांमध्ये कॉर्बेट यांनी केलेल्या वाघांच्या शिकारींमागची त्यांची ही प्रामाणिक भावना आहे. साहजिकच, या सगळ्या शिकारकथा थरारकच आहेत. मात्र वाघाची शिकार करणार्या या माणसाची माणसाइतकीच वाघाबाबतची संवेदनशीलता अनेकदा रोमांचित करते आणि कॉर्बेट यांचं वेगळेपणदेखील अधोरेखित करते. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eम्हणूनच ‘शिकार करण्याचा आनंद घेणारा शिकारी’ या घट्ट, निष्ठुर चौकटीत या माणसाला बंदिस्त करता येत नाही. उलट जंगलाचं जिवंतपण, सळसळतेपण आणि रांगडा पण नितळ कारभार हा माणूस ज्या तरलेतेने टिपतो, त्यातून ‘शिकारी’ या काहीशा आक्रमक चौकटीच्या कितीतरी योजनं तो पुढे जातो आणि माणसाच्या ‘विकसित’ म्हणवल्या जाणार्या मेंदूमुळे निर्माण झालेल्या अनेक वर्तन विसंगती, त्याच्या मनातल्या सूक्ष्मात रुतून बसलेलं मतलबी क्रौय यांना सहज, नर्मविनोदीपणे पृष्ठभागावर आणतो. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eत्यामुळेच ‘थरारक’ म्हणून या कथा आनंद देतातच, पण त्याच वेळी कॉर्बेटबरोबर त्या आपल्यालाही खोल जंगलात उतरायला भाग पाडतात आणि त्याहूनही पुढे जात ‘माणूस’ नावाच्या रसायनाबाबत अनेक प्रश्नचिन्हं उपस्थित करतात.\"\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964775784739,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1027f.jpg?v=1750157993"},{"product_id":"nisargshala","title":"निसर्गशाळा - पर्यावरण विषयक उपक्रम ( ३ पुस्तकांचा संच)","description":"निसर्ग शिक्षण मुलांपर्यन्त पोहोचवणे या हेतूने ‘निसगर्शाळा’ या पुस्तक संचाची रचना करण्यात आली आहे. निसगर्शाळा हा तीन पुस्तकांचा संच आहे. या पुस्तकांचा आधार घेऊन कुठल्याही शाळेला ‘पयार्वरविषयक विशेष कायर्क्रम’ हाती घेता येईल. प्रत्येक पुस्तकात जवळपास ५० उपक्रम आहेत. इयत्ता ५ वी, ६ वी, ७ वी (मुलांचे वय वर्ष १०-१२) साठी हे उपक्रम योजिले आहेत. \u003cbr\u003e\u003cbr\u003eही पुस्तके शिक्षक व पालक यांच्यासाठी आहेत, जेणेकरून ते मुलांसाठी हा अभ्यासक्रम राबवू शकतील. यात मुलांना निसर्गातील  नदी, डोंगर, माती, झाडं, पशू-पक्षी, किटकादी विविध घटकांची ओळख व्हावी, त्यांचं महत्त्व कळावं तसंच त्यांची जोपासना करणं का आवश्यक आहे, ती कशी करावी हे उपक्रमांच्या माध्यमातून स्वानुभवाने कळेल. या अभ्यासक्रमातले उपक्रम कोणत्या क्रमाने व कशा पद्धतीने घ्यावेत याचा विचार करुन तयार के ले आहेत. निसर्गाची ओळख याबरोबरच मुलांच्या विविध कलागुणांना प्रोत्साहन, त्यांचा व्यक्तिमत्त्वविकास ही सुद्धा या अभ्यासक्रमाची वैशिष्ठ्ये आहेत. निसगर्शाळा हा अभ्यासक्रम आत्तापर्यन्त  घोटावडे, वाई, गोवा, रणथंबोर अशा काही ठिकाणी जिल्हा पिरषदेच्या व इतर शाळांमध्ये, संस्थेने प्रत्यक्ष राबिवलेला आहे. ग्राममंगल या संस्थेच्या मागर्दशर्नाखाली, रचनावादी तत्वावर हे उपक्रम आधारलेले आहेत. यात मुले प्रत्यक्ष अनुभूती घेऊन त्या उपक्रमाची मजा घेत शिकतात. या पुस्तकाचा आधार घेऊन असे उपक्रम काही शाळांमध्ये राबवले जात आहेत. ज्यांना मुलांचा छान प्रतिसाद मिळतो आहे. या अभ्यासक्रमाच्या ‘तयारीसाठी’ व ‘संशोधनासाठी’ महाराष्ट्र शासनाच्या पयार्वरण विभागाच्या ‘हरित  संकल्पना’ योजनेचे आर्थिक  साह्य ऑयकॉसला लाभले. निसर्ग शिक्षण  ही काळाची गरज तर आहेच पण निसर्गाजवळ  जाऊन त्यातल्या गमती जमती प्रत्येकाला कळाव्या, त्यावर मैत्र जडावे, जेणेकरून संवर्धन हा आपल्या स्वभावाचाच एक भाग बनेल, व निसर्ग सहवासाचा निस्सीम आनंद प्रत्येकाला अनुभवता येईल ही या पुस्तकांमागची संकल्पना !","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964776800547,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1034f.jpg?v=1750158060"},{"product_id":"sherlock-complete-novels","title":"शेरलॉक होम्सच्या समग्र कादंबऱ्या (चार पुस्तकांचा संच)","description":"सर आर्थर कॉनन डॉयल (१८५९-१९३०) हे स्कॉटिश लेखक होते. त्यांनी जवळजवळ १२५ वर्षांपूर्वी निर्माण केलेलं ‘शेरलॉक होम्स’ हे काल्पनिक पात्र आजही जगातल्या सर्वांत लोकप्रिय नायकांपैकी एक आहे. त्यांच्या कामाचा आवाका अफाट होता. त्यांनी २००हून अधिक कथा, कादंबर्‍या, कविता, नाटकं इत्यादींचं लेखन केलं. त्यात शेरलॉक होम्स मालिकेतल्या ४ कादंबर्‍या आणि ५ कथासंग्रहांचासमावेश आहे.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eरहस्यकथा-लेखनातला एक मापदंड म्हणून आजही जगभर या कादंबर्‍या ओळखल्या जातात. त्यांच्या लिखाणावर आजवर अनेक चित्रपट, टीव्ही मालिका, नाटकं रचली गेली आहेत. एक शतकाहून अधिक काळ लोटून गेल्यानंतरही लहान-मोठे वाचक त्यांच्या सुरस आणि चमत्कृतीपूर्ण कथांचा मनमुराद आस्वाद घेत आहेत.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e1. द हाउंड ऑफ बास्करव्हिल्स\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e2. अ स्टडी इन स्कार्लेट\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e3. द व्हॅली ऑफ फीअर\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e4. द साईन ऑफ फोर\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eMarathi translation of four Sherlock Holmes novels  1. The Hound of the Baskervilles, 2. A study in Scarlet, 3. The Valley of Fear , 4. The Sign of Four\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964777750819,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1046.jpg?v=1750158139"},{"product_id":"rudraprayag","title":"रुद्रप्रयागचा नरभक्षक बिबट्या | सुप्रसिद्ध शिकारी व निसर्गसंवर्धक जिम कॉर्बेटच्या अजरामर शिकारकथा","description":"\u003cp\u003eएका अवलिया शिकार्‍याच्या या अजब शिकारकथा आहेत. या थरारक आहेत, पण फक्त थराराचाच अनुभव देणार्‍या कथा नाहीत. माणूस आणि प्राणी यांच्यातला निसर्ग सांगणार्‍या, त्यांच्यातली पेचात टाकणारी समीकरणं दर्शवणार्‍या कथा आहेत. आजच्या गतिमान युगाला अपेक्षित टिपेच्या अनुभवाची कुठलीही कळ त्या दाबत नाहीत, पण पाऊलही न वाजवता निसर्गासोबतच्या दीर्घ प्रवासाची खुमारी आणि त्याच्या सूक्ष्म निरीक्षणांचे अमीट तरंग त्या मनावर उमटवल्याशिवाय राहत नाहीत.\u003cbr\u003eखड्ड्यात मरून पडलेला बिबट्या नरभक्षकच असल्याचं सिद्ध करण्यासाठीचा कोणताही पुरावा माझ्यासमोर नव्हता, पण तो नरभक्षक बिबट्याच असल्याचं समजायला मला एका सेकंदाचाही वेळ लागला नव्हता. मात्र तो त्या पंडितच्या भाषेतला कुणी सैतान नव्हता. मला रात्र रात्र जागायला लावून कुठूनतरी मला बघत असलेला, त्याला मारण्याचे माझे प्रयत्न व्यर्थ चाललेले बघून विकट हसत असलेला, माझ्या बेसावध होण्याची जिभल्या चाटत वाट बघणारा, माझ्या गळ्यात आपले सुळे रोवायच्या संधीची वाट बघत असणारा कुणी दुष्ट प्राणी नव्हता. इथे तर एक साधा, वय झालेला बिबट्या मरून पडला होता. त्याचा गुन्हा एकच होता. तोही निसर्गाच्या कायद्याच्या विरुद्ध केलेला गुन्हा नव्हता, तर मानवतेच्या विरुद्ध केलेला गुन्हा होता. तो म्हणजे, त्याने माणसाचं रक्त सांडलं होतं. त्यातून त्याला माणसांमध्ये दहशत माजवायची होती, असंही नव्हतं. तर त्याला स्वत:ला जगायचं होतं. त्यासाठी त्याने हे सगळे उद्योग केले होते!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eMarathi translation of Man-eating Leopard of Rudraprayag by Jim Corbett. Translation by Vaishali Chitnis\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964778504483,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1047fRudrapyagchaNarbhakshakBibtya.jpg?v=1750158174"},{"product_id":"kraantijyotii-saavitriibaaii-phule-strii-shikssnnaacaa-paayaa-rcnnaarii-dhgdhgtii-mshaal","title":"क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले - स्त्री-शिक्षणाचा पाया रचणारी धगधगती मशाल","description":"एक दिवस तर हद्दच झाली. सावित्रीबाई शाळेत निघालेल्या असताना त्यांच्या वाटेत एक धटिंगण गुंड येऊन उभा राहिला. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e‘‘ए बाई, बर्‍या बोलानं घरी जा... न्हाईतर फुडं जे व्हईल, त्याची जिम्मेदारी माझी नव्हं!’’ त्याने दम दिला. \u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eत्या गुंडाचा अविर्भाव बघून सावित्रीबाई क्षणभर गांगरल्या, पण त्यांनी लगेचच सगळं अवसान गोळा केलं आणि पुढे होऊन त्या गुंडाला एक जोरदार थप्पड लगावली. गुंडाला याची अजिबातच अपेक्षा नव्हती. सावित्रीबाईंनी त्याच्या धमकावण्याला उत्तरही दिलं, पण ते ऐकायला तो तिथे थांबलाच नव्हता. त्याने तडक पोबारा केला होता!\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eसमाजाचं काम करणार्‍या माणसाकडे जितकी आत्मीयता, तितकीच धमक आणि तितकाच संयमही लागतो. या तिन्हींचा अर्क म्हणजे ‘सावित्रीबाई फुले’! अर्थात अशा बाईला जर जोतिरावांसारख्या जोडीदाराची साथ मिळाली, तर ’स्त्री-पुरुष समानता’ हे फक्त शब्द राहत नाहीत. त्या संपूर्ण समाज-बदलाच्या पाऊलखुणा ठरतात.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eम्हणूनच हे पुस्तकं वाचकांच्या हाती ठेवणं, म्हणजे एका अर्थी उत्तम नागरिक घडवण्याच्या दिशेने छोटंसं पाऊल टाकणं!\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964779749667,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1055f.jpg?v=1750158240"},{"product_id":"koalache-sobati","title":"कोआलाचे सोबती - ऑस्ट्रेलियातील पंचतंत्र","description":"\" भारत काय किंवा इतर देश काय, प्रत्येक ठिकाणच्या संस्कृतीचं, निसर्गाचं स्वत:चं असं खास वैशिष्टय असतं. या पुस्तकातल्या कथांमधले प्राणी-पक्षी ऑस्ट्रेलियाचं वेगळेपण दाखवतात. या कथांमध्ये भौगोलिक वेगळेपण असलं, तरी माणसाला शहाणं करणार्‍या सार्‍या कथांची जातकुळी मात्र एकच असते!\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e‘ऑस्ट्रेलियातलं पंचतंत्र’ म्हणून शोभतील अशा या प्राणीपक्षी-कथांवर कुणा एका लेखकाचा शिक्का नाही. ऑस्ट्रेलियातले मूळचे रहिवासी असलेल्या आदिवासींच्या संस्कृतीत या कथा वर्षानुवर्षं चालत आल्या आहेत. ऑस्ट्रेलियातल्या आदिवासी संस्कृतीचं म्हणून एक वेगळंच विश्व आहे. या संस्कृतीतल्या प्राणी-पक्ष्यांच्या कथा विलक्षण आहेत. त्या तत्त्वचिंतनपर आहेत. म्हणूनच त्या मनात रेंगाळतात.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eभारतीय संस्कृतीप्रमाणे समृद्ध असणार्‍या दुसर्‍या एका संस्कृतीचा परिचय मुलांना व्हावा, म्हणून या कथा पुस्तक रूपाने प्रकाशित केल्या आहेत.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\"\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e","brand":"Diamond Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":53964781748515,"sku":"","price":0.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0702\/5452\/6755\/files\/1069koalachesobatifront.jpg?v=1750158324"}],"url":"https:\/\/kanakbook.in\/collections\/baal-kumaar-saahity.oembed","provider":"Kanak Books","version":"1.0","type":"link"}